आयकर कॅल्क्युलेटर उपयोगकर्ता पुस्तिका

 

1. अवलोकन

आयकर कॅल्क्युलेटर कार्यक्षमता दोन्ही नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत ई-फाइलिंग वापरकर्त्यांना, कमावलेले उत्पन्न आणि कायद्यानुसार दावा केलेल्या कपातीचा तपशील देऊन, आयकर कायदा, आयकर नियम, अधिसूचना इत्यादींच्या तरतुदींनुसार कराची गणना करण्यास सक्षम करते.

ही सेवा जुन्या आणि नवीन कर व्यवस्थेनुसार कराची तुलना करून जुन्या किंवा नवीन कर व्यवस्थेच्या अंतर्गत कराची गणना देखील प्रदान करते.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी

ई-फाइलिंग पोर्टलचा अ‍ॅक्सेस

3. क्रमवार मार्गदर्शक

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.

Data responsive

स्टेप 2: क्विक लिंक्स विभागात 'आयकर कॅल्क्युलेटर' वर क्लिक करा. 

Data responsive

तुम्हाला ‘आयकर कॅल्क्युलेटर’ पेजवर नेले जाईल.
जिथे तुम्ही आयकर कायदा, 2025 आणि आयकर कायदा, 1961 या दोन्हीनुसार तुमच्या कराची गणना करू शकता.

तेथे दोन टॅब्ज असतील-

1. बेसिक कॅल्क्युलेटर' आणि
2. अ‍ॅडव्हान्स्ड कॅल्क्युलेटर'

'बेसिक कॅल्क्युलेटर' टॅब बाय डीफॉल्ट निवडलेला असतो.

कृपया नोंद घ्या:
• आयकर कायदा, 2025 आपोआप निवडला जाईल आणि कर वर्ष केवळ 2026–27 म्हणून उपलब्ध असेल.
• जर तुम्हाला आयकर कायदा, 1961 नुसार कराची गणना करायची असेल, तर लागू असलेला कायदा 'आयकर कायदा, 1961' निवडा आणि निर्धारण वर्ष निवडा.

Data responsive

स्टेप 3a: 'बेसिक कॅल्क्युलेटर' टॅबमध्ये, आवश्यक तपशील प्रविष्ट करा, जसे की पॅन, करदात्याचे नाव, लागू असलेला कायदा (आयकर कायदा, 2025 किंवा आयकर कायदा, 1961), कर वर्ष/निर्धारण वर्ष, करदात्याची श्रेणी, वय, निवासी स्थिती, एकूण वार्षिक उत्पन्न, एकूण भत्ते / सवलती / आणि जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत प्रकरण VIA/VIIIA च्या कपाती. तुम्ही प्रविष्ट केलेल्या तपशिलानुसार कराची गणना 'टॅक्स सारांश' विभागात दिसून येईल.

Data responsiveData responsive

टीप 1:कृपया नोंद घ्या की, योग्य करदाता श्रेणी आणि निवासी स्थिती यांच्या निवडीवर आधारित, टॅक्स कॅल्क्युलेटर स्क्रीनवरील संबंधित फील्ड वापरकर्त्याच्या इनपुटसाठी सक्षम किंवा अक्षम केल्या जातील. उदाहरणार्थ, जर वरील स्क्रीनमध्ये करदाता श्रेणी 'HUF' आणि निवासी स्थिती 'रहिवासी' म्हणून निवडली असेल, तर वयाची अट आता अक्षम होईल.
करदात्यांनी टॅक्स कॅल्क्युलेटर वापरण्यास पुढे जाण्यापूर्वी योग्य श्रेणी आणि निवासी स्थिती निवडावी.

टीप 2: जुन्या आणि नवीन कर व्यवस्थेअंतर्गत कराची अधिक तपशीलवार तुलना पाहण्यासाठी ‘तुलना पहा’ वर क्लिक करा.

Data responsiveData responsive

स्टेप 3b:जर तुम्ही 'अ‍ॅडव्हान्स्ड कॅल्क्युलेटर' निवडले, तर खालील तपशील प्रविष्ट करा:
पॅन, करदात्याचे नाव, लागू असलेला अधिनियम (आयकर अधिनियम, 2025 किंवा आयकर अधिनियम, 1961), ITR चा प्रकार (अपडेटेड विवरणपत्र किंवा अपडेटेड विवरणपत्राव्यतिरिक्त), पसंतीची कर व्यवस्था, कर वर्ष/निर्धारण वर्ष, करदात्याची श्रेणी, वय, निवासी स्थिती, देय तारीख आणि विवरणपत्र सादर केल्याची वास्तविक तारीख.

कृपया नोंद घ्या:
• आयकर अधिनियम, 2025 आपोआप निवडला जाईल आणि कर वर्ष केवळ 2026-27 म्हणून उपलब्ध असेल.
• जर तुम्हाला आयकर अधिनियम, 1961 नुसार कराची गणना करायची असेल, तर लागू असलेला अधिनियम 'आयकर अधिनियम, 1961' निवडा.
• जर तुम्हाला अपडेटेड विवरणपत्रासाठी कराची गणना करायची असेल, तर लागू असलेला अधिनियम 'आयकर अधिनियम, 1961' निवडा आणि नंतर अपडेटेड विवरणपत्रासाठी निर्धारण वर्ष निवडा. कर वर्ष 2026-27 साठी अपडेटेड विवरणपत्र भरणे 01/01/2028 नंतर लागू होईल, त्यानुसार हे पोर्टलवर सक्षम केले जाईल.

'उत्पन्न आणि कर गणना तपशील' अंतर्गत, खालील आवश्यक तपशील प्रविष्ट करा:
•पगारया शीर्षकाखालील उत्पन्न, 
•गृह संपत्तीया शीर्षकाखालील उत्पन्न,
•भांडवली नफाया शीर्षकाखालील उत्पन्न,
•व्यवसाय किंवा पेशाया शीर्षकाखालील उत्पन्न, आणि 
•इतर स्त्रोतया शीर्षकाखालील उत्पन्न.

'कपात तपशील' अंतर्गत, तुम्हाला लागू असलेल्या संबंधित कपाती प्रविष्ट करा, ज्यामध्ये PPF, LIC, गृहनिर्माण कर्ज, NPS, आरोग्य विमा, उच्च शिक्षणावरील कर्ज यांचा समावेश आहे परंतु ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही.

'करपात्र उत्पन्न' अंतर्गत, TDS/TCS/MAT/AMT जमा रक्कम आणि स्व-निर्धारण कर / अग्रिम कर प्रविष्ट करा.

Data responsiveData responsive

आपल्याद्वारे देण्यायोग्य असलेला एकूण कर आणि व्याज पेजच्या शेवटी प्रदर्शित केले जाईल.

स्टेप 4: तुम्ही ‘डाउनलोड करा’ बटणावर क्लिक करून कॅलक्युलेशन PDF डाऊनलोड करू शकता.

Data responsive

स्टेप 5: कॅलक्युलेशन PDF डाऊनलोड होईल.

Data responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsiveData responsive