फॉर्म 1 उपयोगकर्ता पुस्तिका

 


1. फॉर्मचे अवलोकन व हेतू


अधिनियमाच्या कलम 2(92) अंतर्गत डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारांसाठी पात्र ठरण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजने काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी SEBI ची मंजूरी असणे आणि SEBI च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, विशिष्ट क्लायंट ओळख क्रमांक आणि पॅन क्रमांकांसह ग्राहकांचे संपूर्ण तपशील नोंदवणे व संग्रहित करणे, तसेच रोख आणि डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारांचा संपूर्ण लेखापरीक्षण मागोवा राखणे आवश्यक आहे. एकदा व्यवहार सिस्टीममध्ये प्रविष्ट केल्यानंतर तो हटवता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही.
तथापि, कोणत्याही क्लायंट कोडमध्ये बदल केल्यास, सिस्टीममध्ये प्रथम प्रविष्ट केल्यानंतर ज्यांच्या क्लायंट कोडमध्ये बदल करण्यात आला आहे अशा सर्व व्यवहारांची माहिती स्टॉक एक्स्चेंजने फॉर्म क्र. 1 सादर करून द्यावी लागेल. असा बदल ज्या महिन्यात करण्यात आला असेल, तो महिना संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत हा फॉर्म फाइल करणे आवश्यक आहे.


2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्वअटी


•    वापरकर्ता ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा.
•    वापरकर्त्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" असावी.
•    जर वापरकर्त्याला DSC पद्धतीद्वारे फॉर्मची पडताळणी करायची असेल, तर त्याच्याकडे वैध DSC असणे आवश्यक आहे. तसेच, तो ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा आणि तो मुदतबाह्य झालेला नसावा.


3. याचा वापर कोण करू शकतो?


वैध पॅन असलेली आणि ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत कोणतीही कंपनी क्लायंट कोडमधील बदलांसाठी फॉर्म क्र. 1 साठी अर्ज करू शकते.


4. क्रमवार मार्गदर्शक
स्टेप 1: वापरकर्त्याने नोंदणीकृत वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करावे.

Data responsive


स्टेप 2: वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा आणि ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: त्यानंतर, ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.

Data responsive


स्टेप 4: आयकर अधिनियम, 2025 नुसार फॉर्म टॅब निवडा.
आयकर अधिनियम, 2025 नुसार फॉर्म्स वर क्लिक करा, "फॉर्म क्र. 1" निवडा आणि आत्ता फाइल करा वर क्लिक करा.
 

Data responsive

स्टेप 5: वापरकर्त्याने लागू असलेले कर वर्ष आणि महिना निवडावा व सुरू ठेवा बटणावर क्लिक करावे.
 

Data responsive

स्टेप 6: चला, सुरू करूया वर क्लिक करा.
 

Data responsive

स्टेप 7: 'चला, सुरू करूया' वर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्याला फॉर्म स्क्रीनवर नेले जाईल.
फॉर्म स्क्रीनवर, वापरकर्त्याने फॉर्ममध्ये विचारलेले तपशील प्रविष्ट करावेत. फॉर्ममधील फील्ड्स शक्य तितक्या प्रमाणात आधीपासून भरलेले असतात.
टीप: कृपया "माझे प्रोफाइल" विभागातील पत्त्यासह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण केले असल्याची खात्री करा. जर वापरकर्त्याने "माझे प्रोफाइल" विभागातील कोणताही तपशील अपडेट केला असेल, तर बदल योग्यरित्या दिसण्यासाठी कृपया विद्यमान मसुदा हटवा आणि फॉर्म पुन्हा नव्याने फाइल करा.

Data responsiveData responsive

फॉर्ममध्ये तीन CSV फाइल्स आहेत आणि वापरकर्ता चेकबॉक्सवर टिक करून लागू असलेली CSV निवडू शकतो. CSV निवडल्यानंतर, 'टेम्प्लेट डाऊनलोड करा' बटणावर क्लिक करून ती डाऊनलोड करा. CSV भरण्याच्या सूचना फॉर्ममध्ये दिलेल्या टीपमधील पॉइंट 1 मध्ये दिलेल्या आहेत.

'टेम्प्लेट डाऊनलोड करा' बटणावर क्लिक केल्यानंतर, डेरिव्हेटिव्ह मार्केट (स्क्रिप्ससाठी) आणि/किंवा कॅश मार्केट अंतर्गत खालील फील्ड्ससह एक एक्सेल फाइल डाऊनलोड होईल.
  

