तुमचे JAO जाणून घ्या वापरकर्ता मार्गदर्शक

 

1. अवलोकन

'तुमचे JAO जाणून घ्या' ही सेवा वैध पॅन असलेल्या करदात्यांसाठी (ई-फायलिंगवर नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत) उपलब्ध आहे. या सेवेच्या माध्यमातून तुम्ही विशिष्ट पॅनसाठी अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याचा (JAO) तपशील पाहू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी
 

  • वैध पॅन
  • वैध मोबाइल नंबर

3. क्रमवार मार्गदर्शन


स्टेप 1:ई-फायलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि ‘तुमचे JAO जाणून घ्या’ यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2:‘तुमचा अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकारी जाणून घ्या’ या पेजवर तुमचा पॅन आणि वैध मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा व ‘पुढे सुरू ठेवा’ यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3:स्टेप 2 मध्ये तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला 6 अंकी ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘प्रमाणित करा’ वर क्लिक करा.

Data responsive

टीप:

  • ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुम्हाला 3 प्रयत्न करता येतील.
  • स्क्रीनवरील ओटीपी एक्सपायरी काउंटडाउन टाइमर हा ओटीपी कधी कालबाह्य होईल हे दर्शवतो.
  • 'ओटीपी पुन्हा पाठवा’ वर क्लिक केल्यास नवीन ओटीपी जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.

ओटीपीची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला अधिकारक्षेत्र निर्धारण अधिकाऱ्याचा तपशील (यामध्ये क्षेत्र कोड, AO चा प्रकार, रेंज कोड, AO क्रमांक, कार्यक्षेत्र, पत्ता, JAO चा ई-मेल आयडी) तसेच तुमच्या पॅनची स्थिती दिसेल.

Data responsive

4. संबंधित विषय