फॉर्म क्र. 1. 1(28/2024) उपयोगकर्ता पुस्तिका

1.अवलोकन

फॉर्म क्र. 1 हे एक निवेदन-सह-घोषणापत्र आहे, जे आयकर कायदा 2025 मधील कलम 395 व कलम 147 अंतर्गत निर्दिष्‍ट देयकांवर TDS कपात लागू होऊ नये यासाठी IFSC युनिट्स (प्रदेयी) यांनी संबंधित देयककर्त्‍यास सादर करणे आवश्‍यक आहे.

2. या सेवेचा लाभ घेण्‍याकरिता आवश्‍यक असलेल्‍या पूर्वअटी

• तुम्‍ही ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्‍यक आहे
• करदात्‍याच्‍या पॅनची स्थिति "सक्रिय"असावी
• संस्‍था ही IFSC चे वैध युनिट असावे तसेच ती कायद्याच्‍या कलम 147 अंतर्गत वजावटीचा दावा करण्‍यास पात्र असावी
• अर्ज दाखल करण्‍यापूर्वी युनिटने कलम 147 नुसार संबंधित कर वर्षापासून सुरू होणाऱ्या पंधरा वर्षांपैकी सलग दहा वर्षे कर निश्चिती केलेली असावी
• DSC पद्धतीद्वारे पडताळणी होत असल्‍यास निर्धारितीकडे वैध आणि सक्रिय DSC असणे आवश्‍यक आहे

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1 हेतू

1. कलम 147 अंतर्गत कर सुटीचा लाभ घेण्‍याकरिता IFSC युनिटने निवडलेली सलग दहा कर वर्षे दर्शविण्‍याकरिता.
2. फॉर्म क्र. 1 प्राप्‍त झाल्‍यानंतर निर्दिष्‍ट देयकांवर TDS कपात न करण्‍याची परवानगी देयककर्त्‍यांना देण्‍याकरिता.

3.2 हे कोण फाइल करू शकतो/शकते?

खालील दोन्‍ही अटींची पूर्तता करणारे IFSCचे युनिट अर्थात प्रदेयी फॉर्म क्र. 1: भरु शकतात.

  1. हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रातील (जसे की GIFT IFSC) कार्यरत असलेले नोंदणीकृत IFSC युनिट आहे, आणि
  2. यांनी 15 वर्षांपैकी सलग कोणत्‍याही 10 कर वर्षांकरिता आयकर कायदा 2025 च्‍या कलम 147 नुसार कपातीचा दावा करण्‍याचा पर्याय निवडला आहे.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 1-28 चे तीन प्रमुख विभाग आहेत:

  1. IFSC चे तपशील
  2. निवेदन-सह-घोषणापत्र
  3. पडताळणी

4. क्रमवार मार्गदर्शक

स्‍टेप 1: तुमचा वापरकर्ता आईडी तसेच पासवार्ड यांचा वापर करुन ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

स्‍टेप 2: तुमचा वापरकर्ता आईडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्‍ट करा

Data responsive

स्‍टेप 3: ई-फाइल >आयकर फॉर्म्‍स> 'आयकर फॉर्म्‍स फाइल करा' वर जा

Data responsive

स्‍टेप 4: 'आयकर कायदा 2025 नुसार फाॅर्म्‍स' हा टॅब निवडा, 'फॉर्म क्र.1-नवीन' हा टॅब निवडा आणि 'आत्ता फाइल करा' बटणावर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 5: लागू कर वर्ष (T.Y) निवडा आणि 'पुढे सुरु ठेवा ' बटणावर क्लिक करा

Data responsive

स्‍टेप 6: 'चला सुरु करुया' वर क्लिक करा

Data responsive

स्‍टेप 7: 'चला सुरु करुया' वर क्लिक केल्‍यानंतर वापरकर्त्‍याला फॉर्म वर नेले जाते. संबंधित माहिती प्रविष्‍ट केल्‍यानंतर ती माहिती सुरक्षित ठेवण्‍याकरिता 'मसुदा सेव्‍ह करा' वर क्लिक करा आणि पुढील कार्यवाहीसाठी 'PDF चे पूर्वावलोकन करा' वर क्लिक करा.

