फॉर्म 50 वापरकर्ता मार्गदर्शक
1. अवलोकन
आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा समावेश असताना हस्तांतरण किंमत निर्धारणामुळे अनिश्चितता निर्माण होऊ शकते, कारण भविष्यातील वाद टाळण्यासाठी वयवहाराची किंमत ही स्वतंत्र पक्षांमधील व्यवहाराच्या तत्त्वानुसार असणे आवश्यक असते. अग्रिम निश्चितता प्रदान करण्यासाठी आणि वादविवाद कमी करण्यासाठी, आयकर विभाग करदात्यांना अशा व्यवहारांसाठी अग्रिम किंमत निर्धारण करार (APA) करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.
फॉर्म क्र. 50 हा पात्र व्यक्तीने मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय कर आकारणी) यांच्याकडे सादर करावयाचा प्री-फाइलिंग सल्लामसलत अर्ज आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, नियुक्त पथक अर्जदारासोबत प्री-फाइलिंग सल्लामसलत करेल. तसेच, द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करारांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये, भारतीय सक्षम प्राधिकरण किंवा त्यांचे प्रतिनिधीही या सल्लामसलतीत सहभागी होतील.
पात्र व्यक्ती
APA नियमांनुसार करार करण्यासाठी एखादी व्यक्ती पात्र असेल, जर त्याने -
:माहिती: आंतरराष्ट्रीय व्यवहार केला असेल; किंवा
(ii) आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याचा विचार करत असेल.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्वअटी
• तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असलेले नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्यक आहे.
• करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" असावी.
शिफारसीय • पॅन आणि आधार लिंक केलेले असावेत.(शिफारसीय)
• जर तुम्ही फॉर्मची पडताळणी DSC पद्धतीद्वारे करण्याचा पर्याय निवडला असेल, तर तुमच्याकडे वैध DSC असणे आवश्यक आहे. तसेच, तो ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा आणि त्याची वैधता मुदतबाह्य झालेली नसावी.
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1 हेतू
फॉर्म 50 हा अग्रिम किंमत निर्धारण करार (APA) संदर्भात प्री-फाइलिंग मीटिंगची विनंती करण्यासाठी सादर केला जातो. नियंत्रित व्यवहारांसाठी योग्य हस्तांतरण किंमत निर्धारण निकषांचे निर्धारण करण्यासाठी तो बहुराष्ट्रीय समूहांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा फॉर्म प्रस्तावित कराराच्या व्यापक चौकटीवर प्राथमिक चर्चा करण्यास सुलभता प्रदान करतो आणि APA निश्चित करण्यापूर्वी हस्तांतरण किंमत निर्धारणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांची ओळखण्यास मदत करतो. अर्ज तीन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये दिलेले सर्व तपशील अर्जदाराच्या माहितीनुसार अचूक व सत्य असावेत.
3.2 याचा उपयोग कोण करू शकतो /शकते?
ई-फाइलिंग पोर्टलवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते, आयकर अधिनियम आणि नियमांतील संबंधित तरतुदींनुसार परवानगी असल्यास, प्री-फाइलिंग सल्लामसलतीसाठी फॉर्म 50 अर्जामध्ये आवश्यक तपशील सादर करू शकतात.
3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 50 मध्ये चार पॅनल्स आहेत:
1. भाग A - व्यक्तीचा तपशील
2. भाग B - इतर तपशील
3. जोडपत्रे
4. पडताळणी
4. क्रमवार मार्गदर्शक
स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 3: तुमच्या डॅशबोर्डवर ई-फाइल > आयकर फॉर्म > 'आयकर फॉर्म फाइल करा' वर क्लिक करा.
स्टेप 4: आयकर अधिनियम 2025 नुसार फॉर्म हा टॅब निवडा, फॉर्म 50 शोधा आणि 'आत्ता फाइल करा' बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: पॅन, सादरीकरण पद्धत आणि फाइल करण्याचा प्रकार तपासा आणि 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करा.
स्टेप 6: 'चला सुरू करूया' वर क्लिक करा.
स्टेप 7: 'चला सुरू करूया' बटणावर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्याला पॅनल स्क्रीनवर नेले जाईल. त्यानंतर पहिले पॅनल: "भाग A: व्यक्तीचे तपशील" निवडा.
स्टेप 8: आवश्यक तपशील प्रविष्ट करा, तपशीलांची पुष्टी करा आणि 'सेव्ह करा' वर क्लिक करा.
टीप: कृपया "माझे प्रोफाइल" विभागातील पत्त्यासह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण भरलेले असल्याचे सुनिश्चित करा. "माझे प्रोफाइल" या हायपरलिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे संपर्क तपशील आणि पत्त्याची माहिती अपडेट करू शकता.
स्टेप 9: पहिले पॅनल सेव्ह केल्यानंतर त्याची स्थिती 'पूर्ण' अशी दर्शविली जाईल. त्यानंतर दुसरे पॅनल: "भाग B - इतर तपशील" निवडा.
स्टेप 10: दुसरे पॅनल "भाग B - इतर तपशील" मध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि 'सेव्ह करा' वर क्लिक करा. फील्ड क्रमांक 11 साठी वापरकर्त्याला दोन पर्याय उपलब्ध असतील — 'तपशील जोडा' किंवा 'CSV अपलोड करा'. फील्ड क्रमांक 11 पूर्ण करण्यासाठी वापरकर्ता यांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो / शकते.
टीपा:
- फील्ड क्र. 10 फक्त त्या प्रकरणांमध्ये लागू आहे ज्यामध्ये फील्ड क्र. 9 (अग्रिम किंमत निर्धारण करार (APA) चा प्रकार) मध्ये द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय APA निवडलेले आहे.
- तुम्ही एकतर्फी अग्रिम किंमत निर्धारण करार (APA) साठी अर्ज करत असल्यास, "सद्य अर्ज यांच्याकडे सादर करण्यात आला आहे" या फील्डमध्ये "Pr. CCIT (IT)" निवडा. बहुपक्षीय किंवा द्विपक्षीय APA उत्तर अमेरिका (कॅरिबियन बेटांसह) आणि युरोपमधील देशांशी संबंधित असल्यास, "भारताचे सक्षम प्राधिकरण (संयुक्त सचिव विदेशी कर आणि कर संशोधन-I)" निवडा. इतर कोणत्याही देशाशी संबंधित APA असल्यास, "सद्य अर्ज यांच्याकडे सादर करण्यात आला आहे" या फील्डमध्ये "भारताचे सक्षम प्राधिकरण (संयुक्त सचिव विदेशी कर आणि कर संशोधन-II)" निवडा.
- फील्ड क्र. 11: समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे तपशील या अंतर्गत दिलेल्या टिपेतील सूचना कृपया वाचा.
1. फील्ड क्र. 11 अंतर्गत जोडावयाच्या संबंधित उपक्रमांच्या (AE) तपशीलांच्या नोंदी 50 पेक्षा जास्त असल्यास, "एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करा" बटणाचा वापर करा. एक्सेल फाइल डाउनलोड केल्यानंतर, त्यामधील उपलब्ध स्तंभांनुसार तपशील भरावेत. एक्सेल टेम्पलेटमधील स्तंभांचे स्पष्टीकरण खाली दिले आहे:
वरील एक्सेल टेम्पलेट भरण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा:
|
फील्डचे नाव |
सूचना |
अनिवार्य फील्ड (होय/नाही) |
वर्णसंख्या |
|
अनुक्रमांक |
1 पासून सुरू होणारे अनुक्रमांक प्रविष्ट करा |
होय |
|
|
AE चा प्रकार |
ड्रॉपडाउनमधून मूल्य निवडा |
होय |
|
|
प्रकार |
ड्रॉपडाउनमधून मूल्य निवडा |
होय |
|
|
व्यवहाराचे वर्णन |
वर्णन प्रदान करा |
होय |
जास्तीत जास्त 4000 वर्ण |
|
नाव |
संबंधित उपक्रमाचे (AE) चे नाव प्रविष्ट करा |
होय |
जास्तीत जास्त 277 वर्ण |
|
संबंधित उपक्रमाचे स्थान (AE) (देश/प्रदेश) |
ड्रॉपडाउनमधून निवडा |
होय |
|
|
संबंधित उपक्रमाचा (AE) करदाता ओळख क्रमांक किंवा त्याच्या समतुल्य क्रमांक |
करदाता ओळख क्रमांक (TIN) किंवा त्याच्या समतुल्य क्रमांक प्रविष्ट करा |
होय |
जास्तीत जास्त 75 वर्ण |
|
