कलम 12A अंतर्गत फॉर्म 10A साठी माफीची विनंती उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
करदात्यांनी जर निर्दिष्ट देय तारखेपर्यंत फॉर्म 10A फाइल केला नसेल, तर फॉर्म 10A फाइल करण्यास झालेला विलंब माफ करण्याची कोणतीही विद्यमान सुविधा ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध नव्हती. आता, करदाता ई-फाइलिंग पोर्टलवर कलम 12A अंतर्गत फॉर्म 10A फाइल करण्यासाठी विलंब माफीची विनंती फाइल करू शकतो.
वित्त (क्र.2) अधिनियम, 2024 नुसार, कलम 12A(1) च्या खंड (ac) च्या तरतुदीनुसार, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना फॉर्म 10A फाइल करण्यास होत असलेला विलंब माफ करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी आयकर अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या वापरकर्ता पुस्तिकेत, आपण माफी विनंत्या फाइल करण्याची क्रमवार प्रक्रिया पाहणार आहोत आणि त्यासंबंधित काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्व-अटी
• वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड
• फॉर्म 10A च्या देय तारखेची अंतिम मुदत संपलेली आहे.
• विलंबाचे वैध कारण
3. क्रमवार मार्गदर्शन
3.1 कलम 12A अंतर्गत फॉर्म 10A फाइल करण्यास झालेल्या विलंबासाठी माफीची विनंती
संबंधित निर्धारण वर्षांसाठी विलंब माफ करण्यासाठी PCIT/CIT(E) यांच्याकडे माफी विनंती फाइल करण्यासाठी अर्ज.
(कृपया नोंद घ्या की, फॉर्म 10A साठी माफी विनंती केवळ ऑनलाइन पद्धतीनेच फाइल करता येते, ऑफलाइन पद्धतीने फाइल करण्याचा पर्याय उपलब्ध नाही)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिनवर क्लिक करा.
स्टेप 2: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 3: सेवा > माफीची विनंती > वैधानिक फॉर्म्ससाठी अर्ज येथे जा.
स्टेप 4: +माफीची विनंती तयार करा वर क्लिक करा. तुम्हाला पूर्वी फाइल केलेली माफी विनंती पाहायची असल्यास, "तपशील पहा" वर क्लिक करा.
स्टेप 5: नवीन फाइलिंग सुरू करा वर क्लिक करा.
स्टेप 6: विलंब माफीचा फॉर्म भरा:
1. करदात्याचे तपशील
2. फॉर्मचे तपशील.
• माफी विनंती ज्या कलमाअंतर्गत फाइल केली गेली आहे ते कलम, फॉर्मचे नाव, कलम कोड, निर्धारण वर्ष आणि फॉर्मवर संबंधित पालन लागू करण्याची देय तारीख निवडा.
• जर फॉर्म 10A आधीच फाइल केला असेल, तर पोचपावती क्र. आणि फॉर्म 10A फाइल केल्याची तारीख प्रविष्ट करा.
• फॉर्म 10A फाइल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण प्रविष्ट करा.
3. जोडपत्रे: जर तुम्ही "फॉर्म आधीच फाइल केला गेला आहे का?" या फील्डसाठी होय हा पर्याय निवडला असेल, तर फाइल केलेल्या फॉर्म 10A ची PDF अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच, तुम्हाला इतर कोणताही दस्तऐवज संलग्न करायचा असल्यास, कृपया त्याचे वर्णन देऊन तो इतर कोणत्याही जोडपत्रे फील्डमध्ये संलग्न करा.
4. ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा


स्टेप 7: ई-पडताळणीची पद्धत निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 8: ई-पडताळणी केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी नोंद करून ठेवा.