माझे बँक खाते यूजर मॅन्युअल
1. अवलोकन
'माझे बँक खाते' सेवा ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर वैध पॅन आणि वैध बँक खाते असलेल्या सर्व नोंदणीकृत करदात्यांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा तुम्हाला पुढील गोष्टींची परवानगी देते:
- बँक खाते जोडा आणि त्याचे पूर्व-प्रमाणीकरण करा
- बंद किंवा निष्क्रिय बँक खाते काढून टाका.
- आयकर परतावा मिळवण्यासाठी आणि नेट बँकिंग लॉगिनसाठी एक प्रमाणित बँक खाते नामनिर्देशित करा.
- नामनिर्देशित केलेले बँक खाते काढून टाका जेणेकरून त्या खात्यात कर परतावा मिळणार नाही
- प्रमाणित केलेल्या बँक खात्यासाठी EVC सक्षम किंवा अक्षम करा (फक्त वैयक्तिक करदात्यांसाठी, फक्त ई-फाइलिंग एकात्मिक बँकांसाठी).
- अशी बँक खाती पुनर्प्रमाणित करा ज्यांसाठी पूर्व-प्रमाणीकरण अयशस्वी झाले आहे.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्वअटी
- ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
- पॅन हे बँक त्या खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे जे पूर्व-प्रमाणित करायचे आहे
| सेवा | पूर्वअटी |
|---|---|
| बँक खाते जोडा आणि प्रमाणित करा |
1. खाते पॅनशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे
टीप*: पडताळणीचे पर्याय वापरकर्त्याच्या लॉगिन प्रकारानुसार उपलब्ध आहेत. |
| बँक खाते काढून टाका |
1. कोणत्याही एका पडताळणी पद्धतीचा ॲक्सेस*:
टीप*: पडताळणीचे पर्याय वापरकर्त्याच्या लॉगिन प्रकारानुसार उपलब्ध आहेत. |
| 'परताव्यासाठी नामनिर्देशन' मधून एखादे बँक खाते नामनिर्देशित करा किंवा बँक खाते काढून टाका |
1. प्रमाणित केलेले बँक खाते |
| EVC सक्षम करा |
1. ई-फाइलिंग एकात्मिक बँकांपैकी एका बँकेत खाते असणे |
3. क्रमवार मार्गदर्शन
स्टेप 1:तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.

स्टेप 2:डॅशबोर्डमधूनमाझे प्रोफाइलपेजवर जा.

स्टेप 3: 'माझे बँक खाते' वर क्लिक करा.

माझी बँक खातीपेजवर,जोडलेली, अयशस्वीआणिकाढून टाकलेली बँक खातीहे टॅब प्रदर्शित केले जातील.

'माझे बँक खाते' सेवेखालील विविध सुविधा कशा वापरायच्या हे जाणून घेण्यासाठी, खालील विभागांचा संदर्भ घ्या:
| बँक खाते जोडा आणि पूर्व-प्रमाणीकरण करा | विभाग 3.1 वर जा |
| बँक खाते काढून टाका | विभाग 3.2 वर जा |
| 'परताव्यासाठी नामनिर्देशन' मधून एखादे बँक खाते नामनिर्देशित करा किंवा बँक खाते काढून टाका | विभाग 3.3 वर जा |
| EVC सक्षम आणि अक्षम करा | विभाग 3.4 वर जा |
| बँक खाते पुनर्प्रमाणित करा | विभाग 3.5 वर जा |
| नेट बँकिंगद्वारे लॉगिनसाठी बँक खाते नामनिर्देशित करा | विभाग 3.6 वर जा |
3.1 बँक खाते जोडा आणि पूर्व-प्रमाणित करा
पॅन / आधार वापरुन ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून
स्टेप 1: माझी बँक खाती पेजवर, बँक खाते समाविष्ट करा वर करा.

स्टेप 2: बँक खाते समाविष्ट करा पेजवर, बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा, खात्याचा प्रकार आणि खातेधारकाचा प्रकार निवडा आणि IFSC प्रविष्ट करा. IFSC च्या आधारावर बँकेचे नाव आणि शाखा आपोआप भरली जातात. जर तुमची बँक ई-फाइलिंगशी जोडलेली असेल, तर तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल ID तुमच्या ई-फाइलिंग प्रोफाइलमधून आधीपासून भरलेले असतील आणि ते बदलता येणार नाहीत.

