TAN तपशील जाणून घ्या
(एका क्लिकमध्ये TAN माहिती मिळवा)
(एका क्लिकमध्ये TAN माहिती मिळवा)
TAN तपशील जाणून घेण्याबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. TAN म्हणजे काय?
TAN म्हणजे कर कपात आणि संकलन खाते क्रमांक होय. हा ITD द्वारे जारी केलेला 10-अंकी अक्षरांक क्रमांक आहे.
2. कोणाला TAN प्राप्त करणे आवश्यक आहे?
TAN अशा सर्व व्यक्तींनी प्राप्त करणे आवश्यक आहे ज्यांच्यावर स्त्रोतावर कर कपात करण्याची किंवा स्त्रोतावर कर संकलन करण्याची जबाबदारी आहे. TDS/TCS विवरणपत्र, कोणतेही TDS/TCS कर भरणा चलान, TDS/TCS प्रमाणपत्रे तसेच ITD शी होणाऱ्या संप्रेषणांमध्ये विहित केल्यानुसार इतर कागदपत्रांमध्ये TAN नमूद करणे अनिवार्य आहे.
3. TAN चे तपशील जाणून घ्या" या सेवेचा वापर करण्यासाठी मी ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्यक आहे का?
नाही. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत असलेले दोन्ही वापरकर्ते या सेवेचा वापर करू शकतात. ही सेवा लॉगिन करण्यापूर्वी ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवरील क्विक लिंक्स विभागामधील TAN चे तपशील जाणून घ्या वर क्लिक करून ॲक्सेस केली जाऊ शकते.
4. मला माझ्या कपातकर्त्याच्या TAN तपशीलांचा वापर कोणत्या हेतूसाठी करावा लागेल?
तुमच्या वतीने जी कोणी व्यक्ती स्रोतावर कर कपात (TDS) करते त्या व्यक्तीच्या TAN ची पडताळणी करणे ही एक चांगली सवय आहे. तुमच्या फॉर्म 16/16A/26AS चा संदर्भ घ्या आणि त्यामध्ये तुम्ही आर्थिक वर्षासाठीचे TDS चे तपशील पाहू शकाल. TAN चे तपशील जाणून घ्या" या सेवेचा वापर करून, तुम्ही योग्य व्यक्तीने कर कपात केली आहे की नाही याची पडताळणी करू शकता. याचबरोबर, कोणताही TDS लागू असल्यास, तुमचे आयकर विवरणपत्र फाइल करताना तुम्हाला TAN नमूद करणे आवश्यक आहे.
5. जर माझ्या नियोक्त्याने TAN प्राप्त केला नसेल तर काय?
नियोक्त्याला TAN प्राप्त करण्यात आणि/किंवा नमूद करण्यात अपयश आल्यास तो/ती आयकर अधिनियम, 2025 संबंधित विभागांतर्गत दंडास पात्र ठरेल. तसेच, नियोक्त्याला TDS जमा करता येणार नाही (जर तो कापला गेला असेल तर) आणि त्यासंबंधी TDS विवरणपत्रसुद्धा फाइल करता येणार नाही. जर तुमचे वेतन करपात्र श्रेणीत येत असेल आणि तुमच्या नियोक्त्याने TDS कपात केली नसेल, तर तुम्हाला लागू असल्यास स्व-निर्धारण कर आणि/किंवा अग्रिम कर भरावा लागू शकतो.
6. सरकारी कपातकर्त्यांसाठी TAN करिता अर्ज करणे अनिवार्य आहे का?
होय.
7. स्त्रोतावर कर संकलन करण्याच्या हेतूने स्वतंत्र TAN प्राप्त करणे आवश्यक आहे का?
जर TAN चे आधीच वाटप झाले असेल, तर TAN प्राप्त करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. TCS करिता सर्व विवरणपत्रे, चलान आणि प्रमाणपत्रांमध्ये तोच क्रमांक नमूद केला जाऊ शकतो.