AIS - वार्षिक माहिती विवरणपत्र
(एका दृष्टीक्षेपात सविस्तर कर माहिती)
(एका दृष्टीक्षेपात सविस्तर कर माहिती)
AIS - वार्षिक माहिती विवरणपत्र
1. वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) म्हणजे काय?
वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) हे करदात्याकरिता माहितीचे सर्वसमावेशक विवरण आहे.
AIS ची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- उत्पन्नाचे विवरणपत्र फाइल करण्यापूर्वी करदात्याला संपूर्ण माहिती दर्शविली जाते त्याचबरोबर करदात्याचा ऑनलाइन अभिप्राय नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते
- ऐच्छिक अनुपालन प्रोत्साहित करते आणि विवरणपत्र सहजपणे आधीपासून भरणे सक्षम करते
- अनुपालन न करणे प्रतिबंधित करते
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
2. वार्षिक माहिती विवरणपत्राचे (AIS) घटक कोणकोणते आहेत?
AIS वर दर्शवलेली माहिती दोन भागात विभागली आहे:
भाग A - सामान्य माहिती: भाग A मध्ये तुमच्याशी संबंधित सामान्य माहिती दर्शविली जाते; ज्यामध्ये पॅन, अंशतः प्रदर्शित केलेला आधार क्रमांक, करदात्याचे नाव, जन्मतारीख/ निगमन/ निर्मिती झाल्याची तारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेल ॲड्रेस आणि करदात्याचा पत्ता यांचा समावेश असतो.
भाग B - TDS/TCS माहिती: येथे स्रोतावर कपात केलेला/संकलित केलेला कर यासंबंधीची माहिती दर्शविली आहे. यामध्ये TDS/TCS चा माहिती कोड, माहितीचे वर्णन आणि माहितीचे मूल्य दर्शविले आहे.
• SFT माहिती: या शीर्षकाखाली, आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र (SFT) या अंतर्गत अहवाल सादर करणाऱ्या संस्थांकडून प्राप्त झालेली माहिती प्रदर्शित केली जाते. यामध्ये SFT कोड, माहितीचे वर्णन आणि माहितीचे मूल्य उपलब्ध करून दिले जाते.
• कर भरणा: आर्थिक वर्षादरम्यान अग्रिम कर आणि स्व-निर्धारण कर यांसारख्या विविध शीर्षकांखाली 'कर भरणा'बाबत माहिती यात दर्शविली आहे.
• मागणी आणि परतावा: तुम्ही आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेली मागणी आणि सुरू केलेली परताव्याची प्रक्रिया (निर्धारण वर्ष आणि रक्कम) यांचा तपशील पाहू शकाल. (मागणीशी संबंधित तपशील सध्या उपलब्ध नाहीत).
• इतर माहिती: इतर स्रोतांकडून प्राप्त झालेल्या माहितीचा तपशील, जसे की 'परिशिष्ट II' मधील वेतन, परताव्यावरील व्याज, बाह्य परदेशी रेमीटन्स किंवा परकीय चलन खरेदी इत्यादींशी संबंधित माहिती येथे दाखवली आहे.
तसेच, करदाता AIS मध्ये दाखवलेल्या माहितीबाबत आपला अभिप्राय देऊ शकतो/शकते. AIS मध्ये प्रत्येक विभागांतर्गत (उदा. TDS, SFT, इतर माहिती) नोंदवलेले मूल्य तसेच सुधारित मूल्य (म्हणजेच करदात्याचा अभिप्राय किंवा त्यावरील स्रोताची पुष्टी विचारात घेतल्यानंतरचे मूल्य) अशी दोन्ही प्रकारची मूल्ये दर्शविली जातात.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
3. आयकर विवरणपत्र फाइल करण्यासाठी AIS मध्ये करदात्याची सर्व माहिती उपलब्ध असते का?
वार्षिक माहिती विवरणपत्रामध्ये (AIS) आयकर विभागाकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा समावेश असतो. करदात्याशी संबंधित असे सुद्धा काही व्यवहार असू शकतात जे सध्याच्या वार्षिक माहिती विवरणपत्रामध्ये (AIS) दाखविले नाहीत. करदात्याने संबंधित सर्व माहिती तपासावी आणि आयकर विवरणपत्रामध्ये पूर्ण व अचूक माहिती नमूद करावी, अशी अपेक्षा केली जाते.
4. AIS अंतर्गत 'करदात्याचा माहिती सारांश' (TIS) यामध्ये कशाचा समावेश असतो?
'करदात्याचा माहिती सारांश' (TIS) हा करदात्यासाठी माहितीच्या विविध श्रेणींनुसार एकत्रित केलेला सारांश आहे. यामध्ये प्रत्येक माहितीच्या श्रेणीसाठी (उदा. वेतन, व्याज, लाभांश इत्यादी) दोन प्रकारची मूल्ये दाखविली जातात: सिस्टमद्वारे प्रक्रिया केलेले मूल्य (म्हणजेच, पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे माहितीची पुनरावृत्ती दूर केल्यानंतर तयार झालेले मूल्य) आणि करदात्याने स्वीकार केलेले किंवा स्रोताद्वारे पुष्टी केलेले मूल्य (म्हणजेच, करदात्याचा अभिप्राय किंवा करदात्याच्या अभिप्रायावर स्रोताची पुष्टी आणि सिस्टमद्वारे प्रक्रिया केलेले मूल्य यांचा विचार करून निश्चित केलेले मूल्य). TIS मधील करदात्याने स्वीकार केलेली किंवा स्रोताद्वारे पुष्टी केलेली माहिती, लागू असल्यास, विवरणपत्र पूर्व-भरण्यासाठी वापरली जाईल.
तुम्हाला करदात्याच्या माहितीच्या सारांशामध्ये विविध तपशील दाखवले जातील,जसे की,
- माहिती श्रेणी
- सिस्टमद्वारे प्रक्रिया केलेले मूल्य
- करदात्याद्वारे स्वीकृत केलेले/स्रोताद्वारे पुष्टि केलेले मूल्य
पुढे, माहिती श्रेणीमध्ये, खालील माहिती दर्शविली आहे:
भाग ज्याद्वारे माहिती प्राप्त झाली
- माहितीचे वर्णन
- माहितीचा स्त्रोत
- रकमेचे वर्णन
- रक्कम (स्त्रोताद्वारे अहवालित, सिस्टमद्वारे प्रक्रिया केलेली, करदात्याद्वारे स्वीकारलेली/स्त्रोताद्वारे पुष्टी केलेली)
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
5. AIS आणि फॉर्म 26AS (वार्षिक कर विवरणपत्र) यांच्यामध्ये काय फरक आहे?
ट्रेसेस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या 'वार्षिक कर विवरणपत्रात' (फॉर्म 26AS) केवळ करदात्याशी संबंधित TDS/TCS ची माहिती दर्शविली जाते. करदात्याशी संबंधित इतर तपशील AIS (वार्षिक माहिती विवरणपत्र) मध्ये उपलब्ध असतात.
AIS मध्ये करदात्याला नोंदवलेल्या व्यवहारांवर अभिप्राय देण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जातो. तसेच, माहितीच्या स्रोतानुसार व्यवहारांचे एकत्रीकरण AIS अंतर्गत असलेल्या TIS मध्ये दर्शविले जाते.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
6. मी वार्षिक माहिती विवरणपत्र कसे पाहू शकते/शकतो?
खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही वार्षिक माहिती विवरणपत्र सुविधेचा वापर करू शकता:
- स्टेप 1: https://www.incometax.gov.in/ या URL वर लॉगिन करा.
- स्टेप 2: लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवरील वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) मेन्यूवर क्लिक करा.
- स्टेेप 3:पुढे जा बटणावर क्लिक करा, ज्यानंतर तुम्हाला AIS पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाईल; त्यानंतर वार्षिक माहिती विवरणपत्र पाहण्यासाठी AIS टाइलवर क्लिक करा.
वैकल्पिकरित्या,
- स्टेप 1: https://www.incometax.gov.in/ या URLवर लॉगिन करा.
- स्टेप 2: लॉगिन केल्यानंतर ई-फाइल मेन्यू वर क्लिक करा.
- स्टेप 3: आयकर विवरणपत्रावर क्लिक करा व AIS पहा
- स्टेप 4:पुढे जा बटणावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला AIS पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाईल; त्यानंतर वार्षिक माहिती विवरणपत्र पाहण्यासाठी AIS टाइलवर क्लिक करा.
7. मी AIS मध्ये कार्यवाहीची हिस्ट्री ट्रॅक करू शकतो का?
