ई-पे टॅक्स अंतर्गत कर भरण्याचे मार्ग
1. अवलोकन
ई-फायलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) 'ई-कर भरणा' ही एकत्रित सेवा उपलब्ध करून देते, ज्यामुळे करदात्यांना प्रत्यक्ष कर सहजपणे भरता येतात.
पेमेंट 'आयकर अधिनियम, 1961' किंवा 'आयकर अधिनियम, 2025' यांपैकी कशाशीही संबंधित असले, तरी कर भरणा करण्याच्या उपलब्ध पद्धतींमध्ये कोणताही बदल होत नाही.
हे प्लॅटफॉर्म पाच मानक पेमेंट पद्धतींना सपोर्ट करते, ज्या खालीलप्रमाणे आहेत:
- नेटबँकिंग – बँकेचे नेटबँकिंग लॉगिन वापरणे.
- डेबिट कार्ड – अधिकृत बँकांचे ATM/डेबिट कार्ड वापरणे.
- बँकेच्या काउंटरवर पैसे भरणे (OTC) – रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट.
- RTGS/NEFT - जनरेट केलेल्या मँडेट फॉर्मचा वापर करून कोणत्याही बँकेतून.
- पेमेंट गेटवे - क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्व अटी
तुम्ही पूर्व-लॉगिन (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यापूर्वी) किंवा लॉगिन केल्यानंतर (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर) अशा दोन्ही पद्धतीने कर भरणा करू शकता.
वर नमूद केलेल्या सर्व 5 पर्यायांपैकी कोणतीही पेमेंट पद्धत वापरण्यासाठी सामान्य पूर्व-अटी
|
पूर्व-लॉगिन |
|
|
लॉगिन केल्यानंतर |
|
3. सामान्य स्टेप्स (पेमेंटचा प्रकार निवडण्यापूर्वी) - लॉगिन केल्यानंतर व पूर्व-लॉगिन दोन्ही पद्धतीने
3.1 चलान फॉर्म (CRN) जनरेट करणे (लॉगिन केल्यानंतर)
तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
3.2 डॅशबोर्डवर, ई- फाइल > 'ई-कर भरणा' वर क्लिक करा. वापरकर्त्यास 'अधिनियम निवड' स्क्रीनवर नेले जाईल. योग्य निवड केल्यानंतर, 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ई-कर भरणा वर नेले जाईल.
ई-कर भरणा पेजवर, ऑनलाइन कर भरणा सुरू करण्यासाठी नवीन पेमेंट पर्यायावर क्लिक करा.

3.3 नवीन पेमेंट पेजवर, तुम्हाला लागू असलेल्या कर भरणा टाइलवर पुढे जा वर क्लिक करा. लागू होणारी टाइल निवडण्यासाठी, पॅन लॉगिन/TAN लॉगिनद्वारे चलान तयार करण्याकरिता वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
3.4 लागू होणारी कर भरणा टाइल निवडल्यानंतर, योग्य वर्ष (निर्धारण वर्ष/कर वर्ष), लघु शीर्ष, (लागू असलेले) इतर तपशील निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.5 कर विभाजन तपशील जोडा पेजवर, कर विभाजनाच्या एकूण रकमेचा तपशील जोडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.6 पेमेंट पद्धत निवडा पेजवर जा आणि संबंधित विभागांमध्ये दिलेल्या सूचनांनुसार पेमेंट पूर्ण करा
|
अनुक्रमांक |
पेमेंटची पद्धत |
विभागाचा संदर्भ घ्या |
|
1 |
नेट बँकिंग |
तपशीलांसाठी विभाग 4 चा संदर्भ घ्या |
|
2 |
डेबिट कार्ड |
तपशीलांसाठी विभाग 5 चा संदर्भ घ्या |
|
3 |
बँकेच्या काउंटरवर पैसे भरणे |
तपशीलांसाठी विभाग 6 चा संदर्भ घ्या |
|
4 |
RTGS/NEFT |
तपशीलांसाठी विभाग 7 चा संदर्भ घ्या |
|
5 |
पेमेंट गेटवे |
तपशीलांसाठी विभाग 8 चा संदर्भ घ्या |
3.7 ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन न करता पेमेंट करणे - पूर्व-लॉगिन सेवा
3.7.1 ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर जा आणि ई-कर भरणा वर क्लिक करा.
