1. आयकर प्राधिकरणाद्वारे मला जारी करण्यात आलेली नोटीस/आदेश प्रमाणित करणे मला का आवश्यक आहे?
1 ऑक्टोबर, 2019 रोजी किंवा त्यानंतर आयकर विभागाने जारी केलेल्या प्रत्येक संप्रेषणावर एक विशिष्ट दस्तऐवज ओळख क्रमांक (DIN) असेल. तुम्हाला प्राप्त झालेली नोटीस/आदेश किंवा कोणतेही संप्रेषण अस्सल असून ते आयकर प्राधिकरणाने जारी केलेले आहे याची खात्री करून घेण्यासाठी, तुम्ही या सेवेचा वापर करून कोणतीही नोटीस/आदेश किंवा कोणतेही संप्रेषण प्रमाणित करू शकता.
2. ITD च्या नोटीस/आदेश यावर DIN नसल्यास काय करावे?
अशा प्रकरणामध्ये, तुम्हाला प्राप्त झालेली नोटीस/आदेश/पत्र अवैध असल्याचे मानले जाईल आणि ते कायद्याने अस्तित्वात नाही किंवा ते कधीही जारी केले गेले नव्हते असे मानले जाईल. अशा संप्रेषणावर तुम्हाला कोणतीही कारवाई करण्याची किंवा त्यास प्रतिसाद देण्याची गरज नाही.
3. ITD द्वारे मला जारी करण्यात आलेला आदेश मला कुठे प्रमाणित करता येईल?
तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर 'ITD द्वारे जारी करण्यात आलेली नोटीस / आदेश प्रमाणित करा' सेवेचा वापर करून आयकर प्राधिकरणांनी जारी केलेला आदेश प्रमाणित करू शकता.
4. ITD द्वारे मला जारी करण्यात आलेली नोटीस प्रमाणित करण्यासाठी मला लॉगिन करण्याची आवश्यकता आहे का?
नाही, तुम्हाला नोटीस / आदेश प्रमाणित करण्यासाठी ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या 'ITD द्वारे जारी करण्यात आलेली नोटीस/आदेश प्रमाणित करा' या लिंकवर क्लिक करून नोटीस प्रमाणित करू शकता.
5. माझी नोटीस प्रमाणित करण्यासाठी, मला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेलाच मोबाईल नंबर प्रविष्ट करण्याची आवश्यकता आहे का?
नाही, आयकर विभागाने जारी केलेली नोटीस / पत्र किंवा कोणतेही संप्रेषण प्रमाणित करण्यासाठी ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करणे अनिवार्य नाही. तुम्ही मोबाईल नंबर टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा ॲक्सेस करण्यायोग्य कोणताही मोबाईल नंबर प्रविष्ट करून त्यावर ओटीपी प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकता.
6. DIN म्हणजे काय?
DIN म्हणजे दस्तऐवजीकरण ओळख क्रमांक. हा संगणकाने जनरेट केलेला एक विशिष्ट क्रमांक आहे, जो कोणत्याही आयकर प्राधिकरणाने कोणत्याही करदात्याला जारी केलेल्या प्रत्येक संप्रेषणावर (पत्र / नोटीस / आदेश / इतर कोणताही पत्रव्यवहार) योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे.