आधार लिंक करण्याबाबत उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
आयकर अधिनियम 1961 च्या कलम 139AA किंवा आयकर अधिनियम 2025 च्या कलम 262 मधील तरतुदींनुसार पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन कार्डच्या नवीन अर्जदारांकरिता, आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची प्रक्रिया ही अर्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यानच आपोआप पूर्ण केली जाते. 01-07-2017 रोजी अथवा त्याआधी पॅन जारी करण्यात आलेल्या विद्यमान पॅन धारकांनी त्यांचे पॅन हे आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य आहे. 'आधार लिंक करा' सेवा ही वैयक्तिक दोन्ही करदात्यांसाठी (नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत) ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचे पॅन हे आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे निष्क्रिय होईल. तथापि, सूटप्राप्त श्रेणी अंतर्गत येणार्या काही व्यक्तींना पॅन निष्क्रिय झाल्याचे परिणाम लागू होणार नाहीत.
पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याकरिता दोन मुख्य स्टेप्स आहेत.
1. ई-फाइलिंग पोर्टलवर आधार पॅन लिंक करण्याच्या शुल्काचे पेमेंट करणे (एकल चलानमध्ये मुख्य शीर्ष 0021 अंतर्गत लघु शीर्ष 500)
2. ई-फाइलिंग पोर्टलवर पॅन कार्डशी आधार लिंक करणे.
पॅनशी आधार लिंक केल्यानंतर तुम्ही तुम्ही आधार लिंक स्थिती या फंक्शनॅलिटी लिंकचा वापर करून स्थिती तपासू शकता.
2. या सेवेचा लाभ घेण्याकरिता पूर्व-अटी:
- वैध पॅन
- आधार क्रमांक
- वैध मोबाइल नंबर
3. ई-फाइलिंग पोर्टलवर आधार-पॅन लिंक शुल्काचे पेमेंट कसे करावे
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होम पेज वर जा.
क्विक लिंक्स विभागातील ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा. किंवा ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा आणि ‘प्रोफाइल’ विभागातील ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा.

स्टेप 2: 'आधार लिंक करा' विभागातील 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा पॅन आणि आधार नंबर प्रविष्ट करा आणि 'प्रमाणित करा' वर क्लिक करा.
स्टेप 4: ‘ई-कर भरणा च्या माध्यमातून देय करण्याकरिता 'पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
स्टेप 5: लागू आयकर अधिनियम 2025 निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 6:तुमचा पॅन प्रविष्ट करा, पॅनची पुष्टी करा आणि ओटीपी प्राप्त करण्याकरिता कोणताही वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
स्टेप 7: ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला परत ‘ई- कर भरणा’ वर नेले जाते. ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
स्टेप 8:'आयकर' टाइल मधील 'पुढे जा' वर क्लिक करा.
स्टेप 9:संबंधित कर वर्ष, इतर प्राप्तीच्या रूपात पेमेंटचा प्रकार (500), पेमेंटचा उप प्रकार (आधार कार्डशी पॅन लिंक करण्यामध्ये झालेल्या विलंबाचे शुल्क) निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 10:'इतर' पर्यायासमोर असलेली लागू रक्कम पूर्व-भरलेली असेल. 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
आता चलान जनरेट होईल. पुढील स्क्रीन वर, तुम्हाला पेमेंट करण्याची पद्धत निवडावी लागेल. पेमेंटची पद्धत निवडल्यानंतर, तुम्हाला त्या बँकेच्या वेबसाइटवर पुन्हा नेले जाईल जिथे तुम्ही पेमेंट करु शकता.
शुल्काचे पेमेंट केल्यानंतर, तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर पॅनशी आधार लिंक करू शकता.
4. शुल्काचे पेमेंट केल्यानंतर आधार पॅन लिंकची विनंती कशा प्रकारे सबमिट करावी
आधार पॅन लिंकची विनंती लॉगिन केल्यानंतर तसेच लॉगिन करण्याआधी अशा दोन्ही पद्धतीने करता येते.
