1. कोणत्या परिस्थितीत विलंबाच्या माफीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो?

तुमच्या विलंबाच्या माफीची विनंती स्वीकारली जाईल याची कोणतीही खात्री नाही. तुमची विनंती स्वीकारायची की नाही, हे पूर्णपणे आयकर विभागाच्या विवेकाधिकारावर अवलंबून आहे. विलंबाचे कारण योग्य आणि समाधानकारक असल्याचे आयकर विभागाला वाटल्यास, विलंब माफी मंजूर केली जाऊ शकते.

पुढीलपैकी काही कारणांमुळे कर प्राधिकरणांकडून विलंब माफ केला जाऊ शकत नाही:

  1. करदात्याने विलंबासाठी वैध आणि समाधानकारक कारणे सादर न केल्यास;
  2. करदात्याने वारंवार नियमांचे पालन न केल्याचा इतिहास असल्यास, विहित मुदतीत विवरणपत्र फाईल करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्यास किंवा वेळेवर कर भरण्यास अपयशी ठरल्यास;
  3. करदात्याने विलंबाच्या माफीच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावे सबमिट केले नसतील तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विलंबाचे कारण सिद्ध करणारे पुरावे इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे.

2. आयकर प्राधिकरणाकडून विलंबाच्या माफीच्या विनंतीस मंजुरी मिळाल्यानंतर करदात्याने काय करावे?

आयकर प्राधिकरणाकडून विलंबाच्या माफीच्या विनंतीस मंजुरीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर करदात्याने आयकर विवरणपत्र फाईल करणे आवश्यक आहे.

3. विलंबाच्या माफीची विनंती मंजूर झाल्यानंतर ITR फाईल करण्याच्या स्टेप्स काय आहेत?

तुमच्या विलंबाच्या माफीच्या विनंतीस मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही पुढील स्टेप्सनुसार अनुसरण करू शकता:

  • तुमचे आयकर विवरणपत्र अपलोड करा.
  • अपलोड केलेल्या आयकर विवरणपत्राची ई-पडताळणी करा.