ई-कार्यवाहीबाबत
ई-कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. ई-कार्यवाही म्हणजे काय?
ई-कार्यवाही हा ई-फाइलिंग पोर्टलवर एंड-टू-एंड पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक मंच आहे. या सेवेचा वापर करून, कोणताही नोंदणीकृत वापरकर्ता/ वापरकर्ती (किंवा त्याच अधिकृत)आयकर विभागाने जारी केलेली कोणतीही नोटीस / सूचना / पत्र पाहू शकतो आणि त्यावर आपला प्रतिसाद सबमिट करू शकतो/ शकते.
2. ई-कार्यवाहीचे लाभ काय आहेत?
ई-कार्यवाही ही आयकर विभागाद्वारे जारी केलेल्या नोटीस / सूचना/ पत्रांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रतिसाद द्यायची सोपी पद्धत आहे. आयकर कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे, याद्वारे करदात्यावरील अनुपालनाचा भार कमी होतो. तसेच, भविष्यातील संदर्भासाठी सादरीकरणांचा मागोवा घेणे आणि नोंदी जतन करणे सोपे जाते.
3. मला जारी करण्यात आलेल्या सूचनेला मी दिलेला प्रतिसाद सबमिट केल्यानंतर मला माझा प्रतिसाद पाहता येऊ शकतो का?
होय, ई-कार्यवाहीमध्ये आपण किंवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीने सबमिट केलेला प्रतिसाद आपल्याला पाहता येऊ शकतो.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या माहितीसाठी
4. आयकर अधिनियम,1961 च्या उपकलम 143(1)(a) / आयकर अधिनियम, 2025 च्या 270(1)(a) उपकलमात समायोजना संदर्भात मी दिलेल्या प्रतिसादावर कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत की नाही, हे मला कुठे पाहता येईल?
आयकर विभागाने ई-कार्यवाही अंतर्गत उपस्थित केलेले प्रश्न आपण पाहू शकता.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
5. कार्यवाहीची मुदत संपायला अद्याप 4 दिवस बाकी आहेत. तरी मला माझा प्रतिसाद का सबमिट करता येत नाही?
जर तुमची कार्यवाहीची स्थिती खुली(ओपन) असेल, तर 'प्रतिसाद सबमिट करा' हा पर्याय कार्यवाहीची मुदत संपण्याच्या 7 दिवस आधीपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. जर कोणतीही अंतिम तारीख नसेल, तर आयकर प्राधिकरण 'ई-सबमिट' हा पर्याय बंद करू शकते. तथापि, आयकर प्राधिकरणाच्या निर्णयानुसार, सादरीकरणाची सुविधा कार्यवाहीच्या मुदतीपर्यंत पर्यंत पुन्हा कार्यान्वित केली जाऊ शकते.
6. ई-फाइलिंग पोर्टलवर नोटिसला प्रतिसाद दिल्यानंतर मी माझा प्रतिसाद संपादित करू शकतो/शकते का?
नाही, एकदा ई-फाइलिंग पोर्टलवर सबमिट केल्यानंतर आपण आपला प्रतिसाद संपादित करू शकत नाही.
7. आयकर अधिनियम, 1961 आणि आयकर अधिनियम, 2025 नुसार ई-कार्यवाही अंतर्गत मी कोणत्या नोटिस /आदेशांना प्रतिसाद देऊ शकतो/ शकते?
आयकर विभाग आणि CPC द्वारे जारी केलेल्या सर्व नोटिस / सूचना / पत्रे ई-कार्यवाही अंतर्गत उपलब्ध करून दिली जातात, जिथे आपण ती पाहू शकता आणि ई-फाइलिंग पोर्टलवर आवश्यक जोडपत्रे अपलोड करून त्यासोबत आपला प्रतिसाद सबमिट करू शकता. या सेवेद्वारे आपण खालील नोटिसा पाहू शकता आणि त्यावर आपला प्रतिसाद सबमिट करू शकता:
- आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(9) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 263 (7) अंतर्गत सदोष सूचनापत्र
- आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 143(1) (a) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 270 (1) अंतर्गत प्रथमदर्शनी समायोजन
- आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 154 किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 284 अंतर्गत स्वेच्छेने केलेली दुरुस्ती
- निर्धारण अधिकार्याने जारी केलेले सूचना पत्र
- 'स्पष्टीकरणाची मागणी' करणारे संप्रेषण
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
8. निर्धारण अधिकाऱ्याद्वारे जारी केलेल्या सूचनांना प्रतिसाद देताना, जर जोडपत्रांची संख्या किंवा आकार अनुमत मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर मी काय करावे?
एका दस्तऐवजाचा कमाल अनुमत आकार 5 MB आहे. जर आपल्याला 1 पेक्षा जास्त दस्तऐवज अपलोड करायचे असतील, तर आपण 10 पर्यंत जोडपत्रे निवडू शकता. सर्व जोडपत्रांचा एकूण आकार 50 MB पेक्षा जास्त नसावा. जर एखाद्या दस्तऐवजाचा आकार अनुमत मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर आपण फाइलचा आकार कमी करून ते दस्तऐवज ऑप्टिमाइझ करू शकता.