प्रत्येक पद्धतीसाठीच्या तपशीलवार स्टेप्स खाली दिलेल्या आहेत:
आधार पॅन लिंक विनंती सबमिट करा (लॉगिन केल्यानंतर):
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल > लॉगिन वर जा> डॅशबोर्डवरील प्रोफाइल विभागामध्ये 'पॅनशी आधार लिंक करणे' या पर्यायामध्ये 'लिंक आधार' वर क्लिक करा.
अथवा पर्यायी स्वरूपात वैयक्तिक तपशील विभागातील 'आधार लिंक करा' वर क्लिक करा.
स्टेप 2: आधार नंबर प्रविष्ट करा आणि 'प्रमाणित करा' वर क्लिक करा.
आधार पॅन लिंक विनंती सबमिट करा (लॉगिन करण्याआधी):
स्टेप 1:ई-फाइलिंग पोर्टलवरील होम पेज वर जा आणि 'क्विक लिंक्स' अतंर्गत 'आधार लिंक करा' वर क्लिक करा.
स्टेप 2:'आधार लिंक करा' या विभागातील 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 3: पॅन आणि आधार प्रविष्ट करा आणि 'प्रमाणित करा' वर क्लिक करा.
जर तुम्ही आधार पॅन लिंक शुल्काचे पेमेंट केले असेल तर पेमेंटच्या तपशीलाची पडताळणी केली जाईल. 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 4:गरजेनुसार अत्यावश्यक तपशील प्रविष्ट करा आणि 'आधार लिंक करा’ वर क्लिक करा.
स्टेप 5:मागील स्टेपमध्ये मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी नंबर प्रविष्ट करा आणि 'प्रमाणित करा' वर क्लिक करा.
स्टेप 6:आधार लिंक करण्याची विनंती यशस्वीपणे सबमिट झालेली आहे, आता तुम्ही आधार-पॅन लिंक स्थिती तपासू शकता.
परिस्थिती 1: जर ई-फाइलिंग पोर्टलवर पेमेंटच्या तपशीलाची पडताळणी केली गेली नसेल
स्टेप 1: पॅन आणि आधारचे प्रमाणीकरण झाल्यानंतर, तुम्हाला खालील पॉपअप संदेश दिसेल
'पेमेंटचा तपशील आढळला नाही'. आधार पॅन लिंकची विनंती सबमिट करण्याकरिता शुल्काचे पेमेंट करणे ही पूर्वअट असल्याने शुल्काचे पेमेंट करण्याकरिता ‘ई-कर भरणा च्या माध्यमातून देय करण्याकरिता पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
टीप: जर तुम्ही शुल्काचे पेमेंट आधीच केले असेल तर 4-5 कामकाजाचे दिवस वाट पहा. त्यानंतर तुम्ही विनंती सबमिट करु शकता.
टीप: कृपया तुम्ही तुमच्या पॅन कार्डशी योग्य आधार लिंक करत आहात हे सुनिश्चित करा.
जर आधार आणि पॅन हे आधीच लिंक केलेले असतील किंवा पॅन हे इतर आधार कार्डाशी लिंक केलेले असेल किंवा त्याउलट असेल तर तुम्हाला खालील त्रुटी दिसतील:
परिस्थिती 2: पॅन हे आधीपासूनच आधारकार्डशी किंवा इतर आधारकार्डशी लिंक केलेले असेल:
तुम्हाला तुमच्या अधिकारक्षेत्रातील निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याची आणि चुकीच्या पॅनसह आपला आधार डिलिंक करण्याची विनंती सबमिट करावे लागू शकते.
