1. ITNS 288N म्हणजे काय?

आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत स्वयं-निर्धारण कर आणि ब्लॉक निर्धारणासाठीच्या कर मागणीच्या पेमेंटसाठी ITNS 288N हा चलन फॉर्म वापरला जातो.

2. ITNS 288N अंतर्गत कोणते प्रमुख शीर्ष आणि लघू शीर्ष समाविष्ट आहेत?

प्रमुख शीर्ष:
-निगम कर (0020)
-आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त)(0021)
लघू शीर्ष :
-ब्लॉक निर्धारणासाठी स्वयं-निर्धारण कर (311)
-ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावर कर म्हणून मागणी पेमेंट (411)

3. 01/04/2026 पासून सुरू झालेल्या शोध कारवायांसाठी कोणता आयकर अधिनियम लागू असेल?

जर वापरकर्त्याला 01/04/2026 पासून सुरू करण्यात आलेल्या शोध कारवाईंशी संबंधित ब्लॉक कालावधीसाठी कराचा भरणा करायचा असेल, तर आयकर अधिनियम, 2025 लागू होईल. अन्यथा, कृपया आयकर अधिनियम, 1961 निवडा. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये सुरू करण्यात आलेल्या शोध कारवाईंसाठी प्रारंभिक कर वर्ष 2020 असेल.

4. आयकर पेमेंट करण्यासाठी मी ITNS 288N कुठे मिळवू शकतो/शकते?

लॉगिन केल्यानंतर:
ई-फाईल--> ई-कर भरणा--> लागू असलेला आयकर अधिनियम निवडा --> नवीन पेमेंट--> 'ब्लॉक निर्धारणासाठी स्वयं-निर्धारण कर (311)' आणि 'ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावरील कर मागणी पेमेंट (411)' टाइल
लॉगिनपूर्वी:
डॅशबोर्ड--> 'ई-कर भरणा क्विक लिंक'--> लागू असलेला आयकर अधिनियम निवडा--> पॅन आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करण्याची स्क्रीन--> ओटीपी पडताळणी--> 'ब्लॉक निर्धारणासाठी स्वयं-निर्धारण कर (311)' टाइल

5. ITNS 288N चा वापर करून केलेले कर पेमेंट फक्त प्रारंभिक कर वर्षासाठी लागू होते, की ते संपूर्ण ब्लॉक कालावधीसाठी असते?

ITNS 288N वापरून केलेले पेमेंट संबंधित संपूर्ण ब्लॉक कालावधीसाठी लागू होते; केवळ चलानात प्रविष्ट केलेल्या प्रारंभिक कर वर्षासाठीच नाही.

6. शोध घेतलेल्या व्यक्तीच्या (निर्दिष्ट व्यक्ती) बाबतीत ब्लॉक कालावधीसाठी प्रारंभिक कर वर्ष कोणते असेल?

चलनाच्या वरच्या भागात प्रविष्ट करावयाचे 'ब्लॉक कालावधीचे प्रारंभिक कर वर्ष' हे संबंधित ब्लॉक कालावधीतील प्रारंभिक कर वर्षाशी सुसंगत असावे. उदाहरणार्थ,
शोध कारवाई सुरू होण्याची तारीख 20/04/2026 आणि त्या शोध कारवाईसाठी दिलेल्या अधिकृत आदेशांपैकी शेवटच्या आदेशाची अंमलबजावणीची तारीख 15/05/2026 असल्यास, ब्लॉक कालावधी 01/04/2020 ते 15/05/2026 असा असेल. अशा परिस्थितीत, चलनाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात प्रविष्ट करावयाचे 'ब्लॉक कालावधीचे प्रारंभिक कर वर्ष' 2020 असेल.

7. अपील शुल्क भरताना कोणता घटक वापरावा?

अपील शुल्क भरत असल्यास, 'पेमेंटचे तपशील' अंतर्गत ती रक्कम 'इतर' म्हणून प्रविष्ट करा.

8. विविध प्रकारच्या पेमेंटसाठी एकाच चलानचा वापर केला जाऊ शकतो का?