Data responsiveData responsive

जर वापरकर्त्याने डेरिव्हेटिव्ह मार्केट (कमोडिटीसाठी) निवडले, तर खालील एक्सेल टेम्पलेट डाऊनलोड होईल.
  

Data responsiveData responsive


वरील CSV फाइल्स भरण्यासाठी खालील सूचना दिलेल्या आहेत.
डेरिव्हेटिव्ह मार्केट (स्क्रिप्ससाठी) आणि कॅश मार्केट -

अनुक्रमांक

फील्डचे नाव

सूचना

अनिवार्य फील्ड (होय/नाही)

फील्डची लांबी

1

अनुक्रमांक

क्रमाने अनुक्रमांक प्रविष्ट करा.

होय

14 अंक, संख्यात्मक, ऋणेतर

2

व्यवहार आयडी

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जनरेट झालेला व्यवहार आयडी प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

3

दलालाचे नाव

स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत दलालाचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

4

दलालाचा आयडी

स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत दलालाला प्रदान केलेला विशिष्ट कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

5

मूळ क्लायंट कोड

व्यवहार करणाऱ्या क्लायंटचा मूळ क्लायंट कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

6

मूळ क्लायंटचे नाव

व्यवहार करणाऱ्या क्लायंटचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

7

मूळ क्लायंटचे पॅन

व्यवहार करणाऱ्या क्लायंटचा पॅन प्रविष्ट करा.

होय

10 अक्षरांक: पहिली 5 अक्षरे, पुढील 4 अंक आणि त्यानंतर 1 अक्षर

8

सुधारित क्लायंट कोड

सुधारित कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

9

क्लायंटचे सुधारित नाव

जर काही सुधारणा केली असेल, तर क्लायंटचे सुधारित नाव प्रविष्ट करा; अन्यथा मूळ नावच प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

10

क्लायंटचा सुधारित पॅन

जर काही बदल करण्यात आला असेल तर क्लायंटचा सुधारित पॅन प्रविष्ट करा, अन्यथा मूळ पॅन प्रविष्ट करा.

होय

10 अक्षरांक रचनेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: सुरुवातीची 5 अक्षर, त्यानंतरचे 4 अंक आणि शेवटी 1 अक्षर.

11

स्क्रिपचे नाव

ज्या स्क्रिपमध्ये व्यवहार करण्यात आला आहे, त्या स्क्रिपचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

12

स्क्रिप कोड

ज्या स्क्रिपमध्ये व्यवहार करण्यात आला आहे, त्या स्क्रिपचा कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

13

प्रमाण

ज्या प्रमाणात व्यवहार करण्यात आला आहे, ते प्रमाण प्रविष्ट करा.

होय

14 अंकांचा संख्यात्मक,
ऋणेतर आणि दशांश नसलेला.

14

दर

ज्या दराने व्यवहार करण्यात आला आहे, त्या प्रति स्क्रिपचा दर ₹ मध्ये प्रविष्ट करा.

होय

14 अंकांचा संख्यात्मक,
ऋणेतर आणि 2 दशांश
स्थळांपर्यंत असलेला

15

व्यवहाराचे एकूण मूल्य

₹ मध्ये एकूण व्यवहार मूल्य प्रविष्ट करा. (प्रमाण*दर)

होय

14 अंकांचा
संख्यात्मक, ऋणेतर
आणि 2 दशांश स्थळांपर्यंत असलेला
 

16

खरेदी किंवा विक्री

ड्रॉपडाउनमध्ये दिल्याप्रमाणे व्यवहार खरेदीचा आहे की विक्रीचा आहे ते निवडा.

होय

-

17

व्यवहाराची तारीख

ज्या तारखेला व्यवहार करण्यात आला आहे ती तारीख प्रविष्ट करा. व्यवहाराची तारीख ही फेरबदल तारखेच्या समान किंवा त्यापूर्वीची असावी.

होय

खाली नमूद केलेल्या स्वरूपात तारीख प्रविष्ट करा
“DD-MMM-YYYY”.

18

फेरबदलाची तारीख

ज्या तारखेला फेरबदल करण्यात आला आहे ती तारीख प्रविष्ट करा. ही तारीख ज्या महिन्यासाठी फॉर्म भरला जात आहे त्या निवडलेल्या महिन्यातीलच असावी.

होय

खाली नमूद केलेल्या स्वरूपात तारीख प्रविष्ट करा
“DD-MMM-YYYY”.

