1. अवलोकन

वित्त कायदा 1984 यानुसार निर्धारण वर्ष 1985-86 पासून नवीन कलम 44AB समाविष्ट करून कर टाळणे आणि कर चुकवणे यांपासून परावृत्त करण्यासाठी कर लेखापरीक्षणाची आवश्यकता लागू करण्यात आली आहे.

सर्व भत्ते, कपात, नुकसान, समायोजन, सूट इत्यादींचा विचार करून एकूण उत्पन्नाचे योग्य मूल्यांकन सक्षम करण्यासाठी निर्धारितीद्वारे आयकर अधिकाऱ्यांना सादर केलेल्या विशिष्ट वास्तविक तपशीलांच्या सत्य आणि योग्यतेबद्दल कर लेखापरीक्षकाचे मत व्यक्त कर लेखा परीक्षणामध्ये समाविष्ट केले जाते. हे खालील उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आयोजित केले जाते:

  • करदात्याने खाते पुस्तकांची योग्य देखभाल व दुरुस्ती आणि CA द्वारे त्याचे प्रमाणीकरण सुनिश्चित करा
  • लेखा परीक्षणादरम्यान CA ने नोंदवलेली निरीक्षणे / विसंगती नोंदवा
  • फॉर्म 3CD मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे आयकर कायद्याच्या विविध तरतुदींचे अनुपालन करून विहित माहितीचा अहवाल द्या.

हा फॉर्म CA ने त्यांचे डिजिटल स्‍वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) वापरून अपलोड करायचा आहे.
कलम 44AB अंतर्गत खात्यांचे लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याची पद्धत आणि सूसज्ज करण्याची पद्धत नियम 6G मध्ये नमूद केली आहे. फॉर्मचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार आहेत- 3CA-3CD आणि 3CB-3CD. त्यामुळे, प्रत्येक करदात्याला दोनपैकी एकच लागू होईल.

  • फॉर्म 3CA-3CD अशा व्यक्तीच्या बाबतीत लागू आहे ज्यांना कोणत्याही कायद्यानुसार किंवा त्यांच्या खात्यांचे लेखा परीक्षण करणे आवश्यक आहे.
  • फॉर्म 3CB-3CD वर संदर्भित नसलेल्‍या व्यक्तीवर लागू होते म्हणजे जेथे इतर कोणत्याही कायद्यांतर्गत खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक नाही

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

  • करदाता आणि CA ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्डसह नोंदणीकृत आहेत
  • करदात्याच्या आणि CA च्‍या PAN ची स्थिती सक्रिय आहे
  • करदात्याने फॉर्म 3CB-CD साठी CA ची नियुक्ती केली आहे
  • CA आणि करदात्याकडे एक वैध आणि सक्रिय डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आहे.
  • वैयक्तिक करदात्याच्या बाबतीत करदात्याचा PAN आधारशी लिंक केलेला असावा (शिफारस केलेले)

3. फॉर्मबद्दल

3.1. हेतू

इतर कोणत्याही कायद्यानुसार खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक नसल्यास, फॉर्म 3CB-3CD लागू आहे. हे करदात्याने ठेवलेल्या खाते पुस्तकांची दुरुस्ती, CA ने नमूद केलेली निरीक्षणे / विसंगती यांचा अहवाल देणे आणि फॉर्म 3CD मध्ये संदर्भित केल्यानुसार आयकर कायद्याच्या विविध तरतुदींच्या अनुपालनात विहित माहितीचा CA द्वारे अहवाल देणे प्रमाणित करणे आहे

3.2. त्याचा वापर कोण करू शकतो?

ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला आणि करदात्याने फॉर्म 3CB-3CD याचे लेखा परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेला CA ला हा फॉर्म ऍक्सेस करण्याचा हक्क आहे.

4. एका दृष्टीक्षेपात फॉर्म

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म 3CB-3CD मध्ये भरणे आवश्यक असलेले 2 विभाग आहेत. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत:

  1. फॉर्म क्रमांक 3CB
  2. फॉर्म क्रमांक 3CD

येथे फॉर्म 3CB-3CD च्‍या विभागांची माहिती येथे दिली आहे.

