1. प्रोटियन पोर्टलवर (पूर्वीचे NSDL) उपलब्ध असलेल्या “OLTAS कराचे ई-पेमेंट” च्या तुलनेत, ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नवीन ई-कर भरणा सेवेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?

नवीन ई-कर भरणा सेवेअंतर्गत, अधिकृत बँकांसाठी चलान (CRN) जनरेट करण्यापासून पेमेंट करणे आणि पेमेंट हिस्ट्री नोंदवण्यापर्यंत, प्रत्यक्ष कर पेमेंट करण्याशी संबंधित असलेली संपूर्ण प्रक्रिया ई-फाइलिंग पोर्टलद्वारे (होम | आयकर विभाग) सक्षम करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत, फॉर्म 141(कलम 393(1) अंतर्गत कर कपातीसाठी चलान सह विवरण) (पूर्वी फॉर्म 26QB/26QC/26QD/26QE म्हणून ओळखला जाणारा) फाइल करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

करदात्यांना पेमेंट करण्यासाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, बँक काउंटरवर पैसे भरा यांसह विविध पर्याय उपलब्ध आहेत.

नवीन कार्यप्रणालीमध्ये (काउंटरवर) पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या बँका थेट कर गोळा करण्यासाठी अधिकृत नाहीत, त्यांच्यामार्फत पेमेंट्स करण्यासाठी करदात्यांना RTGS/NEFT आणि पेमेंट गेटवे (नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI) यांसारख्या पद्धतींचा वापर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यप्रणालीद्वारे पेमेंट करण्यासाठी, ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा कार्यप्रणालीमध्ये चलान (CRN) तयार करणे हे अनिवार्य आहे. याशिवाय, ई-फाइलिंग पोर्टलमध्ये CSI (चलान स्थिती चौकशी) ही सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. TAN वापरकर्ते प्री लॉगिनमध्ये क्विक लिंक्सचा वापर करून CSI फाइल डाउनलोड करू शकतात आणि पर्यायाने, पोस्ट लॉगिन मध्ये, वापरकर्ते CSI फाईल डाउनलोड टॅब वर जाऊन ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेद्वारे केलेल्या कर भरणासाठी CSI फाइल डाउनलोड करू शकतात

2. ई-फाइलिंग पोर्टलद्वारे कर भरणा करणे आवश्यक असलेल्या अधिकृत बँका कोणत्या आहेत?

सध्या, खाली नमूद केलेल्या बँका ई-फाइलिंग पोर्टलद्वारे कर भरणा करण्यासाठी सक्षम आहेत. अधिकृत बँकांद्वारे कर भरणा केवळ ई-फाइलिंग पोर्टलद्वारेच करणे आवश्यक आहे. करदाते ई-फाइलिंग प्रणालीमध्ये NEFT/RTGS आणि पेमेंट गेटवे या नवीन पेमेंट पद्धतींद्वारे अनधिकृत बँकांमार्फत पेमेंट करू शकतात.

ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेमध्ये कर भरणा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या बँका

अ‍ॅक्सिस बँक

बंधन बँक

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ महाराष्ट्र

कॅनरा बँक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सिटी यूनियन बँक

डीसीबी बँक

फेडरल बँक

एचडीएफसी बँक

आयसीआयसीआय बँक

आयडीबीआय बँक

इंडियन बँक

इंडियन ओव्हरसीज बँक

इंडसइंड बँक

जम्मू आणि काश्मीर बँक

करुर वैश्य बँक

कोटक महिंद्रा बँक

पंजाब अँड सिंध बँक

पंजाब नॅशनल बँक

आरबीएल बँक

साउथ इंडियन बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया

युको बँक

युनियन बँक ऑफ इंडिया

धनलक्ष्मी बँक

आयडीएफसी फर्स्ट बँक

कर्नाटक बँक

भारतीय रिझर्व बँक

तमिळनाडू मर्कंटाइल बँक

येस बँक

अस्वीकरण: अधिकृत बँकांची यादी 25 मार्च 2026 रोजी अपडेट केलेली असून ती बदलत्या स्वरूपाची आहे.

3. अधिकृत बँकांव्यतिरिक्त इतर माध्यमातून कर भरणा करण्याची प्रक्रिया काय आहे?

अधिकृत बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमार्फत कर भरणा ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेमध्ये NEFT/RTGS किंवा पेमेंट गेटवेच्या माध्यमातून करता येतो

4. ई-कर भरणा सुविधा कशी ॲक्सेस करायची?

ई-कर भरणा सुविधा ॲक्सेस करण्यासाठी, करदात्याने होम | आयकर विभागाला भेट देणे आवश्यक आहे, जिथे ही सुविधा प्री-लॉगिन (होमपेजवरील क्विक लिंक्स अंतर्गत) तसेच पोस्ट-लॉगिन पद्धतीमध्ये उपलब्ध आहे.

5. कर भरणा करण्यासाठी चलान (CRN) तयार करणे आवश्यक आहे का?

ई-फाइलिंग पोर्टलवर ई-कर भरणा सेवेमध्ये, थेट कर भरण्यासाठी चलान जनरेट करणे अनिवार्य आहे. अशा प्रत्येक जनरेट केलेल्या चलानशी संबंधित एक अनन्य चलान संदर्भ क्रमांक (CRN) असेल.

6. कोणाला चलान (CRN) जनरेट करता येईल?

थेट कर भरणा करणे आवश्यक असलेला आणि ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेचा वापर करण्यास इच्छुक असलेला कोणताही करदाता (कर कपातकर्ता आणि संकलककर्ता यांच्यासह) चलान (CRN) जनरेट करू शकतो. सेवेमध्ये उपलब्ध असलेल्या पोस्ट-लॉगिन/प्री-लॉगिन पर्यायाद्वारे चलान (CRN) जनरेट केले जाऊ शकते.