तुमच्या JAO चे संपर्क तपशील जाणून घेण्यासाठी, https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO (लॉगिन करण्याआधी)
किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/dashboard/myProfile/jurisdictionDetail (लॉगिन केल्यानंतर) वर जा
परिस्थिती 3: जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट केले असेल आणि पेमेंट व तपशीलांची पडताळणी ई-फाइलिंग पोर्टलवर केली गेली असेल
स्टेप 1: पॅन आणि आधारचे प्रमाणीकरण झाल्यानंतर तुम्हाला 'तुमच्या पेमेंट तपशीलाची पडताळणी झाली आहे' असा पॉपअप संदेश दिसेल, कृपया आधार पॅन लिंक करण्याची विनंती सबमिट करण्याकरिता पॉपअप संदेशावरील 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 2:आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि 'आधार लिंक करा' बटणावर क्लिक करा.
स्टेप 3: आधार पॅनची लिंक करण्याची विनंती यशस्वीपणे सबमिट झाली आहे, आता तुम्ही आधार पॅन लिंकची स्थिती तपासू शकता.
5. आधार लिंक करण्याची स्थिती पहा (लॉगिन करण्याआधी)
स्टेप 1:ई-फाइलिंग पोर्टलवरील होमपेज वर, 'क्विक लिंक्स' अंतर्गत 'आधार लिंक करा/स्थिती पहा' वर क्लिक करा.
स्टेप 2:'स्थिती पहा' टाइल अंतर्गत येणार्या 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 3:तुमचा पॅन आणि आधार नंबर प्रविष्ट करा व 'आधार लिंक करण्याची स्थिती पहा' वर क्लिक करा.
प्रमाणीकरण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार लिंक करण्याच्या स्थितीशी संबंधित संदेश दाखविला जाईल.
आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्यास:
आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्यास:
6. आधार लिंक करण्याची स्थिती पहा (लॉगिन केल्यानंतर)
स्टेप 1:लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर 'आधार लिंक करा' वर क्लिक करा.
स्टेप 2:किंवा तुम्ही 'माझे प्रोफाइल' > 'आधार लिंक करण्याची स्थिती' वर जाऊ शकता.
(जर तुमचे आधार आधीपासूनच लिंक केले असेल तर आधार नंबर दाखवला जातो. जर आधार लिंक केले नसेल तर 'आधार लिंक करण्याची स्थिती' दाखवले जाते.)
टीप:
- जर प्रमाणीकरण पूर्ण झाले नाही तर स्थिती पेज वरील 'आधार लिंक करा' वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्याकरिता आवश्यक असलेल्या स्टेप्स परत कराव्या लागतील.
- जर आपला पॅन आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी विनंती प्रमाणित करण्यासाठी UIDAI कडे प्रलंबित असेल तर, आपल्याला नंतर स्थिती तपासणे आवश्यक आहे.
- खालील परिस्थितींमध्ये आधार आणि पॅन डिलिंक करण्यासाठी तुम्हाला अधिकारक्षेत्रातील AO शी संपर्क साधावा लागू शकतो:
- तुमचे आधार इतर पॅनशी लिंक केले गेले असल्यास
- तुमचे पॅन इतर आधारशी लिंक केले गेले असल्यास
प्रमाणीकरण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या आधार लिंक करण्याच्या स्थितीशी संबंधित संदेश दाखविला जाईल.
अस्वीकरण:
ही उपयोगकर्ता पुस्तिका केवळ माहिती आणि सामान्य मार्गदर्शनाकरिता जारी करण्यात आली आहे. करदात्यांनी आपापल्या प्रकरणांना लागू होणारी अचूक माहिती, अर्थनिर्वचन व स्पष्टीकरणांसाठी आयकर अधिनियमाशी संबंधित परिपत्रके, अधिसूचना, नियम आणि तरतुदींचा संदर्भ घ्यावा. या उपयोगकर्ता पुस्तिकेवर आधारित कोणत्याही कृतीसाठी आणि/अथवा घेतलेल्या निर्णयांसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.