फॉर्म 145

 

1. अवलोकन

फॉर्म 145 हा एक नवीन फॉर्म आहे ज्याने भारताबाहेर पैसे पाठवण्यासाठीच्या जुन्या फॉर्म 15CA ची जागा घेतली आहे. ज्या व्यक्तीला परदेशी पेमेंट करायचे आहे, त्यांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि पैसे पाठवण्यापूर्वी तो सबमिट करणे आवश्यक आहे. या फॉर्ममुळे, पैसे का पाठवले जात आहेत आणि त्यावर काही कर भरायचा आहे का, हे जाणून घेण्यास आयकर विभागाला मदत होते. फॉर्म 145 मध्ये एका निश्चित यादीतून रेमिटन्स पाठवण्याच्या उद्देशाबद्दल स्पष्ट तपशील देखील मागितला जातो, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होते आणि चुका कमी होतात. काही प्रकरणांमध्ये, तुम्ही फॉर्म 145 फाइल करण्यापूर्वी सनदी लेखापालाने प्रथम फॉर्म 146 (पूर्वीचा फॉर्म 15CB) देणे आवश्यक असते. जर व्यवहाराची रक्कम विहित मर्यादा (₹ 5 लाख) ओलांडत असेल आणि भाग B अंतर्गत समाविष्ट नसल्यामुळे भाग C मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यावर कर आकारला जात असेल, तर फॉर्म 145 फाइल करता येतो. तुम्ही आयकर पोर्टलवर फॉर्म 145 ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सबमिट करू शकता.

2. ही सेवा मिळवण्यासाठीच्या पूर्वअटी 

• वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असलेला ई-फायलिंग पोर्टलचा नोंदणीकृत वापरकर्ता.
• सीएने (फक्त भाग - C साठी) फॉर्म 146 फाइल केलेला असावा.

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1 उद्देश

या फॉर्ममुळे वापरकर्त्यांना अनिवासी व्यक्तीला, जी कंपनी नाही किंवा परदेशी कंपनीला केलेल्या पेमेंट्ससाठी सादर करावयाची माहिती फाइल करता येते. फॉर्म 145 हा अशा रेमिटन्ससाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीद्वारे प्रत्येक रेमिटन्ससाठी, रक्कम रेमिट करण्यापूर्वी फाइल केला जातो. काही प्रकरणांमध्ये, फॉर्म 145 ऑनलाइन अपलोड करण्यासाठी फॉर्म 146 मधील सनदी लेखापालाकडचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

3.2 याचा वापर कोण करू शकतो/शकते?

कोणत्याही श्रेणीतील करदाता, अधिकृत स्वाक्षरीकर्ता आणि प्रतिनिधी निर्धारिती हे अनिवासी व्यक्तीला - जी कंपनी नाही किंवा परदेशी कंपनीला केलेल्या पेमेंटसंबंधी माहिती सादर करण्यासाठी फॉर्म 145 वापरू शकतात.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 145 मध्ये चार विभाग आहेत:

  1. भाग A - रेमिटन्सवर अधिनियमांतर्गत कर लागू होत असल्यास आणि असे रेमिटन्स किंवा अशा रेमिटन्सची एकूण रक्कम, परिस्थितीनुसार, कर वर्षात ₹ 5,00,000 पेक्षा जास्त नसल्यास हा भाग भरावा.
  2. भाग B - रेमिटन्सवर अधिनियमांतर्गत ("आयकर अधिनियम") कर लागू होत असल्यास आणि असे रेमिटन्स किंवा अशा रेमिटन्सची एकूण रक्कम, परिस्थितीनुसार, कर वर्षात ₹ 5,00,000 पेक्षा जास्त असल्यास, तसेच अधिनियमाच्या कलम 395(1) / 395(2) अंतर्गत निर्धारण अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास हा भाग भरावा.
  3. भाग C - रेमिटन्सवर अधिनियमांतर्गत ("आयकर अधिनियम") कर लागू होत असल्यास आणि असे रेमिटन्स किंवा अशा रेमिटन्सची एकूण रक्कम, परिस्थितीनुसार, कर वर्षात ₹ 5,00,000 पेक्षा जास्त असल्यास, तसेच अधिनियमाच्या कलम 515(3)(b) मध्ये परिभाषित केल्यानुसार लेखापालाकडून फॉर्म क्र. 146 मधील प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास हा भाग भरावा.
  4. भाग D - नियम 220(3) मध्ये संदर्भित पेमेंट्सव्यतिरिक्त, रेमिटन्सवर अधिनियमांतर्गत कर लागू होत नसल्यास, नियम 220(2) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तीद्वारे हा भाग भरावा.
Data responsive

3.3.1 भाग A:

रेमिटर, रेमिटी आणि रेमिटन्सचे तपशील प्रविष्ट करा. भाग A मध्ये फॉर्म 145 सबमिट करणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र देखील समाविष्ट आहे.

Data responsive

3.3.2 भाग B:

रेमिटर, रेमिटी, AO प्रमाणपत्राचे तपशील आणि रेमिटन्सचे तपशील प्रविष्ट करा. भाग B मध्ये फॉर्म 145 सबमिट करणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र देखील समाविष्ट आहे.

Data responsive

3.3.3 भाग C:

रेमिटर आणि रेमिटीचे तपशील, लेखापालाचे तपशील, रेमिटन्सचे तपशील (निधी हस्तांतरण), अधिनियमाच्या तरतुदींनुसार करपात्रता [दुहेरी कर आकारणी टाळण्याचा करार (“DTAA”) विचारात न घेता], तसेच दुहेरी कर आकारणी टाळण्याच्या कराराअंतर्गत (“DTAA”) करपात्रता, स्रोतावरील कर कपातीचे तपशील आणि घोषणापत्र यांसारखे सर्व पॅनल्स, फाइल केलेल्या फॉर्म 146 च्या प्रदान केलेल्या ARN तपशिलांच्या आधारे आधीपासून भरलेले असतील.

