माझ्या प्रोफाइलचे अवलोकन
(आपल्या प्रोफाइलचा सोपा सारांश)
(आपल्या प्रोफाइलचा सोपा सारांश)
माझे प्रोफाइल बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. ई-फाइलिंग पोर्टलवर माझे प्रोफाइल अपडेट झाले आहे हे मला कसे कळेल?
जर तुमच्या प्रोफाइलवर कोणतीही माहिती अपडेट झाली असल्यास, तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी केलेल्या प्राथमिक ई-मेल आयडीवर ई-मेल प्राप्त होईल.
2. मी NRI आहे आणि माझ्याकडे भारतीय मोबाईल नंबर नाही. माझा संपर्क तपशील पडताळणी करण्यासाठी मला ओटीपी कसा प्राप्त होईल?
तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ओटीपी प्राप्त होईल.
3. प्रोफाइल अपडेट करणे अनिवार्य आहे का?
नाही, ई-फाइलिंग पोर्टलवर तुमचे प्रोफाइल अपडेट करणे अनिवार्य नाही. तथापि, अधिक चांगला वापरकर्ता अनुभव (प्री-फाइलिंगसह) मिळवण्यासाठी तसेच आयकर विभागाकडून वेळोवेळी येणारे संदेश प्राप्त करण्यासाठी तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवण्याची शिफारस केली जाते.
4. प्रोफाइल अपडेट करण्याचा काय फायदा आहे?
तुम्ही अपडेट केलेले प्रोफाइल तपशील आवश्यकतेनुसार ITD ला तुमच्याशी वेळेवर संपर्क साधता यावा यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, ई-फाइलिंग पोर्टलवरील तुम्हाला लागू असलेल्या विविध फॉर्म्स आणि ITR च्या पूर्व-फाइलिंगसाठीही या तपशीलांचा वापर केला जातो.
5.माझ्या प्रोफाइलद्वारे मी कोणते तपशील सुधारू/अपडेट करू शकतो?
तुमच्या प्रोफाइलद्वारे तुम्ही खालील अपडेट किंवा सुधारणा करू शकता:
- उत्पन्नाच्या स्रोताचे तपशील
- बँक खाते आणि डीमॅट अकाउंट तपशील
- DSC ची नोंदणी करा
- संपर्क तपशील (ओटीपी प्रमाणीकरणाद्वारे),प्रमुख व्यक्तींचे तपशील
- तुम्ही करदाता म्हणून लॉगिन केले असल्यास – तुम्ही निवासी स्थिती आणि पासपोर्ट क्रमांक यांसारख्या तुमच्या मूलभूत प्रोफाइल तपशिलांमध्ये तसेच प्राथमिक व दुसरा मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता यांसारख्या संपर्क तपशिलांमध्ये सुधारणा करू शकता.
- तुम्ही ERI म्हणून लॉगिन केले असल्यास – तुम्ही बाह्य संस्थेचा प्रकार, सेवांचे प्रकार, संस्थेचा पॅन आणि संस्थेचा TAN यांसारख्या मूलभूत प्रोफाइल तपशिलांमध्ये तसेच संपर्क तपशिलांमध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही प्रमाणपत्रे व्यवस्थापित करू शकता, प्रमुख संपर्क व्यक्तीचे तपशील अद्ययावत करू शकता, ERI जोडू किंवा काढून टाकू शकता आणि ERI चा प्रकार बदलू शकता.
- तुम्ही बाह्य संस्था म्हणून लॉगिन केले असल्यास – तुम्ही संपर्क तपशील अद्ययावत करू शकता, प्रमाणपत्रे व्यवस्थापित करू शकता, प्रमुख व्यक्ती जोडू किंवा काढून टाकू शकता तसेच सेवा जोडू किंवा काढून टाकू शकता.
- तुम्ही TIN 2.0 भागधारक म्हणून लॉगिन केले असल्यास – तुम्ही संपर्क तपशील अद्ययावत करू शकता, प्रमाणपत्रे व्यवस्थापित करू शकता तसेच तांत्रिक SPOC चे तपशील अपडेट करू शकता किंवा नवीन तांत्रिक SPOC चे तपशील जोडू शकता.
माझ्या प्रोफाइलनुसार मी प्राथमिक आणि दुय्यम संपर्कांवर ITD कडून संप्रेषण प्राप्त करू शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या ई-फाइलिंग प्रोफाइलमध्ये जोडलेल्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्क तपशीलांवर ITD कडून संदेश प्राप्त करू शकता.
7.माझे DSC नोंदणीकृत आहे की नाही, हे मला कसे कळेल?
तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये जाऊन DSC नोंदणी करा वर क्लिक करा आणि स्थिती पहा. CA / कंपनी / ERI साठी, पॅन / मुख्य संपर्क यांच्यासाठी DSC नोंदणीकृत नसल्यास किंवा त्याची वैधता संपली असल्यास, त्याबाबतचा संदेश लॉगिन केल्यानंतर प्रोफाइलमध्ये दाखवला जाईल. याव्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी DSC नोंदणी करा उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.