7. चलान (CRN) जनरेट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धती कोणत्या आहेत?

चलान (CRN) जनरेट केल्यानंतर, कर भरणा करण्यासाठी खालील पद्धती उपलब्ध आहेत:

  • नेट बँकिंग (अधिकृत बँकांची निवड करा)
  • डेबिट कार्ड (अधिकृत बँकांची निवड करा)
  • बँक काउंटरवर पैसे भरा (निवडक अधिकृत बँकांच्या शाखांमध्ये काउंटरवर पेमेंट करणे)
  • RTGS / NEFT (अशी सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेद्वारे)
  • पेमेंट गेटवे (नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि कोणत्याही बँकेचे UPI म्हणून सब-पेमेंट पद्धतींचा वापर करणे)

नोंद घ्यावी की, एखादी कंपनी असलेला करदाता किंवा (कंपनी व्यतिरिक्त) अशी व्यक्ती ज्यांना नियम 333 नुसार आयकर कायदा, 2025 च्या कलम 63 च्या तरतुदी (करदात्यांना त्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे) लागू आहेत, त्यांना कर भरणा करण्याच्या "बँकेमध्ये पैसे भरा" या पद्धतीचा वापर करता येणार नाही.

8. करदात्याला चुकून भरलेल्या कराच्या रकमेचा परतावा/रिव्हर्सल करण्याची विनंती करता येते का?

चुकून भरलेल्या चलान रकमेच्या परताव्याची किंवा रिव्हर्सलची विनंती आयकर ई-फाइलिंग पोर्टलद्वारे हाताळली जाऊ शकत नाही.
करदात्याला पुढीलप्रमाणे सल्ला दिला जातो:

  1. संबंधित निर्धारण वर्ष/कर वर्षासाठीच्या आयकर विवरणपत्रात (ITR) रकमेचा कर क्रेडिट म्हणून दावा करा, किंवा
  2. चुकून भरलेल्या कराच्या परताव्यासाठी/समायोजनासाठी अधिकारक्षेत्रतील निर्धारण अधिकाऱ्याकडे (AO) विनंती सादर करावी

9. चलान (CRN) तयार केल्यानंतर कोणतेही पेमेंट सुरू न झाल्यास काय होईल?

अंशतः तयार केलेले चलान, जोपर्यंत चलान संदर्भ क्रमांकासह (CRN) अंतिमरित्या जनरेट केले जात नाही तोपर्यंत ते "सेव्ह केलेले ड्राफ्ट्स" या टॅबमध्येच राहते. CRN जनरेट केल्यानंतर, ते "जनरेट केलेले चलान" टॅबमध्ये जाते आणि CRN जनरेट झाल्याच्या तारखेनंतर 15 दिवसांसाठी वैध असते. या वैधतेच्या कालावधीत संबंधित करदाता CRN साठी पेमेंट सुरू करू शकतो. या कालावधीत कोणतेही पेमेंट सुरू न केल्यास, CRN कालबाह्य होईल आणि करदात्याला पेमेंट करण्यासाठी नवीन CRN जनरेट करावा लागेल.

जर, 'अग्रिम कर' भरण्यासाठी 16 मार्च रोजी किंवा त्यानंतर चलान (CRN) जनरेट केले गेले असेल, तर त्याच्या वैधतेची अंतिम तारीख डीफॉल्टनुसार त्या आर्थिक वर्षाची 31 मार्च अशी निश्चित केली जाते.

10. चलान फॉर्म (CRN) वर प्रिंट केलेल्या "वैधतेची अंतिम तारीख" या तारखेचा अर्थ काय आहे?

“वैधतेची अंतिम तारीख” ही ती तारीख आहे, ज्या तारखेपर्यंत चलान फॉर्म (CRN) पेमेंट करण्यासाठी वैध राहतो. “वैधतेची अंतिम तारीख” तारखेच्या कालबाह्यतेनंतर, न वापरलेल्या चलान फॉर्मची (CRN) स्थिती कालबाह्य अशी बदलली जाते. उदाहरणार्थ, जर 1 एप्रिल रोजी CRN जनरेट झाला असेल, तर तो 16 एप्रिलपर्यंत वैध राहील आणि तोपर्यंत त्या CRN साठी पेमेंट सुरू न केल्यास, 17 एप्रिल रोजी CRN ची स्थिती कालबाह्य अशी बदलली जाईल.

जर करदात्याने धनादेशाचा "बँक काउंटरवर पैसे भरा" पद्धती म्हणून वापर करत असताना, "वैधतेची अंतिम तारीख" या तारखेला किंवा त्या तारखेपूर्वी अधिकृत बँकेकडे पेमेंट इंस्ट्रुमेंट सादर केले, तर चलानची "वैधतेची अंतिम तारीख" ही तारीख अतिरिक्त 90 दिवसांनी वाढवली जाईल.

'अग्रिम कर' चे पेमेंट करण्यासाठी 16 मार्च रोजी किंवा त्यानंतर चलान फॉर्म (CRN) जनरेट केला गेला असेल, तर वैधतेची अंतिम तारीख, डीफॉल्टनुसार त्या आर्थिक वर्षाच्या 31 मार्च अशी सेट केलेली असते.

11. करदात्याला जनरेट केलेले चलान (CRN) कुठे पाहता येईल? करदात्याला कालबाह्य झालेले चलान (CRN) पाहता येतील का?

करदाता जनरेट केलेले चलान (CRN) हे, ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ई-कर भरणा या पेजवर “जनरेट केलेले चलान” टॅब अंतर्गत पाहू शकतात.

कालबाह्य झालेले चलान (CRN), हे "वैधतेची अंतिम तारीख" पासून 30 दिवसांसाठी ई-कर भरणा पेजवर जनरेट केलेले चलान टॅब अंतर्गत देखील उपलब्ध असेल.

12. करदाते आधीच जनरेट केलेल्या चलानमध्ये (CRN) बदल करू शकतात का?

नाही. एकदा चलान (CRN) जनरेट झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येत नाही. तथापि, पूर्वीच्या चलान (CRN) मधील माहिती कॉपी करून नवीन चलान जनरेट केले जाऊ शकते.

13. चलान (CRN) जनरेट करताना करदात्याने पेमेंटची पद्धत निवडणे आवश्यक आहे का?

होय, करदात्याने चलान (CRN) जनरेट करताना पेमेंटची पद्धत अनिवार्यपणे निवडणे आवश्यक आहे.

14. चलान (CRN) जनरेट केल्यानंतर करदात्याला कर भरणा करण्याची पद्धत बदलता येईल का?

एकदा चलान (CRN) जनरेट झाल्यानंतर, करदात्याला पेमेंटची पद्धत बदलता येत नाही.

जर करदात्याला कर भरणा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने करायचा असल्यास, नवीन चलान (CRN) जनरेट करावे लागेल आणि जुने चलान 15 दिवसांनंतर कालबाह्य होईल.

15. कर भरणा प्रक्रिया यशस्वी झाली आहे हे करदात्याला कसे कळेल?

कर भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एक चलान पावती जनरेट केली जाते. चलान पावतीमध्ये चलान ओळख क्रमांक (CIN), BSR कोड आणि पेमेंटची तारीख आणि इतर संबंधित माहिती समाविष्ट असते. त्याचबरोबर, CRN ची स्थिती देखील "पेमेंट हिस्ट्री" टॅब अंतर्गत "पैसे भरले" म्हणून अपडेट केली जाते. करदाते पेमेंट हिस्ट्री विभागातून ही चलान पावती डाउनलोड करून पाहू शकतात.

16. चलानच्या ड्राफ्ट स्थितीचा अर्थ काय आहे?

ई-कर भरणा कार्यप्रणालीच्या "सेव्ह केलेले ड्राफ्ट्स" टॅब अंतर्गत चलान सेव्ह केले जाते. अंतिम सेव्ह केलेल्या ड्राफ्टपासून 15 दिवसांमध्ये CRN संपादित आणि जनरेट करण्यासाठी हे पुनर्प्राप्त केले जाऊ शकते.

17. चलान (CRN) च्या "जनरेट केलेले चलान" टॅबमध्ये दर्शविल्या जाणाऱ्या "पेमेंट सुरू झाले नाही" या स्थितीचा अर्थ काय आहे?

“पेमेंट सुरू झाले नाही” ही स्थिती असे दर्शवते की, जरी एखादे वैध चलान (CRN) जनरेट झाले असले, तरीही त्या चलानासाठी पेमेंट सुरू झालेले नाही.

  • करदात्याने ई-फाइलिंग पोर्टलवरून ऑनलाइन व्यवहार सुरू करेपर्यंत, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतींद्वारे निवडलेल्या ई-पेमेंट्ससाठी ही स्थिती दर्शविली जाते.
  • करदात्याद्वारे बँके शाखेत पेमेंट इंस्ट्रुमेंट सादर करेपर्यंत ही स्थिती "बँक काउंटरवर पैसे भरा" या पद्धतीसाठी दर्शविली जाते.
  • ही स्थिती RTGS/NEFT पद्धतीसाठी भारतीय रिझर्व बँक (लाभार्थी बँक) द्वारे कर वित्तप्रेषण प्राप्त होईपर्यंत दर्शविली जाते.

18. जनरेट केलेले चलान" टॅब अंतर्गत दर्शविल्या जाणाऱ्या चलानाची (CRN) "सुरू झाले" स्थिती म्हणजे काय?

करदाता जेव्हा ई-फाइलिंग पोर्टलवरून नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतीच्या माध्यमातून CRN साठी पेमेंट सुरू करतो तेव्हा “सुरू झाले” ही स्थिती दर्शविली जाते. एकदा पेमेंट करणे सुरू झाल्यानंतर, करदाता त्याच CRN साठी त्या CRN ची स्थिती काहीही असली तरी पेमेंट पुन्हा सुरू करू शकत नाही. करदाता आवश्यक असल्यास, नवीन CRN तयार करण्यासाठी "कॉपी” सुविधेचा वापर करू शकतो.

19. जनरेट केलेले चलान" टॅब अंतर्गत दर्शविल्या जाणाऱ्या चलानाची (CRN) "बँकेकडून कोणताही प्रतिसाद नाही" स्थिती म्हणजे काय?

जर पेमेंट नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतींद्वारे सुरू केले असेल, परंतु पेमेंट सुरू केल्यापासून 30 मिनिटांच्या आत आदात्याच्या बँकेकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नसेल तर “बँकेकडून कोणताही प्रतिसाद नाही” अशी स्थिती दर्शविली जाते.

बँकेकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यास आणि देयकदाराच्या खात्यातून रक्कम डेबिट झाल्यास, करदात्याला एक दिवस प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो कारण ई-फाइलिंग पोर्टल बँकेशी CRN ची जुळवाजुळव करेल आणि त्यानुसार CRN ची स्थिती अपडेट करेल. जर CRN ची स्थिती अद्याप अपडेट झाली नसेल, तर करदात्याला त्यांच्या बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

20. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "पेमेंट अयशस्वी" या स्थितीचा अर्थ काय आहे?

जर नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतींद्वारे पेमेंट सुरू केले असेल, परंतु ई-फाइलिंग पोर्टलला आदात्याच्या बँकेकडून पेमेंट अयशस्वी झाल्याची स्थिती प्राप्त झाली असेल तर “पेमेंट अयशस्वी” ही स्थिती दर्शविली जाते.