स्टेप 3:ई-पडताळणीकडे जावर क्लिक करा.

ई-पडताळणीचा पर्याय निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

ओटीपी प्रविष्ट करा आणि प्रमाणित करा.

प्रमाणीकरण विनंती यशस्वीरित्या सादर झाल्यावर, यशस्वीतेचा संदेश दर्शविला जातो. तसेच, तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर एक संदेश प्राप्त होईल.


3.2 बँक खाते काढून टाका
स्टेप 1: इच्छित बँक खात्यासाठी ॲक्शन कॉलमखालील बँक खाते काढून टाका वर क्लिक करा.

स्टेप 2: बँक खाते काढून टाकण्यासाठी ड्रॉपडाउनमधून एक कारण निवडा. जर तुम्ही इतर निवडले, तर टेक्स्ट बॉक्समध्ये कारण प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 3: ई-पडताळणी पर्याय निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा

स्टेप 4: ओटीपी प्रविष्ट करा आणि प्रमाणित करा.

बँक खाते यशस्वीपणे हटवल्यानंतर, यशस्वीतेचा संदेश दर्शविला जातो.

तुम्ही 'प्रमाणीकरण प्रगतीपथावर' अशी स्थिती असलेले बँक खाते काढून टाकू शकता आणि एकदा काढून टाकल्यावर, तुम्ही योग्य तपशिलांसह तेच बँक खाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू शकता.
3.3 परताव्यासाठी बँक खाते नामनिर्देशित करा किंवा नामनिर्देशनातून बँक खाते काढून टाका
A. परतावा मिळवण्यासाठी बँक खाते नामनिर्देशित करा
स्टेप 1: परताव्यासाठी बँक खाते नामनिर्देशित करण्यासाठी, जे बँक खाते तुम्ही परताव्यासाठी नामनिर्देशित करू इच्छिता त्या खात्यासाठीपरताव्यासाठी नामनिर्देशित करा टॉगल / स्विचवर (हा स्विच डावीकडे असेल) क्लिक करा.

स्टेप 2:निवडलेले बँक खाते नामनिर्देशित करायचे असल्याची पुष्टी करण्यासाठी'पुढे सुरू ठेवा'वर क्लिक करा.

यशस्वी झाल्यावर, स्विच उजवीकडे जाईल.

B. परताव्यासाठी नामनिर्देशनातून बँक खाते काढून टाका
स्टेप 1: परताव्यासाठी नामनिर्देशित केलेले बँक खाते काढून टाकण्यासाठी, ज्या बँक खात्याला तुम्ही नामनिर्देशनातून काढून टाकू इच्छिता त्या खात्याच्यापरताव्यासाठी नामनिर्देशित करा टॉगल / स्विचवर (जो उजवीकडे असेल) क्लिक करा.

स्टेप 2:तुम्हाला निवडलेल्या बँक खात्याचे नामनिर्देशन काढून टाकायचे आहे याची पुष्टी करण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

यशस्वी झाल्यावर, स्विच डावीकडे जाईल.

3.4 EVC सक्षम आणि अक्षम करा
A. EVC सक्षम करा
स्टेप 1: ज्या बँक खात्यासाठी तुम्हाला EVC सक्षम करायचे आहे, त्या खात्यावरीलॲक्शन कॉलमखालीलEVC सक्षम करा वर क्लिक करा.

स्टेप 2: एक पुष्टीकरण संदेश दर्शविला जाईल.पुढे सुरू ठेवावर क्लिक करा.

