चालान तयार करा PAN लॉगिनद्वारे
1. अवलोकन
हा दस्तऐवज करदात्यांना आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत कर भरणा करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलद्वारे चलान फॉर्म्स ITNS 280N, ITNS 282N आणि ITNS 288N जनरेट करण्यासंबंधी क्रमवार मार्गदर्शन प्रदान करतो. आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत लागू होणारे चलान फॉर्म्स ITNS 280, ITNS 282 आणि ITNS 288 हे आहेत.
एक प्रमुख प्रक्रियात्मक बदल असा आहे की आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत चलान हे निर्धारण वर्षाच्या आधारे फाइल केले जात होते, तर आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत चलान हे कर वर्षाच्या आधारे फाइल करणे आवश्यक आहे.
या मॅन्युअलमध्ये करदाते योग्य अधिनियम, कराचा प्रकार आणि कर कालावधी निवडून दोन्ही अधिनियमांतर्गत चलान अचूकपणे कसे जनरेट करू शकतात हे स्पष्ट केले आहे.
• ITNS 280/280N मध्ये आयकर आणि निगम कराशी संबंधित पेमेंट्स समाविष्ट आहेत, ज्यामध्ये अग्रिम कर, स्व-निर्धारण कर आणि नियमित निर्धारण कर (400) यांचा समावेश आहे
• ITNS 282/282N मध्ये STT, CTT, कलम 379 अंतर्गत e-DRS आणि इतर लागू करांसाठीचे पेमेंट्स समाविष्ट आहेत
• ITNS 288/288N मध्ये ब्लॉक निर्धारणाशी संबंधित पेमेंट्स समाविष्ट आहेत, ज्यामध्ये ब्लॉक निर्धारणासाठीचा स्व-निर्धारण कर (311) आणि ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावरील कर (411) म्हणून मागणीनुसार करावयाच्या पेमेंट्सचा समावेश आहे.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठीच्या पूर्व-अटी
तुम्ही कर भरणा करण्यासाठी चलान प्री-लॉगिन (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यापूर्वी) किंवा पोस्ट-लॉगिन (ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर) पद्धतीने जनरेट करू शकता.
|
पर्याय |
पूर्व-अटी |
|
लॉगिन करण्यापूर्वी |
|
|
लॉगिन केल्यानंतर |
|
टीप: सध्या, ई-फायलिंग पोर्टलवर (ई-कर भरणा सेवा) पेमेंट गेटवे पद्धतीद्वारे कर भरणा करण्याची सुविधा केवळ अधिकृत बँकांमार्फतच उपलब्ध आहे.
3. क्रमवार मार्गदर्शक
3.1 चलान फॉर्म (CRN) जनरेट करणे (लॉगिन केल्यानंतर)
3.1.1 वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरुन ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
टीप :- वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसेल, तर तुम्हाला एक पॉप-अप संदेश दिसेल की, तुमचा पॅन तुमच्या आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे पॅन निष्क्रिय करण्यात आला आहे.
पॅन आधारसह लिंक करण्यासाठी, आता लिंक करा बटणावर क्लिक करा, अन्यथा पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
3.1.2 डॅशबोर्डवर, ई-फाइल > 'ई-कर भरणा' वर क्लिक करा. 'ई-कर भरणा' वर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला 'लागू अधिनियम निवड' स्क्रीनवर नेण्यात येईल. योग्य निवड केल्यानंतर, 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करा. त्यानंतर वापरकर्त्याला 'ई-कर भरणा' वर नेण्यात येईल.
3.1.3 'ई-कर भरणा' पेजवर, केवळ निवडक अधिकृत बँकांमार्फत नवीन चलान फॉर्म (CRN) तयार करण्यासाठी 'नवीन पेमेंट' या पर्यायावर क्लिक करा. या बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमार्फत कर भरणा आरबीआयने प्रदान केलेल्या NEFT/RTGS सुविधेद्वारे केला जाऊ शकतो.
3.1.4 'नवीन पेमेंट' पेजवर, तुम्हाला लागू होणाऱ्या कर भरणा टाइलवर 'पुढे जा' वर क्लिक करा. मागील स्क्रीनवर निवडलेल्या अधिनियमाच्या आधारे टाइल्स सक्षम केल्या जातील.
निर्धारण वर्ष 2026-27 पर्यंत आणि मागील वर्षांसाठी निर्धारण वर्ष 2026-27 च्या स्व-निर्धारण करासह पेमेंट करण्यासाठी, "आयकर अधिनियम 1961" हे रेडियो बटण निवडा.
कर वर्ष 2026–27 पासून पुढे पेमेंट करण्यासाठी, "आयकर अधिनियम 2025" हा पर्याय निवडा.
कृपया नोंद घ्या: काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी अधिनियम, 2015 शी संबंधित कर भरणा करण्यासाठी, कृपया “आयकर अधिनियम 1961” निवडा
आयकर, 1961 रेडियो बटण निवडल्यावर, खालील टाइल्स उपलब्ध होतील:
टाइल्सचे अवलोकन:
|
टाइलचे नाव |
मुख्य शीर्ष |
टाइल्ससाठी लागू सूचना आणि (लघु शीर्ष) |
|
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त इतरांसाठी) / निगम कर (कंपनी लॉगिनसाठी) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020) |
निर्धारण वर्ष 26-27 किंवा मागील वर्षांसाठी कर भरणा करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा • स्व‑निर्धारण कर (300) - पॅन आधारसह लिंक करण्यात विलंब झाल्यास शुल्क
कृपया नोंद घ्या: लघु कोडसाठी लागू ITNS
|
|
नियमित निर्धारण कर (400) म्हणून पेमेंटची मागणी करा |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020) |
निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षांची थकीत कर मागणी (400) भरण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा समाविष्ट चलान: ITNS 280 टीप: तुम्हाला DRN सह किंवा DRN शिवाय मागणी पेमेंट करण्याचा पर्याय असेल. |
|
समानीकरण कर / STT / CTT |
वस्तू आणि सेवांवरील इतर कर आणि शुल्क (0045) रोखे व्यवहार कर (0034) |
- STT अंतर्गत स्व‑निर्धारण कर (300), |
|
शुल्क / इतर पेमेंट्स
|
- बँकिंग रोख व्यवहार कर (0036) |
निर्धारण वर्ष 2009‑10 किंवा मागील वर्षांचा स्व‑निर्धारण कर (300) आणि थकीत कर मागणी (400) यांचे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा- ITNS 283 चा संदर्भ घ्या |
|
- हॉटेल पावती कर (0023) |
निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षांसाठी स्व‑निर्धारण कर आणि थकीत कर मागणी यांचे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. – ITNS 282 चा संदर्भ घ्या |
|
|
संकीर्ण पावत्या (0075) |
निर्धारण वर्ष 2026-27 किंवा मागील वर्षांसाठी (800) कलम 245MA (फॉर्म क्र. 34BC) अंतर्गत अर्ज शुल्क भरण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा: ITNS 282 चा संदर्भ घ्या |
|
|
ब्लॉक निर्धारणासाठी स्व-निर्धारण कर |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020) |
ब्लॉक निर्धारण (311) साठी स्व-निर्धारण कर भरणा करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा – ITNS 288 चा संदर्भ घ्या |
|
ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावर कर म्हणून मागणी पेमेंट (411) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020)
|
ब्लॉक कालावधीसाठी मागणी पेमेंट (411) करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा- ITNS 288 चा संदर्भ घ्या टीप: ब्लॉक निर्धारणाशी संबंधित मागणीचे पेमेंट फक्त DRN द्वारेच करता येते आणि हा पर्याय केवळ लॉगिननंतरच्या सुविधेद्वारेच उपलब्ध आहे. |
|
26 QB (मालमत्तेच्या विक्रीवरील TDS) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर मालमत्तेच्या विक्रीवरील कर भरणा करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
मालमत्तेवरील TDS साठी मागणी पेमेंट |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर मालमत्तेच्या विक्रीवरील TDS च्या मागणीचे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
26 QC (मालमत्तेच्या भाड्यावरील TDS) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर भाड्यावरील TDS चे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