3.7.2 ई-कर भरणा पेजवर, खालील स्क्रीनशॉटमध्ये संदर्भित केलेले आवश्यक तपशील भरा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.7.3 ओटीपी पडताळणी पेजवर, स्टेप क्र. 2 मध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.7.4 ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर, तुमचा पॅन/TAN आणि अंशतः प्रदर्शित केलेले नाव असलेला एक यशस्वीतेचा संदेश दाखवला जाईल. पुढे जाण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.7.5 ई-कर भरणा पेजवर, तुम्हाला लागू असलेल्या कर भरणा श्रेणीवर पुढे जा वर क्लिक करा.
- निर्धारण वर्ष 26-27 पर्यंत आणि आधीच्या वर्षांचे पेमेंट्स करण्यासाठी, "आयकर अधिनियम, 1961" हे रेडिओ बटण निवडा
- कर वर्ष 2026-27 पासून पुढील वर्षांसाठी पेमेंट्स करण्यासाठी, "आयकर अधिनियम 2025" निवडा
3.7.6 त्यापुढे, विभाग 3.3 ते 3.6 मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे स्टेप्स सारख्याच राहतील
4. पद्धत 1 - नेटबँकिंगद्वारे पेमेंट
अधिकृत बँकांद्वारे ई-फायलिंग पोर्टलवर नेट बँकिंग पद्धतीने (ई-कर भरणा सेवा) कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिकृत बँकांच्या यादीसाठी (दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी) कृपया परिशिष्ट 1 चा संदर्भ घ्या. इतर बँकांसाठी, कृपया पेमेंट गेटवे किंवा RTGS/NEFT पर्यायाचा उपयोग करा.
4.1 पेमेंट पद्धत निवडा पेजवर, नेट बँकिंग पद्धत निवडा आणि पर्यायांमधून बँकेचे नाव निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
4.2 पूर्वावलोकन करून पेमेंट करा पेजवर, तपशीलांची आणि कर विभाजन तपशीलांची पडताळणी करा आणि आता पेमेंट करा वर क्लिक करा.
4.3 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक केल्यानंतर, पॉप-अप मध्ये निर्दिष्ट केलेल्या नियम व अटींचा संदर्भ घ्या आणि पुढे जाण्यासाठी चेकबॉक्स निवडा
4.4 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला बँक लॉगिन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, जेथे वापरकर्त्याने अधिकृत बँकेचे नेट बँकिंगचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे
4.5 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, आपल्याला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यावर, पेमेंटचे तपशील आणि चलान पावती ई-कर भरणा पेजवरील पेमेंट हिस्ट्री टॅबखाली उपलब्ध होईल.
5. पद्धत 2 - डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणे
अधिकृत बँकांच्या डेबिट कार्डद्वारे कर भरणा करण्याचा पर्याय हा सर्व करदात्यांसाठी उपलब्ध आहे. ह्या सेवेद्वारे, ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी तुम्ही उपलब्ध अधिकृत बँकेचे डेबिट कार्ड वापरुन कर भरणा ऑनलाइन (पूर्व-लॉगिन किंवा लॉगिन केल्यानंतरच्या पद्धतीने) करू शकता.
5.1 डेबिट कार्ड पद्धत निवडा आणि पर्यायांमधून बँकेचे नाव निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप:
- कृपया लक्षात घ्या की अधिकृत बँकेने (ई-फायलिंग पोर्टलवर डेबिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा देणाऱ्या) जारी केलेले डेबिट कार्ड असणाऱ्या करदात्यांना कर भरणा करण्यासाठी ही पद्धत वापरता येईल.