टीप: अनुक्रमांक 9 आणि 10 मध्ये, जर क्लायंटच्या नावात किंवा पॅन क्रमांकात कोणताही बदल नसल्यास, अनुक्रमांक 6 आणि 7 मध्ये नमूद केलेल्या मूळ क्लायंटच्या नाव किंवा पॅन प्रमाणेच मूल्ये प्रविष्ट करता येतील.

डेरिव्हेटिव्ह मार्केट (कमोडिटीसाठी)-

 

अनुक्रमांक

फील्डचे नाव

सूचना

अनिवार्य फील्ड (होय/नाही)

फील्डची लांबी

1

अनुक्रमांक

क्रमाने अनुक्रमांक प्रविष्ट करा.

होय

14 अंकी संख्यात्मक, ऋणेतर

2

व्यवहार आयडी

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जनरेट झालेला व्यवहार आयडी प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

3

दलालाचे नाव

स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत दलालाचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

4

दलालाचा आयडी

स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत दलालाला प्रदान केलेला विशिष्ट कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

            5

मूळ क्लायंट कोड

ज्या क्लायंटने व्यवहार केला आहे, त्याचा मूळ क्लायंट कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

            6

मूळ क्लायंटचे नाव

ज्या क्लायंटने व्यवहार केला आहे, त्या क्लायंटचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

7

मूळ क्लायंटचा पॅन

ज्या क्लायंटने व्यवहार केला आहे, त्या क्लायंटचा पॅन प्रविष्ट करा.

होय

10 अक्षरांक: पहिली 5 अक्षरे, पुढील 4 अंक, आणि शेवटी 1 अक्षर

8

सुधारित क्लायंट कोड

सुधारित कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

9

क्लायंटचे सुधारित नाव

जर काही फेरबदल करण्यात आला असेल तर क्लायंटचे सुधारित नाव प्रविष्ट करा, अन्यथा मूळ नाव तसेच प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 250 वर्ण

            10

क्लायंटचा सुधारित पॅन

जर काही फेरबदल करण्यात आला असेल तर क्लायंटचा सुधारित पॅन प्रविष्ट करा, अन्यथा मूळ पॅन तसाच प्रविष्ट करा.

होय

10 अक्षरांक रचनेमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत: पहिली 5 अक्षरे, त्यानंतर 4 अंक, आणि शेवटी 1 अक्षर

11

कमोडिटी डेरिव्हेटिव्हचे नाव

ज्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवहार करण्यात आला आहे, त्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हचे नाव प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

12

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कोड

ज्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवहार करण्यात आला आहे, त्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हचा कोड प्रविष्ट करा.

होय

जास्तीत जास्त 100 वर्ण

            13

प्रमाण

ज्या प्रमाणासाठी व्यवहार करण्यात आला आहे ते प्रमाण प्रविष्ट करा.

होय

14 अंकी संख्यात्मक, ऋणेतर
आणि दशांश नसलेला.

14

दर

ज्या दराने व्यवहार करण्यात आला आहे, त्या प्रति कमोडिटीचा दर ₹ मध्ये प्रविष्ट करा.

होय

14 अंकी संख्यात्मक,
ऋणेतर आणि 2 दशांश
स्थळांपर्यंत असलेला

     15

व्यवहाराचे एकूण मूल्य

₹ मध्ये एकूण व्यवहार मूल्य प्रविष्ट करा. (प्रमाण*दर)

होय

14 अंकी संख्यात्मक,
ऋणेतर आणि 2 दशांश
स्थळांपर्यंत असलेला

16

खरेदी किंवा विक्री

ड्रॉपडाउनमध्ये दिल्याप्रमाणे व्यवहार खरेदीचा आहे की विक्रीचा आहे ते निवडा.

होय

-

17

व्यवहाराची तारीख

ज्या तारखेला व्यवहार करण्यात आला आहे ती तारीख प्रविष्ट करा. व्यवहाराची तारीख ही फेरबदल केल्याच्या तारखेच्या समान किंवा त्यापूर्वीची असू शकते.

होय

खाली नमूद केलेल्या स्वरूपात तारीख प्रविष्ट करा
“DD-MMM-YYYY”.

18

फेरबदलाची तारीख

ज्या तारखेला फेरबदल करण्यात आला आहे ती तारीख प्रविष्ट करा. ही तारीख ज्या महिन्यासाठी फॉर्म दाखल केला जात आहे त्या निवडलेल्या महिन्यातील असावी.

होय

खाली नमूद केलेल्या स्वरूपात तारीख प्रविष्ट करा
“DD-MMM-YYYY”.