टीप:

  1. अनुक्रमांक:6 यामध्‍ये IFSC युनिट चे नाव व पत्‍ता यांचा समावेश आहे.
  2. अनुक्रमांक:7 यामध्‍ये नोंदणीचे तपशील दिलेले आहेत जसे की IFSC ची नोंदणी कोणत्‍या कायद्याच्‍या अंतर्गत झालेली आहे तसेच नोंदणीची तारीख कोणती आहे.
  3. अनुक्रमांक.8 यामध्‍ये जोडपत्र पॅनल समाविष्‍ट आहे ज्‍यामध्‍ये वापरकर्त्‍याने नोंदणीची ती प्रत अपलोड करणे गरजेचे आहे जी अनुक्रमांक:07 मध्‍ये निवडलेल्‍या कायद्यावर आधारित असून प्राधिकरणाद्वारे जारी केलेली आहे.
Data responsive

 

Data responsive
Data responsive

टीप:निवेदन-सह-घोषणापत्र यामध्‍ये घोषणाकर्त्‍याचे तपशील, IFSC युनिटच्‍या व्‍यवसायाचे स्‍वरूप तसेच कपातीचा लाभ लागू असलेल्‍या "ह्या वर्षापासून ते त्‍या वर्षापर्यंत" च्‍या कर वर्षांची माहिती यांचा समावेश असतो.

Data responsive

टीप: पडताळणीमध्‍ये पडताळणीकर्ता/घोषणाकर्ता यांचे तपशील स्‍थान, दिनांक व IP ॲड्रेस यांचा समावेश असतो.
तपशील सेव्‍ह केल्‍यानंतर 'पूर्वावलोकन करा' वर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 8: तपशीलाचे परीक्षण करा तसेच पूर्वावलोकन पेजवरील 'डाउनलोड करा' बटणावर क्लिक करून PDF पूर्वावलोकन डाउनलोड करा आणि ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा.

Data responsive
Data responsive

स्‍टेप 9: ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक केल्‍यानंतर पुष्‍टीकरण पॉपअप दिसेल. फॉर्म फाइल करण्‍यासाठी 'पुढे जा' वर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 10: 'हाेय' वर क्लिक केल्‍यानंतर, तुम्‍हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाते जिथे तुम्‍ही DSC/EVC(लागू असल्‍यास) चा उपयोग करुन फॉर्म 1-नवीन- 28/2024 ची पडताळणी करु शकता.

टीप:अधिक माहिती करिता ई-पडताळणी कशी करावी यासाठी उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

Data responsive

स्‍टेप 11: ई-पडताळणी यशस्‍वीपणे झाल्‍यानंतर, व्‍यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्‍वीतेचा संदेश दाखविला जातो. भविष्‍यातील संदर्भांसाठी कृपया व्‍यवहार आयडी तसेच पोचपावती क्रमांक यांची नोंद करुन ठेवा. तुम्‍हाला ई-फाइलिंग पोर्टल वर नोंदणीकृत केलेल्‍या तुमच्‍या ई-मेल आईडी तसेच मोबाईल क्रमांकावर पुष्‍टीकरण संदेशसुद्धा प्राप्‍त होईल.

पोचपावती डाउनलोड करण्‍यासाठी 'डाउनलोड करा' बटणावर क्लिक करा.
Data responsive

फॉर्म 1-नवीन-28/2024 यशस्‍वीपणे सादर केल्‍यानंतर वापरकर्ता फाइल केला गेलेला फॉर्म पाहण्‍याकरिता- डॅशबोर्डवर, ई-फाइल > आयकर फॉर्म्‍स फाइल करा > फाइल केले गेलेले फॉर्म्‍स पहा > 'आयकर कायदा 2025 अंतर्गत फाइल केलेला फॉर्म' ह्या टॅबवर क्लिक करू शकतो.

टीप:अधिक माहिती जाणून घेण्‍याकरिता 'भरलेला फॉर्म पहा' या उपयोगकर्ता पुस्तिकेचा वापर करा

5. संबंधित विषय

  • लॉगिन
  • डॅशबोर्ड
  • ई -पडताळणी कशी करावी
  • DSC ची नोंदणी करा

6.शब्‍दावली

संक्षेप/संक्षिप्त रूप वर्णन/पूर्ण फॉर्म
DSC डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
EVC इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र
ARN पोचपावती क्रमांक
PY मागील वर्ष
FY आर्थिक वर्ष
TY कर वर्ष