Data responsive

3.3.4 भाग D:

रेमिटर, रेमिटी आणि रेमिटन्सचे तपशील प्रविष्ट करा. भाग D मध्ये फॉर्म 145 सबमिट करणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र देखील समाविष्ट आहे.

Data responsive

4. ॲक्सेस आणि सबमिट कसे करावे

तुम्ही फॉर्म 145 खालील पद्धतींनी भरू आणि सबमिट करू शकता:

• ऑनलाइन पद्धत - ई-फायलिंग पोर्टलद्वारे.
• ऑफलाइन पद्धत - ऑफलाइन उपयुक्ततेद्वारे.

टीप: अधिक माहितीसाठी ऑफलाइन उपयुक्तता (वैधानिक फॉर्म्स) या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या. फॉर्म 145 ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.

5. क्रमवार मार्गदर्शक

5.1 भाग A, B आणि D फाइल करण्यासाठीचे क्रमवार मार्गदर्शक

स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsiveData responsive

स्टेप 2: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.

Data responsive

स्टेप 3: “आयकर अधिनियम 2025 नुसार फॉर्म्स” हा टॅब निवडा.

Data responsive

स्टेप 4: फॉर्म 145 निवडा / शोधा.

Data responsive

स्टेप 5: ऑनलाइन आणि कर वर्ष निवडा, त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 6: चला सुरू करुया वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7: चला सुरू करुया वर क्लिक केल्यावर, फॉर्म 145 दर्शविला जाईल. लागू असलेला विभाग निवडा आणि सर्व आवश्यक तपशील भरा. पुढे जा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.1: निवडलेल्या भागातले प्रत्येक पॅनल पूर्ण करा आणि भाग A, भाग B किंवा भाग D मधील सर्व पॅनल्स पूर्ण झाल्यानंतरच पूर्वावलोकन बटण सक्रिय होईल. (भाग A चे उदाहरण खाली दिले आहे.)

Data responsive

स्टेप 7.2: प्रत्येक पॅनलमध्ये आवश्यक असलेले तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsiveData responsive
Data responsiveData responsive

स्टेप 7.3: पॅनलमधील सर्व आवश्यक फील्ड भरले गेल्यानंतर, 'पूर्ण झाले' अशी खूण दिसून येईल. सर्व पॅनल्स पूर्ण झाल्यानंतर, पूर्वावलोकन बटण सक्रिय होईल.

Data responsive

स्टेप 8: पूर्वावलोकन पेजवर, तपशीलांची पडताळणी करा आणि ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.

Data responsiveData responsiveData responsive

स्टेप 9: सबमिट करण्यासाठी होय वर क्लिक करा. होय वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

स्टेप 10: तुम्ही पडताळणीच्या कोणत्याही पद्धतीद्वारे फॉर्मची ई-पडताळणी करू शकता.

Data responsive

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी, ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

यशस्वी ई-पडताळणीनंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह एक यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक नोंदवून घ्या. तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

स्टेप 11: फॉर्म सबमिट करण्यासाठी होय वर क्लिक करा.

 
Data responsive

स्टेप 12: तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर सबमिशन यशस्वी होईल.

Data responsive

5.2 जर तुम्हाला फॉर्म 145 - भाग C भरायचा असेल

स्टेप 1: फॉर्मचा भाग C निवडा.

 
Data responsive

स्टेप 2: "जर तुम्ही सीएला समाविष्ट केले नसेल, तर कृपया फॉर्म नेमून देण्यासाठी एकाची निवड करा. मदतीसाठी तुम्ही 'माझा सीए' या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता. सीएला समाविष्ट केल्यानंतर, ते फॉर्म 146 भरतील. फॉर्म 146 सबमिट झाल्यावर, एक पोचपावती जनरेट होईल. पोचपावतीवर नमूद केलेला पोचपावती क्रमांक वापरून, तुम्ही फॉर्म 145 - भाग C फाइल करण्यासाठी पुढे जाऊ शकता."

स्टेप 3: लॉगिन केलेल्या वापरकर्त्यासाठी सीएने भरलेल्या फॉर्म 146 चा पोचपावती क्रमांक प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 4: प्रत्येक पॅनल उघडा, सीएने सबमिट केलेल्या फॉर्म 146 मधील आधीपासून भरलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि ते पॅनल सेव्ह करा. सर्व पॅनल्स पूर्ण केल्यानंतर, सीएने फॉर्म 146 मध्ये सबमिट केलेल्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन वर क्लिक करा.

स्टेप 5: प्रतिमेत दर्शविल्याप्रमाणे पूर्वावलोकन दिसेल. पुन्हा एकदा तपशीलांची पडताळणी करा आणि ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.

स्टेप 6: ई-पडताळणी करण्यासाठी पुष्टीकरण पॉप-अपवर होय या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 7: तुम्ही पडताळणीच्या कोणत्याही पद्धतीद्वारे फॉर्मची ई-पडताळणी करू शकता.

Data responsive

टीप: अधिक माहितीकरिता ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

यशस्वी ई-पडताळणीनंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह एक यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक नोंदवून ठेवा. तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

स्टेप 8: फॉर्म सबमिट करण्यासाठी होय वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9: तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर सबमिशन यशस्वी होईल.

Data responsive