फॉर्म 10-IEA - उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
निर्धारण वर्ष 2024-25 पासून, नवीन कर व्यवस्था ही डीफॉल्ट कर व्यवस्था म्हणून निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा होतो की, जर करदात्याने जुनी कर व्यवस्था निवडण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट केला नाही, तर आयकर हा नवीन व्यवस्थेनुसार देय असेल.
कलम 115BAC(6)(ii) नुसार, कोणतेही व्यापारिक किंवा व्यावसायिक उत्पन्न नसलेले करदाते कर विवरणपत्रे फाइल करताना थेट नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडू शकतात.
तथापि, व्यापारिक आणि व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), व्यक्तींची संघटना (AOP) (सहकारी संस्थांव्यतिरिक्त), व्यक्तींचे समूह (BOI) व कृत्रिम न्यायिक व्यक्ती (AJP) यांना जुन्या कर व्यवस्थेसाठी प्राधान्य दर्शविण्यासाठी फॉर्म 10 IEA फाइल करणे आवश्यक आहे. जर अशा व्यक्तींना त्यांची कर व्यवस्था नवीन व्यवस्थेतून जुन्या व्यवस्थेत बदलायची असेल किंवा त्यांना नवीन योजनेची पुन्हा निवड करायची असेल, तर त्यांनी कलम 139(1) अंतर्गत विहित मुदतीत फॉर्म 10-IEA अनिवार्यपणे सबमिट करावा.
2. फॉर्म फाइल करण्यासाठीच्या पूर्व-अटी
- वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड.
- करदात्याच्या एकूण उत्पन्नामध्ये व्यावसायिक उत्पन्नाचा समावेश होतो.
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1.उद्देश.
व्यावसायिक प्रकरणांसाठी, फॉर्म 10-IEA हा 21 जून 2023 च्या अधिसूचना क्र.43/2023 द्वारे अधिसूचित करण्यात आला आहे, ज्याचा वापर करदात्यांद्वारे जुन्या किंवा नवीन कर व्यवस्थेपैकी निवड करण्याचा त्यांचा अधिकार बजावण्यासाठी केला जाऊ शकतो. हा फॉर्म आयुष्यात दोनदा म्हणजेच एकदा नवीन कर व्यवस्थेमधून बाहेर पडण्यासाठी आणि एकदा नवीन कर व्यवस्थेची पुन्हा निवड करण्यासाठी फाइल केला जाऊ शकतो.
3.2. याचा वापर कोण करू शकतो/शकते?
नवीन कर व्यवस्थेतून "बाहेर पडण्यासाठी किंवा तिची पुन्हा निवड करण्यासाठी" व्यावसायिक उत्पन्न असणारा/असणारी करदाता फॉर्म 10-IEA चा वापर करू शकतो/शकते.
4. फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 10 IEA तीन भागांमध्ये विभागलेला आहे:
- मूलभूत माहिती,
- अतिरिक्त माहिती
- घोषणापत्र आणि पडताळणी
येथे फॉर्म 10 IEA च्या विभागांचा एक संक्षिप्त आढावा दिलेला आहे:
4.1. मूलभूत माहिती
भाग 1 मध्ये मूलभूत माहिती (निर्धारितीचे नाव, पॅन, निर्धारण वर्ष आणि व्यक्तीची स्थिती) असते, जी फॉर्ममध्ये आधीपासून भरलेली असेल. फॉर्म पहिल्यांदाच फाइल करत असल्यास, 'बाहेर पडण्याचा' पर्याय आपोआप निवडला जाईल आणि जर सिस्टममध्ये 'बाहेर पडण्याच्या' पर्यायासह वैध फॉर्म असेल, तर 'पुन्हा निवड करण्याचा' पर्याय आपोआप निवडला जाईल.
4.2. अतिरिक्त माहिती
भाग 2 हा अतिरिक्त माहितीशी संबंधित आहे ज्यामध्ये निर्धारितीला IFSC युनिटशी संबंधित अतिरिक्त माहिती (असल्यास) द्यावी लागेल.
कृपया लक्षात घ्या: जर तुम्ही नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडत असाल, तर हे अतिरिक्त माहितीचे पॅनल निष्क्रिय केले जाईल
4.3. घोषणापत्र आणि पडताळणी
भाग 3 हा नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी किंवा तिची पुन्हा निवड करण्यासाठी करदात्याद्वारे करावयाचे घोषणापत्र आणि पडताळणी यांचा आहे.
5. ॲक्सेस आणि सबमिट कसे करावे
5.1. करदात्याद्वारे 10 IEA फाइल करणे
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल वर जा आणि लॉगिनवर क्लिक करा.
स्टेप 2: लॉगिन पेजवर तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 3: तुमच्या डॅशबोर्ड वर, ई-फाइल मेन्यू > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.
स्टेप 4: आयकर फॉर्म्स फाइल करा पेजवर, 'आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म या टॅब अंतर्गत फॉर्म-10-IEA' निवडा. किंवा, फॉर्म फाइल करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये फॉर्म 10-IEA प्रविष्ट करा.
स्टेप 5: फॉर्म 10-IEA पेजवर, संबंधित निर्धारण वर्ष निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: फॉर्म फाइल करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज तपासा आणि चला सुरू करूया वर क्लिक करा.
स्टेप 7: जर निर्धारण वर्षादरम्यान 'व्यापार किंवा व्यवसायातून मिळणारा नफा आणि लाभांक' या शीर्षकाखाली तुमचे उत्पन्न असेल, तर होय हा पर्याय निवडा.
कृपया लक्षात घ्या:
- व्यापारिक आणि व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), व्यक्तींची संघटना (AOP) (सहकारी संस्थांव्यतिरिक्त), व्यक्तींचे समूह (BOI) व कृत्रिम न्यायिक व्यक्ती (AJP) यांना नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी किंवा तिची पुन्हा निवड करण्यासाठी फॉर्म 10-IEA सबमिट करणे अनिवार्य आहे.
- कोणतेही व्यापारिक किंवा व्यावसायिक उत्पन्न नसलेल्या व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) त्यांचे आयकर विवरणपत्र फाइल करताना नवीन कर व्यवस्थेमधून बाहेर पडू शकतात किंवा नवीन कर व्यवस्थेची पुन्हा थेट निवड करू शकतात.
स्टेप 8: उत्पन्नाचे विवरणपत्र फाइल करण्यासाठी लागू असलेली देय तारीख निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: लागू होणारी देय तारीख निवडण्यात मदत करण्याकरिता, तुम्ही 'मदत दस्तऐवज' या हायपरलिंकवर क्लिक करून "मदत दस्तऐवज" चा वापर देखील करू शकता.
स्टेप 9: व्यवस्थेच्या निवडीची पुष्टी करा.
स्टेप 10: फॉर्ममध्ये तीन विभाग आहेत -प्रत्येक विभागाची पुष्टी करा. मूलभूत माहिती विभागावर क्लिक करा.
स्टेप 11: मूलभूत माहिती विभागात, तुमची मूलभूत माहिती आधीपासून भरलेली असेल. फॉर्म पहिल्यांदाच फाइल करत असल्यास, 'बाहेर पडण्याचा' पर्याय आपोआप निवडला जाईल आणि जर सिस्टममध्ये 'बाहेर पडण्याच्या' पर्यायासह वैध फॉर्म असेल, तर 'पुन्हा निवड करण्याचा' पर्याय आपोआप निवडला जाईल. सेव्ह करा वर क्लिक करा.
बाहेर पडणे:
पुन्हा निवड करणे:
स्टेप 12: अतिरिक्त माहिती विभागात IFSC युनिटशी संबंधित आवश्यक तपशील भरा (असल्यास) आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
तुम्ही नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडत असल्यास, हे अतिरिक्त माहिती पॅनल निष्क्रिय केले जाईल.
स्टेप 13: फॉर्मच्या घोषणापत्र आणि पडताळणी विभागात आवश्यक तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
स्टेप 14: फॉर्ममध्ये सादर केलेले सर्व तपशील तपासा. तुम्ही 'संपादित करा' बटणावर क्लिक करून तपशील संपादित करू शकता अन्यथा ई-पडताळणीकडे जा बटणावर क्लिक करा.
स्टेप 15: फॉर्मची पडताळणी करण्यासाठी खालील पर्यायांमधून पडताळणी पद्धत निवडा.
स्टेप 16: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म सबमिट करण्यासाठी "होय" या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 17: आता, फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी नोंदवून ठेवा.
आता, जर करदात्याला फाइल केलेला फॉर्म पाहायचा असेल, तर ई-फाइल मेन्यू > फाइल केलेले फॉर्म्स पहा > आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स > फॉर्म 10-IEA वर जा. तुम्ही फॉर्म आणि पावती डाउनलोड करू शकता. फॉर्मच्या प्रक्रियेचे टप्पे पाहण्यासाठी तपशील पहा वर क्लिक करा.