- या पद्धतीने कर भरणा करण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही. सध्या, ई-फायलिंग पोर्टलवर (ई-कर भरणा सेवा) डेबिट कार्ड पद्धतीने कर भरणा करण्यासाठी पुढील बँकांचे डेबिट कार्ड्स उपलब्ध आहेत - कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि यूनियन बँक ऑफ इंडिया. इतर बँकांसाठी, कृपया पेमेंट गेटवे पद्धत निवडा.
5.2 पूर्वावलोकन करून पेमेंट करा पेजवर, तपशीलांची आणि कर विभाजन तपशीलांची पडताळणी करा आणि आता पेमेंट करा वर क्लिक करा.
5.3 'आता पेमेंट करा' वर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्यास 'नियम व अटी' पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. वापरकर्त्याने 'नियम व अटी' चेकबॉक्स निवडणे आणि पुढे जाण्यासाठी 'बँकेकडे सादर करा' बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
5.4 'बँकेकडे सादर करा' बटणावर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्यास बँकेच्या वेबसाइटवर नेले जाईल. तेथे, वापरकर्त्याने बँकेच्या पेजकडून विनंती केलेले आवश्यक तपशील, जसे की 'कार्डची माहिती' प्रविष्ट करणे आवश्यक आहे. तपशील प्रविष्ट केल्यानंतर आणि ओटीपी सबमिट केल्यानंतर, वापरकर्त्यास ई-फायलिंग वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.
5.5 यशस्वी पेमेंटनंतर, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यावर, ई-कर भरणा पेजवर पेमेंट हिस्ट्री टॅबखाली (लॉगिन केल्यानंतर) पेमेंटचे तपशील आणि चलान पावती उपलब्ध होईल.
6. पद्धत 3 - काउंटरवर पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे पेमेंट करणे
“बँकेच्या काउंटरवर पैसे भरणे” या पर्यायाचा वापर करून कर भरणा करण्याची सुविधा ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर (पूर्व-लॉगिन किंवा लॉगिन केल्यानंतरच्या पद्धतीने) सर्व करदात्यांसाठी उपलब्ध आहे. या सेवेसह, आपण चलान फॉर्म (CRN) जनरेट करताना निवडलेल्या बँकेच्या काउंटरवर (रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे) पैसे भरून कर भरणा करू शकता.
तुम्ही पूर्व-लॉगिन (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यापूर्वी) किंवा लॉगिन केल्यानंतरच्या (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर) पद्धतीने “बँकेच्या काउंटरवर पैसे भरा” वापरून कर भरणा करू शकता.
हा पर्याय अशा करदात्याद्वारे वापरला जाऊ शकत नाही जो/जी कंपनी आहे किंवा अशी व्यक्ती (कंपनीव्यतिरिक्त) आहे ज्यांना आयकर नियम, 2026 च्या नियम 333 नुसार कलम 63 च्या तरतुदी लागू होतात.
करदाते अधिकृत बँकांच्या काउंटरवर कर भरणा करण्यासाठी या पद्धतीचा वापर करू शकतात.
- पेमेंट करण्यासाठी, चलान फॉर्मच्या स्वाक्षरी केलेल्या प्रतीसोबत पेमेंट इन्स्ट्रुमेंट (रोख रक्कम, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट) निवडलेल्या अधिकृत बँकेच्या शाखेसमोर सादर करणे आवश्यक आहे.
- या पद्धतीअंतर्गत ₹ 10,000/- (फक्त दहा हजार रुपये) पेक्षा जास्त कर भरणा रोखिने करण्याची परवानगी नाही.
- या पद्धतीने कर भरणा करण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही.