पॅन (उपलब्ध असल्यास) |
पहिली 5 अक्षरे, 4 अंक, 1 अक्षर |
नाही |
|
|
प्रस्तावित हस्तांतरण किंमत निर्धारण पद्धती |
ड्रॉपडाउनमधून निवडा |
|
|
|
कृपया निर्दिष्ट करा |
वरील फील्ड पर्यायामध्ये (f) "बोर्डद्वारे विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही पद्धत" हा पर्याय निवडल्यास |
होय |
जास्तीत जास्त 400 वर्ण |
|
मागील 3 कर वर्षांसाठीचे अंदाजित मूल्य |
आर्थिक वर्ष 2025-26 |
नाही |
दशांशांशिवाय 14 अंक |
|
|
आर्थिक वर्ष 2024-25 |
नाही |
दशांशांशिवाय 14 अंक |
|
|
आर्थिक वर्ष 2023-24 |
नाही |
दशांशांशिवाय 14 अंक |
स्टेप 11: दुसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर त्याची स्थिती 'पूर्ण' म्हणून दर्शविली जाईल. त्यानंतर तिसरे पॅनल: "जोडपत्रे" निवडा. या पॅनलमध्ये 8 जोडपत्रे आहेत, त्यापैकी 3 जोडपत्रे आणि 1 "तपशील जोडा" फील्ड अनिवार्य आहेत.
स्टेप 12: तिसरे पॅनल "जोडपत्रे" भरल्यानंतर 'सेव्ह करा' वर क्लिक करा.

स्टेप 13: तिसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर ते 'पूर्ण' झाले असे दिसेल, त्यानंतर चौथे पॅनल "पडताळणी" निवडा.
स्टेप 14: चौथ्या पॅनलमध्ये आवश्यक तपशील भरा आणि 'सेव्ह करा' वर क्लिक करा.
स्टेप 15: चौथा पॅनल सेव्ह केल्यानंतर पॅनलची स्थिती 'पूर्ण' म्हणून दिसेल, त्यानंतर 'पुनरावलोकन' वर क्लिक करा.
स्टेप 16: पूर्वावलोकन पेजवरील तपशील पडताळा आणि 'ई-व्हेरिफिकेशनसाठी पुढे जा' वर क्लिक करा. वापरकर्ता पूर्वावलोकन PDF डाउनलोड करू शकतो.

स्टेप 17: 'ई-पडताळणीसाठी पुढे जा' बटणावर क्लिक केल्यानंतर, आपण ई-पडताळणीसाठी पुढे जाऊ इच्छिता याची पुष्टी करणारी पॉपअप विंडो दिसेल. 'होय' वर क्लिक करा.
स्टेप 18: 'होय' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 'ई-पडताळणी करा' पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही EVC/DSC (लागू असल्यास) वापरून फॉर्म 50 ची पडताळणी करू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी 'ई-पडताळणी कशी करावी' या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
ई-पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, यशस्वीतेचा संदेश व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह प्रदर्शित होईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक नोंदवून ठेवा. तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.
फॉर्म 50 यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर, वापरकर्ता भरलेला फॉर्म खालील मार्गाने पाहू शकतो - डॅशबोर्डवर ई-फाइल > आयकर फॉर्म्स फाइल करा > फाइल केलेले फॉर्म्स पहा > 'आयकर अधिनियम 2025 अंतर्गत फाइल केलेले फॉर्म' टॅब पहा.
टीप: अधिक माहितीसाठी 'फाइल केलेले फॉर्म' या वापरकर्ता मार्गदर्शिकेचा संदर्भ घ्या.
5. संबंधित विषय
- लॉगिन
- डॅशबोर्ड
- ई-पडताळणी कशी करावी
- EVC जनरेट करा
- प्रतिनिधी म्हणून अधिकृत/नोंदणी करा
6. शब्दावली
| संक्षेप /संक्षिप्त रूप | वर्णन/पूर्ण फॉर्म |
| DSC | डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र |
| EVC | इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र |
| ARN | पोचपावती क्रमांक |
| TY | कर वर्ष |