मालमत्तेच्या भाड्यावरील TDS साठीचे मागणी पेमेंट |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर भाड्यावरील TDS साठीचे मागणी पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
26 QD (निवासी कंत्राटदार आणि व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील TDS) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर निवासी कंत्राटदार आणि व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील TDS चे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
निवासी कंत्राटदार आणि व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील TDS साठीचे मागणी पेमेंट |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर निवासी कंत्राटदार आणि व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील TDS साठीचे मागणी पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
26 QE (आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावरील TDS) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावरील TDS चे पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
|
आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावरील TDS साठीचे मागणी पेमेंट |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) |
जर पेमेंट करण्याची/जमा होण्याची तारीख निर्धारण वर्ष 2026‑27 किंवा मागील वर्षाशी संबंधित असेल, तर आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणावरील TDS साठीचे मागणी पेमेंट करण्यासाठी कृपया हा पर्याय निवडा. |
3.2 आयकर अधिनियम 2025 रेडियो बटण निवडल्यावर, खालील टाइल्स उपलब्ध होतील:
3.3 टाइल्सचे अवलोकन:-
3.3.1 आयकर /निगम कर टाइल व थकीत कर मागणी (नियमित निर्धारण कर) (400) टाइल
|
टाइलचे नाव |
मुख्य शीर्ष |
टाइल्ससाठी लागू सूचना आणि (लघु शीर्ष) |
|
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त इतरांसाठी) / निगम कर (कंपनी लॉगिनसाठी) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0020)
|
कर वर्ष 2026-27 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कर भरणा करण्यासाठी हा पर्याय निवडा- ITNS 280N चा संदर्भ घ्या
टीप: संबंधित कर वर्ष संपल्यानंतर ही टाइल सक्षम केली जाईल. (उदाहरणार्थ: कर वर्ष 2026‑27 साठी, स्व‑निर्धारण कर भरणा दिनांक 01 एप्रिल 2027 पासून पुढे करता येईल.)
- पॅन आधारसह लिंक करण्यात विलंब झाल्यास शुल्क |
|
नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट |
कर वर्ष 2026‑27 व त्यानंतरच्या वर्षांसाठी खालील गोष्टींचे पेमेंट करण्यासाठी हा पर्याय निवडा: वापरकर्त्याकडे DRN सह किंवा DRN शिवाय मागणी पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. • DRN सह: पेमेंट केवळ लॉगिननंतरच्या सुविधेद्वारे केले जाऊ शकते. कृपया नोंद घ्या: पेमेंटची सहजपणे जुळवणी करता यावी यासाठी, DRN क्रमांक वापरुन मागणी पेमेंट करण्याची शिफारस केली जाते - ITNS 280N चा संदर्भ घ्या |
आयकर टाइल/निगम कर टाइलवरील (कंपनी लॉगिनच्या बाबतीत) 'पुढे जा' बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला 'लागू कर तपशील जोडा' पेजवर नेले जाते, जिथे लागू होणारे कर वर्ष, लघु शीर्ष निवडून नंतर 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करता येते

नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट या टाइलवरील 'पुढे जा' बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला DRN सह किंवा DRN शिवाय (DRN उपलब्ध नसेल केवळ तेव्हाच) पेमेंट करण्यासाठी 'लागू मागणी तपशील जोडा' पेजवर नेले जाते.

DRN वापरुन पेमेंट करताना, DRN हा पर्याय निवडा. सिस्टम आपोआप DRN-संबंधित सर्व तपशील मिळवेल आणि 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक केल्यावर, तुम्हाला थेट पेमेंट पेजवर नेण्यात येईल.