टीप: अनुक्रमांक 9 आणि 10 मध्ये, जर क्लायंटच्या नावात किंवा पॅन क्रमांकात कोणताही बदल नसेल, तर अनुक्रमांक 6 आणि 7 मध्ये प्रविष्ट केलेल्या मूळ क्लायंटच्या नाव किंवा पॅन प्रमाणेच मूल्ये प्रविष्ट करता येतील.

डाउनलोड केलेल्या एक्सेल टेम्प्लेटमध्ये माहिती भरल्यानंतर, वापरकर्त्याने ती माहिती एक्सेल टेम्प्लेटमध्ये सेव्ह करावी. त्यानंतर फाइल > हयाप्रकारे सेव्ह करा वर क्लिक करा किंवा Alt+F+A दाबा. हयाप्रकारे सेव्ह करा प्रकारा मधील ड्रॉपडाउनमधून ‘CSV (स्वल्पविरामाने विभाजित)’ हा पर्याय निवडा आणि सेव्ह करा वर क्लिक करा. भरलेली एक्सेल फाइल CSV स्वरूपात सेव्ह केली जाईल. हे CSV स्वरूप “टेम्प्लेट अपलोड करा” बटणावर क्लिक करून पोर्टलवर अपलोड करावे.

फॉर्ममधील सर्व नोंदी पूर्ण केल्यानंतर, वापरकर्ता फॉर्म सेव्ह करण्याचा किंवा सबमिट करण्यासाठी पूर्वावलोकन पेजवर जाण्याचा पर्याय निवडू शकतो.

सर्व अनिवार्य फील्ड भरल्यानंतरच पूर्वावलोकन करा बटण सक्रिय होईल. पुढे जाण्यासाठी वापरकर्त्याने पूर्वावलोकन करा वर क्लिक करावे.

स्टेप 8: “पूर्वावलोकन करा” बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला पूर्वावलोकन स्क्रीनवर नेले जाईल. येथे तो दिलेल्या तपशीलांची पडताळणी करू शकतो आणि त्यानंतर “ई-पडताळणीकडे पुढे जा” वर क्लिक करावे.

फॉर्ममध्ये वापरकर्त्याने भरलेली सर्व फील्ड आणि माहिती पूर्वावलोकन स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल. पुढे जाण्यापूर्वी वापरकर्त्याने या तपशीलांचे पुनरावलोकन करावे. कोणताही बदल आवश्यक असल्यास, फॉर्ममधील माहितीमध्ये फेरबदल करण्यासाठी वापरकर्ता “संपादित करा” बटणावर क्लिक करू शकतो. वापरकर्त्याला पूर्वावलोकन स्क्रीन PDF स्वरूपात डाऊनलोड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे; मात्र हा PDF केवळ फाइल करण्यापूर्वीच्या दृश्याची प्रत आहे, अंतिम फाइल केलेला फॉर्म नाही.
फॉर्म फाइल करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी, वापरकर्त्याने “ई-पडताळणीकडे पुढे जा” बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
   

Data responsiveData responsive


स्टेप 9: ‘ई-पडताळणीकडे पुढे जा’ बटणावर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला ‘ई-पडताळणी’ पेजवर नेले जाईल, जिथे तो DSC चा वापर करून फॉर्म क्र. 1 ची पडताळणी करू शकतो. फॉर्म सबमिट करण्यासाठी वापरकर्त्याने ‘पुढे सुरू ठेवा’ बटणावर क्लिक करावे.

Data responsive

स्टेप 10: फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर, स्क्रीनवर पुष्टीकरण संदेश प्रदर्शित केला जाईल.
ई-पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवावी. ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकावर देखील पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.
पोचपावती डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड करा बटणावर क्लिक करा
 

Data responsive

स्टेप 11: फॉर्म क्र. 1 यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, वापरकर्ता तुमच्या डॅशबोर्डवर मध्ये भरलेला फॉर्म पाहू शकतो, ई-फाइल > आयकर फॉर्म फाइल करा > फाइल केलेले फॉर्म पहा > आयकर अधिनियम 2025 अंतर्गत फाइल केलेला फॉर्म पहा टॅबवर क्लिक करा.


टीप: अधिक माहितीसाठी भरलेला फॉर्म पहा या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
 

टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या

5. संबंधित विषय

6. शब्दावली

संक्षेप/संक्षिप्त रूप वर्णन/पूर्ण फॉर्म
DSC डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
EVC इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र
ARN पोचपावती क्रमांक
PY मागील वर्ष
FY आर्थिक वर्ष
TY कर वर्ष