फॉर्म 51 उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये हस्तांतरण किंमतीमुळे अनिश्चितता निर्माण होऊ शकते, कारण भविष्यातील वाद टाळण्यासाठी ही किंमत वाजवी असणे आवश्यक असते. आगाऊ निश्चितता प्रदान करण्यासाठी आणि कायदेशीर वाद कमी करण्यासाठी, आयकर विभाग करदात्यांना अशा व्यवहारांसाठी अग्रिम किंमत करार (APA) करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.
फॉर्म 51 हा APA ची विनंती करण्यासाठी वापरला जाणारा अर्ज आहे. तो विहित शुल्कासह एकपक्षीय, द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय करारासाठी फाइल केला जाऊ शकतो. हाच फॉर्म अर्जदाराला रोलबॅकची विनंती करण्याची परवानगी देखील देतो, जेणेकरून नियमांनुसार परवानगी असेल तेथे, मंजूर केलेली पद्धत मागील वर्षांसाठीही लागू केली जाऊ शकते.
चालू व्यवहारांच्या बाबतीत पहिल्या संबंधित कर वर्षाच्या सुरुवातीपूर्वी किंवा उर्वरित व्यवहारांच्या बाबतीत व्यवहार करण्यापूर्वी फॉर्म 51 फाइल करणे आवश्यक आहे. मागितलेल्या APA च्या प्रकारानुसार तो योग्य प्राधिकरणाकडे सादर करणे आवश्यक आहे.
फॉर्म 51 आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे आणि तो फक्त ऑनलाइनच सादर केला जाऊ शकतो.
2. ही सेवा मिळवण्यासाठीच्या पूर्व-अटी
• ई-फाइलिंग पोर्टलवर तुम्ही वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असलेले नोंदणीकृत वापरकर्ता असायला हवे.
• करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" असावी
• पॅन आणि आधार जोडलेले असावेत (याची शिफारस केली जाते)
• तुम्ही DSC पद्धतीद्वारे फॉर्मची पडताळणी करणे निवडल्यास, फॉर्मची पडताळणी करण्यासाठी तुमच्याकडे वैध DSC असणे आवश्यक आहे आणि ते ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावे आणि कालबाह्य झालेले नसावे
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1 उद्देश
फॉर्म 51 हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (CBDT) अग्रिम किंमत करार (APA) करण्याची इच्छा असणाऱ्या करदात्यांसाठी अर्ज म्हणून काम करतो, यामुळे व्यापाराला त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी हस्तांतरण किंमत पद्धती अग्रिम स्वरूपात स्थापित करता येतात, ज्यामुळे विवाद कमी होतात आणि कराबद्दलची निश्चितता वाढते.
नवीन आयकर नियम, 2026 अंतर्गत फॉर्म्स 3CED आणि 3CEDA यांना नवीन फॉर्म 51 मध्ये एकत्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे मंजूर केलेल्या APA हस्तांतरण किंमत पद्धतींचा मागील वर्षांपर्यंत विस्तार करणे अधिक सुलभ होईल, सुसंगतता वाढेल आणि चालू किंवा संभाव्य कर विवाद कमी होतील.
3.2 याचा वापर कोण करू शकतो / शकते?
ई-फाइलिंग पोर्टलवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते, आयकर कायदा आणि नियमांच्या संबंधित तरतुदींअंतर्गत परवानगी असल्याप्रमाणे, अग्रिम किंमत करारासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक तपशील देण्याकरिता फॉर्म 51 सादर करू शकतात, ज्यामध्ये लागू असेल तेथे रोलबॅकची विनंती समाविष्ट आहे.
3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 51 मध्ये चार पॅनल्स आहेत:
1. भाग A: अर्जदाराचे तपशील
2. भाग B: इतर तपशील
3. जोडपत्रे
4. पडताळणी
4. क्रमवार मार्गदर्शक
स्टेप 1: तुमच्या वापरकर्ता आयडी आणि पासवर्डने ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: वापरकर्ता आयडी(पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा येथे जा.
स्टेप 4: आयकर आधिनियम 2025 नुसार फॉर्म्स टॅब निवडा, फॉर्म 51 शोधा आणि आत्ता फाइल करा बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: पॅन सादर करण्याची पद्धत, फाइलिंगचा प्रकार तपासा आणि पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
स्टेप 6: चला सुरू करूया वर क्लिक करा.