टीप:
- प्रमाणित बँक खात्यासाठी केवळ खालील अटी पूर्ण झाल्यावरच EVC सक्षम केले जाऊ शकते:
- बँकेकडून तुमचा मोबाइल नंबर किंवा ईमेल ID पडताळला गेला पाहिजे.
- ई-फाइलिंगसह नोंदणीकृत असलेला तुमचा मोबाइल नंबर बँकेने पडताळणी केलेल्या नंबरप्रमाणेच असणे आवश्यक आहे. ते जुळत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी, एकतर तुमच्या ई-फाइलिंग प्रोफाइलमधील मोबाइल नंबर बँकेशी जोडलेल्या नंबरप्रमाणेच अपडेट करा किंवा तुमच्या बँकेमधील मोबाइल नंबर तुमच्या ई-फाइलिंग प्रोफाइलमधील नंबरप्रमाणेच अपडेट करा.
- इतर कोणत्याही बँक खात्यासाठी EVC सक्षम केले जाऊ नये.
- तुमची बँक ई-फाइलिंगशी जोडलेली असावी. ई-फाइलिंगशी जोडलेल्या बँकांची यादी येथे सापडेल: लॉगिन > माझे प्रोफाइल > माझे बँक खाते > टीपा विभागात > “बँकांची यादी” वर क्लिक करा
- जर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याचे केवळ पूर्व प्रमाणीकरण करायचे असेल आणि EVC सक्षम करायचे नसेल, तर तुमचा ई-फाइलिंग मोबाइल किंवा ई-मेल तुमच्या बँकेद्वारे पडताळणी केलेल्या संपर्क तपशिलांसह जुळणे आवश्यक नाही.
वरील अटींची पूर्तता झाल्यास, निवडलेल्या बँक खात्यासाठी EVC यशस्वीरित्या सक्षम केले जाते आणि स्थिती प्रमाणित आणि EVC सक्षम अशी अपडेट केली जाते:

स्टेप 3: जर एका बँक खात्यासाठी EVC आधीच सक्षम केले असेल आणि तुम्ही दुसऱ्या बँक खात्यासाठी EVC सक्षम करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तशी सूचना देणारा एक संदेश दर्शविला जाईल. त्या संदेशातील पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा आणि जर स्टेप 2 मध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण झाल्या, तर त्या बँक खात्यासाठी EVC सक्षम केले जाईल. अशा परिस्थितीमध्ये, पूर्वी सक्षम केलेल्या बँक खात्यासाठी EVC अक्षम केले जाईल.

टीप: तुम्ही रद्द करा वर क्लिक केल्यास किंवा संदेश बंद केल्यास, विद्यमान बँक खात्यासाठी EVC सक्षम राहील.
B. EVC अक्षम करा
स्टेप 1: ज्या बँक खात्यासाठी EVC सक्षम केले आहे, त्या खात्यावरीलॲक्शनकॉलमखालीलEVC अक्षम करावर क्लिक करा.

स्टेप 2: एक पुष्टीकरण संदेश दर्शविला जाईल.पुढे सुरू ठेवावर क्लिक करा.

यशस्वी झाल्यावर, निवडलेल्या खात्यासाठी EVC अक्षम केले जाते आणि स्थिती केवळप्रमाणित अशी अपडेट केली जाते.

3.5 बँक खाते पुनर्प्रमाणित करा
स्टेप 1: जर एखाद्या बँक खात्याचे प्रमाणीकरण पूर्वी अयशस्वी झाले असेल, तर तुम्हाला त्याचे तपशील अयशस्वी बँक खाती टॅबखाली दिसतील. जे बँक खाते तुम्हाला पुनर्प्रमाणित करायचे आहे, त्यासाठी ॲक्शन कॉलमखालील पुनर्प्रमाणित करा वर क्लिक करा.
बँकेशी जोडलेल्या तुमच्या मोबाइल/ई-मेलमध्ये किंवा ई-फाइलिंग प्रोफाइलमध्ये काही अपडेट केले असल्यास किंवा तुमच्या खात्याचा प्रकार/खात्याची स्थिती अपडेट झाली असल्यास, तुम्ही जोडलेले बँक खाते पुनर्प्रमाणित देखील करू शकता.

स्टेप 2: बँक खाते जोडा पेजवर, बँकेचे आणि संपर्क तपशील आधीपासून भरलेले असतील. बँकेचे तपशील संपादित करता येतील आणि संपर्क तपशील संपादित करता येणार नाहीत. आवश्यक असल्यास, संपादित करता येणारे तपशील अपडेट करा. ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.

स्टेप 3: ई-पडताळणी करण्यासाठी पद्धत निवडा.

आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.


यशस्वी झाल्यावर, बँक खाते जोडलेली बँक खाती टॅबखाली जोडले जाते आणि स्थिती प्रमाणीकरण प्रगतीपथावर अशी अपडेट केली जाते.

