निर्धारण वर्ष 2026-27 साठी भागीदारी संस्था/LLP ला लागू असलेली विवरणपत्रे आणि फॉर्म्स
अस्वीकरण : या पेजवरील मजकूर हा केवळ अवलोकन आणि सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी देण्यात आलेला असून तो सर्वसमावेशक नाही. संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी कृपया आयकर अधिनियम, 1961, नियम आणि अधिसूचना पाहावा.
आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 2(23)(i) नुसार, फर्मचा अर्थ भारतीय भागीदारी अधिनियम, 1932 मध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल. भारतीय भागीदारी अधिनियम, 1932 च्या कलम 4 मध्ये फर्मची व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
“ज्या व्यक्ती एकत्र येऊन भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना स्वतंत्रपणे "भागीदार" आणि एकत्रितपणे "फर्म" असे म्हणतात. ज्या नावाने त्यांचा व्यवसाय चालतो, त्या नावाला "फर्मचे नाव" असे म्हणतात.”
आयकर अधिनियम, 1961 नुसार, फर्म मध्ये मर्यादित दायित्व भागीदारीचा (LLP) समावेश होतो. मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, 2008 च्या कलम 2(1)(n) अंतर्गत, LLP म्हणजे कायद्यानुसार स्थापन व नोंदणीकृत केलेली भागीदारी संस्था होय. ही एक वेगळी कायदेशीर संस्था असून ती तिच्या भागीदारांपासून स्वतंत्र असते.
|
हे विवरणपत्र अशा वैयक्तिक व्यक्तीस किंवा हिंदू अविभक्त कुटुंबास (HUF) लागू आहे, जे भारताचे रहिवासी आहेत; मात्र “साधारणपणे रहिवासी नसलेले” नाहीत. तसेच हे विवरणपत्र अशा रहिवासी फर्मसाठी (LLP वगळून) लागू आहे, ज्यांचे एकूण उत्पन्न ₹50 लाखांपर्यंत आहे आणि ज्यांचे व्यापार किंवा व्यवसायाचे उत्पन्न आयकर कलम, 1961 च्या कलम 44AD / 44ADA / 44AE अंतर्गत अनुमानित आधारावर गणना केलेले आहे. तसेच खालीलपैकी कोणत्याही स्रोतांमधून उत्पन्न मिळणाऱ्यांसाठी हे विवरणपत्र लागू आहे.
|
|
हे विवरणपत्र अशा व्यक्तीस लागू आहे जी:
|
टीप: असे असले तरी, आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(4A), 139(4B) किंवा 139(4D) अंतर्गत आयकर उत्पन्नाचे विवरणपत्र दाखल करणे आवश्यक असलेल्या व्यक्तीने हा फॉर्म वापरू नये not use this form.
आयकर अधिनियम, 1961 नुसार लागू होणारे फॉर्म
|
टीप: अग्रिम कर/SAT, परताव्याचा तपशील, SFT व्यवहार, आयकर अधिनियम 1961 च्या कलम 194IA, 194IB, 194M अंतर्गत TDS तसेच TDS त्रुटी) यांसंबंधीची जी माहिती पूर्वी 26AS मध्ये उपलब्ध होती, ती आता AIS मध्ये उपलब्ध आहे
|
|
|
|
|
|
|
|
निर्धारण वर्ष 2026-27 साठी भागीदारी फर्म / LLP साठी कर दर
निर्धारण वर्ष 2026-27 साठी, भागीदारी फर्म (LLP सहित) 30% दराने करपात्र आहे.
अधिभार, किरकोळ सवलत आणि आरोग्य व शिक्षण उपकर
|
|
|
||||||||||
ज्या गुंतवणुकी / पेमेंट्स/ उत्पन्नावर कर लाभ उपलब्ध आहे
आयकर अधिनियम, 1961 च्या प्रकरण VIA अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या कर कपाती
|
निर्धारित निधी, धर्मादाय संस्था इत्यादींना दिलेल्या देणग्यांवरील कपात. खालील श्रेणींअंतर्गत देणग्या कपातीस पात्र आहेत
|
|
वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी दिलेल्या देणगीवरील कपात खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीला पात्र आहेत
|
टीप: या कलमांतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख स्वरूपात दिलेल्या देणगीच्या संदर्भात कपातीची परवानगी दिली जाणार नाही. तसेच, जर सकल एकूण उत्पन्नामध्ये व्यापार / व्यवसायातील नफा किंवा मिळकत यांमधून मिळालेले उत्पन्न समाविष्ट असेल, तर या कलमांतर्गत कपात मिळणार नाही.