 नाही, एकाच चलानचा वापर अनेक प्रकारच्या पेमेंटसाठी करता येत नाही. प्रत्येक प्रकारच्या पेमेंटसाठी वेगळे चलान तयार करणे आवश्यक आहे:
a) पुढील भरण्यासाठी एकच चलान वापरा:
कर, अधिभार आणि उपकर
b) पुढील प्रत्येकासाठी वेगळे चलान वापरा:
व्याज
दंड
इतर (अपील शुल्क, इत्यादी)

9. ब्लॉक निर्धारणाशी संबंधित मागणी पेमेंट मी कसे करू शकतो/शकते?

ब्लॉक निर्धारणांतर्गत उपस्थित केली गेलेली मागणी ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून ई-फाइलिंग → ई-कर भरणा → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → नवीन पेमेंट → "ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावरील कर म्हणून मागणी पेमेंट (411)" हा पर्याय निवडून भरता येते. अशा पेमेंटसाठी DRN (मागणी संदर्भ क्रमांक) अनिवार्य आहे. DRN वापरून पेमेंट करताना, संबंधित वर्षासाठीच्या पेमेंट स्क्रीनवर फक्त "DRN" हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर, प्रणाली संबंधित कर मागणीचा तपशील आपोआप मिळवते आणि तुम्हाला पेमेंट पेजवर पुनर्निर्देशित करते, जिथे तुम्ही पेमेंट पूर्ण करू शकता.

10. ब्लॉक निर्धारण संदर्भात ‘निर्दिष्ट व्यक्ती’ आणि ‘इतर व्यक्ती’ यांचा अर्थ काय आहे?

'निर्दिष्ट व्यक्ती' म्हणजे अशी व्यक्ती जिच्या संदर्भात कलम 247 अंतर्गत शोध कारवाई करण्यात आली आहे किंवा जिची लेखापुस्तके, इतर कागदपत्रे किंवा कोणतीही मालमत्ता कलम 248 अंतर्गत मागविण्यात आली आहे. तर 'इतर व्यक्ती' म्हणजे शोध घेतलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त (निर्दिष्ट व्यक्ती) अशी व्यक्ती, जिची कागदपत्रे, लेखापुस्तके किंवा मालमत्ता निर्दिष्ट व्यक्तीवर करण्यात आलेल्या शोध कारवाईदरम्यान आढळून आली आहेत किंवा निर्दिष्ट व्यक्तीच्या बाबतीत कलम 248 अंतर्गत मागविण्यात आली आहेत.

11. ब्लॉक निर्धारणासाठी 'इतर व्यक्ती' संदर्भातील पेमेंट करताना योग्य प्रारंभिक कर वर्ष कोणते असेल?

'इतर व्यक्ती' (Other Person) च्या बाबतीत, जिथे अघोषित उत्पन्न केवळ पुढील कालावधीशी संबंधित आहे—
(A)(i) शोध कारवाई किंवा मागणी सुरू झालेल्या वर्षाच्या तत्काळ आधीच्या कर वर्षापासून (ज्याला निर्दिष्ट वर्ष म्हटले जाते) सुरू होणारा; आणि
(ii) आणि शोध कारवाई सुरू झाल्याच्या किंवा मागणी करण्यात आल्याच्या तारखेला समाप्त होणारा असल्यास, कलम 301(a) मधील तरतुदींची पर्वा न करता, अशा इतर व्यक्तीच्या संदर्भातील ब्लॉक कालावधीत निर्दिष्ट वर्ष तसेच ज्या कर वर्षात शोध कारवाई सुरू झाली किंवा मागणी करण्यात आली त्या कर वर्षाच्या 1 एप्रिलपासून सुरू होऊन अशा शोध कारवाईसाठी किंवा अशा मागणीसाठी दिलेल्या अधिकृत आदेशांपैकी शेवटच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या तारखेपर्यंतचा कालावधी समाविष्ट असेल;
(B) ज्या प्रकरणात इतर व्यक्तीचे अघोषित उत्पन्न निर्दिष्ट वर्षाच्या आधीच्या पाच कर वर्षांपैकी केवळ एका कर वर्षाशी संबंधित असेल, त्या प्रकरणात, कलम 301(a) मधील तरतुदींची पर्वा न करता, अशा इतर व्यक्तीच्या संदर्भातील ब्लॉक कालावधीत फक्त त्या एकाच कर वर्षाचा समावेश असेल.
(C) वर समाविष्ट नसलेल्या प्रकरणांमध्ये, ब्लॉक कालावधीचे प्रारंभिक कर वर्ष हे शोध घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीत लागू असलेल्या प्रारंभिक कर वर्षाप्रमाणेच असेल.