फॉर्म 55 वापरकर्ता मार्गदर्शक
1. अवलोकन
- दुहेरी कर आकारणीशी संबंधित प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी भारतीय सक्षम प्राधिकरणाची मदत घेऊ इच्छिणाऱ्या करदात्यांनी फॉर्म 55 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. या फॉर्मच्या माध्यमातून आयकर विभाग कर वादाशी संबंधित तपशीलांची तपासणी करतो, सादर केलेल्या माहितीची पडताळणी करतो आणि आवश्यकतेनुसार संबंधित परदेशी देशाच्या सक्षम प्राधिकरणाशी चर्चा सुरू करतो.
- फॉर्म 55 सबंधित आवश्यक दस्तऐवजांसह जसे की निर्धारण आदेश, कर मागणी सूचना किंवा परदेशी कर प्राधिकरणांशी झालेला पत्रव्यवहार ई-फाइलिंग पोर्टलवर ऑनलाइन फाइल करावा लागतो. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर सक्षम प्राधिकरण त्या प्रकरणाचे परीक्षण करतात आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त माहितीची मागणी करू शकतात.
- ही प्रक्रिया अनावश्यक दुहेरी कर आकारणीपासून करदात्यांना संरक्षण देण्याची हमी देते. तसेच आंतरराष्ट्रीय कर करारा अंतर्गत उद्भवणाऱ्या सीमापार कर वादांचे पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने निराकरण करते.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी
- तुम्ही ई-फाईलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्यक आहे
- करदात्याच्या पॅन ची स्थिती "सक्रिय" अशी असावी
- DSC नुसार फॉर्मची पडताळणी करण्यासाठी आपल्याकडे वैध DSC असणे आवश्यक आहे, आणि ते ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावे आणि त्याची मुदत संपलेली नसावी.
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1 हेतू
फॉर्म 55 इतर देश किंवा निर्दिष्ट प्रदेशांशी झालेल्या करारांमध्ये नमूद केलेल्या परस्पर करार प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी सादर केला जाणारा अर्ज आहे.(नियम 121 पहा)
3.2 याचा वापर कोण करू शकतो?
फॉर्म 55 निवासी भारतीय असलेल्या आणि इतर देशांशी किंवा निर्दिष्ट प्रदेशांशी केलेल्या करारांमध्ये नमूद केलेल्या परस्पर सहमती प्रक्रियेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही निर्धारितीने फाइल करणे आवश्यक आहे.
3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 55 मध्ये चार पॅनल आहेत:
- भाग A: अर्जदाराचे तपशील
- भाग B: इतर तपशील
- जोडपत्र
- पडताळणी
4. क्रमवार मार्गदर्शक
स्टेप 1: : तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: : वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा
स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.
स्टेप 4: आयकर अधिनियम 2025 नुसार फॉर्म्स हा टॅब निवडा, फॉर्म 55 निवडा आणि आत्ता फाइल करा बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: लागू असलेले कर वर्ष (T.Y) निवडा आणि पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
स्टेप 6. चला सुरू करूया वर क्लिक करा.
स्टेप 7: चला सुरू करूया वर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास पॅनल स्क्रीनवर नेले जाते. तेथे पहिले पॅनेल भाग A: अर्जदाराचे तपशील निवडा.
स्टेप 8: तपशीलांची पडताळणी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: कृपया सुनिश्चित करा की "माझे प्रोफाइल" विभागांतर्गत पत्त्यासह सर्व अनिवार्य तपशील पूर्ण भरले आहेत. आपण "माझे प्रोफाइल" या हायपरलिंकवर क्लिक करून आपला संपर्क आणि पत्त्याचे तपशील अपडेट करू शकता.
स्टेप 9: पहिले पॅनल सेव्ह केल्यानंतर, दुसरे पॅनल निवडा: भाग B: इतर तपशील.
स्टेप 10: महिती भरा आणि पडताळणी करा "भाग B: इतर तपशील" पॅनल आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: अनुक्रमांक 7 मध्ये, सूचना किंवा आदेश ज्याच्याशी संबंधित आहेत, त्या "कर वर्षांशी" फील्डसाठी वापरकर्ता एकापेक्षा जास्त चेकबॉक्स निवडू शकतो/शकते.

स्टेप 11: दुसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर , तिसरे पॅनल निवडा: जोडपत्रे.
स्टेप 12: संबंधित दस्तऐवज जोडा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: फील्ड क्र.11 मध्ये वापरकर्त्याने "होय" निवडल्यास जोडपत्र A-3 अनिवार्य असेल.
स्टेप 13: तिसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, “पडताळणी” पॅनल निवडा.
स्टेप 14: हमीपत्राची पुष्टी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
स्टेप 15: चौथे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पूर्वालोकन करा वर क्लिक करा.
स्टेप 16: पूर्वावलोकन पेजवर, पूर्वावलोकन PDF डाउनलोड करण्यासठी आणि तपशीलांची पडताळणी करण्यासाठी "डाउनलोड करा" वर क्लिक करा, त्यानंतर ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा.

स्टेप 17: ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक केल्यानंतर आपण ई-पडताळणीसाठी पुढे जाऊ इच्छिता का, याची पुष्टी करणारा एक पॉप-अप संदेश प्रदर्शित होईल. होय वर क्लिक करा.
स्टेप 18: होय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही DSC/EVC (लागू असल्यास) वापरून फॉर्म 55 ची पडताळणी करू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या
स्टेप 19: ई-पडताळणी यशस्वी झाल्यानंतर व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक यासोबत यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित होईल. भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक नोंदवून ठेवा. तसेच, ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.
पोचपावती डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करा बटणावर क्लिक करा.
फॉर्म 55 यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर भरलेला फॉर्म पाहण्यासाठी डॅशबोर्डवर जाऊन, ई-फाइल > आयकर फॉर्म फाइल करा > फाइल केलेले फॉर्म्स पाहा > आयकर अधिनियम 2025 अंतर्गत फाइल केलेला फॉर्म पहा या टॅबवर क्लिक करा.
टीप: अधिक माहितीसाठी फाइल केलेला फॉर्म पहा उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
5. संबंधित विषय
6. शब्दावली
|
संसंक्षेप/संक्षिप्त रूप |
वर्णन/पूर्ण फॉर्म |
|
DSC |
डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र |
|
EVC |
इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र |
|
ARN |
पोचपावती क्रमांक |
|
PY |
मागील वर्षात |
|
FY |
आर्थिक वर्ष |
|
TY |
कर वर्ष |