DRN शिवाय पेमेंट करताना, तुम्हाला स्क्रीनवर दर्शविलेल्या हायपरलिंकवर क्लिक करून कर वर्ष, लघु शीर्ष निवडणे आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करणे आवश्यक असेल. हा पर्याय लॉगिन करण्यापूर्वीच्या आणि लॉगिन केल्यानंतरच्या अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध आहे.
3.3.2 STT/CTT/ कलम 379 अंतर्गत E-DRS / इतर कर टाइल
|
टाइल |
मुख्य शीर्ष |
टाइल्ससाठी लागू सूचना आणि (लघु शीर्ष) |
|
STT/ CTT/ कलम 379 अंतर्गत E-DRS / इतर कर टाइल |
रोखे व्यवहार कर (0034) |
कर वर्ष 2026-27 व त्यानंतरच्या वर्षांसाठी कर भरणा करण्यासाठी हा पर्याय निवडा - ITNS 282N चा संदर्भ घ्या
|
|
संकीर्ण पावत्या (0075) |
कर वर्ष 2026‑27 व त्यानंतरच्या वर्षांसाठी कलम 379 अंतर्गत e‑DRS योजने अंतर्गत संकीर्ण पावत्यांचे (800) पेमेंट करण्यासाठी हा पर्याय निवडा - ITNS 282N चा संदर्भ घ्या |
|
|
इतर कर (0028) |
कर वर्ष 2026‑27 व त्यानंतरच्या वर्षांसाठी कर भरणा करण्याकरिता हा पर्याय निवडा- ITNS 282N चा संदर्भ घ्या
|
STT/CTT/ कलम 379 अंतर्गत E-DRS/ इतर कर टाइलवरील, 'पुढे जा' बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला 'लागू कर तपशील जोडा' पेजवर नेले जाते, जिथे लागू होणारे कर वर्ष, मुख्य शीर्ष, लघु शीर्ष निवडून नंतर 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करावे लागते

3.3.3 ब्लॉक निर्धारणासाठी स्व-निर्धारण कर (311) आणि ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावरील कर म्हणून मागणी पेमेंट (411)
|
टाइल |
मुख्य शीर्ष |
टाइल्ससाठी लागू सूचना आणि (लघु शीर्ष) |
|
ब्लॉक निर्धारणासाठी स्व-निर्धारण कर (311) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0020) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0021) |
कर वर्ष 2020 व त्यानंतरच्या वर्षांसाठी (311) ब्लॉक निर्धारणासाठी स्व-निर्धारण कर भरणा करण्याकरिता हा पर्याय निवडा- ITNS: 288N चा संदर्भ घ्या |
|
ब्लॉक कालावधीसाठी शोध निर्धारणावरील कर म्हणून मागणी पेमेंट (411) |
आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0020) / निगम कर (कंपनी लॉगिन) (0021) |
कर वर्ष 2020 व त्यानंतरच्या वर्षांसाठी (411) ब्लॉक कालावधीसाठी मागणी पेमेंट करण्याकरिता हा पर्याय निवडा- ITNS: 288N चा संदर्भ घ्या |
ब्लॉक निर्धारणासाठी स्व-निर्धारण कर (311) टाइलवरील 'पुढे जा' बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला ब्लॉक कालावधीचे प्रारंभिक कर वर्ष, लघु शीर्ष निवडण्यासाठी आणि 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करण्यासाठी 'लागू कर तपशील जोडा' पेजवर नेले जाते.