जर CRN ची दर्शविलेली स्थिती “पेमेंट अयशस्वी” अशी असेल आणि करदात्याच्या खात्यातून रक्कम वजा झाली असेल, तर करदात्याला त्यांच्या बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

21. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "बँक क्लीअरन्सच्या प्रतीक्षेत" या स्थितीचा अर्थ काय आहे?

जर "बँक काउंटरवर पैसे भरा" पद्धतीद्वारे पेमेंट सुरू केले असेल आणि करदात्याने बँकेच्या काउंटरसमोर पेमेंट इन्स्ट्रुमेंट सादर केले असेल तर “बँक क्लीअरन्सच्या प्रतीक्षेत” अशी स्थिती दर्शविली जाते. बँकेकडून पेमेंट इन्स्ट्रुमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर, स्थिती "पैसे भरले" अशी अपडेट केली जाईल.

22.जनरेट केलेले चलान” टॅब अंतर्गत दर्शविल्या जाणाऱ्या चलान (CRN) च्या "पेमेंट DD-MMM-YYYY रोजी नियोजित केले आहे" या स्थितीचा अर्थ काय आहे?

ही स्थिती नेट बँकिंग पद्धती अंतर्गत पूर्व-अधिकृत डेबिट व्यवहारांसाठी दर्शविली जाते, यामध्ये करदात्याने निवडलेल्या पेमेंटची नियोजित तारीख दर्शविली जाते. ही स्थिती पेमेंटच्या वसुलीच्या आधारावर नियोजित तारखेला अपडेट केली जाईल.

23. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "बँकेकडून चुकीचे तपशील" या स्थितीचा अर्थ काय आहे?

बँकेने ई-फाइलिंग पोर्टलला दिलेले CIN तपशील (पेमेंट पुष्टीकरण तपशील) आणि ई-फाइलिंग पोर्टलवरील उपलब्ध तपशील यांच्यात विसंगती असल्यास, ही स्थिती पेमेंटच्या कोणत्याही पद्धतीसाठी दर्शविली जाते. जुळवाजुळव झाल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलद्वारे योग्य तपशील प्राप्त झाल्यानंतर ही स्थिती अपडेट केली जाईल.

24. जनरेट केलेले चलान" टॅब अंतर्गत दर्शविल्या जाणाऱ्या चलान (CRN) च्या “धनादेश / डिमांड ड्राफ्ट अनादरण” स्थितीचा अर्थ काय आहे?

करदात्याने "बँक काउंटरवर पैसे भरा" पद्धतीद्वारे पेमेंट करण्यासाठी सादर केलेला डिमांड ड्राफ्ट/धनादेश नाकारला गेल्यास ही स्थिती दर्शविली जाते.

25. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "कालबाह्य" या स्थितीचा अर्थ काय आहे?

चलान (CRN) जनरेट झाल्यानंतर, ते जनरेट झालेल्या तारखेपासून 15 दिवसांसाठी वैध असते. या वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर न वापरलेल्या CRN ची स्थिती "कालबाह्य" अशी बदलली जाते. या वैधता कालावधीमध्ये, करदाता CRN साठी पेमेंट सुरू करू शकतो.

"बँक काउंटरवर पैसे भरा" पद्धती वापरताना, करदात्याने CRN कालबाह्य होण्यापूर्वी अधिकृत बँकेत पेमेंट इंस्ट्रुमेंट सादर केल्यास, चलानाची वैधता कालावधी अतिरिक्त 90 दिवसांनी वाढवला जाईल.

26. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "व्यवहार रद्द झाला" या स्थितीचा अर्थ काय आहे?

करदात्याने नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतींद्वारे सुरू केलेला व्यवहार रद्द केल्यास ही स्थिती दर्शविली जाते.

27. जनरेट केलेले चलान" या टॅब अंतर्गत दर्शविलेल्या चलान (CRN) च्या "बँकेच्या पुष्टीकरणाची प्रतीक्षा करत आहे" या स्थितीचा अर्थ काय आहे?

नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा पेमेंट गेटवे पद्धतींच्या माध्यमातून केलेल्या पेमेंटसाठी आदात्याच्या बँकेकडून पेमेंटचे पुष्टीकरण प्रतीक्षेत असताना ही स्थिती दर्शविली जाते.

28. चलान (CRN) च्या "पैसे भरले" या स्थितीचा अर्थ काय आहे?

जेव्हा करदात्याकडून पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण केले जाते आणि बँकेकडून त्याचे पुष्टीकरण प्राप्त होते तेव्हा ही स्थिती दर्शविली जाते.

29. ई-फाइलिंग पोर्टलद्वारे कर भरणा करण्यासाठी नेट बँकिंग पद्धत काय आहे?

या पद्धतीमध्ये, पेमेंट हे अधिकृत बँकांच्या नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून केले जाते. करदात्यांचे कोणत्याही अधिकृत बँकेत बँक खाते असेल, तर कर भरणा करण्यासाठी ते या पद्धतीचा लाभ घेऊ शकतात. या पद्धतीने कर भरणा करण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही.

30. करदाता नेट बँकिंग पद्धतीमध्ये नंतरच्या तारखेसाठी पेमेंट नियोजित करू शकतो का?

