फॉर्म 29B उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
फॉर्म 29B कंपन्यांना आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 115JB अंतर्गत घालून दिलेल्या तरतुदींनुसार, विशिष्ट निर्धारण वर्षासाठी सीए द्वारे प्रमाणित केलेला पुस्तकी नफा जाहीर करण्यास सक्षम करतो. हा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी दाखल करता येतो. फॉर्म 29B हा कलम 139(1) अंतर्गत विवरणपत्र फाइल करण्याच्या देय तारखेच्या एक महिन्यापूर्वी किंवा कलम 142(1)(i) अंतर्गत दिलेल्या सूचनेला प्रतिसाद म्हणून सादर केलेल्या उत्पन्नाच्या विवरणपत्रासोबत दाखल करायला हवा.
2. ही सेवा मिळवण्यासाठीच्या पूर्वअटी
- करदाता आणि सीए यांनी वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- करदाता आणि सीएच्या पॅनची स्थिती सक्रिय आहे
- करदात्याने माझा सीए अंतर्गत फॉर्म 29B साठी सीए नियुक्त केले असेल
- सीएकडे ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आणि कालबाह्य न झालेला वैध डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) असायला हवे.
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1 हेतू
सर्व कंपन्यांनी आयकर अधिनियम, 1961 मधील तरतुदींनुसार पुस्तकी नफ्याची गणना करण्यात आली आहे हे प्रमाणित करण्यासाठी अधिकृत सीएकडून फॉर्म 29B मधील अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे.
3.2 याचा वापर कोण करू शकतो / शकते?
कंपन्यांनी ( माझा सीए सेवा वापरून लॉगिन केल्यानंतर) अशा सीएची नियुक्ती करणे आवश्यक आहे जो फॉर्म 29B च्या स्वरूपात लेखापरीक्षण अहवाल सादर करेल. त्यानंतर, नोंदणीकृत सीए लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची विनंती स्वीकारू किंवा नाकारू शकतो आणि (स्वीकारल्यास) त्याने फॉर्म 29B तयार करून सादर करणे आवश्यक असते.
4. फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 29B मध्ये तीन भाग आहेत – भाग A, भाग B / भाग C आणि लेखापरीक्षण अहवाल. या फॉर्ममध्ये तीन भागांची परिशिष्टे आहेत. पहिला भाग सर्व कंपन्यांना लागू आहे, तर दुसरा आणि तिसरा भाग विशिष्ट अटींच्या आधारावर लागू आहेत.
फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी, नोंदणीकृत सीएला भाग B आणि भाग C लागू आहेत का याबाबत विचारले जाईल आणि त्यानुसार ते भाग भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.
4.1 भाग A
पहिल्या भागात पुस्तकी नफ्याचे सामान्य तपशील आहेत जे सर्व कंपन्यांना लागू आहेत.
4.2 भाग B / भाग C
भाग B मध्ये अशा रकमेचा तपशील आहे जी कलम 115JB च्या उप-कलम (2A) नुसार वाढवणे / कमी करणे आवश्यक आहे. भाग C मध्ये अशा रकमेचा तपशील आहे जी कलम 115JB च्या उप-कलम (2C) नुसार वाढवणे / कमी करणे आवश्यक आहे.
4.3 लेखापालाचा अहवाल
शेवटचा भाग सीए ऑडिट अहवाल आहे.
5. अॅक्सेस आणि सबमिट कसे करावे
फॉर्म 29B खालील पद्धतींनी फाइल केला आणि सबमिट केला जाऊ शकतो:
- ऑनलाईन पद्धत - ई-फाईलिंग पोर्टलद्वारे
- ऑफलाइन पद्धत : ऑफलाइन उपयुक्ततेद्वारे
टीप: अधिक माहितीसाठी ऑफलाइन उपयुक्तता (वैधानिक फॉर्म्स) उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
ऑनलाइन पद्धतीद्वारे फॉर्म 29B फाइल करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.
5.1. करदात्याद्वारे फॉर्म 29B नेमून देणे
स्टेप 1: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाईलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर ई- फाईल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर क्लिक करा.