स्टेप 7: चला सुरू करूया बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला पॅनल स्क्रीनवर नेले जाईल आणि पहिले पॅनल निवडा: "भाग A: अर्जदाराचे तपशील".
स्टेप 8: तपशिलांची पुष्टी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: कृपया सुनिश्चित करा की "माझे प्रोफाइल" विभागा अंतर्गत पत्त्यासह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण भरले आहेत. तुम्ही "माझे प्रोफाइल" या हायपरलिंकवर क्लिक करून तुमचा संपर्क आणि पत्त्याचे तपशील अपडेट करू शकता.
स्टेप 9: पहिले पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिती पूर्ण झाले अशी दर्शविली जाईल, त्यानंतर दुसरे पॅनल: "भाग B: इतर तपशील" निवडा.
स्टेप 10: दुसऱ्या पॅनलमध्ये आवश्यक तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीपा:
फील्ड क्र. 10 केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा फील्ड क्र. 9 (APA चा प्रकार) मध्ये द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय APA निवडले असेल
जर तुम्ही एकपक्षीय APA साठी अर्ज करत असाल, तर कृपया "सध्याचा अर्ज यांच्याकडे सादर केला आहे" या फील्ड अंतर्गत "Pr. CCIT (IT)" निवडा. जर बहुपक्षीय किंवा द्विपक्षीय APA, कॅरिबियन बेटांसह उत्तर अमेरिका आणि युरोपमधील देशांशी संबंधित असेल, तर कृपया "भारताचे सक्षम प्राधिकरण (संयुक्त सचिव FT&TR-I)" हा पर्याय निवडा. अन्यथा, "सध्याचा अर्ज यांच्याकडे सादर केला आहे" या फील्ड अंतर्गत "भारताचे सक्षम प्राधिकरण (संयुक्त सचिव FT&TR-II)" हा पर्याय निवडा.

टीपा:
कृपया फील्ड क्र. 12: समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित/मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे तपशील अंतर्गत असलेल्या टीपेमध्ये नमूद केलेल्या सूचना वाचा.
तुम्ही संबंधित उपक्रमाचा प्रकार आणि प्रकार फील्ड निवडल्यानंतरच व्यवहार आयडी जनरेट केला जाईल.
जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट व्यवहारासाठी रोलबॅकचा पर्याय निवडत नसाल, तर तुम्हाला त्याचे कारण नमूद करणारा दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे.
टीपा:
फील्ड क्र. 12 अंतर्गत "रोलबॅक निवडला आहे का" या फील्डसाठी होय निवडल्यावरच फील्ड क्र. 13 लागू केले जाईल.
कृपया फील्ड क्र. 13: "रोलबॅक निवडल्यास प्रत्येक व्यवहारासाठी मागील चार कर वर्षांचे तपशील" अंतर्गत असलेल्या टीपेमध्ये नमूद केलेल्या सूचना वाचा.
कर वर्षे 11 व्या फील्डमध्ये निवडलेल्या कालावधीच्या आधारावर दर्शविली जातील: प्रस्तावित/मंजूर APA चा कालावधी आणि ज्या तारखेपासून APA ची विनंती केली आहे/APA केला आहे:". उदाहरणार्थ, जर निवडलेला कालावधी 01 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असेल, तर रोलबॅक कर वर्षे ही कर वर्ष 2022-23 पासून कर वर्ष 2025-26 पर्यंत दर्शविली जातील.
फील्ड क्र. 12 मध्ये ज्या व्यवहार आयडीसाठी रोलबॅक निवडला जात आहे, ते व्यवहार आयडी फील्ड अंतर्गत दर्शविले जातील.
जर तुम्हाला फील्ड क्र. 13 मध्ये 40 पेक्षा जास्त नोंदी प्रविष्ट करायच्या असतील, तर तुम्ही एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करावे, तपशील भरावे, एक्सेल फाईल .CSV स्वरूपात परिवर्तित करावी आणि ती अपलोड करावी.