जर बँक ही सुविधा उपलब्ध करून देत असेल, तर करदाता नेट बँकिंग पद्धतीचा वापर करून त्याच्या/तिच्या बँक खात्यातून कर भरणा डेबिट करण्यासाठी वेळापत्रक ठरवू शकतो. तथापि, पेमेंट करण्याची नियोजित तारीख, चलान (CRN) मध्ये उल्लेख केलेल्या “वैधतेची अंतिम तारीख” या तारखेला किंवा त्यापूर्वीची असणे आवश्यक आहे. करदात्याने नेट बँकिंग पद्धती वापरून भविष्यातील तारखेसाठी पेमेंटचे वेळापत्रक निवडल्यास, त्याने/तिने कर भरणा करण्याच्या तारखेला निवडलेल्या बँक खात्यामध्ये पुरेशी शिल्लक रक्कम असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.

31. या पद्धतीमध्ये करदात्याला त्याची/तिची बँक दिसत नसल्यास, काय करावे?

या पद्धतीमध्ये, पेमेंट केवळ अधिकृत बँकांच्या नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातूनच केले जाऊ शकते. इतर कोणत्याही बँकेत खाते असलेले करदाते, पेमेंट गेटवे पद्धती अंतर्गत NEFT/RTGS पद्धत किंवा नेट बँकिंगचा पर्याय निवडू शकतात. बँक शुल्क NEFT/RTGS किंवा पेमेंट गेटवे पद्धतीमध्ये लागू होऊ शकतात.

32. पेमेंट प्रक्रियेदरम्यान, करदात्याचे खाते डेबिट केले जाते. तथापि, CRN ची स्थिती "पैसे भरले" मध्ये बदलली गेली नाही. करदात्याने काय करावे?

करदाता 30 मिनिटांनंतर CRN ची स्थिती पुन्हा तपासू शकतो कारण बँकेकडून ई-फाइलिंग पोर्टलला प्रतिसाद मिळाल्यानंतर ती अपडेट केली जाऊ शकते.  
जर, या वेळेत असा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर करदात्याला एक दिवस प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो. जर CRN ची स्थिती अद्याप अपडेट केली गेली नसेल, तर करदात्याला बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

33. डेबिट कार्ड पद्धत काय आहे?

या पद्धतीमध्ये, स्वतःच्या डेबिट कार्डद्वारे संकलनाची सुविधा ऑफर करणाऱ्या निवडक अधिकृत बँकांच्या डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येते. या पद्धतीने कर भरणा करण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही. इतर बँकांच्या डेबिट कार्डसाठी, कृपया “पेमेंट गेटवे” पद्धतीचा वापर करावा. तथापि, अतिरिक्त पेमेंट गेटवे शुल्क हे पेमेंट गेटवे पद्धतीनुसार लागू होऊ शकते.

34. या पद्धतीअंतर्गत पेमेंट करण्यासाठी निवडलेल्या सर्व अधिकृत बँकांचे डेबिट कार्ड वापरता येतील का?

या पद्धतीमध्ये, ज्या निवडक अधिकृत बँका त्यांच्या स्वतःच्या डेबिट कार्डद्वारे संकलनाची सुविधा देतात, त्या बँकांचे डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येते. इतर बँकांच्या डेबिट कार्डसाठी, कृपया “पेमेंट गेटवे” पद्धतीचा वापर करा. 

35. कर भरणा ऑफलाइन पद्धतीद्वारे केला जाऊ शकतो का?

होय, कर भरणा "बँकेमध्ये पैसे भरा (काउंटरवर)" च्या माध्यमातून आणि बँकेच्या काउंटरवर RTGS/NEFT पद्धतीद्वारे केला जाऊ शकतो. तथापि, चलान (CRN) केवळ ई-फाइलिंग पोर्टलच्या ई-कर भरणा सुविधेमधूनच जनरेट करणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धती अंतर्गत कर भरणा करण्यासाठी हाताने भरलेले कोणतेही चलान फॉर्म्स (CRN) वैध नाहीत.

नोंद घ्यावी की, एखादी कंपनी असलेला करदाता किंवा (कंपनी व्यतिरिक्त) अशी व्यक्ती जिला नियम 333 नुसार आयकर कायदा, 2025 च्या कलम 63 (करदात्यांना त्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे) च्या तरतुदी लागू आहेत, त्यांना कर भरणा करण्याच्या "बँकेमध्ये पैसे भरा" या पद्धतीचा वापर करता येत नाही

 

36. होय, कर भरणा "बँकेमध्ये पैसे भरा (काउंटरवर)" च्या माध्यमातून आणि बँकेच्या काउंटरवर RTGS/NEFT पद्धतीद्वारे केला जाऊ शकतो. तथापि, चलान (CRN) केवळ ई-फाइलिंग पोर्टलच्या ई-कर भरणा सुविधेमधूनच जनरेट करणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धती अंतर्गत कर भरणा करण्यासाठी हाताने भरलेले कोणतेही चलान फॉर्म्स (CRN) वैध नाहीत. नोंद घ्यावी की, एखादी कंपनी असलेला करदाता किंवा (कंपनी व्यतिरिक्त) अशी व्यक्ती जिला नियम 333 नुसार आयकर कायदा, 2025 च्या कलम 63 (करदात्यांना त्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे) च्या तरतुदी लागू आहेत, त्यांना कर भरणा करण्याच्या "बँकेमध्ये पैसे भरा" या पद्धतीचा वापर करता येत नाही

काउंटरवर (OTC) पद्धतीमध्ये, करदाता केवळ CRN जनरेट करतानाच निवडलेल्या अधिकृत बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये ऑफलाइन पद्धतीने (धनादेश/डिमांड ड्राफ्ट/ रोख) कर भरणा करू शकतो. या पद्धतीने कर भरणा करण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही.

अधिकृत बँकांव्यतिरिक्त इतर बँकांसाठी, करदात्याकडे RTGS/NEFT पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

37.करदाता धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे थेट कर भरू शकतो का? या इन्स्ट्रुमेंट्ससाठी परवानगी असलेल्या रकमेवर कोणतीही मर्यादा आहे का?

