EVC जनरेट करण्याबाबत उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
EVC जनरेट करण्याकरिता, इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) जनरेट करण्याची सेवा केवळ ई-फाइलिंग पोर्टलवरील वैयक्तिक नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे. या सेवेद्वारे आपण पुढील गोष्टी करू शकता:
- आयटमची ई-पडताळणी करणे (वैधानिक फॉर्म्स, आयकर विवरणपत्रे)
- ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करणे
- पासवर्ड रिसेट करणे
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी
- वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरुन वैयक्तिक करदाता म्हणून ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला/असलेली वापरकर्ता
- ई-फाइलिंग पोर्टलमध्ये प्रमाणित आणि EVC सक्षम केलेले बँक खाते (बँक खाते पर्यायासाठी)
- ई-फाइलिंग पोर्टलमध्ये प्रमाणित आणि EVC सक्षम केलेले डीमॅट अकाउंट (डीमॅट अकाउंट पर्यायासाठी)
- बँक खात्याशी लिंक केलेले पॅन (नेट बँकिंग पर्यायासाठी)
- वैध डेबिट कार्ड (बँक ATM पर्यायासाठी)
3. क्रमवार मार्गदर्शन
स्टेप 1:आपला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर,सेवा > EVC जनरेट करा वर क्लिक करा.
स्टेप 3:EVC जनरेट करा पेजवर,आपण इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) कसा जनरेट करू इच्छिता?हा पर्याय निवडा.
आपण खालील पद्धती वापरुन EVC जनरेट करू शकता:
| नेट बँकिंग | विभाग 3.1 चा संदर्भ घ्या |
| बँक खाते | विभाग 3.2 चा संदर्भ घ्या |
| डीमॅट अकाउंट | विभाग 3.3 चा संदर्भ घ्या |
3.1 नेट बँकिंगद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1:EVC जनरेट करा पेजवर,नेट बँकिंगद्वारे हा पर्याय निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 2: नेट बँकिंगद्वारे ई-फाइलिंग लॉगिन पेजवर,बँकेचे नाव निवडा.
टीप: आपल्या बँकेचे नेट बँकिंग लॉगिन पेज दिसल्यावर आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवरून लॉग आउट केले जाईल.
स्टेप 3: आपल्या बँकेच्या नेट बँकिंग लॉगिन पेजवर, आपल्या बँकेने प्रदान केलेले आपले यूजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 4: आपल्या नेट बँकिंग वेबसाइटवर, ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
टीप: आपल्याला आपल्या नेट बँकिंग वेबसाइटवरून लॉग आउट केले जाईल आणि आपल्या ई-फाइलिंग खात्यात लॉगिन केले जाईल.
स्टेप 5:आपल्या डॅशबोर्ड वर,सेवा > EVC जनरेट करा वर क्लिक करा.
आपल्याला जनरेट केलेला EVC ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीवर प्राप्त होईल, तसेच, यशस्वी झाल्याचा संदेश दर्शविला जाईल.
3.2. बँक खात्याद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1:EVC जनरेट करा पेजवर,बँक खात्याद्वारे हा पर्याय निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
यशस्वी झाल्याचा संदेश दर्शविला जाईल, तसेच, बँकेद्वारे पडताळणी केलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीवर आपल्याला EVC प्राप्त होईल.
टीप:
- जोडलेले बँक खाते प्रमाणित आणि EVC सक्षम केलेले असल्यावरच बँक खाते पर्याय वापरून EVC जनरेट करता येईल.
- जर बँकेने पडताळणी केली असेल तरच आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर किंवा आपल्या ईमेल आयडीवर EVC प्राप्त होईल.
3.3. डिमॅट अकाउंटद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1:EVC जनरेट करा पेजवर,डिमॅट अकाउंटद्वारे हा पर्याय निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
यशस्वी झाल्याचा संदेश दर्शविला जाईल आणि NSDL / CDSL द्वारे पडताळणी केलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीवर आपल्याला EVC प्राप्त होईल.
टीप:
- जोडलेले डीमॅट अकाउंट प्रमाणित आणि EVC सक्षम केलेले असल्यावरच डीमॅट अकाउंटद्वारे हा पर्याय वापरुन EVC जनरेट करता येईल.
- आपल्या मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडीची NSDL/CDSL द्वारे पडताळणी झाल्यावरच आपल्याला त्यावर EVC प्राप्त होईल.
4. संबंधित विषय