त्वरित ई-पॅन सेवा वापरकर्ता मार्गदर्शक
1.अवलोकन
त्वरित ई-पॅन सेवा सर्व वैयक्तिक करदात्यासाठी उपलब्ध अहे ज्यांना अद्याप कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) मिळालेला नाही परंतू त्यांच्याकडे आधार क्रमांक आहे. ही पूर्व-लॉगिन सेवा आहे,जिथे आपण खालील गोष्टी करू शकता:
- आधार आणि त्यासोबत लिंक केलेल्या तुमच्या मोबाइल नंबरच्या मदतीने, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिटल स्वाक्षरीयुक्त पॅन विनामूल्य प्राप्त करा,
- आधार ई-KYC नुसार पॅन तपशील अपडेट करा,
- पॅन वितरित/अपडेट केल्यानंतर, ई-KYC तपशीलांच्या आधारे ई-फाइलिंग खाते तयार करा आणि
- ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यापूर्वी किंवा लॉग इन केल्यानंतर प्रलंबित ई-पॅन विनंतीची स्थिती तपासा / ई-पॅन डाउनलोड करा.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी
- ज्या व्यक्तींना पॅन वितरित केलेले नाही
- वैध आधार आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- वापरकर्ता विनंतीच्या तारखेला अल्पवयीन नसावा; आणि
- वापरकर्ता आयकर अधिनियमाच्या कलम 160 अंतर्गत ‘प्रतिनिधी निर्धारिती’ या व्याख्येत समाविष्ट नसावा.
3.क्रमवार मार्गदर्शक
3.1 नवीन ई-पॅन जनरेट करा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल होमपेजवर जा, 'त्वरित ई-पॅन' वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-पॅन पेजवर, 'नविन ई-पॅन मिळवा' वर क्लिक करा'.

स्टेप 3: नवीन ई-पॅन मिळवा' पेजवर आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'मी याची पुष्टी करतो/करते' चेकबॉक्स निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- आधार क्रमांक आधीपासूनच वैध पॅनशी लिंक केलेला असल्यास, पुढील संदेश दाखवला जाईल – प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आधीपासून पॅनशी लिंक केलेला आहे.
- आधार क्रमांक कोणत्याही मोबाईल नंबरशी लिंक केलेला नसेल, तर पुढील संदेश दाखवला जाईल – प्रविष्ट केलेला आधार क्रमांक कोणत्याही मोबाईल नंबरशी लिंक केलेला नाही.
स्टेप 4: ओटीपी प्रमाणीकरण पेजवर, 'मी संमतीच्या अटी वाचल्या आहेत आणि पुढे जाण्यास माझी सहमती आहे' वर क्लिक करा. 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

स्टेप 5:ओटीपी प्रमाणीकरण पेजवर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा. त्यानंतर, UIDAI सह आधार तपशील प्रमाणित करण्यासाठी चेकबॉक्स निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- अचूक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी आहेत.
- स्क्रीनवर दर्शविणारा ओटीपी कालबाह्यता काउंटडाउन टाइमर ओटीपी किती वेळात कालबाह्य होईल, याची माहिती देतो.
- 'ओटीपी पुन्हा पाठवा' वर क्लिक केल्यानंतर, नवीन ओटीपी जनेरट करून पाठवला जाईल.
स्टेप 6:‘आधारचे तपशील प्रमाणित करा’ पेजवर ‘मी यास सहमती देतो/देते’ या चेकबॉक्सची निवड करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- ईमेल आयडी (तुमच्या आधारशी नोंदणीकृत असलेला) लिंक / प्रमाणित करणे ऐच्छिक आहे.
- जर तुम्ही आधारमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट केला असेल, परंतु तो अद्याप प्रमाणित केला नसेल, तर ‘ई-मेल प्रमाणित करा’ वर क्लिक करा. ‘ई-मेल आयडी प्रमाणित करा’ पेजवर आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
- जर तुम्ही आधारमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट केला नसेल, तर ‘ई-मेल आयडी लिंक करा’ वर क्लिक करा. ‘ई-मेल आयडी प्रमाणित करा’ पेजवर आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
यशस्वीरीत्या सबमिट केल्यावर, पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. तसेच, आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

3.2 आधार ई-KYC नुसार पॅन तपशील अपडेट करा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि 'त्वरित ई-पॅन' वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-पॅन पेजवर, 'पॅन अपडेट करा' वर क्लिक करा.

स्टेप 3:'पॅन तपशील अपडेट करा' पेजवर, तुमचा 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा, 'मी याची पुष्टी करतो/करते' हा चेकबॉक्स निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- जर आधार आधीच वैध पॅनशी लिंक केलेला असेल, तर खालील संदेश दाखवला जाईल - प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आधीच पॅनशी लिंक केलेला आहे.
- जर आधार कोणत्याही मोबाईल नंबरशी लिंक केलेला नसेल, तर खालील संदेश दाखवला जाईल - दिलेला आधार क्रमांक कोणत्याही सक्रिय मोबाईल नंबरशी लिंक केलेला नाही.
स्टेप 4:ओटीपी प्रमाणीकरण पेजवर, आधारशी नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- अचूक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी आहेत.
- स्क्रीनवर दर्शविणारा ओटीपी कालबाह्यता काउंटडाउन टाइमर ओटीपी किती वेळात कालबाह्य होईल,याची माहिती देतो.
- 'ओटीपी पुन्हा पाठवा' वर क्लिक केल्यानंतर, नवीन ओटीपी जनरेट करून पाठवला जाईल.
स्टेप 5: ओटीपी प्रमाणीकरण झाल्यानंतर, आधार ई-KYC मधील तपशील तसेच पॅनमधील नोंदणीकृत तपशील प्रदर्शित केले जातील. आधार ई-KYC नुसार अपडेट करावयाच्या तपशीलांसाठी संबंधित चेकबॉक्स निवडा आणि ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