होय, करदाता "बँकेमध्ये पैसे भरा" पद्धत वापरुन धनादेश/डिमांड ड्राफ्टद्वारे पेमेंट करू शकतो. आयकर विभाग डिमांड ड्राफ्ट/धनादेशाद्वारे पेमेंट केलेल्या कर रकमेवर कोणतीही मर्यादा लादत नाही. तथापि, संबंधित अधिकृत बँकेच्या अंतर्गत धोरणानुसार, या उप-पद्धतींद्वारे कर भरणा करण्यावर मर्यादा असू शकते.

38. करदात्याला रोख स्वरूपात पेमेंट करता येईल का? रोख व्यवहारावर काही मर्यादा आहे का?

होय, करदाता काउंटरवर (OTC) रोख स्वरूपात पेमेंट करू शकतो. तथापि, रोख रकमेद्वारे कर भरणा हा प्रति चलान फॉर्म (CRN) कमाल रक्कम ₹ 10,000 पर्यंत मर्यादित आहे.

39. काउंटरवर (OTC) पद्धतीने कर भरणा करण्याची प्रक्रिया काय आहे?

काउंटरवर (OTC) पद्धतीने कर भरणा करण्यासाठी, चलान फॉर्म (CRN) जनरेट करताना, करदात्याने अधिकृत बँकांच्या यादीमधून ज्या बँकेद्वारे पेमेंट करायचे आहे, अशी बँक निवडणे आवश्यक आहे. चलान फॉर्म (CRN) जनरेट झाल्यानंतर, करदात्याने निवडलेल्या अधिकृत बँकेच्या शाखेत या चलान फॉर्मची (CRN) एक प्रिंट केलेली आणि स्वाक्षरी केलेली प्रत तसेच पेमेंट इन्स्ट्रुमेंट (धनादेश/डिमांड ड्राफ्ट/रोख) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

40. काउंटरवर (OTC) "बँकेमध्ये पैसे भरा" पद्धती अंतर्गत तयार केलेल्या चलान फॉर्म (CRN) चा वैधता कालावधी काय असतो?

चलान फॉर्म (CRN) चा वैधता कालावधी त्याच्या जनरेट केल्याच्या तारखेनंतर 15 दिवसांचा असतो, म्हणजेच जर CRN 1 एप्रिल रोजी जनरेट झाला असेल, तर तो 16 एप्रिलपर्यंत वैध राहील. करदात्याने या कालावधीत, निवडलेल्या अधिकृत बँकेच्या शाखेत पेमेंट इन्स्ट्रुमेंट सादर करणे आवश्यक आहे. जर करदात्याने चलान फॉर्म (CRN) वर उल्लेख केलेल्या वैधतेच्या कालावधीमध्ये अधिकृत बँकेकडे पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणून धनादेश/ डिमांड ड्राफ्ट सादर केला, तर चलानची वैध तारीख आणखी 90 दिवसांसाठी वाढवली जाईल.

41. जर पेमेंट, काउंटरवर (OTC) पद्धतीने धनादेश/डिमांड ड्राफ्टद्वारे केले असेल, तर कर भरणा करण्याची तारीख म्हणून कोणती तारीख विचारात घेतली जाईल?

धनादेश/डिमांड ड्राफ्टमार्फत "बँकेमध्ये पैसे भरा" पद्धतीद्वारे कर भरणा करण्याच्या बाबतीत, बँकेच्या शाखेत इंस्ट्रुमेंट सादर करण्याची तारीख ही कर भरणा करण्याची तारीख म्हणून मानली जाईल.

42. RTGS/NEFT पद्धतीद्वारे कर भरणा करण्यासाठी करदात्याद्वारे कोणत्या बँकांचा वापर केला जाऊ शकतो?

या पद्धतीमध्ये, कर भरणा करण्यासाठी RTGS/NEFT सेवा ऑफर करणाऱ्या कोणत्याही बँकेमार्फत कर भरणा केला जाऊ शकतो.

43. RTGS/NEFT द्वारे कर भरणा करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क/फी आहे का?

बँक शुल्क, लागू असल्यास, संबंधित ओरिजिनेटर बँकेने (ज्या बँकेद्वारे लाभार्थीच्या खात्यात कर रक्कम हस्तांतरित केली जाईल) विहित केलेल्या नियम आणि अटींच्या अधीन असेल. बँक शुल्क हे आदेश फॉर्ममध्ये निर्दिष्ट केलेल्या कराच्या रकमेपेक्षा जास्त असेल आणि या शुल्कांमुळे आयकर विभागाला कोणत्याही प्रकारे लाभ होत नाही.

44. मी RTGS/NEFT पद्धती अंतर्गत रोख रक्कम भरू शकतो का?

नाही, करदाता या पद्धती अंतर्गत पेमेंट करण्यासाठी रोख रक्कम वापरू शकत नाही.

45. RTGS/NEFT पद्धती अंतर्गत कर भरणा करण्याची प्रक्रिया काय आहे?

या पद्धतीमध्ये, एक मँडेट फॉर्म जनरेट केला जातो ज्यामध्ये लाभार्थीच्या खात्याची माहिती असते ज्यामध्ये कर वित्तप्रेषण करणे आवश्यक आहे. करदात्याने प्रिंट केलेला आणि स्वाक्षरी केलेला मँडेट फॉर्म घेणे आवश्यक आहे आणि पेमेंट इंस्ट्रुमेंट (धनादेश/डिमांड ड्राफ्ट) सह बँकेत प्रस्तुत करणे आवश्यक आहे.

करदाता, मँडेट फॉर्ममध्ये उपलब्ध माहितीसह लाभार्थी जोडून आणि जोडलेल्या खात्यात रक्कम हस्तांतरित करून कराची रक्कम रेमिट करून, या पद्धतीद्वारे कर भरणा करण्यासाठी, त्यांच्या बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा उपयोग देखील करू शकतात.

