कर क्रेडिट विसंगती उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन


कर क्रेडिट विसंगती ही सेवा ई-फाइलिंग पोर्टलवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी (ERI सह) उपलब्ध आहे. या सेवेद्वारे, संबंधित निर्धारण वर्षासाठी आयकर विवरणपत्र ई-फाइल केल्यानंतर, तुम्ही कितीही नोंदींसाठी तुमच्या ई-फाइल केलेल्या आयकर विवरणपत्रांमधील कर क्रेडिट विसंगती त्वरित पाहू शकता.

ही सेवा आयकर विवरणपत्र फाइल करताना तुम्ही नमूद केलेल्या स्त्रोतावर कपात केलेला कर, स्त्रोतावर संकलित केलेला कर, अग्रिम कर किंवा नियमित निर्धारण कर यांच्या रकमेतील कोणतीही विसंगती अधोरेखित करते. विसंगती आढळल्यास, तुम्ही तुमच्या स्तरावर चुका दुरुस्त करू शकता किंवा कर कपातकर्त्याकडून 24Q, 26Q, 27Q, 27EQ यांसारख्या TDS विवरणपत्रे/फॉर्ममध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता. (यासाठी दुरुस्तीची विनंती फाइल करणे किंवा सुधारित आयकर विवरणपत्र फाइल करणे आवश्यक असू शकते.)

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी

  • ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
  • वैध आणि सक्रिय पॅन
  • संबंधित निर्धारण वर्षासाठी (AY) कर क्रेडिट विसंगती तपासण्यासाठी किमान एक आयकर विवरणपत्र फाइल केलेले असावे
  • TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा भरलेला आयकर ई-फाइलिंग पोर्टलवरील फॉर्म 26AS मध्ये दिसत असावा
  • ERI साठी: ERI जोडलेला असावा आणि ERI ने करदात्याला क्लायंट म्हणून जोडलेले असावे
  • ERI साठी: ERI ची स्थिती सक्रिय असावी

3. क्रमवार मार्गदर्शक


3.1. कर क्रेडिट विसंगती पहा

स्‍टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive


स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर, सेवा > कर क्रेडिट विसंगती वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3:कर क्रेडिट विसंगतीपेजवर, निर्धारण वर्ष (ज्या वर्षासाठी तुम्हाला विसंगतीचा तपशील पाहायचा आहे) निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप: पॅन पर्यायामध्ये तुमचा पॅन आधीच भरलेला असेल.

स्टेप 4: आयकर विवरणपत्रात तुम्ही नमूद केलेला TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा भरलेल्या आयकराचा तपशील आणि फॉर्म 26AS मध्ये प्रतिबिंबित झालेला तपशील यांतील विसंगती प्रदर्शित केली जाईल.

Data responsive


टीप:

  • विसंगतीच्या 10 पेक्षा अधिक नोंदी असल्यास, त्या डाउनलोड (PDF / XLS फॉरमॅटमध्ये) करण्यासाठी डाउनलोड करा वर क्लिक करा.
  • विसंगतीच्या 10 किंवा त्यापेक्षा कमी नोंदी असल्यास, त्या तुम्ही कर क्रेडिट विसंगती पेजवर पाहू शकता. तसेच, डाउनलोड करा वर क्लिक करून त्या डाउनलोड ( PDF / XLS फॉरमॅटमध्ये) करू शकता.

Data responsive


3.2. कर क्रेडिट विसंगती पहा (ERI साठी)

स्‍टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive


स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर, सेवा > कर क्रेडिट विसंगती वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: कर क्रेडिट विसंगती पेजवर, पॅन (ज्याचा तपशील तुम्हाला तपासायचा आहे) प्रविष्ट करा, निर्धारण वर्ष (ज्या वर्षासाठी तुम्हाला विसंगतीचा तपशील पाहायचा आहे) निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: निवडलेल्या पॅनसाठी फाइल केलेल्या ITR मध्ये नमूद केलेला TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा भरलेल्या आयकराचा (TDS / TCS व्यतिरिक्त) तपशील आणि फॉर्म 26AS मध्ये दिसत असलेला तपशील यातील विसंगती प्रदर्शित केली जाईल.

Data responsive

टीप:

  • विसंगतीच्या 10 पेक्षा अधिक नोंदी असल्यास, त्या डाउनलोड (PDF / XLS फॉरमॅटमध्ये) करण्यासाठी डाउनलोड करा वर क्लिक करा.
  • विसंगतीच्या 10 किंवा त्यापेक्षा कमी नोंदी असल्यास, त्या तुम्ही कर क्रेडिट विसंगती पेजवर पाहू शकता. तसेच, डाउनलोड करा वर क्लिक करून त्या डाउनलोड (PDF / XLS फॉरमॅटमध्ये) करू शकता.

Data responsive


4. संबंधित विषय