फॉर्म 10BD-BE वापरकर्ता मार्गदर्शिका
1. अवलोकन
विशिष्ट आर्थिक वर्षात मिळवलेल्या एकूण उत्पन्नावर एकूण आयकर दायित्वाची गणना केली जाते. तथापि, त्या आर्थिक वर्षातील उत्पन्नामध्ये वेतनाच्या स्वरूपातील आगाऊ रक्कम किंवा थकबाकीचा समावेश असल्यास, करदायित्वाचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आयकर अधिनियमांतर्गत (कलम 89 अंतर्गत) कर सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशा कर सवलतीचा दावा करण्यासाठी फॉर्म 10E फाइल करणे आवश्यक आहे. आयकर विवरणपत्र फाइल करण्यापूर्वीच फॉर्म 10E फाइल करण्याचा सल्ला दिला जातो. हा फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे. फॉर्म 10E फाइल केला नसेल आणि करदात्याने कलम 89 अंतर्गत सवलतीचा दावा केला, तर फाइल केलेल्या ITR वर प्रक्रिया केली जाईल; मात्र, दावा केलेली सवलत मंजूर केली जाणार नाही. वेतनाच्या स्वरूपातील थकबाकी किंवा आगाऊ मिळणाऱ्या उत्पन्नावर कर सवलतीचा दावा करण्यासाठी फॉर्म 10E फाइल करणे अनिवार्य आहे. फॉर्म 10E केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सबमिट करता येतो.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी
- तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता असावे.
- करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" असावी.
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1 हेतू
आयकर अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत, एखाद्या निर्धारितीला पगार किंवा कौटुंबिक पेन्शन, ग्रॅच्युइटी, कर्मचारी कपात नुकसानभरपाई किंवा एकरकमी रूपांतरित पेन्शन यापैकी कोणतीही रक्कम एखाद्या आर्थिक वर्षात आगाऊ किंवा थकबाकी स्वरूपात प्राप्त झाल्यास त्या निर्धारितीला सवलत दिली जाते. ही सवलत यासाठी दिली जाते की, संबंधित उत्पन्नावर आकारला जाणारा कर हा सामान्यतः लागू होणाऱ्या दरापेक्षा अधिक दराने आकारला गेला असता. अशा सवलतीचा दावा फॉर्म 10E मध्ये आपल्या उत्पन्नाचा तपशील सादर करून करता येतो.
3.2 याचा वापर कोण करू शकतो / शकते?
ई-फायलिंग पोर्टलवरील सर्व वैयक्तिक नोंदणीकृत वापरकर्ते, आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 89 नुसार सवलत मिळवण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचे तपशील फॉर्म 10E मध्ये सादर करू शकतात.
3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 10E मध्ये सात भाग आहेत:
- परिशिष्ट I - थकबाकी वेतन / थकबाकी स्वरूपात प्राप्त झालेले कौटुंबिक पेन्शन.
- परिशिष्ट I - वेतन / आगाऊ मिळालेले कौटुंबिक पेन्शन.
- परिशिष्ट II व IIA - पूर्वीच्या सेवांच्या बदल्यात प्राप्त झालेले ग्रॅच्युइटी स्वरूपातील पेमेंट.
- परिशिष्ट III – सलग 3 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या सेवेनंतर रोजगार समाप्तीमुळे किंवा त्यासंदर्भात, नियोक्त्याकडून किंवा मागील नियोक्त्याकडून नुकसानभरपाईच्या स्वरूपात दिलेले पेमेंट किंवा जिथे रोजगाराच्या कालावधीचा उर्वरित भागही 3 वर्षांपेक्षा कमी नाही, अशा परिस्थितीत मिळणारे पेमेंट.
- परिशिष्ट IV - पेन्शनचे एकरकमी रूपांतरण.
प्राप्त झालेल्या रकमेच्या स्वरूपानुसार, फॉर्म 10E फाइल करताना योग्य परिशिष्ट निवडणे आवश्यक आहे.
4. क्रमवार मार्गदर्शक
स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2:वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.
स्टेप 4:आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स या टॅब अंतर्गत फॉर्म 10E निवडा/ शोधा.
स्टेप 5: निर्धारण वर्ष निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: चला सुरू करूया वर क्लिक करा.
स्टेप 7: उत्पन्नाच्या तपशीलांबाबत लागू असलेल्या बाबी निवडा.
स्टेप 8: वैयक्तिक माहिती वर क्लिक करा आणि वैयक्तिक माहितीची पुष्टी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप:कृपया “माझे प्रोफाइल” विभागांतर्गत निवासी स्थितीसह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण भरलेले असल्याचे सुनिश्चित करा. “माझे प्रोफाइल” या हायपरलिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे संपर्क तपशील आणि निवासी स्थिती बदलू शकता.
स्टेप 9.1.a:वैयक्तिक माहिती टॅबची आता पुष्टी झाली आहे, (जर तुम्हाला लागू असेल तर) थकबाकी वेतन/कौटुंबिक पेन्शन वर क्लिक करा.