46. नेट बँकिंग सुविधेचा उपयोग करून कर भरणा करण्यासाठी RTGS/NEFT करता येईल का?

करदाता, मँडेट फॉर्ममध्ये उपलब्ध माहितीसह लाभार्थी जोडून आणि जोडलेल्या खात्यात रक्कम हस्तांतरित करून कराची रक्कम रेमिट करून, या पद्धतीच्या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याच्या नेट बँकिंगचा (अशी सुविधा त्यांच्या बँकेने प्रदान केली असल्यास) देखील उपयोग करू शकतात.

47. मँडेट फॉर्म म्हणजे काय? याची आवश्यकता कधी आहे?

करदाता जेव्हा कर भरणा पद्धती म्हणून RTGS/NEFT निवडतो तेव्हा मँडेट फॉर्म जनरेट केला जातो. त्यात ज्या लाभार्थी खात्यामध्ये कर वित्तप्रेषण पाठवायचे आहे, त्या खात्याचे तपशील असतील.

48.RTGS/NEFT पद्धती अंतर्गत पेमेंट करण्यासाठी करदात्याने जनरेट केलेल्या मँडेट फॉर्मचा वैधता कालावधी किती आहे?

मँडेट फॉर्मची वैधता त्याच्या तयार केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांची असते. RTGS/ NEFT रेमिटन्स मँडेट फॉर्मवर उल्लेख केलेल्या "वैधतेची अंतिम तारीख" या तारखेला किंवा त्यापूर्वी गंतव्य बँकेत (भारतीय रिझर्व बँक) पोहोचणे आवश्यक आहे. कोणताही विलंब झाल्यास, RTGS/ NEFT व्यवहार मूळ खात्यात परत केला जाईल. RTGS/ NEFT रेमिटन्स लाभार्थ्यांच्या खात्यात "वैधतेची अंतिम तारीख" या तारखेपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे ही मूळ बँकेची जबाबदारी असेल आणि कोणत्याही विलंबासाठी आयकर विभाग किंवा भारतीय रिझर्व बँक उत्तरदायी राहणार नाही.

49. कर भरणा करण्यासाठी ओरिजिनेटर बँक/करदात्याने मँडेट फॉर्ममध्ये उल्लेख केलेले तपशील स्वतःहून (मॅन्युअली) प्रविष्ट करणे आवश्यक आहे का?

होय, RTGS/NEFT व्यवहार करताना मँडेट फॉर्ममध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योग्य तपशील प्रविष्ट करणे ही ओरिजिनेटर बँक/करदात्याची (ऑनलाइन ट्रान्सफरच्या बाबतीत) जबाबदारी असेल. कोणत्याही विसंगती आढळल्यास, RTGS/NEFT व्यवहार नाकारला जाऊ शकतो आणि अशा विसंगतीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही परिणामांसाठी आयकर विभाग किंवा भारतीय रिझर्व बँक उत्तरदायी राहणार नाही.

50. कोणत्या इन्स्ट्रुमेंट्सद्वारे करदाता पेमेंट गेटवेद्वारे कर भरणा करू शकतो?

पेमेंट गेटवे ही पेमेंटची आणखी एक पद्धत आहे जी करदात्याला ई-फाइलिंग पोर्टलवर ई-कर भरणा सेवेशी संलग्न असलेल्या पेमेंट गेटवेशी संबंधित निवडक बँकांच्या खालील इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून कर भरणा करण्याची सुविधा प्रदान करते:

  1. नेट बँकिंग
  2. डेबिट कार्ड
  3. क्रेडिट कार्ड
  4. UPI

टीप: अधिकृत बँकेमार्फत डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग पद्धतीद्वारे थेट कर भरणे देखील शक्य आहे.

51. पेमेंट गेटवेद्वारे कर भरणा करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते? त्या कर रकमे मध्ये पेमेंट गेटवे शुल्क समाविष्ट असेल का?

पेमेंट गेटवे पद्धतीद्वारे कर भरणा करण्यासाठी आकारण्यात येणारे फी/सेवा शुल्क हे संबंधित बँकेच्या नियम आणि अटी यानुसार आणि या संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील. येथे याची नोंद घ्यावी की, ई-फाइलिंग पोर्टल/आयकर विभाग अशा कोणत्याही प्रकारची शुल्क आकारत नाही. असे शुल्क/फी बँकेकडे/पेमेंट गेटवेकडे जाईल आणि ते कराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. तथापि, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रुपे डेबिड कार्ड, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (BHIM-UPI) आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) (BHIM-UPI QR कोड) द्वारे केलेल्या पेमेंटवर असे कोणतेही शुल्क/व्यापारी सवलत दर (MDR) शुल्क आकारले जाणार नाही.

याव्यतिरिक्त, पोर्टलवरील ‘पेमेंट गेटवे’ पेमेंट पद्धतीमध्ये पेमेंट गेटवे सेवा देणाऱ्या सर्व बँकांचे व्यवहार शुल्क सूचीबद्ध केले आहे.

52.पेमेंट गेटवेद्वारे केलेल्या पण पुष्टीकरण प्राप्त न झालेल्या कर भरणाबद्दल चौकशी कशी करावी? कोणत्या प्राधिकरणाशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे?

