स्थिती तपासा उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
TDS, TCS, अग्रिम कर किंवा स्वयंनिर्धारण कर याद्वारे भरलेली कराची रक्कम प्रत्यक्ष देय करापेक्षा जास्त असल्यास, आयकर विभागाकडून परत दिली जाणारी रक्कम म्हणजे आयकर परतावा होय. आयकर विभागाकडून निर्धारणाच्या वेळी सर्व कपाती आणि सवलती विचारात घेऊन कराची गणना केली जाते.
करदात्याने आयकर विवरणपत्राची ई-पडताळणी केल्यानंतरच आयकर विभागाकडून परताव्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. साधारणपणे, परताव्याची रक्कम करदात्याच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी 4 ते 5 आठवडे लागतात. मात्र, या कालावधीत परतावा प्राप्त न झाल्यास, ITR मधील तफावतींबाबत काही सूचना प्राप्त झाल्या आहेत का, हे तपासा. तसेच, परताव्याबाबत आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही सूचनेसाठी तुमचा ई-मेल तपासा. याशिवाय, खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार ई-फायलिंग पोर्टलवर परताव्याची स्थितीही तपासू शकता.
2. ही सेवा मिळवण्यासाठी पूर्व-अटी
- वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड
- पॅन आधार क्रमांकाशी लिंक केलेला आहे
- परताव्याचा दावा करण्यासाठी ITR फाइल केला जातो
3. प्रक्रिया/क्रमवार मार्गदर्शन
3.1 परताव्याची स्थिती
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.

स्टेप 2: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आता लिंक करा बटणावर क्लिक करा. अन्यथा, पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

स्टेप 3: ई-फाईल टॅब >आयकर विवरणपत्रे > फाईल केलेली विवरणपत्रे पहा यावर जा

स्टेप 4: आता तुम्ही इच्छित निर्धारण वर्षासाठी परताव्याची स्थिती तपासू शकता.
तपशील पहा> वर क्लिक करा. येथे तुम्ही फाईल केलेल्या ITR ची प्रगती देखील पाहू शकता.

स्थिती 1: परतावा जारी झाल्यावर:

स्थिती 2: परतावा अंशतः समायोजित झाल्यावर:

स्थिती 3: परतावा पूर्णपणे समायोजित झाल्यावर:

स्थिती 4: परतावा जारी करण्यात अयशस्वी झाल्यावर:

टीप: तुमचा पॅन निष्क्रिय असल्यास, परतावा जारी करण्यात अयशस्वी होईल आणि पॅन आधारशी लिंक करण्यासाठीची संदेश तुम्हाला दिसेल.

परतावा जारी करण्यात अयशस्वी होण्याची इतर कारणे:
उपरोक्त व्यतिरिक्त, आयकर विभागाकडून देय दिलेला परतावा खालील कारणांमुळे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही:
1. बँक खाते पूर्व-प्रमाणित नसल्यास. आता तुमचे बँक खाते पूर्व-प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
2. बँक खात्यामध्ये नमूद केलेले नाव पॅन कार्डवरील तपशीलांशी जुळत नसेल.
3. IFSC कोड अवैध असल्यास
4. आपण ITR मध्ये नमूद केलेले खाते बंद करण्यात आले असेल.