3.3.4 फॉर्म 141 साठी कृपया फॉर्म 141[कलम 393(1) अंतर्गत कर कपातीचे चलान-सह-विवरण] साठी वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या
3.4 कर भरणा
3.4.1 'लागू कर तपशील जोडा' / 'लागू मागणी तपशील जोडा' पेजवरील 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक केल्यावर (नियमित निर्धारण कर (400) टाइल म्हणून मागणी पेमेंट करण्याच्या बाबतीत), वापरकर्त्याला 'कर रकमेचे विभाजन तपशील जोडा' पेजवर नेले जाते, जिथे ते कर भरणा केलेल्या एकूण रकमेचे विभाजन तपशील प्रविष्ट करून 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करू शकतात
3.4.2 “कर रकमेचे विभाजन तपशील जोडा” पेजवरील 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक केल्यावर, ज्या पेमेंट पद्धतीद्वारे पेमेंट करायचे प्रस्तावित केले आहे ती पद्धत निवडा. (“विविध पद्धती वापरून पेमेंट कसे करावे” याबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया संबंधित वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या)
3.4.3 “पुढे सुरू ठेवा” बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला पूर्वावलोकन करून पेमेंट करा पेजवर नेले जाईल.
येथे, वापरकर्ता पुढील गोष्टी करू शकतो/शकते:
• पेमेंट करण्यापूर्वी, प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करणे.
• जर काही दुरुस्त्या आवश्यक असतील, तर वापरकर्ता मागे जाऊन माहिती अपडेट करण्यासाठी “संपादित करा” बटणावर क्लिक करू शकतो/शकते.
• जर सर्व तपशील बरोबर असतील, तर वापरकर्ता “आता पेमेंट करा” बटणावर क्लिक करू शकतो/शकते, त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांना बँकेच्या पेमेंट पेजवर पुनर्निर्देशित करण्यात येईल.
टीप: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर एक पुष्टीकरण ई-मेल आणि एक एसएमएस प्राप्त होईल. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, भविष्यातील संदर्भांसाठी चलान पावती डाउनलोड केली जाऊ शकते. लॉगिन केल्यानंतर, 'ई-कर भरणा' पेजवर 'पेमेंट हिस्ट्री' या टॅबखाली पेमेंटचे तपशील आणि चलान पावती देखील उपलब्ध आहे.
3.5 चलान फॉर्म (CRN) जनरेट करणे (लॉगिन करण्यापूर्वी)
3.5.1 ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर जा आणि ई-कर भरणा वर क्लिक करा.
3.5.2 ई-कर भरणा पेजवर, आवश्यक तपशील भरा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.5.3 ओटीपी पडताळणी पेजवर, स्टेप 2 मध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.5.4 ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर, तुमचा पॅन आणि छुपे नाव असणारा एक यशस्वीतेचा संदेश दर्शविला जाईल. पुढे जाण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.5.5 ई-कर भरणा पेजवर, तुम्हाला लागू होणाऱ्या कर भरणा श्रेणीवर पुढे जा वर क्लिक करा.
• निर्धारण वर्ष 2026-27 पर्यंतच्या आणि मागील वर्षांच्या पेमेंट्ससाठी, तसेच निर्धारण वर्ष 2026-27 साठीच्या स्व-निर्धारण करासह, पेमेंट्स करण्यासाठी “आयकर अधिनियम 1961” हे रेडियो बटण निवडा.
• कर वर्ष 2026–27 पासून पुढील वर्षांसाठी पेमेंट्स करण्याकरिता, “आयकर अधिनियम 2025” निवडा.
कृपया नोंद घ्या: काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी अधिनियम, 2015 शी संबंधित कर भरणा करण्यासाठी, कृपया 'आयकर अधिनियम, 1961' निवडा
3.5.6 आयकर, 1961 रेडियो बटण निवडल्यावर, खालील टाइल्स उपलब्ध होतील:
3.5.7 आयकर, 2025 रेडियो बटण निवडल्यावर, खालील टाइल्स उपलब्ध होतील:
टाइल्सची निवड करण्यापासून पेमेंट प्रक्रियेपर्यंतची पुढील प्रक्रिया, लॉगिननंतरच्या सुविधेसाठी वर नमूद केल्याप्रमाणेच असेल. (स्टेप 3.3.1 ते 3.4.3 चा संदर्भ घ्या)