करदात्याच्या खात्यातून पैसे गेले असतील किंवा क्रेडिट कार्डवर शुल्क आकारले गेले असेल पण CRN ची स्थिती "पैसे भरले" वर अपडेट केली गेली नसेल, तर करदाता 30 मिनिटांनंतर CRN ची स्थिती पुन्हा तपासू शकतो कारण पेमेंट गेटवेकडून ई-फाइलिंग पोर्टलला प्रतिसाद मिळाल्यानंतर ती अपडेट केली जाऊ शकते. जर, या वेळेत असा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर करदात्याला एक दिवस प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो. जर CRN ची स्थिती अद्याप अपडेट केली गेली नसेल, तर करदात्याला संबंधित पैसे देणाऱ्या बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

53. ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेद्वारे ऑनलाइन कर भरणा स्वीकारण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा आहे का?

ई-फाइलिंग पोर्टलवर ई-कर भरणा सेवेद्वारे ऑनलाइन पेमेंट 24/7 उपलब्ध आहे. तथापि, अधिक माहितीसाठी आपल्याला बँकेच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येतो.

54. मी मागील कोणत्याही वर्षाची थकीत कर मागणी कशी भरू शकतो?

आयकर पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, ई-कर भरणा सेवेमध्ये उपलब्ध असलेल्या 'नियमित मूल्यांकन कर म्हणून मागणी पेमेंट' पेमेंट टाइलमध्ये पॅन आणि निर्धारण वर्ष यांच्या संयोजनासाठीच्या सर्व थकीत कर मागण्या आपोआप भरल्या जातील. विविध उपलब्ध पद्धतींद्वारे कर रेमिटन्ससाठी संबंधित मागणी निवडली जाऊ शकते.
तसेच, करदाता लॉगिन करण्यापूर्वी (ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करण्यापूर्वी) किंवा लॉगिन केल्यानंतरच्या (ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन केल्यानंतर) सुविधेद्वारे मागणीच्या संदर्भ क्रमांकाशिवाय नियमित मूल्यांकन कर (400) म्हणून मागणी पेमेंट करू शकतो.

55. ई-कर भरणा प्रक्रियेद्वारे पेमेंट करण्याऐवजी, ऑनलाइन ITR भरताना मी देय कर थेट भरू शकतो का?

होय, ITR भरताना आपण देय कराचे पेमेंट थेट करू शकता. ऑनलाइन ITR प्रक्रियेतून पुनर्निर्देशित केल्यानंतर, ई-कर भरणा सेवेमध्ये तपशील आपोआप भरले जातात. चलानचे पेमेंट केल्यानंतर, कृपया चलानचा दावा करण्यासाठी ITR सबमिट करण्यापूर्वी, पेमेंट तपशील संबंधित अनुसूचीमध्ये भरले असल्याचे सुनिश्चित करा.

56.पेमेंट हिस्ट्री टॅब अंतर्गत यशस्वीरित्या भरलेले चलान किती काळ दर्शविले जातील?

अशी कोणतीही वेळेची मर्यादा नाही. तथापि, आपल्याला आपल्या रेकॉर्डसाठी तत्काळ चलान डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.

57. बँकेचे नाव डेबिट कार्ड पेमेंट पद्धतीमध्ये दिसत नसेल तर?

या बाबतीत, उपलब्धतेनुसार करदाता इतर अधिकृत बँकेच्या डेबिट कार्ड पद्धतीचा वापर करून पेमेंट करण्यासाठी उपलब्ध पेमेंट गेटवे पद्धत निवडू शकतो.

58. कोणत्या परिस्थितीत, ऑनलाइन कर भरणे अनिवार्य आहे?

आयकर नियम 2026 च्या नियम 333 नुसार, खाली दिलेल्या करदात्यांच्या श्रेणींना ऑनलाइन कर भरणा करणे अनिवार्य आहे :-
1. प्रत्येक कंपनी
2. अशी व्यक्ती (कंपनी व्यतिरिक्त), जी आयकर कायदा, 2025 च्या कलम 63 मधील तरतुदींच्या अधीन आहे

59. ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी माझ्याकडून माझी स्थळप्रत गहाळ झाली असल्यास, मी कोणाशी संपर्क साधू शकतो?

पेमेंट यशस्वी झाल्यास, आयकर पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ई-कर भरणा सेवा अंतर्गत पेमेंट हिट्री टॅबमध्ये चलान पावती नेहमी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असते.

60. पेमेंट लघु शीर्ष 500 अंतर्गत केले असेल तर करदात्याला परतावा मिळू शकेल का?

सध्याच्या कायदेशीर चौकटीनुसार, लघु शीर्ष 500 अंतर्गत करण्यात आलेल्या पेमेंटसाठी परताव्याची कोणतीही तरतूद नाही.

61.जर मी TDS/TCS पेमेंट केले असेल, परंतु पेमेंट केल्यानंतर चलान डाउनलोड करायला विसरलो, तर मी ते चलान कसे ॲक्सेस करू शकतो?

तुम्ही आयकर पोर्टलवर तुमच्या TAN खात्यामध्ये लॉगिन करून TDS/TCS पेमेंटची चलान पावती ॲक्सेस करू शकता.

62. माझ्या कराचा भरणा करण्यासाठी मला ई-कर भरणा सेवा वापरताना समस्या आल्यास, मी काय करावे?

ई-फाइलिंग पोर्टलवरील ई-कर भरणा सेवेमध्ये तुम्हाला काही समस्या आल्यास, epay.helpdesk@incometax.gov.in किंवा efilingwebmanager@incometax.gov.in वर ई-मेल पाठवा किंवा खाली दिलेल्या क्रमांकापैकी कोणत्याही एका क्रमांकावर ई-फाइलिंग केंद्राला कॉल करा:
1.    1800 103 0025 
2.    1800 419 0025 
3.    +91-80-46122000 
4.    +91-80-61464700

अस्वीकरण: हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न केवळ माहितीच्या उद्देशाने दिले आहेत. या दस्तऐवजात कोणताही कायदेशीर सल्ला समाविष्ट नाही.