होय, AIS च्या होमपेजवरील 'कार्यवाहीची हिस्ट्री' बटणावर क्लिक करून तुम्ही कार्यवाहीची हिस्ट्री पाहू शकता. यामध्ये तुम्हाला अनुपालन पोर्टलवर केलेल्या कार्यवाहींचा सारांश पाहायला मिळेल. प्रत्येक कार्यवाहीसाठी सिस्टमद्वारे एक विशिष्ट ओळख क्रमांक (कार्यवाही आयडी) तयार केला जाईल आणि या टॅब अंतर्गत कार्यवाहीची तारीख, कार्यवाहीचे वर्णन व तपशील प्रदर्शित केले जातील.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
8. मी माझे AIS कोणत्या फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकतो/शकते?
आपण वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) PDF, JSON, CSV फाइल फॉरमॅट्समध्ये डाउनलोड करू शकता.
9. माहितीबाबत अभिप्राय कसा सबमिट करावा?
खालील स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही TDS/TCS माहिती, SFT माहिती किंवा इतर माहिती अंतर्गत प्रदर्शित केलेल्या सक्रिय माहितीवर अभिप्राय सादर करू शकता:
• स्टेप 1: 'संबंधित माहितीवर' क्लिक करा आणि त्यानंतर 'अभिप्राय' रकान्यात दिलेल्या पर्यायी (ऐच्छिक) बटणावर क्लिक करा. तुम्हाला अभिप्राय जोडा स्क्रीनवर नेले जाईल.
• स्टेप 2: 'संबंधित अभिप्राय' पर्याय निवडा आणि अभिप्रायाचे तपशील प्रविष्ट करा (अभिप्राय पर्यायावर अवलंबून असेल).
• स्टेप 3: अभिप्राय सबमिट करण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
10. मी अभिप्राय सबमिट केल्यानंतर काय होईल?
AIS माहितीवर अभिप्राय यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर, तो अभिप्राय माहितीसोबत प्रदर्शित केला जाईल आणि माहितीचे सुधारित मूल्य देखील नोंदवलेल्या मूल्यासोबत दिसेल. 'कार्यवाही हिस्ट्री' टॅब देखील अपडेट केला जाईल, आणि तुम्ही खालील गोष्टी करू शकाल
पोचपावती डाउनलोड करा. अभिप्राय सबमिट केल्याबाबतचे पुष्टीकरण ईमेल आणि एसएमएसद्वारे सुद्धा पाठवले जाईल.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
11. AIS अभिप्राय सबमिट केल्यानंतर मला काही पुष्टीकरण मिळेल का?
होय, AIS माहितीवर तुमचा अभिप्राय यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, 'कार्यवाहीची हिस्ट्री' टॅब अपडेट केला जाईल आणि तुम्ही त्याची पोचपावती डाउनलोड करण्यास सक्षम असाल.अभिप्राय सबमिट केल्याचे पुष्टीकरण ईमेल आणि एसएमएसद्वारे पुष्टीकरणही पाठवले जाईल.
12. AIS एकत्रित अभिप्राय फाइल म्हणजे काय?
AIS एकत्रित अभिप्राय फाइल (ACF) करदात्यांना त्यांचे सर्व AIS अभिप्राय (अभिप्राय व्यतिरिक्त, ‘माहिती बरोबर आहे’) संबंधित माहिती सहज समजण्यासाठी एका PDF मध्ये पाहण्याची सुविधा देते. AIS बाबत अभिप्राय सबमिट केल्यानंतर, आपण AIS एकत्रित अभिप्राय फाइलची PDF प्रत डाउनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी, लॉगिन केल्यानंतर ई-फाइल/AIS मेन्यू अंतर्गत AIS वर जा.
13.दिलेल्या अभिप्रायामध्ये मी कितीवेळा बदल करू शकते/शकतो? त्यावर काही मर्यादा आहे का?
सध्या, आपण पूर्वी दिलेल्या अभिप्रायमध्ये किती वेळा बदल करू शकता यावर मर्यादा नाही.
14. मी AIS मधील GST उलाढाल पडताळून पाहू शकतो/शकते का?
होय, AIS माहिती कोड (EXC-GSTR3B) अंतर्गत GST उलाढालीशी संबंधित माहिती प्रदर्शित करते. ही माहिती AIS मधील इतर माहिती या टॅबमध्ये दिसून येईल.
15. AIS संदर्भातील काही व्हिडिओ मार्गदर्शिका उपलब्ध आहे का?
होय, AIS साठी यूट्यूबवर एक माहितीपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. हा व्हिडिओ येथे पाहता येईल.