त्यानंतर, तुमच्या संपर्क तपशिलांची बँकेच्या तपशिलांसह पडताळणी केली जाते. बँकेकडून खात्याचे तपशील पडताळले गेल्यास, तुमचे बँक खाते प्रमाणित होते. तुम्ही जोडलेली बँक खाती टॅबच्या स्थिती कॉलममध्ये प्रमाणीकरण स्थिती तपासू शकता.

जर प्रमाणीकरण अजूनही अयशस्वी झाले, तर अपयशाच्या कारणानुसार (संलग्न बँकांसाठी) पुढील कारवाई करा:
| अयशस्वी होण्याचे कारण | करावयाची कारवाई |
| पॅन-बँक खाते-IFSC लिंक करणे अयशस्वी झाले | तुमचा पॅन बँक खात्याशी लिंक करण्यासाठी शाखेशी संपर्क साधा, त्यानंतर विनंती सादर करण्यासाठी पुनर्प्रमाणित करा वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
| न जुळणारे नाव | पॅननुसार नाव अपडेट करण्यासाठी शाखेशी संपर्क साधा. त्यानंतर, पुनर्प्रमाणित करा, तपशील अपडेट करा आणि पुनर्प्रमाणीकरणासाठी विनंती सादर करा. |
| बँक खाते क्रमांक जुळत नाही | पुनर्प्रमाणित करा वर क्लिक करा, योग्य बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुनर्प्रमाणीकरणाची विनंती सादर करा. |
| खाते क्रमांक अस्तित्वात नाही | योग्य बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुनर्प्रमाणीकरणाची विनंती सादर करा. |
| बँक खाते बंद / निष्क्रिय | दुसऱ्या बँक खाते क्रमांकाने प्रयत्न करा. अधिक माहितीसाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
जर खाते असंघटित बँकांपैकी एका बँकेमध्ये असेल, तर पुढील कारवाई केली पाहिजे:
| अपयशाचे कारण | करावयाची कारवाई |
| बँक खात्याशी पॅन लिंक केलेले नाही | बँक खात्याशी पॅन लिंक करा आणि विनंती सादर करण्यासाठी पुनर्प्रमाणित करावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
| पॅन जुळत नाही | बँक खात्याशी योग्य पॅन लिंक करा आणि विनंती सादर करण्यासाठी पुनर्प्रमाणित करावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
| अवैध खाते प्रकार | पुनर्प्रमाणित करा वर क्लिक करा, बँक खात्याचा योग्य प्रकार निवडा आणि प्रमाणीकरणासाठी विनंती सादर करा. |
| खाते बंद/निष्क्रिय खाते/कायदेशीर वादग्रस्त खाते/गोठवलेले किंवा अवरोधित खाते | दुसऱ्या वैध बँक खाते क्रमांकाने प्रयत्न करा. अधिक माहितीसाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
| खातेधारकाचे नाव अवैध आहे | पुनर्प्रमाणित करा वर क्लिक करा आणि तपशील अपडेट करा. पॅननुसार नाव अपडेट करण्यासाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधा. |
जर बँक प्रमाणीकरण स्थिती 'प्रमाणीकरण होऊ शकत नाही' अशी दर्शविली जात असेल, तर हे सूचित करते की विभागाकडून बँक खात्याच्या तपशिलाची पडताळणी होऊ शकली नाही, कारण ती बँक संलग्न बँक नाही किंवा ती NPCI शी संलग्न नाही. अशा परिस्थितींमध्ये, तुम्ही संलग्न बँकेतील (RBI च्या यादीनुसार) किंवा NPCI शी संलग्न असलेल्या बँकेमधील दुसरे बँक खाते जोडू शकता.
3.6 नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी एक प्रमाणित बँक खाते नामनिर्देशित करा
स्टेप 1: नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी 'नामनिर्देशित करा' हे बटण सक्षम करा:

स्टेप 2: पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 3: आता, नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी बँक खाते नामनिर्देशित केले आहे.

4. संबंधित विषय
- लॉगिन
- माझे प्रोफाइल
- ITR (ITR-1 ते 7) फाइल करा
- आयकर फॉर्म्स अपलोड करा
- ई-पडताळणी कशी करावी
- EVC जनरेट करा
- सेवा विनंत्या दाखल करा
- ई-फाइलिंग वॉल्ट उच्च सुरक्षा
- माझे डिमॅट खाते
- तुमचा पासवर्ड रीसेट करा
- पासवर्ड बदला