ITR-V बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न / आयकर विवरणपत्राच्या ई-पडताळणीसाठी 30 दिवसांची मुदत
ITR-V बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न / आयकर विवरणपत्राच्या ई-पडताळणीसाठी 30 दिवसांची मुदत
1. ITR-V च्या ई-पडताळणीसाठी किंवा सबमिट करण्यासाठी वेळेची मर्यादा काय आहे?
आयकर विवरणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून ITR-V ची ई-पडताळणी किंवा सादर करण्यासाठी 30 दिवसांची वेळ मर्यादा असेल.
(अधिक माहितीसाठी पहा: अधिसूचना क्रमांक 2/2024, दिनांक 31.03.2024, लागू दिनांक 01/04/2024)
2. ई-पडताळणी किंवा ITR-V 30 दिवसांच्या कालमर्यादेनंतर सबमिट केल्यास काय होईल?
जर आयकर विवरणपत्र अपलोड केले असेल आणि अपलोड केल्याच्या 30 दिवसांच्या आत ITR-V सबमिट केला असेल, तर अशा प्रकरणांमध्ये आयकर विवरणपत्र अपलोड केल्याची तारीख हीच विवरणपत्र सबमिट केल्याची तारीख मानली जाईल.
ITR पडताळणीची वेळ मर्यादा कमी केल्यामुळे होणाऱ्या परिणामाचे उदाहरण खालीलप्रमाणे आहे.
| ITR अपलोड करण्याची तारीख | ITR पडताळणीची तारीख | ITR दाखल/फाइल केल्याची ग्राह्य धरली जाणारी तारीख |
| 5 जुलै 2025 | 10 जुलै 2025 | 5 जुलै 2025 |
| 5 जुलै 2025 | 10 ऑगस्ट 2025 | 10 ऑगस्ट 2025 |
(अधिक जाणून घेण्यासाठी पहा: दिनांक 31.03.2024 रोजीची अधिसूचना क्रमांक 2/2024 01/04/2024 पासून प्रभावी)
3. ई-पडताळणी किंवा ITR-V 30 दिवसांच्या कालमर्यादेनंतर सबमिट केल्यास काय होईल?
ज्या प्रकरणांमध्ये आयकर विवरणपत्र विहित मुदतीत अपलोड केले आहे परंतु अपलोड केल्याच्या 30 दिवसांनंतर ई-पडताळणी किंवा ITR-V सबमिट केला आहे, अशा प्रकरणांमध्ये ई-पडताळणी /ITR-V सबमिशनची तारीख हीच आयकर विवरणपत्र सादर केल्याची तारीख मानली जाईल आणि अधिनियमांतर्गत रिटर्न उशिरा भरण्याचे सर्व लागू असणारे परिणाम लागू होतील. 30 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यासाठी, योग्य रित्या पडताळणी केलेला ITR-V CPC कडे ज्या दिवशी प्राप्त होईल ती तारीख ग्राह्य धरली जाईल. पुढे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, जर आयकर विवरणपत्र अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी केले नाही, तर असे विवरणपत्र अवैध मानला जाईल, तथापि खऱ्या व योग्य कारणांमुळे झालेल्या विलंबासाठी विलंब माफीचा अर्ज सबमिट केला जाऊ शकतो.
ITR पडताळणीसाठी कमी करण्यात आलेल्या कालमर्यादेचा परिणाम खालील उदाहरणाद्वारे स्पष्ट केला आहे.
| ITR अपलोड करण्याची तारीख | ITR पडताळणीची तारीख | ITR दाखल/फाइल केल्याची गृहीत धरली जाणारी तारीख |
| 5 जुलै 2025 | 10 जुलै 2025 | 5 जुलै 2025 |
| 5 जुलै 2025 | 10 ऑगस्ट 2025 | 10 ऑगस्ट 2025 |
(अधिक जाणून घेण्यासाठी पहा: दिनांक 31.03.2024 रोजीची अधिसूचना क्रमांक 2/2024 01/04/2024 पासून प्रभावी)
4. ITR-V कोणत्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे?
निर्धारित नमुन्यात आणि विहित पद्धतीने योग्य रित्या पडताळणी केलेला ITR-V केवळ सामान्य पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून खालील पत्त्यावरच पाठवला जावा:
सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, आयकर विभाग, बेंगळुरू - 560500, कर्नाटक.
(अधिक जाणून घेण्यासाठी पहा: दिनांक 31.03.2024 रोजीची अधिसूचना क्रमांक 2/2024 01/04/2024 पासून प्रभावी)
5. स्पीड पोस्टद्वारे ITR-V पाठवल्यास, पडताळणीसाठी कोणती तारीख ग्राह्य धरली जाईल?
30 दिवसांचा कालावधी निश्चित करण्याच्या उद्देशाने, योग्य रित्या पडताळणी केलेला ITR-V CPC मध्ये ज्या दिवशी प्राप्त होईल ती तारीख पडताळणीची तारीख म्हणून ग्राह्य धरली जाईल.
(अधिक जाणून घेण्यासाठी पहा: दिनांक 31.03.2024 रोजीची अधिसूचना क्रमांक 2/2024 01/04/2024 पासून प्रभावी)
6. ITR पडताळणीच्या पद्धती कोणत्या आहेत?
ITR पडताळणी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने इलेक्ट्रॉनिक किंवा मॅन्युअली पूर्ण केली जाऊ शकते:
ई-पडताळणी
- पॅनशी लिंक असलेल्या आधार कार्डवर नोंदणीकृत असलेल्या करदात्याच्या मोबाईल नंबरवर प्राप्त होणारा ओटीपी
- ऑनलाइन पूर्व-प्रमाणित बँक खाते, डिमॅट खाते, नेट बँकिंग किंवा ऑटोमेटेड टेलर मशीन द्वारे जनरेट केलेला इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC)
- डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC)
मॅन्युअल पडताळणी
स्वाक्षरी केलेला ITR-V फॉर्म केंद्रीकृत प्रक्रिया केंद्रकडे पाठवणे