9. सदोष विवरणपत्र म्हणजे काय?
आयकर अधिनियम, 1961 च्या उपकलम 139(9) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या उपकलम 263(7) नुसार, विवरणापत्र किंवा अनुसूचींमध्ये असलेल्या अपूर्ण किंवा विसंगत माहितीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे विवरण सदोष मानले जाऊ शकते.
10. माझे विवरणपत्र सदोष आहे की नाही हे मला कसे कळेल?
जर आपले विवरणपत्र सदोष आढळले, तर आयकर विभाग आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेलद्वारे आयकर अधिनियम, 1961 च्या उपकलम 139(9) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या उपकलम 263(7) अंतर्गत आपल्याला सदोष नोटीस पाठवेल आणि ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून आपण ती पाहू शकता.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
11. ई-फाइलिंग पोर्टलवर प्रतिसाद सबमिट केल्यानंतर मी माझा प्रतिसाद अपडेट करू शकतो/ शकते का?
नाही, ई-फाइलिंग पोर्टलवर आपण आपला प्रतिसाद सबमिट केल्यानंतर तो अपडेट किंवा मागे घेऊ शकत नाही.
12. माझ्या सदोष नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीला अधिकृत करू शकतो/शकते का?
होय, उपकलम 139(9) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या उपकलम 263(7) अंतर्गत असलेल्या सदोष नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीला अधिकृत करू शकता.
13. आयकर विभागाने पाठवलेल्या सदोष नोटीसला मी किती कालमर्यादेत प्रतिसाद देऊ शकतो/शकते?
आपण फाइल केलेल्या विवरणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास, आपल्या विवरणपत्रामधील त्रुटी सुधारण्यासाठी, आपल्याला नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा किंवा नोटीस मध्ये नमूद केलेला कालावधी मिळेल. तथापि, आपण स्थगितीची (तहकुबीची) मागणी करू शकता आणि मुदत वाढवण्याची विनंती करू शकता.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
14. मी सदोष नोटीसला प्रतिसाद दिला नाही तर काय होईल?
जर आपण दिलेल्या मुदतीत सदोष नोटीसला प्रतिसाद देण्यास अपयशी ठरलात, तर आपले विवरणपत्र अवैध मानले जाऊ शकते आणि आयकर अधिनियम, 1961 किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या तरतुदींनुसार परिस्थितीनुसार दंड, व्याज, तोटा पुढे न नेणे, विशिष्ट सवलती गमावणे यासारखे परिणाम घडू शकतात.
15. आयकर अधिनियम, 1961 च्या उपकलम 139(9) किंवा आयकर अधिनियम, 2025 च्या उपकलम 263(7) अंतर्गत सदोष विवरणपत्राबाबत मला सूचित करण्यात आले आहे. मी त्या करनिर्धारण वर्षासाठी/कर वर्षासाठी नवीन विवरण दाखल करू शकतो/शकते का?
होय, जर एखाद्या विशिष्ट करनिर्धारण वर्षासाठी/कर वर्षासाठी विवरणपत्र दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपली नसेल, तर आपण नवीन किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करू शकता किंवा पर्याय म्हणून आपण उपकलम 139 किंवा 263 अंतर्गत आलेल्या नोटीसला प्रतिसाद देणे निवडू शकता.
तथापि, एकदा एखाद्या विशिष्ट करनिर्धारण वर्षासाठी/कर वर्षासाठी विवरणपत्र दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपली, तर आपण नवीन किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करू शकणार नाही आणि आपल्याला आयकर अधिनियम, 2025 च्या उपकलम 139(9) किंवा 263(7) अंतर्गत आलेल्या नोटीसला प्रतिसाद द्यावाच लागेल. जर आपण प्रतिसाद देण्यास अपयशी ठरलात तर आपले विवरणपत्र अवैध किंवा त्या निर्धारण वर्षासाठी फाइल केले गेले नाही असे मानले जाईल.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई> ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
16. विवरणपत्र सदोष ठरण्यास कारणीभूत असणाऱ्या काही सामान्य चुका कोणत्या आहेत?
काही सामान्य चुका ज्यामुळे विवरणपत्र सदोष होते त्या खालील प्रमाणे आहेत:
- TDS साठी क्रेडिटचा दावा केला गेला आहे परंतु संबंधित प्राप्त्या/उत्पन्न, कर आकारणीसाठी वगळण्यात आले आहे.
- फॉर्म 26AS, AIS मध्ये दर्शविलेली एकूण प्राप्ती, ज्यावर TDS क्रेडिटचा दावा केला गेला आहे, ती उत्पन्नाच्या विवरणपत्रात उत्पन्नाच्या सर्व शीर्षांखाली दर्शविलेल्या एकूण प्राप्तीपेक्षा जास्त असेल.
- सकल एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाची सर्व शीर्षे शून्य किंवा 0 म्हणून नोंदवली आहेत, परंतु कर दायित्वाची गणना करून तो भरला गेला असेल.
- ITR मधील करदात्याचे नाव पॅन डेटाबेसमधील नावाशी जुळत नसेल.