कृपया लक्षात घ्या, आधारच्या तपशीलानुसार केवळ खालील तपशील अपडेट केले जाऊ शकतात:
- फोटो
- नाव
- जन्मतारीख (जर तुमच्या पॅनमध्ये फक्त जन्मवर्ष नमूद असेल, तर पॅनमध्ये अपडेट करण्यापूर्वी तुम्हाला आधारमध्ये जन्मतारीख अपडेट करावी लागेल.)
- मोबाईल नंबर (तो डिफॉल्टनुसार अपडेट केला जातो)
- ईमेल आयडी (पॅन तपशीलांमध्ये अपडेट करण्यासाठी तुम्ही ईमेल आयडी प्रमाणित करणे आवश्यक आहे)
- पत्ता
स्टेप 6: आधारमधील तपशीलांनुसार तुम्ही अपडेट करू इच्छित असलेले सर्व तपशील निवडल्यानंतर,'पुष्टी करा' वर क्लिक करा.

पुष्टी केल्यानंतर, पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. तसेच, आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

3.3 प्रलंबित ई-पॅन विनंतीची स्थिती तपासा / ई-फायलिंग पोर्टल खाते तयार करा / ई-पॅन डाउनलोड करा.
स्टेप 1:ई-फाइलिंग पोर्टल होमपेजवर जा आणि 'त्वरित ई-पॅन' वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-पॅन पेजवर, ‘स्थिती तपासा / पॅन डाउनलोड करा’ या पर्यायावर ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

स्टेप 3: 'स्थिती तपासा/पॅन डाउनलोड करा' पेजवर, 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

स्टेप 4: 'ओटीपी प्रमाणीकरण पेजवर, आधारशी नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- अचुक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी आहेत.
- स्क्रीनवर दर्शविणारा ओटीपी कालबाह्यता काउंटडाउन टाइमर ओटीपी किती वेळात कालबाह्य होईल,याची माहिती देतो.
- 'ओटीपी पुन्हा पाठवा' वर क्लिक केल्यानंतर, नवीन ओटीपी जनरेट करून पाठवला जाईल.
स्टेप 5: 'तुमच्या ई-पॅन विनंतीची सद्यस्थिती' पेजवर, आपण आपल्या ई-पॅन विनंतीची स्थिती पाहू शकता. नवीन ई-पॅन जनरेट होऊन प्रदान करण्यात आला असल्यास, तो पाहण्यासाठी 'ई-पॅन पहा' वर किंवा त्याची प्रत डाउनलोड करण्यासाठी 'ई-पॅन डाउनलोड करा' वर क्लिक करा. ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 'ई-फाइलिंग खाते तयार करा' वर क्लिक करा.

टीप: टीप: जर तुम्ही ई-पॅन जनरेट करताना किंवा पॅन तपशील अपडेट करताना तुमचा (आधार KYC नुसार) ईमेल आयडी प्रमाणित केला नसेल, तर नोंदणी करताना तो प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
3.4 लॉगिननंतर ई-पॅन डाउनलोड करा
स्टेप 1:तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

टीप: ई-पॅन प्राप्त झाल्यानंतर तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.यशस्वी नोंदणीनंतरच तुम्ही पोर्टलवर लॉगिन करू शकता. अधिक माहितीसाठी 'ई-फाइलिंगसाठी (करदाता) नोंदणी करा' ही उपयोगकर्ता पुस्तिका पहा.
स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर सेवा> 'ई-पॅन पहा / डाउनलोड करा' वर क्लिक करा.

स्टेप 3: 'आधार क्रमांक प्रविष्ट करा' पेजवर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

स्टेप 4: 'ओटीपी प्रमाणीकरण' पेजवर आधारशी नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

टीप:
- ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- अचूक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी आहेत.
- स्क्रीनवर दर्शविणारा ओटीपी कालबाह्यता काउंटडाउन टाइमर ओटीपी किती वेळात कालबाह्य होईल,याची माहिती देतो.
- 'ओटीपी पुन्हा पाठवा' वर क्लिक केल्यानंतर, नवीन ओटीपी जनरेट करून पाठवला जाईल.
स्टेप 5: 'ई-पॅन पहा / डाउनलोड करा' पेजवर, तुम्ही तुमच्या ई-पॅन विनंतीची स्थिती पाहू शकता. नवीन ई-पॅन जनरेट करून दिला असल्यास, तो पाहण्यासाठी 'ई-पॅन पहा' वर क्लिक करा किंवा त्याची प्रत डाउनलोड करण्यासाठी 'ई-पॅन डाउनलोड करा' वर क्लिक करा.

4.संबंधित विषय
- (करदाता) ई-फाइलिंगसाठी नोंदणी करा
- डॅशबोर्ड आणि कार्यसूची
- लॉगिन
- तुमच्या पॅनची पडताळणी करा
- आधार लिंक करा
- तुमचा पॅन जाणून घ्या