1.मला माझा पासवर्ड रीसेट करण्याची आवश्यकता का आहे?
जर आपण आपला ई-फाइलिंग पोर्टल पासवर्ड विसरलात किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्याला आपला पासवर्ड माहीत नसेल, तर आपण ही सेवा वापरून तो रीसेट करू शकता.
माझा पासवर्ड यशस्वीरित्या रीसेट झाला आहे हे मला कसे कळेल?
जेव्हा आपला पासवर्ड यशस्वीरित्या रिसेट केला जाईल, तेव्हा एक व्यवहार ID निर्माण होईल. तसेच आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.
3. DSC चा वापर करून माझा पासवर्ड रिसेट करताना मला अवैध डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हा संदेश प्राप्त होत आहे. मी काय करू शकतो?
DSC च्या सहाय्याने पासवर्ड रीसेट करण्यासाठी, प्रमाणन प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि सक्रिय असलेले स्तर-2 किंवा त्यावरील DSC अपलोड करणे आवश्यक आहे.
4. मी माझा पासवर्ड कोणकोणत्या पध्दतीने रीसेट करू शकतो?
खालीलपैकी कोणताही पर्याय वापरून आपण आपला पासवर्ड रीसेट करू शकता:
• ई-फाइलिंग ओटीपी (आपल्या ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला)
• आधार ओटीपी(आपल्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला)
• DSC
5. मला EVC कुठे प्राप्त होईल?
आपण निवडलेल्या पर्यायानुसार आपल्या पूर्व-प्रमाणित बँक/डीमॅट खात्यात नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबरवर आपला EVC मिळेल.
6. मला माझा पासवर्ड बँक खाते EVC वापरून रीसेट करायचा आहे परंतु हा पर्याय सूचीमध्ये उपलब्ध नाही. मी काय करू शकतो?
आपले ई-फाइलिंग खाते सुरक्षित करण्यासाठी आपण ई-फाइलिंग तिजोरी उच्च सुरक्षा सेवेद्वारे निवडलेले पर्यायच दाखवले जातील. आपल्याला बँक खाते EVC किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करून आपला पासवर्ड रीसेट करायचा असेल परंतु तो पर्याय म्हणून उपलब्ध होत नसेल, तर आपण ई-फाइलिंग तिजोरी उच्च सुरक्षा सेवेद्वारे तो पर्याय जोडू शकता.
7. दिलेल्या कोणत्याही पद्धतींद्वारा पासवर्ड रीसेट करण्यास मी असमर्थ आहे?
पुढील सहाय्यासाठी आपण हेल्पडेस्क (1800 103 0025) शी संपर्क साधू शकता.