- करदात्याचे व्यवसाय किंवा पेशाचे नफा आणि लाभ या शीर्षाखाली उत्पन्न आहे, परंतु त्यांनी ताळेबंद आणि नफा-तोटा खाते पत्रक भरलेले नाही.
17. 'स्पष्टीकरणाची मागणी' करणारे संप्रेषण म्हणजे काय?
'स्पष्टीकरणाची मागणी' करणारे संप्रेषण करदात्याला अशा वेळी पाठवले जाते, जेव्हा विवरणपत्राच्या एखाद्या अनुसूची किंवा परिशिष्टांतर्गत पुरवलेली माहिती अपूर्ण असते आणि करदात्याने केलेल्या विशिष्ट दाव्यांवर स्पष्टीकरणाची आवश्यकता असते.
क्रम:डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
18. ई-कार्यवाही सेवेचा वापर करून प्रतिसाद पाहण्यासाठी आणि ते सबमिट करण्यासाठी मला ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता आहे का?
होय, ई-कार्यवाही सेवा वापरून आपला प्रतिसाद पाहण्यासाठी व सबमिट करण्यासाठी आपल्याला ई-फाइलिंग लॉगिन करावे लागेल.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
19. ई- कार्यवाही सेवेचा वापर करून केलेल्या प्रतिसादाची/ सादरीकरणाची ई-पडताळणी करणे आवश्यक आहे का?
नाही, ई-कार्यवाही सेवेचा वापर करून आपण सबमिट केलेल्या प्रतिसादाची ई-पडताळणी करण्याची आवश्यकता नाही.
20. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन न करता मी 'स्पष्टीकरणाची मागणी' करणाऱ्या नोटीसला प्रतिसाद देऊ शकतो/शकते का?
नाही, 'स्पष्टीकरणाची मागणी'संप्रेषणाला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला लॉगिन करणे आवश्यक असेल. आपल्याला जारी केलेली नोटीस पाहता येणार नाही किंवा त्या नोटीसवर आपला प्रतिसाद सादर करता येणार नाही.
क्रम: डॅशबोर्ड > प्रलंबित कारवाई > ई-कार्यवाही > आपल्या कृतीसाठी
21. आयकर प्राधिकरणाने मला जारी केलेल्या नोटिसांना माझ्या वतीने ई-कार्यवाही सेवेचा वापर करून इतर कोणी प्रतिसाद देऊ शकते का?
होय, ई-कार्यवाही सेवेचा वापर करून आपल्या वतीने सूचनेला प्रतिसाद देण्यासाठी आपण अधिकृत प्रतिनिधी समाविष्ट करू शकता.
22. मी आधीच समाविष्ट केलेला / विद्यमान अधिकृत प्रतिनिधी काढून टाकू शकतो/शकते का?
होय, आपण अधिकृत प्रतिनिधीला काढून टाकू शकता किंवा त्याला दिलेले अधिकार मागे घेऊ शकता.
23. मला जारी केलेल्या नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी मी दोन अधिकृत प्रतिनिधी जोडू शकतो/शकते का?
नाही, कार्यवाहीसाठी एका वेळी केवळ एकच अधिकृत प्रतिनिधी सक्रिय असू शकतो.
24.मी सुधारित विवरणपत्र दाखल केले आहे. तरीही मला जारी करण्यात आलेल्या 'स्पष्टीकरणाची मागणी' करणाऱ्या संप्रेषणाला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे का?
नाही, जर आपण त्याच करनिर्धारण वर्षासाठी/कर वर्षासाठी आधीच सुधारित विवरणपत्र दाखल केले असेल, तर प्रतिसाद सबमिट करण्याची अनुमती दिली जाणार नाही. तिथे 'या नोटीस संदर्भात सुधारित विवरणपत्र दाखल केले गेले आहे; पुढील कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही' असा संदेश प्रदर्शित केला जाईल.
25.मला जारी करण्यात आलेल्या 'स्पष्टीकरणाची मागणी' करणाऱ्या संप्रेषणाला प्रतिसाद देणे माझ्यासाठी अनिवार्य आहे का? असल्यास, मी कोणत्या कालमर्यादेत माझा प्रतिसाद सबमिट केला पाहिजे?
आपल्याला जारी करण्यात आलेल्या संप्रेषणामध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेनुसार आपला प्रतिसाद सबमिट करणे आवश्यक आहे. जर अंतिम तारीख उलटून गेली असेल आणि कोणताही प्रतिसाद दिला गेला नसेल, तर CPC त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे विवरणपत्रावर प्रक्रिया करेल.
26. वेबसाईटवर प्रतिसाद सबमिट करण्याचे बटण निष्क्रिय का आहे?
'प्रतिसाद सबमिट करा' बटण खालील कारणांमुळे निष्क्रिय असू शकते
- CPC नोटीसांसाठी - जर प्रतिसादाची अंतिम तारीख उलटून गेली असल्यास.
- ITBA नोटिसांसाठी - जर आयकर प्राधिकरणाद्वारे कार्यवाहीची स्थिती बंद/अवरोधित केली गेली असल्यास.