6.1 'पेमेंट पद्धत निवडा' पेजवर, बँकेच्या काउंटरवर पैसे भरा ही पद्धत निवडा आणि धनादेश, रोख किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पर्यायांमधून बँकेचे नाव निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
6.2 चलान फॉर्मचे पूर्वावलोकन करून डाउनलोड करा पेजवर, तपशीलांची आणि कर विभाजन तपशीलांची पडताळणी करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
6.3 चलान फॉर्म यशस्वीरित्या जनरेट होईल. चलान फॉर्म (CRN) प्रिंट करा आणि पेमेंट करण्यासाठी निवडलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत भेट द्या.
6.4 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यावर, भविष्यातील संदर्भांसाठी चलान पावती डाउनलोड केली जाऊ शकते. लॉगिन केल्यानंतर ई-कर भरणा पेजवरील पेमेंट हिस्ट्री टॅबखाली पेमेंटचे तपशील आणि चलान पावती देखील उपलब्ध आहे.
7. पद्धत 4 - RTGS/NEFT पद्धतीने पेमेंट करणे
ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर सर्व करदात्यांसाठी “RTGS/NEFT” वापरुन कर भरणा करण्याची सुविधा (पूर्व-लॉगिन किंवा लॉगिन केल्यानंतरच्या पद्धतीने) उपलब्ध आहे. या सेवेद्वारे, तुम्ही RTGS/NEFT द्वारे कर भरणा करू शकता.
महत्त्वाची टीप:
- करदाता कोणत्याही बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धत वापरून देखील पेमेंट करू शकतो/शकते.
- ई-फायलिंग पोर्टलवरील 'ई-कर भरणा' सेवेचा वापर करून CRN जनरेट केल्यानंतरच या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे.
7.1 'पेमेंट पद्धत निवडा' पेजवर, RTGS/NEFT पद्धत निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
7.2 मँडेट फॉर्मचे पूर्वावलोकन करून डाउनलोड करा पेजवर, तपशीलांची आणि कर विभाजन तपशीलांची पडताळणी करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
7.3 मँडेट फॉर्म यशस्वीरित्या जनरेट होईल. मँडेट फॉर्म (CRN) प्रिंट करा आणि पेमेंट करण्यासाठी RTGS/NEFT सुविधा प्रदान करणाऱ्या कोणत्याही बँकेच्या शाखेला भेट द्या. तुम्ही बँकेच्या उपलब्ध असलेल्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून कराची रक्कम देखील रेमिट करू शकता [यासाठी मँडेट फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या लाभार्थीच्या तपशीलांसह आपल्या बँक खात्यात लाभार्थी जोडणे आवश्यक आहे आणि कराची रक्कम जोडलेल्या खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे].
7.4 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यावर, पेमेंटचे तपशील आणि चलान पावती ई-कर भरणा पेजवरील पेमेंट हिस्ट्री टॅबखाली उपलब्ध असतील.
8. पद्धत 5 - पेमेंट गेटवे पद्धतीद्वारे पेमेंट करणे
ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर सर्व करदात्यांसाठी पेमेंट गेटवे पर्याय वापरुन कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सेवेसह, तुम्ही पेमेंट गेटवेचा वापर करून ऑनलाइन (पूर्व-लॉगिन किंवा लॉगिन केल्यानंतरच्या पद्धतीने) कर भरणा करू शकता, या पेमेंट गेटवेमुळे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट-बँकिंग आणि UPI द्वारे कर भरणा करू शकता. निवडलेला पेमेंट गेटवे तुम्हाला त्याच्या स्वत:च्या पेजवर पुनर्निर्देशित करेल आणि त्या गेटवेसह उपलब्ध असलेले सर्व पर्याय प्रदान करेल. या पद्धतीमध्ये, परिशिष्ट 2 नुसार आकारले जाणारे व्यवहार शुल्क हे कर रकमेव्यतिरिक्त लागू होईल.
सध्या, ई-फायलिंग पोर्टलवर (ई-कर भरणा सेवा) पेमेंट गेटवे पद्धतीद्वारे कर भरणा करण्याची सुविधा केवळ अधिकृत बँकांद्वारेच उपलब्ध आहे.
8.1 'पेमेंटची पद्धत निवडा' पेजवर, पेमेंट गेटवे पद्धत निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
8.2 पूर्वावलोकन करून पेमेंट करा पेजवर, तपशीलांची आणि कर विभाजन तपशीलांची पडताळणी करा आणि आता पेमेंट करा वर क्लिक करा.
8.3 नियम व अटी वाचा आणि निवडा आणि बँकेत सादर करा वर क्लिक करा. (तुम्हाला पेमेंट गेटवेच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल जिथे तुम्ही लॉगिन करू शकता किंवा नेट बँकिंग / डेबिट / क्रेडिट कार्ड / UPI तपशील प्रविष्ट करून पेमेंट करू शकता).
(पेमेंटचा पर्याय निवडण्यापूर्वी तुम्ही पाच पेमेंट गेटवेच्या व्यवहार शुल्कांची (परिशिष्ट 2 नुसार) तुलना करू शकता)
8.4 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यावर, पेमेंटचे तपशील आणि चलान पावती ई-कर भरणा पेजवरील पेमेंट हिस्ट्री टॅबखाली उपलब्ध असेल.
परिशिष्ट 1: अधिकृत बँकांची यादी (दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी)
|
अनुक्रमांक |
बँकेचे नाव |
|
1 |
अॅक्सिस बँक |
|
2 |
बंधन बँक |
|
3 |
बँक ऑफ बडोदा |
|
4 |
बँक ऑफ इंडिया |
|
5 |
बँक ऑफ महाराष्ट्र |
|
6 |
कॅनरा बँक |
|
7 |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
|
8 |
सिटी यूनियन बँक |
|
9 |
डीसीबी बँक |
|
10 |
फेडरल बँक |
|
11 |
एचडीएफसी बँक |
|
12 |
आयसीआयसीआय बँक |
|
13 |
आयडीबीआय बँक |
|
14 |
इंडियन बँक |
|
15 |
इंडियन ओव्हरसीज बँक |
|
16 |
इंडसइंड बँक |
|
17 |
जम्मू आणि काश्मीर बँक |
|
18 |
करुर वैश्य बँक |
|
19 |
कोटक महिंद्रा बँक |
|
20 |
पंजाब आणि सिंध बँक |
|
21 |
पंजाब नॅशनल बँक |
|
22 |
आरबीएल बँक |
|
23 |
साउथ इंडियन बँक |
|
24 |
स्टेट बँक ऑफ इंडिया |
|
25 |
युको बँक |
|
26 |
युनियन बँक ऑफ इंडिया |
|
27 |
धनलक्ष्मी बँक |
|
28 |
आयडीएफसी फर्स्ट बँक |
|
29 |
कर्नाटक बँक |
|
30 |
भारतीय रिझर्व्ह बँक |
|
31 |
तमिळनाडू मर्कंटाइल बँक |
|
32 |
येस बँक |
|
33 |
डीबीएस बँक इंडिया लिमिटेड |
परिशिष्ट 2: व्यवहार शुल्क
|
पेमेंट गेटवे शुल्क - फेडरल बँक |
|
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग |
सुविधा शुल्क |
|
एचडीएफसी बँक - INR 12* |
|
|
आयसीआयसीआय – INR 9* |
|
|
एसबीआय – INR 7* |
|
|
अॅक्सिस बँक – INR 7* |
|
|
इतर बँका (फेडरल बँकेसहित) – INR 5* |
|
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क < 2,000) |
NIL |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क >=2,000) |
NIL |
|
क्रेडिट कार्ड (फेडरल बॅंक) |
0.85%* |
|
क्रेडिट कार्ड (इतर बॅंक) |
0.85% * |
|
रुपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (BHIM-UPI) |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) (BHIM-UPI QR कोड) |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
|
पेमेंट गेटवे शुल्क - कॅनरा बँक |
|
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग (एचडीएफसी/आयसीआयसीआय/येस) |
INR 14* |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
INR 6* |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क < 2,000) |
शून्य |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क >=2,000) |
शून्य |
|
क्रेडिट कार्ड (कॅनरा बँक) |
0.90%* |
|
क्रेडिट कार्ड (इतर बॅंक) |
0.90%* |
|
रुपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (BHIM-UPI) |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) (BHIM-UPI QR कोड) |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क – कोटक महिंद्रा बँक