  • पहिले पेज आपल्‍याला फॉर्म 3CB आणि फॉर्म 3CD वर नेव्हिगेट करण्‍यास मदत करते.
  • फॉर्म क्रमांक 3CB पेज असे पेज आहे जेथे CA एखाद्या व्यक्तीच्या व्यवसाय किंवा व्यापार खात्याच्या लेखापरीक्षणाचे तपशील नोंदवतो.
  • फॉर्म क्रमांक 3CD मध्ये आणखी 5 विभाग आहेत, जेथे CA आयकर कायद्याच्या कलम 44AB अंतर्गत आवश्यक तपशील प्रविष्ट करतो.
    • फॉर्म 3CD च्या भाग A (खंड 1 ते 8) मध्ये CA ने निर्धारितीची मूलभूत तपशील देणे आवश्यक आहे. फॉर्मचा भाग A भरल्यानंतर आणि सेव्ह केल्यावरच वापरकर्ता पुढे जाऊ शकतो.
    • फॉर्म 3CD च्या भाग B मध्ये आयकर कायदा, 1961 मधील 9 ते 44 खंडाच्या आधारावर आणखी विभाग आहेत. या विभागातील सर्व कलमांचे तपशील भरणे आवश्यक आहे.

5. ॲक्सेस आणि सबमिट कसे करावे

आपण CA ला फॉर्म नियुक्त करू शकता आणि सबमिट केलेल्या फॉर्मची ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करू शकता. CA ने ऑफलाइन उपयोगिताद्वारेच फॉर्म भरणे आवश्यक आहे.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी वैधानिक फॉर्म उपयोगकर्ता पुस्तिकेसाठी ऑफलाइन उपयोगिता पहा.

5.1. CA ला फॉर्म नियुक्त करणे

स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, PAN आधारशी लिंक नसल्यास, आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की, आपला PAN आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे PAN निष्क्रिय करण्यात आला आहे.

PAN ला आधारशी लिंक करण्यासाठी, आता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 2: आपल्‍या डॅशबोर्ड वर, ई-फाइल > आयकर फॉर्म > आयकर फॉर्म फाइल करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: आयकर फॉर्म फाइल करा पेजवर, फॉर्म 3CB-3CD वर क्लिक करा. वैकल्पिकरित्या, फॉर्म फाइल करण्यासाठी शोध बॉक्समध्ये फॉर्म 3CB-3CD प्रविष्ट करा.

Data responsive


स्टेप 4: फॉर्म 3CB-3CD पेजवर, फाइलिंगचा प्रकार आणि निर्धारण वर्ष (A.Y.) निवडा, सनदी लेखापाल नियुक्‍त करा आणि कोणतेही सहाय्यक दस्‍तऐवज संलग्न करा. पुढे जाण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • आपण CA आधीच नियुक्त केला असल्यास, फाइलिंग किंवा स्वीकृतीसाठी CA कडे प्रलंबित असलेल्या फॉर्म 3CB-3CD चे तपशील प्रदर्शित केला जाईल .
  • CA नियुक्त केला नसल्यास, आपण विद्यमान CA च्‍या लिंकमधून पूर्वी नियुक्त केलेल्या CA च्या यादीतून निवडून CA नियुक्त करू शकता
  • CA जोडला नसल्यास, आपण डॅशबोर्ड>अधिकृत भागीदार >माझा CA>नवीन CA जोडा वर क्लिक करून CA जोडू शकता.

CA ला फॉर्म असाइन केल्यानंतर, व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा.

Data responsive



5.2. CA द्वारे फॉर्म फाइल करणे

स्टेप 1: आपला उपयोगकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टल वर लॉग इन करा.

Data responsive


स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर, प्रलंबित क्रिया > कार्यसूची वर क्लिक करा जिथे प्रलंबित बाबींची यादी प्रदर्शित केली जाईल.

