1. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी मला माझ्या नोंदणीकृत मोबाइल नंबरची गरज लागेल का?

ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्याचे अनेक मार्ग आहेत. नोंदणीकृत मोबाइल नंबर असण्याची गरज नाही. तथापि, आपण आपला पासवर्ड विसरलात तर नोंदणीकृत मोबाइल नंबर उपयुक्त ठरू शकतो.

2. मी माझे पॅन ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदवले पाहिजे का?

होय, पॅन ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नसल्यास, तुम्हाला खालील संदेश दिसेल - पॅन अस्तित्वात नाही, कृपया या पॅन ची नोंदणी करा किंवा दुसरा पॅन वापरून प्रयत्न करा. पॅनशी जोडलेले ई-फाइलिंग खाते निष्क्रिय झाले असल्यास, कृपया हेल्पडेस्कवर संपर्क करून पुन्हा सक्रिय करा.

3. मी चुकीचा पासवर्ड प्रविष्ट केल्यास माझे खाते लॉक होईल का?

होय, लॉगिन करण्याचे 5 अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर खाते लॉक होईल. "तुमचे खाते अनलॉक करा" या सुविधेचा वापर करून खाते अनलॉक केले जाऊ शकते किंवा 30 मिनिटांनंतर ते आपोआप अनलॉक होईल.

4. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी मला आधार पॅनसह लिंक करण्याची आवश्यकता आहे का?

तुमचा पॅन आधारशी लिंक नसला तरीही तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करू शकाल, परंतु तुम्हाला मर्यादित ॲक्सेस मिळेल. म्हणूनच, पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला जातो.

5. सर्व बँका ई-फाइलिंग खात्यात लॉगिन करण्यासाठी नेट बँकिंग सुविधा प्रदान करतात का?

बहुतेक राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त बँका आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा प्रदान करतात. तथापि, सुरक्षित राहण्यासाठी, बँकेची वेबसाइट तपासण्याचा किंवा त्यासंबंधी बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. 'नेट बँकिंग' पर्यायावर क्लिक केल्यानंतर मान्यताप्राप्त बँकांची यादी ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध होते.

6.माझ्याकडे ओटीपी साठी मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही. मी माझ्या ई-फाइलिंग खात्यात लॉगिन कसे करू शकतो?

ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला ओटीपी ची आवश्यकता नाही. जर तुम्ही “ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा” सेवेमधून कोणताही उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केला असेल, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रमाणीकरणासाठी खालीलपैकी कोणताही पर्याय निवडला असल्यास तुम्ही खालील पद्धतींनी लॉगिन करू शकता:

  • बँक खाते EVC (आपल्याकडे आधीपासूनच EVC असल्यास), किंवा
  • डीमॅट खाते EVC (आपल्याकडे आधीपासूनच EVC असल्यास), किंवा
  • DSC किंवा
  • विद्यमान आधार ओटीपी.

7. ई-फाइलिंग व्हॉल्ट म्हणजे काय? याचा मला कसा फायदा होतो?

ई-फाइलिंग व्हॉल्ट पर्याय लॉगिन आणि पासवर्ड रीसेट करण्यासाठी मल्टी-फॅक्टर प्रमाणीकरण प्रदान करतो. लॉगिन करताना प्रमाणीकरणाचा एक अतिरिक्त टप्पा जोडण्यासाठी तुम्ही बँक खाते EVC, डिमॅट खाते EVC आणि DSC सारख्या अनेक पर्यायांपैकी निवड करू शकता.

8. नवीन पोर्टलवर लॉगिन सेवेमध्ये कोणते बदल/सुधारणा करण्यात आल्या आहेत?

नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये, अडचणीरहित लॉगिन करता यावे यासाठी कॅप्चा काढून टाकण्यात आला आहे. फिशिंग वेबसाइट्सपासून संरक्षण करण्यासाठी ॲक्सेस संदेश जोडण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही ई-व्हॉल्ट सुरक्षेचा वापर करून मल्टी-फॅक्टर प्रमाणीकरण सेट करू शकता.

9. मी एक वैयक्तिक करदाता आहे. लॉगिन करण्यासाठी माझा यूजर आयडी काय आहे?

प्रत्येक व्यक्तींसाठी वापरकर्ता आयडी हा पॅन असतो.

10. सीए, ERI, बाह्य एजन्सी, ITDREIN वापरकर्ता आणि TIN 2.0 वापरकर्त्यासाठी वापरकर्ता आयडी काय आहे?

वरील वापरकर्त्यांसाठी यूजर आयडी तेव्हा तयार केला जातो जेव्हा ते ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी करतात. संबंधित यूजर आयडी खालीलप्रमाणे आहेत:

  • CA - ARCA आणि त्यानंतर सीए चा 6-अंकी सदस्यत्व क्रमांक.
  • ERI - ERIP त्यानंतर नोंदणी दरम्यान जनरेट झालेला 6-अंकी नंबर
  • बाह्य एजन्सी - EXTA त्यानंतर नोंदणी दरम्यान जनरेट झालेला 6-अंकी नंबर
  • ITDREIN वापरकर्ता - नोंदणी दरम्यान जनरेट झालेला वापरकर्ता आयडी
  • TIN2.0 वापरकर्ता - TINP नंतर नोंदणी करताना जनरेट झालेला 6-अंकी नंबर

11.जर मला असे वाटले की माझे ई-फाइलिंग खाते एखाद्या अनधिकृत व्यक्तीने अ‍ॅक्सेस केले आहे, तर मी काय करू शकतो?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे ई-फाइलिंग खाते हॅक झाले आहे किंवा अनधिकृतपणे अ‍ॅक्सेस केले गेले आहे, तर तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी ठरले असू शकता. कृपया पहिली पायरी म्हणून या घटनेची माहिती संबंधित पोलीस किंवा सायबर-सेल अधिकार्‍यांना द्या. तुम्ही सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्यासाठी भारत सरकारचा पुढाकार असलेल्या https://cybercrime.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन फौजदारी तक्रार / एफआयआर दाखल करू शकता. कथित सायबर गुन्ह्याशी संबंधित कोणतीही माहिती, आयकर विभागाद्वारे त्यांच्या तपासणीच्या वैधानिक अधिकारांतर्गत समन्स बजावले गेल्यास संबंधित अंमलबजावणी अधिकार्‍यांशी सामायिक केली जाईल.

सामान्य सावधगिरी म्हणून, कृपया आपले लॉगिन क्रेडेंशियल किंवा इतर संवेदनशील माहिती सामायिक करू नका.

12. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी मला माझा यूजर आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे का?

होय, ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. नेट बँकिंगसारख्या प्रकरणांमध्ये, यूजर आयडी आणि पासवर्डची आवश्यकता नसते.

13. माझ्या ई-फाइलिंग नोंदणीकृत मोबाईल नंबरवर माझा अ‍ॅक्सेस नसल्यास मी नवीन पोर्टलवर लॉगिन कसे करू शकतो?

तुम्ही यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून नवीन पोर्टलवर लॉगिन करू शकता आणि जर तुम्ही आधार ओटीपी चा वापर करून लॉगिन करण्याचा पर्याय सक्षम केला असेल, तर तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला असल्याची खात्री करा आणि आधार ओटीपी जनरेट करण्यासाठी व ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी तुमच्याकडे आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा अ‍ॅक्सेस असणे आवश्यक आहे.

14. नेट बँकिंग लॉगिन साठी अनेक बँक खाती वापरली जाऊ शकतात का?

नाही, नेट बँकिंग लॉगिन साठी फक्त एकच सत्यापित बँक खाते सक्षम केले जाऊ शकते. जर कोणतेही सत्यापित खाते निवडले नसेल, तर सिस्टम 'प्रवेश नाकारला' असा संदेश दर्शवेल.

15. अ‍ॅक्सेस नाकारल्याची समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या प्रोफाइलमध्ये 'नेट बँकिंगद्वारे लॉगिन करा' हा पर्याय कसा सक्षम करू?

'अ‍ॅक्सेस नाकारला' समस्येच्या संदर्भात, कृपया तुमच्या प्रोफाइल विभागातील 'माझे बँक खाते' मध्ये 'नेट बँकिंगद्वारे लॉगिन करा' हा पर्याय सक्षम करा. एकदा सक्षम केल्यानंतर, तुम्ही नेट बँकिंग पद्धतीचा वापर करून लॉगिन करू शकाल.

नेट बँकिंग लॉगिन सक्षम करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह खालीलप्रमाणे आहे:

  • तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करा
  • प्रोफाइलवर जा
  • 'माझे बँक खाते जोडा' निवडा
  • नेट बँकिंगद्वारे लॉगिन हा पर्याय सक्षम करा

16. नेट बँकिंगसाठी ई-व्हॉल्ट उच्च सुरक्षा लॉगिन पर्याय सक्षम करण्यासाठी कोणत्या पूर्व-अटी आहेत?

 

नेट बँकिंगसाठी ई-व्हॉल्ट उच्च सुरक्षा लॉगिन पर्याय सक्षम करण्यासाठी, तुम्ही प्रथम 'नेट बँकिंग नामांकनाद्वारे लॉगिन करा' हा पर्याय सक्षम केला पाहिजे, जो 'माझे बँक खाते' स्क्रीनवर उपलब्ध आहे.

17. नेट बँकिंगसाठी ई-व्हॉल्ट उच्च सुरक्षा लॉगिन पर्याय आधीच सक्षम केलेला असताना, मी 'नेट बँकिंग नामनिर्देशनाद्वारे लॉगिन करा' हा पर्याय अक्षम केल्यास काय होईल?

जर तुम्ही "नेट बँकिंग नामनिर्देशनाद्वारे लॉगिन करा" हा पर्याय अक्षम करत असाल, तर यामुळे तुमच्या नेट बँकिंग लॉगिनशी लिंक केलेल्या सक्षम सुरक्षा लॉगिन वैशिष्ट्याचा अ‍ॅक्सेस संपुष्टात येईल. एकदा अक्षम केल्यानंतर, तुम्ही या पद्धतीचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करू शकणार नाही. तथापि, जर तुम्ही इतर कोणतेही ई-व्हॉल्ट लॉगिन पर्याय सक्षम केले असतील, तर ते सक्रिय राहतील.