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग (अॅक्सिस/एचडीएफसी/आयसीआयसीआय/कोटक/एसबीआय) |
INR 7* |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
INR 5* |
|
डेबिट कार्ड्स (व्हिसा / मास्टर कार्ड) - ₹ 2000 पर्यंत |
शून्य |
|
डेबिट कार्ड्स (व्हिसा / मास्टर कार्ड) - ₹ 2000 पेक्षा जास्त |
शून्य |
|
डेबिट कार्ड्स (रुपे) / UPI / UPI QR |
शून्य |
|
क्रेडिट कार्ड्स (मास्टर/व्हिसा/रुपे) |
0.80%* |
|
क्रेडिट कार्ड्स (आंतरराष्ट्रीय) |
2.75%* |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क-एसबीआय बँक
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
INR 5.08* |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क < 2,000) |
लागू नाही |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क >= 2,000) |
लागू नाही |
|
क्रेडिट कार्ड (एसबीआय बँक) |
लागू नाही |
|
क्रेडिट कार्ड (इतर बँक) |
लागू नाही |
|
रूपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
लागू नाही |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (BHIM-UPI) |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) (BHIM-UPI QR कोड) |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क - एचडीएफसी बँक
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
लागू नाही |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क <2,000) |
शून्य |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क >= 2,000) |
शून्य |
|
क्रेडिट कार्ड (एचडीएफसी बँक) |
0.72%* |
|
क्रेडिट कार्ड (इतर बँक) |
0.80%* |
|
रूपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) (BHIM-UPI) |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) (BHIM-UPI QR कोड) |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क - बँक ऑफ महाराष्ट्र
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग |
INR 15* |
|
डेबिट कार्ड - ₹ 2000 पेक्षा कमी |
0.40%* |
|
डेबिट कार्ड - ₹ 2000 पेक्षा जास्त |
0.90%* |
|
क्रेडिट कार्ड - ₹ 2000 पेक्षा जास्त |
1.00%* |
|
क्रेडिट कार्ड EMI- मास्टर/व्हिसा/रूपे |
1.00%* |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) |
शून्य |
|
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस क्विक रिस्पॉन्स कोड (UPI QR कोड) |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क- बंधन बँक
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग (एचडीएफसी/आयसीआयसीआय/येस) |
INR 12* |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
INR 8* |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क < 2,000) |
शून्य |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) (व्यवहार शुल्क >= 2,000) |
शून्य |
|
क्रेडिट कार्ड (इतर बॅंक) |
1.00% (सुविधा शुल्क) |
|
रूपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
शून्य |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|
पेमेंट गेटवे शुल्क- आयसीआयसीआय
|
पेमेंटची पद्धत |
व्यवहार शुल्क (INR) |
|
नेट बँकिंग (अॅक्सिस/एचडीएफसी/आयसीआयसीआय/कोटक/एसबीआय/येस) |
INR 7* |
|
नेट बॅंकिंग (इतर बॅंक) |
INR 5* |
|
रूपेद्वारे संचालित डेबिट कार्ड |
शून्य |
|
डेबिट कार्ड (इतर बँक) |
INR 12/- + 0.15% |
|
किरकोळ विक्री क्षेत्रातील क्रेडिट कार्ड |
0.85% |
|
कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड |
0.78% |
|
* 18% दराने अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल |
|