स्टेप 9.1.b: या भागात थकबाकी मिळालेल्या वेतनाचे / कौटुंबिक पेन्शनचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.
तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
"थकबाकी स्वरूपात प्राप्त झालेले वेतन/कौटुंबिक पेन्शन" या फील्डमधील तपशील अनुक्रमांक 6 नंतर जोडावयाच्या तक्ता A मधील "वेगवेगळ्या मागील वर्षांशी संबंधित थकबाकी स्वरूपात प्राप्त झालेले वेतन/कौटुंबिक पेन्शनचे तपशील" या विभागात प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे भरले जातील.
टीप:सिस्टमद्वारे निर्धारण वर्ष 2024 - 25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेअंतर्गत केली जाते, तर निर्धारण वर्ष 2023 - 24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी, कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.
स्टेप 9.2.a:थकबाकी वेतन या टॅबची पुष्टी आता झाली आहे, (तुम्हाला लागू असल्यास) आगाऊ वेतन वर क्लिक करा.
स्टेप 9.2.b:या भागामध्ये आगाऊ प्राप्त झालेले वेतन / कौटुंबिक पेन्शन यासंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.
तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
"आगाऊ स्वरूपात प्राप्त झालेले वेतन" या फील्डमधील तपशील, अनुक्रमांक 6 नंतर जोडावयाच्या तक्ता A मधील "वेगवेगळ्या मागील वर्षांशी संबंधित आगाऊ स्वरूपात प्राप्त झालेले वेतन/कौटुंबिक पेन्शनचे तपशील" या विभागात प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे भरले जातील.
टीप:सिस्टमद्वारे निर्धारण वर्ष 2024 - 25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेअंतर्गत केली जाते, तर निर्धारण वर्ष 2023 - 24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी, कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.
स्टेप 9.3.a:आगाऊ वेतन या टॅबची आता पुष्टी झाली आहे, (तुम्हाला लागू असल्यास) ग्रॅच्युइटी वर क्लिक करा.
स्टेप 9.3.b:या भागामध्ये पूर्वीच्या सेवांच्या बदल्यात प्राप्त झालेल्या ग्रॅच्युइटी स्वरूपातील पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.
तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप:सिस्टमद्वारे निर्धारण वर्ष 2024 - 25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेअंतर्गत केली जाते, तर निर्धारण वर्ष 2023 - 24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी, कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.
स्टेप 9.4.a:ग्रॅच्युइटी या टॅबची आता पुष्टी झाली आहे, (तुम्हाला लागू असल्यास) रोजगार समाप्तीची भरपाई या टॅबवर क्लिक करा.
स्टेप 9.4.b: या भागामध्ये सलग 3 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या सेवेनंतर रोजगार समाप्तीमुळे किंवा त्यासंदर्भात, नियोक्त्याकडून किंवा मागील नियोक्त्याकडून नुकसानभरपाईच्या स्वरूपात दिलेल्या पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील किंवा जिथे रोजगाराच्या कालावधीचा उर्वरित भागही 3 वर्षांपेक्षा कमी नाही, अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.
तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: सिस्टमद्वारे निर्धारण वर्ष 2024 - 25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेअंतर्गत केली जाते, तर निर्धारण वर्ष 2023 - 24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी, कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.
स्टेप 9.5.a:रोजगार समाप्तीची भरपाई या टॅबची आता पुष्टी झाली आहे, (तुम्हाला लागू असल्यास) पेन्शनचे एकरकमी रूपांतरण या टॅबवर क्लिक करा.
स्टेप 9.5.b:या भागामध्ये पेन्शनच्या एकरकमी रूपांतरणासाठी केल्या जाणाऱ्या पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.
तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप:सिस्टमद्वारे निर्धारण वर्ष 2024 - 25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेअंतर्गत केली जाते, तर निर्धारण वर्ष 2023 - 24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी, कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.
स्टेप 10:पेन्शनचे एकरकमी रूपांतरण या टॅबची पुष्टी आता झाली आहे, पडताळणी करा टॅबवर क्लिक करा.
स्टेप 11: चेकबॉक्स निवडा, ठिकाण प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
स्टेप 12: सर्व टॅब्जची आता पुष्टी झाली आहे. पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.
स्टेप 13:हे फॉर्मचे पूर्वावलोकन आहे. पूर्वावलोकनामधील तपशील योग्य असल्यास, ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा, अन्यथा, तुम्ही तपशील संपादित करू शकता.
स्टेप 14: उपलब्ध असलेल्या कोणत्याही पडताळणी पद्धतीचा वापर करून तुम्ही फॉर्मची ई-पडताळणी करू शकता.
ई-पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 10E सबमिट केला जाईल. पोचपावती क्रमांक जनरेट केला जाईल आणि तो नोंदणीकृत ई-मेल आयडी तसेच मोबाईल नंबरवर कळविला जाईल.
5. फाइल केलेला फॉर्म कसा पाहता येईल?
ई-फाइल > आयकर फॉर्म्स > फाइल केलेले फॉर्म्स पहा > आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स वर जा.
फाइल केलेला फॉर्म येथे प्रदर्शित केला जाईल.