Data responsive


स्‍टेप 3: आपल्या कृतीसाठी टॅब अंतर्गत, आपल्‍याला नियुक्‍त केलेल्‍या फॉर्म 3CB-CD च्या समोर स्‍वीकार करा वर क्लिक करा.

Data responsive

करदात्याचा PAN आधारशी लिंक केलेला नसेल, तर CA ला फॉर्म स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी स्क्रीनवर एक पॉप-अप संदेश दिसेल की, करदात्याचा PAN निष्क्रिय आहे कारण तो आधारशी लिंक केलेला नाही.

फॉर्म स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

Data responsive

टीप: आपण विनंती नाकारण्याचे निवडल्यास, आपल्याला सेवा विनंती नाकारण्याचे कारण प्रदान करावे लागेल


स्टेप 4: विनंती यशस्वीपणे स्वीकारल्यावर, व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. फॉर्म फाइल करण्‍यासाठी कार्यसूचीवर परत जा क्लिक करा

Data responsive


स्टेप 5: आपल्‍या कार्यसूची वर, फाइलिंगसाठी प्रलंबित टॅब अंतर्गत, आपण स्‍वीकारलेल्‍या फार्म 3CB-3CD समोर असलेल्या फॉर्म फाइल करा वर क्लिक करा.

Data responsive

करदात्याचा PAN आधारशी लिंक केलेला नसल्यास, CA ला फॉर्म फाइल करताना/अपलोड करताना स्क्रीनवर एक पॉप-अप संदेश दिसेल की, करदात्याचा PAN निष्क्रिय आहे कारण तो आधारशी लिंक केलेला नाही. फॉर्म फाइल/अपलोड करण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा .

Data responsive

स्टेप 6: फॉर्म 3CB-3CD पेजवर, पुढे जाण्‍यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 7 : ऑफलाईन उपयोगिता डाउनलोड करा (आपल्‍या होमपेजवरील डाउनलोड्स विभागाच्या अंतर्गत देखील उपलब्ध) आणि उपयोगिता वापरून फॉर्म फाइल करा . फॉर्म 3CB-3CD पेजवर ऑफलाइन उपयोगिताचा वापर करून तयार केलेली JSON फाइल अपलोड करा. आवश्यक सहाय्यक दस्तऐवज संलग्‍न करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive


स्‍टेप 8: अनन्य ओळख क्रमांक पेजवर, पढे जा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 9: जर आपण पुढे जा निवडले तर, आपल्‍याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे आपण डिजिटल स्‍वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.

टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी यावरील उपयोगकर्ता पुस्तिका पहा.

यशस्वी ई-पडताळणी नंतर, व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. करदात्याला ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

Data responsive


5.3. करदात्याद्वारे पडताळणी

स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, PAN आधारशी लिंक नसल्यास, आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की, आपला PAN आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे PAN निष्क्रिय करण्यात आला आहे.

PAN ला आधारशी लिंक करण्यासाठी, आता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर प्रलंबित क्रिया > कार्यसूची वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: आपल्या कार्यसूची मधील, स्वीकृतीसाठी प्रलंबित टॅब अंतर्गत, आपल्या CA ने सबमिट केलेल्या फॉर्म 3CB-3CD समोर असेलल्या स्वीकारा वर क्लिक करा.

Data responsive

टीप: आपण विनंती नाकारण्याचे निवडल्यास, आपल्याला सेवा विनंती नाकारण्याचे कारण प्रदान करावे लागेल

स्टेप 4: विनंती स्वीकारल्यानंतर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे आपण डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी याच्या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

यशस्वी ई-पडताळणीनंतर, व्यवहार ID आणि पोचपावती क्रमांकासह एक यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID आणि पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत केलेल्या आपल्या ई-मेल ID आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

Data responsive

6. संबंधित विषय

टीप: हा केवळ एक मदत दस्‍तऐवज आहे. कायदेशीर तरतुदींसाठी कृपया आयकर कायदा 1961, आयकर नियम, अधिसूचना, CBDT (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) ने वेळोवेळी जारी केलेली परिपत्रके पहा.