टीपा:
वरील एक्सेल टेम्पलेट भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांचे अनुसरण करा:
|
फील्डचे नाव |
सूचना |
अनिवार्य फील्ड (होय/नाही) |
वर्णसंख्या |
|
अनुक्रमांक |
1 पासून सुरू होणारे अनुक्रमांक प्रविष्ट करा |
होय |
|
|
कर वर्ष |
ज्या संबंधित कर वर्षासाठी रोलबॅक निवडला आहे, ते वर्ष YYYY-YY स्वरूपात प्रविष्ट करा |
होय |
खाली नमूद केलेल्या स्वरूपात 7 वर्ण: |
|
व्यवहार आयडी |
फील्ड क्र. 12 मध्ये जनरेट केलेला व्यवहार आयडी प्रविष्ट करा, ज्यासाठी रोलबॅकचा पर्याय निवडला जात आहे |
होय |
|
|
उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याची तारीख |
संबंधित कर वर्षासाठी उत्पन्नाचे विवरणपत्र सादर केल्याची तारीख प्रविष्ट करा |
नाही |
खाली नमूद केलेल्या |
|
फॉर्म क्र. 48 मध्ये ऑडिट अहवाल सादर करण्याची तारीख |
संबंधित कर वर्षासाठी फॉर्म क्र. 48 मधील ऑडिट अहवाल ज्या तारखेस सादर करण्यात आला होता ती तारीख प्रविष्ट करा. |
नाही |
खाली नमूद केलेल्या |
|
प्रलंबित अपीलांचे तपशील |
प्रलंबित अपीलांचे तपशील प्रविष्ट करा |
नाही |
जास्तीत जास्त 2000 वर्ण |
|
अपीलीय न्यायाधिकरणाने |
ड्रॉपडाउनमधून होय किंवा नाही निवडा |
होय |
|
टीपा:
फील्ड क्र. 14(b): फील्ड क्र. 12 मधील "रोलबॅक निवडला आहे का" या फील्डसाठी तुम्ही "होय" निवडले असेल तरच रोलबॅक शुल्क लागू केले जाईल.
आयकर नियम, 2026 च्या नियम 106 आणि 111 नुसार, तुम्हाला अर्ज शुल्क, भरलेले रोलबॅक शुल्क यांचा तपशील प्रदान करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला जोडपत्रे पॅनल अंतर्गत A-27 मध्ये भरलेल्या शुल्काची प्रत जोडणे आवश्यक आहे.
स्टेप 11: दुसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिती पूर्ण झाले अशी दर्शविली जाईल, त्यानंतर तिसरे पॅनल: "जोडपत्रे" निवडा.
स्टेप 12: तिसऱ्या पॅनलमध्ये आवश्यक दस्तऐवज/तपशील जोडा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.




स्टेप 13: तिसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिती पूर्ण झाले अशी दर्शविली जाईल, त्यानंतर चौथे पॅनल: "पडताळणी" निवडा.
स्टेप 14: चौथ्या पॅनलमध्ये आवश्यक तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
स्टेप 15: चौथे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिती पूर्ण झाले अशी दर्शविली जाईल, त्यानंतर पूर्वावलोकन वर क्लिक करा.
स्टेप 16: पूर्वावलोकन पेजवर, तपशीलाची पडताळणी करा आणि ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.

स्टेप 17: ई-पडताळणीकडे जा बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही ई-पडताळणी करण्यासाठी पुढे जाऊ इच्छिता हे दर्शविणारे पॉपअप पुष्टीकरण येईल. होय वर क्लिक करा.
स्टेप 18: होय वर क्लिक केल्यावर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही EVC/DSC चा (लागू असल्यास) वापर करून फॉर्म 51 ची पडताळणी करू शकता.
टीप: अधिक जाणून घेण्यासाठी, ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
यशस्वीरित्या ई-पडताळणीनंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह एक यशस्वी झाल्याचा संदेश दर्शविला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.
5. संबंधित विषय
6. शब्दावली
|
संक्षेप/संक्षिप्त रूप |
वर्णन/पूर्ण रूप |
|
DSC |
डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र |
|
EVC |
इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड |
|
ARN |
पोचपावती क्रमांक |
|
TY |
कर वर्ष |