फॉर्म 3CB-3CD उपयोगकर्ता पुस्तिका

 

1. अवलोकन

कर टाळणे आणि कर चुकवेगिरी या गोष्‍टींना आळा घालण्यासाठी, वित्त अधिनियम, 1984 द्वारे निर्धारण वर्ष 1985-86 पासून नवीन कलम 44AB समाविष्ट करून कर लेखा परीक्षणाची आवश्यकता लागू करण्यात आली.

कर लेखापरीक्षणामध्‍ये, निर्धारितीने आयकर अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या विशिष्ट वास्‍तविक तपशीलांच्या सत्यतेबाबत आणि अचूकतेबाबत कर लेखापरीक्षकाचे मत व्यक्त केले जाते; या तपशीलांचा उपयोग सर्व प्रकारच्या भत्त्यांचा, कपातींचा, तोट्यांचा, समायोजनांचा आणि सवलतींचा विचार करून एकूण उत्पन्नाचे योग्य निर्धारण करण्यासाठी व त्यावर अंतिम कर निर्धारित करण्यासाठी केला जातो.हे लेखापरीक्षण खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केले जाते:

  • करदात्याकडून खाते पुस्तिकांची योग्य निगा व अचूकता राखली जाणे तसेच सीएकडून त्यांचे प्रमाणीकरण केले जाणे सुनिश्चित करा.
  • लेखा परीक्षणादरम्‍यान सीएने नोंदविलेली निरीक्षणे/विसंगती नोंदवा.
  • फॉर्म 3CD मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे आयकर कायद्याच्या विविध तरतुदींचे अनुपालन करून विहित माहितीचा अहवाल द्या.

हा फॉर्म सीएने त्यांच्या डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राचा वापर करून अपलोड करणे आवश्यक आहे.
नियम 6G मध्ये कलम 44AB अंतर्गत सादर करावयाच्या खात्‍यांच्‍या लेखापरीक्षणाची माहिती देण्याची आणि तो सादर करण्याची पद्धत सांगितली आहे. यामध्ये 3CA-3CD आणि 3CB-3CD असे दोन प्रकारचे फॉर्म्स आहेत. त्यामुळे, प्रत्येक करदात्याला या दोन्‍हींपैकी केवळ एकच फॉर्म लागू होईल.

  • फॉर्म 3CA-3CD हा अशा व्‍यक्‍तीस लागू होतो ज्‍याला कोणत्‍याही कायद्यानुसार किंवा कायद्यातंर्गत आपल्‍या खात्‍यांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे.
  • फॉर्म 3CB-3CD हा वर उल्लेख केलेल्‍या व्यक्तीव्यतिरिक्त इतर व्यक्तींना लागू होतो, अर्थात ज्या व्‍यक्‍तींच्‍या खात्‍यांचे इतर कोणत्याही कायद्यानुसार लेखापरीक्षण करणे आवश्यक नाही.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी

  • करदाता आणि सीए ई-फाईलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह नोंदणीकृत आहेत
  • करदात्याच्या आणि सीएच्‍या पॅनची स्थिती सक्रिय आहे
  • करदात्याने फॉर्म 3CB-CD साठी सीएची नियुक्ती केली आहे
  • सीए आणि करदात्याकडे एक वैध आणि सक्रिय डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आहे.
  • वैयक्तिक करदात्याच्या बाबतीत करदात्याचा पॅन आधारशी लिंक केलेला असावा (शिफारस केलेले)

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1. हेतू

फॉर्म 3CB-3CD हा अशा व्यक्तीच्या बाबतीत लागू होतो, ज्‍याच्‍या खात्‍यांचे इतर कोणत्याही कायद्यानुसार लेखापरीक्षण करणे आवश्यक नसते. या फॉर्मद्वारे करदात्याने ठेवलेल्या लेखापुस्तकांची अचूकता प्रमाणित केली जाते, सीएने निदर्शनास आणलेल्या निरीक्षणे / तफावतींचा अहवाल दिला जातो तसेच फॉर्म 3CD मध्ये नमूद केल्याप्रमाणे आयकर अधिनियमातील विविध तरतुदींचे पालन करण्यासाठी आवश्यक माहिती सादर केली जाते.

3.2. याचा वापर काेण करू शकतो?

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला आणि करदात्याने फॉर्म 3CB-3CD चे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेला सीए या फॉर्ममध्ये प्रवेश करू शकतो.

4. फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 3CB-3CD मध्‍ये 2 विभाग असतात जे फॉर्म सादर करण्‍यापूर्वी भरणे आवश्‍यक असते. ते पुढीलप्रमाणे आहेत:

  1. फॉर्म क्र. 3CB
  2. फॉर्म क्र. 3CD

येथे फॉर्म 3CB-3CD च्‍या विभागांची माहिती येथे आहे.

