फॉर्म 10E उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

विशिष्ट आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण उत्पन्नावर एकूण आयकर दायित्वाची गणना केली जाते. तथापि, त्या आर्थिक वर्षातील उत्पन्नामध्ये वेतनाच्या स्वरूपातील आगाऊ रक्कम किंवा थकबाकीचा समावेश असल्यास, अतिरिक्त करदायित्वाचा भार कमी करण्यासाठी आयकर अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत कर सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशी कर सवलत मिळविण्यासाठी फॉर्म 10E सादर करणे आवश्यक आहे. आयकर विवरणपत्र फाईल करण्यापूर्वी फॉर्म 10E सादर करणे उचित आहे. हा फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे. करदात्याने कलम 89 अंतर्गत सवलतीचा दावा केला, परंतु फॉर्म 10E सादर केला नसेल, तर आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया केली जाईल; मात्र, दावा केलेली सवलत मंजूर केली जाणार नाही. वेतनाच्या स्वरूपातील थकबाकी किंवा आगाऊ उत्पन्नावर कर सवलतीचा दावा करण्यासाठी फॉर्म 10E सबमिट करणे अनिवार्य आहे. फॉर्म 10E केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सबमिट करता येतो.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी

  • तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता असावे.
  • करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" अशी असावी.

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1 हेतू

आयकर अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत, एखाद्या निर्धारितीला वेतन, कौटुंबिक निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, कपातीची भरपाई किंवा एकरकमी रूपांतरित निवृत्तीवेतन यापैकी कोणतीही रक्कम एखाद्या आर्थिक वर्षात आगाऊ किंवा थकबाकी स्वरूपात प्राप्त झाल्यास सवलत दिली जाते. ही सवलत यासाठी दिली जाते की, अशा रकमेचा समावेश झाल्यामुळे निर्धारितीच्या एकूण उत्पन्नावर अन्यथा लागू झाला असता त्यापेक्षा जास्त दराने कर आकारला जाऊ शकतो. अशा सवलतीचा दावा फॉर्म 10E मध्ये आपल्या उत्पन्नाचा तपशील नमूद करून करता येतो.

3.2 याचा वापर कोण करू शकतो/शकते?

सर्व नोंदणीकृत वापरकर्ते, वैयक्तिक असल्याने, ई-फाइलिंग पोर्टलवर, आयकर अधिनियम 1961 च्या कलम 89 नुसार सवलत मिळवण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचे तपशील फॉर्म 10E मध्ये सादर करू शकतात.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 10E मध्ये सात भाग आहेत:

  1. परिशिष्ट I - थकबाकीत वेतन / थकबाकी स्वरूपात प्राप्त झालेले कौटुंबिक निवृत्तीवेतन
  2. परिशिष्ट I - वेतन/आगाऊ मिळालेले कौटुंबिक निवृत्तीवेतन
  3. परिशिष्ट II आणि IIA - पूर्वीच्या सेवांबाबत प्राप्त झालेले ग्रॅच्युइटी स्वरूपातील पेमेंट.
  4. परिशिष्ट III – निर्धारितीला त्याच्या नियोक्त्याकडून किंवा माजी नियोक्त्याकडून, सलग 3 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या सेवेनंतर किंवा रोजगार कराराच्या उर्वरित कालावधी किमान 3 वर्षांपेक्षा कमी नसताना, नोकरी समाप्तीशी संबंधित किंवा त्याअनुषंगाने प्राप्त झालेले सेवांत लाभ स्वरूपातील पेमेंट.
  5. परिशिष्ट IV - निवृत्तीवेतनाच्या पद्धतीतील बदल

प्राप्त झालेल्या रकमेच्या स्वरूपानुसार, फॉर्म 10E फाईल करताना योग्य परिशिष्ट निवडणे आवश्यक आहे.

4. क्रमवार मार्गदर्शक

स्टेप 1:तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

स्टेप 2:वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.

Data responsive

स्टेप 4:आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स या टॅब अंतर्गत फॉर्म 10E शोधा/ निवडा.

Data responsive

स्टेप 5: A.Y. निवडा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 6: चला सुरू करूया वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7:उत्पन्नाच्या तपशीलांबाबत लागू असलेल्या बाबी निवडा.

Data responsive

स्टेप 8:वैयक्तिक माहिती वर क्लिक करा व वैयक्तिक माहितीची पडताळणी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप:कृपया "माझे प्रोफाइल" विभागातील निवासी स्थितीसह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण भरलेले असल्याची खात्री करा. “माझे प्रोफाइल” या हायपरलिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे संपर्क तपशील आणि निवासी स्थिती बदलू शकता.

Data responsive

स्टेप 9.1.a:वैयक्तिक माहिती ही टॅब पूर्ण झाली आहे. त्यानंतर, (तुम्हाला लागू असल्यास) थकबाकीत वेतन/कौटुंबिक निवृत्तीवेतन वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9.1.b: या भागात थकबाकी मिळालेल्या वेतनाची / कौटुंबिक पेन्शनचे सामान्य तपशील आहेत.

तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

"थकबाकीत वेतन/कौटुंबिक निवृत्तीवेतन प्राप्त झाले" या फील्डमधील तपशील अनुक्रमांक 6 नंतर जोडावयाच्या तक्ता A मधील "वेगवेगळ्या मागील वर्षांशी संबंधित थकबाकीत स्वरूपातील वेतन/कौटुंबिक निवृत्तीवेतनाचा तपशील" या विभागात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे स्वयंचलितपणे भरले जातील.

टीप:निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेनुसार केली जाते. तर निर्धारण वर्ष 2023-24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.

Data responsive

स्टेप 9.2.a:थकबाकीत वेतन टॅब पूर्ण झाली आहे. त्यानंतर, (तुम्हाला लागू असल्यास) आगाऊ वेतन वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9.2.b:या भागामध्ये आगाऊ प्राप्त झालेले वेतन / कौटुंबिक निवृत्तीवेतन यासंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.

तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

“आगाऊ प्राप्त झालेले वेतन”या फील्डमधील तपशील, अनुक्रमांक 6 नंतर जोडल्या जाणाऱ्या तक्ता A मधील “वेगवेगळ्या मागील वर्षांशी संबंधित आगाऊ प्राप्त झालेले वेतन/कौटुंबिक निवृत्तीवेतनाचा तपशील” या विभागात दिलेल्या माहितीच्या आधारे स्वयंचलितपणे भरले जातील.

टीप: निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेनुसार केली जाते. तर निर्धारण वर्ष 2023-24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.

Data responsive

स्टेप 9.3.a:आगाऊ वेतन टॅब पूर्ण झाली आहे. त्यानंतर, ग्रॅच्युइटी वर (तुम्हाला लागू असल्यास) क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9.3.b:या भागामध्ये पूर्वीच्या सेवांबाबत प्राप्त झालेल्या ग्रॅच्युइटी स्वरूपातील पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.

तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा

टीप:निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेनुसार केली जाते. तर निर्धारण वर्ष 2023-24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.

Data responsive

स्टेप 9.4.a:ग्रॅच्युइटी टॅब पूर्ण झाला आहे. त्यानंतर, नोकरी समाप्तीबाबतची भरपाई (तुम्हाला लागू असल्यास) या टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9.4.b:या भागामध्ये नियोक्ता किंवा माजी नियोक्त्याकडून, सलग तीन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या सेवेनंतर किंवा नोकरीच्या कराराचा उर्वरित कालावधी किमान तीन वर्षांपेक्षा कमी नसताना, नोकरी समाप्तीशी संबंधित प्राप्त झालेल्या भरपाईच्या स्वरूपातील पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.

तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डीफॉल्ट नवीन कर व्यवस्थेनुसार केली जाते. तर निर्धारण वर्ष 2023-24 पर्यंतच्या सर्व निर्धारण वर्षांसाठी कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.

Data responsive

स्टेप 9.5.a:नोकरी समाप्तीबाबतची भरपाई ही टॅब पूर्ण झाली आहे. त्यानंतर, निवृत्तीवेतनाचे एकरकमी रूपांतरण (तुम्हाला लागू असल्यास) या टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9.5.b:या भागामध्ये निवृत्तीवेतनाच्या एकरकमी रूपांतराच्या स्वरूपातील पेमेंटसंबंधीचे सर्वसाधारण तपशील समाविष्ट आहेत.

तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी कराची गणना कलम 115BAC(1A) नुसार डिफॉल्ट नवीन कर व्यवस्थेनुसार केली जाते. तर निर्धारण वर्ष 2023-24 पर्यंतच्या सर्व वर्षांसाठी कराची गणना जुन्या कर व्यवस्थेनुसार केली जाते.

Data responsive

स्टेप 10:निवृत्तीवेतनाचे एकरकमी रूपांतरण या टॅबची पुष्टी झाली आहे, त्यानंतर पडताळणी टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप11: चेकबॉक्स निवडा आणि ठिकाण प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 12:सर्व टॅबची पुष्टी झाली आहे. पूर्वावलोकन वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 13:हे फॉर्मचे पूर्वावलोकन आहे. पूर्वावलोकनामधील तपशील योग्य असल्यास ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा. कोणताही बदल आवश्यक असल्यास, तपशील संपादित करू शकता.

Data responsive

स्टेप 14:उपलब्ध असलेल्या कोणत्याही पडताळणी पद्धतीचा वापर करून तुम्ही फॉर्मची ई-पडताळणी करू शकता.

Data responsive

ई-पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 10E सबमिट होईल. पोचपावती क्रमांक जनरेट होईल आणि तो नोंदणीकृत ई-मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.

5. फाईल केलेला फॉर्म कसा पाहता येईल?

ई-फायलिंग > आयकर फॉर्म्स > फाईल केलेले फॉर्म्स पहा > आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स यावर जा.

Data responsive

फाईल केलेला फॉर्म येथे प्रदर्शित केला जाईल.

Data responsive