|
राजकीय पक्ष किंवा निवडणूक न्यासाला देणगी दिलेल्या रकमेस कपात म्हणून परवानगी आहे (विशिष्ट अटींच्या अधीन) |
|
|
औद्योगिक उद्यानांमध्ये कार्यरत उपक्रम (कोणताही उपक्रम) आणि कोणताही विद्युत उपक्रम, कपातीचा दावा (विशिष्ट अटींच्या अधीन राहून) करण्यास पात्र असेल |
|
|
विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासात गुंतलेल्या उपक्रम किंवा उद्योगाच्या नफा आणि मिळकतींबाबत कपात (विशिष्ट अटींच्या अधीन) |
|
|
निर्दिष्ट व्यवसायामधील पात्र स्टार्ट-अपद्वारे प्राप्त झालेला नफा आणि मिळकत |
ज्या वर्षात पात्र स्टार्ट-अपची स्थापना करण्यात आली त्या वर्षापासून 10 निर्धारण वर्षांपैकी सलग 3 निर्धारण वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेची कपात |
|
पायाभूत सुविधा विकास उपक्रमांव्यतिरिक्त निर्दिष्ट औद्योगिक उपक्रमांमधून मिळणाऱ्या नफा आणि मिळकतीबाबत कपात, विहित प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या निर्धारण वर्षापासून 10 वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेवर कपात (जर मंजुरी 31 मार्च 2000 नंतर आणि 1 एप्रिल 2007 पूर्वी मिळालेली असेल तर). या कलमाच्या अंतर्गत कपात अशा करदात्यासाठी उपलब्ध आहे, ज्याच्या सकल एकूण उत्पन्नामध्ये खालील व्यवसायांमधून मिळालेला कोणताही नफा आणि मिळकत समाविष्ट आहे:
विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी निर्दिष्ट अटींनुसार 5 / 10 / 7 वर्षांसाठी नफ्याच्या 100% / 25% रकमेवर कपात. |
|
गृहनिर्माण प्रकल्पांच्या विकास आणि बांधकामातून प्राप्त नफा व मिळकत |
निर्दिष्ट विविध अटींच्या अधीन राहून नफ्याच्या 100% रकमेवर कपात. |
|
हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तरांचल आणि ईशान्य राज्यांतील विशिष्ट उपक्रमांच्या संदर्भात कपात (विशिष्ट अटींच्या अधीन) |
विशिष्ट वस्तू किंवा गोष्टीचे उत्पादन किंवा निर्मिती करण्यासाठी पहिल्या 5 निर्धारण वर्षांसाठी 100% नफा आणि पुढील 5 निर्धारण वर्षांसाठी 25% (कंपनीसाठी 30%) नफा |
|
ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थापन केलेल्या काही उपक्रमांना कपात (विशिष्ट अटींच्या अधीन) |
निर्दिष्ट विविध अटींच्या अधीन राहून 10 निर्धारण वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेवर कपात. |
|
जैवविघटनक्षम कचरा गोळा करणे आणि प्रक्रिया करण्याच्या व्यवसायातून मिळणारा नफा आणि मिळकती संदर्भात कपात (विशिष्ट अटींच्या अधीन) |
जैवविघटनशील कचरा गोळा करणे, प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या उपक्रमातून मिळणाऱ्या नफ्याच्या 100% रकमेवर सलग 5 निर्धारण वर्षांसाठी कपात. |
|
आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 44AB लागू असलेल्या निर्धारितीस नवीन कामगार / कर्मचारी नियुक्त केल्याबद्दल मिळणारी कपात. (विशिष्ट अटींच्या अधीन) |
विशिष्ट अटींच्या अधीन राहून, 3 निर्धारण वर्षांसाठी अतिरिक्त कर्मचारी खर्चाच्या 30% कपात. |
|
ऑफशोअर बँकिंग युनिट आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या उत्पन्नासाठी कपात (विशिष्ट अटींच्या अधीन) |
निर्दिष्ट अटींनुसार 5 / 10 निर्धारण वर्षांसाठी निर्दिष्ट उत्पन्नाच्या 100% / 50% रकमेवर कपात. |