  • पहिले पेज आपल्‍याला फॉर्म 3CB आणि फॉर्म 3CD वर नॅव्हिगेट करण्‍यास मदत करते.
  • फॉर्म क्रमांक 3CB पेज वर सीए संबंधित व्यक्तीच्या व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्नाशी संबंधित खात्यांच्या लेखापरीक्षणाबाबतचा तपशील प्रविष्‍ट करतो.
  • फॉर्म क्रमांक 3CD मध्ये आणखी 5 विभाग आहेत, जेथे सीए आयकर अधिनियमाच्या कलम 44AB अंतर्गत आवश्यक तपशील प्रविष्ट करतो/करते.
    • फॉर्म 3CD मधील भाग A (कलम 1 ते 8) मध्ये सीएने निर्धारितीची मूलभूत माहिती नमूद करणे आवश्यक आहे. भाग A मधील सर्व तपशील भरून सेव्‍ह केल्यानंतरच वापरकर्ता फॉर्मच्या पुढील भागाकडे जाऊ शकतो.

    • फॉर्म 3CD मधील भाग B हा आयकर अधिनियम, 1961 मधील कलम 9 ते 44 यांच्या आधारे पुढील उपविभागांमध्ये विभागलेला आहे. या विभागात सर्व संबंधित कलमांशी संबंधित तपशील भरणे आवश्यक आहे.

5. अ‍ॅक्सेस आणि सबमिट कसे करावे

तुम्‍ही सीएला फॉर्म नियुक्‍त करू शकता आणि ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्‍या फॉर्मची पडताळणी करू शकता. सीएने केवळ ऑफलाइन उपयोगितेच्‍या माध्‍यमातून फॉर्म भरणे आवश्‍यक आहे.

टीप : अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी वैधानिक फॉर्म्‍ससाठी ऑफलाइन उपयुक्‍तता या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

5.1. सीएला फॉर्म नियुक्‍त करून देणे

स्‍टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी तसेच पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive


 

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, जर पॅन हे आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्‍हाला पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे ते निष्क्रिय झाले असल्‍याचा पॉप-अप संदेश दिसेल.

आधारशी पॅन लिंक करण्‍यासाठी आता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्‍यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 2: तुमच्‍या डॅशबोर्डवर , ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्‍स फाइल करा वर क्लिक करा.

Data responsive


स्‍टेप 3: आयकर फॉर्म्‍स फाइल करा या पेजवर, आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्‍स या टॅब अंतर्गत फॉर्म 3CB-3CD वर क्लिक करा. वैकल्पिकरीत्या, हा फॉर्म फाइल करण्‍यासाठी सर्च बॉक्समध्ये फॉर्म 3CB-3CD प्रविष्‍ट करा.

Data responsive


स्‍टेप 4: फॉर्म 3CB-3CD या पेजवर, फाइलिंगचा प्रकार आणि निर्धारण वर्ष (A.Y.)निवडा, सनदी लेखापाल यांची नियुक्ती करा आणि आवश्यक ती समर्थनार्थ दस्‍तऐवज संलग्‍न करा. कार्यवाहीसाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
 

Data responsive


टीप:

  • जर आपण सीए आधीच नियुक्त केला असेल तर, फाइलिंग किंवा स्वीकृतीसाठी सीएकडे प्रलंबित असलेल्या फॉर्म 3CB-3CD चा तपशील प्रदर्शित केला जाईल.
  • जर सीएची नियुक्‍ती झालेली नसेल, तर तुम्ही विद्यमान सीए या लिंकवरून यापूर्वी नियुक्‍त केलेल्‍या सीएच्या विद्यमान यादीतून सीएची नेमणूक करू शकता.
  • जर कोणतेही सीए जोडलेले नसतील, तर तुम्ही डॅशबोर्ड > अधिकृत भागीदार > माझे सीए > नवीन सीए जोडा वर क्लिक करून सीए जोडू शकता.

सीएला फॉर्म नियुक्‍त केल्यानंतर, व्यवहार आयडीसह यशस्‍वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडीची नोंद ठेवा.

Data responsive

 





5.2. सीएद्वारे फॉर्म फाइल करणे

स्‍टेप 1: तुमचा वापकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

 

Data responsive

 


स्‍टेप 2:तुमच्याडॅशबोर्डवर,प्रलंबित कारवाई>कार्यसूचीवर क्लिक करा तिथे प्रलंबित बाबींची यादी दिसेल.
 

Data responsive

 


स्‍टेप 3:तुमच्‍या कारवाईसाठीटॅब अंतर्गत, तुम्‍हाला नियुक्त करण्यात आलेल्या फॉर्म 3CB-3CD समोरीलस्‍वीकारावर क्लिक करा.
 

Data responsive

 

जर करदात्याचे पॅन आधारशी लिंक केलेले नसेल, तर सीए च्या स्क्रीनवर तो फॉर्म स्‍वीकारायचा किंवा नाकारायचा याच्‍याशी संबंधित पॉपअप संदेश दिसेल ज्‍यामध्‍ये करदात्याचे पॅन आधारशी संलग्न नसल्यामुळे ते निष्क्रिय असल्याचे नमूद केलेले असेल.

फॉर्म स्‍वीकारण्‍यासाठी किंवा नाकारण्‍यासाठी पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

Data responsive

 

टीप: जर तुम्‍ही विनंती अस्‍वीकार करण्‍याचा पर्याय निवडला, तर तुम्‍हाला सेवा विनंतीचा अस्‍वीकार करण्‍याचे कारण प्रदान करावे लागेल.



स्‍टेप 4: विनंतीचा स्‍वीकार यशस्‍वीपणे झाल्‍यानंतर व्‍यवहार आयडीसह यशस्‍वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्‍यातील संदर्भासाठी व्‍यवहार आयडीची नोंद ठेवा. फॉर्म फाइल करण्‍यासाठी कार्यसूची वर परत जा वर क्लिक करा.    

Data responsive

 

  
स्‍टेप 5: तुमच्‍या कार्यसूची वर फाइलिंग साठी प्रलंबित टॅब अंतर्गत, तुम्‍ही स्‍वीकृत केलेल्‍या फॉर्म 3CB-3CD समोरील फॉर्म फाइल करा वर क्लिक करा.
 

Data responsive

 

 

जर करदात्याचे पॅन आधारशी लिंक केलेले नसेल, तर सीएला फॉर्म फाइल करताना किंवा अपलोड करताना एक पॉप-अप संदेश दिसेल ज्‍यामध्‍ये असे नमूद असेल की आधारशी लिंक नसल्यामुळे करदात्‍याचे पॅन निष्क्रिय झाले आहे.फॉर्म फाइल करण्‍यासाठी किंवा अपलोड करण्‍यासाठी पुढे सुरू ठेवा वर‍ क्लिक करा.

Data responsive

 

स्‍टेप 6: फॉर्म 3CB-3CD पेज वर, कार्यवाहीसाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

 



स्‍टेप 7: ऑफलाइन उपयोगिता डाउनलोड करा (तुमच्‍या होमपेज वर डाऊनलोड्स विभागामध्‍ये सुद्धा उपलब्ध) आणि उपयुक्‍ततेचा वापर करून फॉर्म फाइल करा. त्‍यांनतर ऑफलाइन उपयोगितेद्वारे तयार केलेली JSON फाइल फॉर्म 3CB-3CD पेज वर अपलोड करा. आवश्‍यक समर्थनार्थ दस्‍तऐवज संलग्‍न करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
 

Data responsive

 



स्‍टेप 8: विशिष्‍ट ओळख क्रमांक पेज वर, पुढे जा वर क्लिक करा.
 

Data responsive

 



स्‍टेप 9: जर तुम्‍ही पुढे जानिवडले, तर तुम्‍हाला ई-पडताळणी पेज वर नेले जाईल जिथे तुम्‍ही डिजिटल स्‍वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.

टीप: अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

ई-पडताळणी यशस्‍वीपणे पूर्ण झाल्‍यानंतर व्‍यवहार आयडीसह यशस्‍वीतेचा संदेश प्रदर्शित होतो. कृपया भविष्‍यातील संदर्भासाठी व्‍यवहार आयडीची नोंद करून ठेवा. करदात्‍याला ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत ईमेल आयडी व मोबाइल नंबरवर पुष्‍टीकरण संदेश देखील प्राप्‍त होईल.
 
 

Data responsive

 



5.3 करदात्‍याद्वारे पडताळणी

स्‍टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग वर लॉगिन करा.

Data responsive

 


 

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, जर पॅन आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्‍हाला एक पॉप-अप संदेश दिसेल की, तुमचे पॅन हे तुमच्‍या आधारशी लिंक केलेले नसल्यामुळे निष्क्रिय झाले आहे.

आधारशी पॅन लिंक करण्‍यासाठी आत्‍ता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्‍यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

 

स्‍टेप 2: तुमच्‍या डॅशबोर्ड वर प्रलंबित कारवाई > कार्यसूची वर क्लिक करा.

Data responsive

 

स्‍टेप 3: तुमच्या कार्यसूची वरील स्वीकृतीसाठी प्रलंबित या टॅबमध्ये, तुमच्या सीएने सादर केलेल्या फॉर्म 3CB-3CD च्या समोर असलेल्या स्‍वीकारा या पर्यायावर क्लिक करा.

Data responsive

 

टीप: जर तुम्‍ही विनंती अस्‍वीकार करण्‍याचा पर्याय निवडला, तर तुम्‍हाला सेवा विनंती अस्‍वीकार करण्‍याचे कारण प्रदान करावे लागेल.

स्‍टेप 4: विनंती स्‍वीकार केल्‍यानंतर, तुम्‍हाला ई-पडताळणी पेज वर नेले जाते जेथे तुम्‍ही डिजिटल स्‍वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.

टीप: अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

ई-पडताळणी यशस्‍वीपणे पूर्ण झाल्‍यानंतर, व्‍यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्‍वीतेचा संदेश प्रदर्शित होतो. भविष्‍यातील संदर्भासाठी कृपया व्‍यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकाची नोंद करून ठैवा. ई-फाइलिंग पोर्टलवर तुमच्‍या नोंदणीकृत ईमेल आयडी तसेच मोबाइल क्रमांकावर तुम्‍हाला पुष्‍टीकरण संदेश प्राप्‍त होईल.
 

Data responsive