1. ई-फाइलिंग वॉल्ट म्हणजे काय?
ई-फाइलिंग खात्यावर द्वितीय घटक प्रमाणिकरणासह उच्च सुरक्षा सक्षम करण्यासाठी ई-फाइलिंग वॉल्ट सेवा नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ई-फाइलिंग वॉल्टचा वापर आपल्या ई-फाइलिंग खात्यात लॉग इन करण्यासाठी आणि / किंवा पासवर्ड बदलण्यासाठी केला जाऊ शकतो. ई-फाइलिंग वॉल्ट सेवेचा वापर करणे अनिवार्य नसले तरी, आपले ई-फाइलिंग खाते सुरक्षित करण्यासाठी त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

2. द्वितीय-घटक प्रमाणीकरण(सेकंड-फॅक्टर ऑथेंटिकेशन) म्हणजे काय?
द्वितीय-घटक प्रमाणीकरण ही एक कार्यक्षमता आहे जेणेकरून आपल्या ई-फाइलिंग खात्यासाठी उच्च पातळीची सुरक्षा सक्षम होईल. ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता ID आणि पासवर्डची पडताळणी करण्याव्यतिरिक्त ही सुविधा सुरक्षेचा आणखी एक स्तर सुनिश्चित करते. ई-फाइलिंग वॉल्ट सेवा वापरुन, आपण लॉग इन पर्याय निवडू शकता जो आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा डिफॉल्ट रूपात दिसेल.

3. माझ्या ई-फाइलिंग खात्यासाठी उच्च सुरक्षा कशी सक्षम केली जाऊ शकते?
आपण खालील पैकी एका प्रकारे द्वितीय-घटक प्रमाणीकरणाच्या स्वरूपात उच्च सुरक्षा सक्षम करू शकता:

  • नेट बँकिंग
  • डिजिटल सुरक्षा प्रमाणपत्र (DSC)
  • आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP
  • बँक खाते EVC
  • डिमॅट खाते EVC

4. मला माझ्या ई-फाइलिंग खात्यासाठी उच्च सुरक्षा कशी सक्षम करता येईल?
आपण ई-फाइलिंग पोर्टलचा नोंदणीकृत वापरकर्ता असल्यास, आपण ई-फाइलिंग वॉल्ट वैशिष्ट्य वापरून आपल्या ई-फाइलिंग खात्यावर उच्च सुरक्षा सक्षम करू शकता.

5. मला उच्च सुरक्षेच्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडला नाही तर मला माझ्या खात्यात कसे लॉग इन करता येईल?
आपण उच्च सुरक्षेच्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडला नाही, तर आपण आपल्या डिफॉल्ट वापरकर्ता ID आणि पासवर्ड आणि विविध लॉग इन पद्धतींपैकी एका पद्धतीचा वापर करून लॉग इन करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी लॉग इन करा या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

6. मी ई-फाइलिंग व्हॉल्ट पासवर्ड रीसेट पर्यायातील कोणताही पर्याय न निवडल्यास मी माझा पासवर्ड कसा रीसेट करू?
आपण ई-फाइलिंग वॉल्ट पासवर्ड रिसेट पर्यायाची निवड केली नसल्यास, आपण ई-फाइलिंग OTP चा डिफॉल्ट पर्याय वापरून पासवर्ड बदलू शकता.अधिक जाणून घेण्यासाठी पासवर्ड विसरलात या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

7. मला ई-फाइलिंग व्हॉल्टसाठी सुरक्षिततेच्या एकापेक्षा जास्त पद्धती वापरता येतील का?
लॉग इन आणि पासवर्ड बदलण्यासाठी अनेक उच्च सुरक्षा पद्धती जरी निवडल्या जाऊ शकत असतील, तरी ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी किंवा आपला पासवर्ड बदलण्यासाठी निवडलेल्या पर्यायांमधून आपल्याला एकच निवडावा लागतो.

8. नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये मला पुन्हा माझे उच्च सुरक्षा पर्याय निवडावे लागतील किंवा ते जुन्या पोर्टलमध्ये जसे होते तसेच राहतील?
नवीन पोर्टलवर आपल्याला पुन्हा उच्च सुरक्षेचे पर्याय निवडावे लागतील कारण ती माहिती तांत्रिकी कारणांमुळे नवीन पोर्टल वर स्थलांतरित करण्यात आली नाही. आपण उच्च सुरक्षेचा पर्याय म्हणून DSC निवडल्यास, ई-फाइलिंग पोर्टलवर पहिले आपल्याला DSC नोंदवावी लागेल.