स्टेप 3: आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्समधून फॉर्म 29B निवडा/शोधा.
(जर तुम्ही कोणताही सीए नियुक्त केलेला नसेल तर) माझा सीए सेवेद्वारे सीए नियुक्त करा.
टीप: अधिक माहितीसाठी माझा सीए उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
स्टेप 4: निर्धारण वर्ष प्रदान कर आणि माझा सीए सेवेद्वारे सीए नियुक्त करा. सहाय्यक कागदपत्रे जोडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

फॉर्म यशस्वीरित्या सीएकडे सबमिट करण्यात आला आहे. व्यवहार आयडीसह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी या व्यवहार आयडीची नोंद ठेवा.
5.2. सीएद्वारे फॉर्म 29B फाइल करणे
स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरुन ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2:आपल्या डॅशबोर्ड वर, प्रलंबित कारवाई > वर्कलिस्ट वर क्लिक करा.
स्टेप 3:फॉर्म 29B फाइल करण्याच्या विनंतीसाठी स्वीकार करा किंवा अस्वीकार करा वर क्लिक करा.
टीप:
- आपण नाकारणे निवडल्यास, आपण संबंधित कारण देऊ शकता.
- अस्वीकार केल्यावर, अस्वीकार होण्याची कारणे प्रदान करून करदात्यास ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर ई-मेल व एसएमएसद्वारे संदेश पाठवला जातो.
स्वीकृतीनंतर, यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो.
स्टेप 4:तुमच्या वर्कलिस्ट मधून फॉर्म फाइल करा निवडा.
स्टेप 5:तपशील पडताळा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: सूचना पेजवर, चला सुरू करूया वर क्लिक करा.
स्टेप 7:संबंधित पर्यायांवर क्लिक करून फॉर्म 29B च्या भाग B आणि C ची प्रयोज्यता निवडा आणि पुढे जा वर क्लिक करा.
टीप:तुमच्या निवडीनुसार लागू असलेले भागच फॉर्म क्र. 29B पेजवर दिसतील.
स्टेप 8:लागू असलेल्या विभागांसाठी – भाग A, भाग B / भाग C आणि लेखापालाचा अहवाल – सर्व आवश्यक क्षेत्रे भरा आणि पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.
स्टेप 9: पूर्वावलोकन करा पेजवर ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.
स्टेप 10:पुष्टी करण्यासाठी होय वर क्लिक करा.
स्टेप 11: होय वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ई-पडताळणी या पेजवर नेले जाईल.
टीप: अधिक माहितीसाठी ई -पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
यशस्वी ई-पडताळणीनंतर, व्यवहार आयडी सोबत एक यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. यशस्वी सादरीकरणावर, करदात्याच्या स्वीकृती / नकारासाठी ई-फाईलिंग पोर्टलसह नोंदणीकृत करदात्याच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश पाठवला जातो.
5.3. करदात्याद्वारे फाइल केलेल्या फॉर्म 29B ची स्वीकृती
स्टेप 1: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाईलिंग पोर्टल मध्ये लॉगिन करा.
स्टेप 2:आपल्या डॅशबोर्ड वर, प्रलंबित क्रिया > वर्कलिस्ट वर क्लिक करा.
स्टेप 3:सीएद्वारे अपलोड केलेला फॉर्म स्वीकारण्यासाठी स्वीकार करा निवडा / अस्वीकार करा निवडा आणि फॉर्म नाकारण्यासाठी नकाराच्या टिप्पण्या द्या.
टीप:
- आपण नाकारणे निवडल्यास, आपण संबंधित कारण देऊ शकता.
- अस्वीकार केल्यास, अस्वीकार करण्याच्या कारणांच्या तपशीलासह ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सीएच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर ईमेल आणि एसएमएसद्वारे संदेश पाठवला जातो.
स्टेप 5: स्वीकार करा निवडल्यानंतर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही अपलोड केलेला फॉर्म पडताळू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
यशस्वी ई-पडताळणीनंतर नंतर, पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. फॉर्म यशस्वीरित्या सादर झाल्याची पुष्टी करणारा ई-मेल करदात्याच्या आणि ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत सीएच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पाठविला जातो.