नेट बँकिंगद्वारे लॉगिन - वापरकर्ता मार्गदर्शक
1. अवलोकन
लॉगिन सेवा ई-फाइलिंग पोर्टलच्या नोंदणीकृत वापरकर्त्याला ई-फाइलिंग पोर्टल आणि ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा ॲक्सेस करण्यास सक्षम करते.
ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करण्याच्या विविध पद्धती आहेत. सर्व लॉगिन पद्धती आणि त्यासाठी प्रविष्ट करावयाचे क्रेडेन्शियल्स खाली सूचीबद्ध केले आहेत:
| लॉगिनची पद्धत | प्रविष्ट करावयाचे क्रेडेन्शियल्स |
|
नेट बँकिंग (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केलेली नाही) |
नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड |
|
नेट बँकिंग (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केली आहे) |
वापरकर्ता आयडी (पॅन) व पासवर्ड + द्वितीय घटक प्रमाणीकरणासाठी नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड |
|
बँक/डिमॅट खाते EVC (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केली आहे) |
वापरकर्ता आयडी (पॅन) व पासवर्ड + द्वितीय घटक प्रमाणीकरणासाठी बँक EVC |
| DSC | वापरकर्ता आयडी (पॅन) व पासवर्ड + द्वितीय घटक प्रमाणीकरणासाठी DSC |
| वापरकर्ता आयडी वापरून लॉगिन करा – सीए, TAN वापरकर्ता, ERI, बाह्य एजन्सी, ITDREIN वापरकर्त्यांसाठी | वापरकर्ता आयडी व पासवर्ड |
बहुतेक प्रमुख बँका त्यांच्या नेट बँकिंग सेवांद्वारे ई-फाइलिंग पोर्टल ॲक्सेस करण्याची सुविधा देतात. कर-संबंधित सेवांसाठी ई-फाइलिंग खात्यांत लॉगिन करण्याचा हा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.
तुमची बँक ही सुविधा देते का हे तपासण्यासाठी, तुम्ही आयकर ई-फाइलिंग वेबसाइटवर नेट बँकिंगचा पर्याय शोधू शकता.
या वापरकर्ता पुस्तिकेत, आपण नेट बँकिंगद्वारे ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन कसे करावे (जर 'ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा' सक्षम असेल/नसेल) याबद्दल चर्चा करणार आहोत.
2. पूर्व अटी:
1. ई-फाइलिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड (जर नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी ई-फाइलिंग व्हॉल्ट सक्षम केलेले असेल)
2. ई-फाइलिंग पोर्टलमध्ये बँक खाती वैध केलेली असावीत आणि नेट बँकिंगद्वारे लॉगिनसाठी नामनिर्देशित केलेली खाती सक्षम केलेली असावीत.
3. नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड.
4. नेट बँकिंगद्वारे ई-फाइलिंग खात्यात लॉगिन करण्यापूर्वी करदात्याने एकदा तरी नेट बँकिंगमध्ये लॉगिन केलेले असावे.
3. क्रमवार प्रक्रिया:
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा. 'लॉगिन' वर क्लिक करा.
स्टेप 2: लॉगिन पेजवर, 'नेट बँकिंग' वर क्लिक करा.
कृपया लक्षात घ्या:
1. जर नेट बँकिंगद्वारे लॉगिनसाठी ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केलेली असेल, तर तुम्हाला प्रथम ई-फाइलिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर नेट बँकिंग बँक निवडावी लागेल.
2. नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी जर ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केलेली नसेल- तर लॉगिन पेजवर, 'नेट बँकिंग' या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: 'नेट बँकिंगद्वारे लॉगिन करा' या पेजवर बँक निवडा.
स्टेप 4: बँक निवडल्यावर, एक पॉप-अप संदेश दिसेल की ‘तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवरून बाहेर पडून इतर पक्षांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेबसाइटवर प्रवेश करणार आहात'. ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
स्टेप 5: तुमच्या नेट बँकिंग क्रेडेन्शियल्सचा वापर करून नेट बँकिंग वेबसाइटवर लॉगिन करा.
कृपया लक्षात घ्या: नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी नेट बँकिंग बँक खाते ई-फाइलिंग पोर्टलवर वैध केलेले आणि नामनिर्देशित केलेले असावे.
स्टेप 6: बँकेच्या वेबसाइटवर 'आयकर ई-फाइलिंग' टॅब शोधा (बँकेच्या वेबसाइटवरील नेव्हिगेशन प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते) बँकेच्या वेबसाइटवर 'आयकर ई-फाइलिंगमध्ये लॉगिन करा' वर क्लिक करा.
स्टेप 7: तुम्हाला येथून थेट ई-फाइलिंग वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल