फॉर्म 67 उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

आयकर नियम, 1962 मधील नियम 128 नुसार, भारताबाहेरील देश किंवा निर्दिष्ट प्रदेशात भरलेल्या कोणत्याही परदेशी करासाठी निवासी करदाता कर क्रेडिटचा दावा करू शकतो. ही सवलत मिळण्यासाठी निर्धारितीने निर्धारित कालमर्यादेत फॉर्म 67 मध्ये आवश्यक तपशील सादर करणे आवश्यक आहे.
फॉर्म 67 केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सबमिट करता येतो. ही सेवा नोंदणीकृत वापरकर्त्यांना ई-फायलिंग पोर्टलद्वारे फॉर्म 67 ऑनलाइन पद्धतीने फाईल करण्याची सुविधा प्रदान करते.

2. ही सेवा मिळवण्यासाठीच्या पूर्वअटी 

• तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्ता असावे.
• करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" अशी असावी.
• करदात्याचा पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक केलेले असावेत. (शिफारशीनुसार)

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1 उद्देश

भारताबाहेरील देशात कर कपातीद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे भरलेल्या परदेशी करासाठी कर क्रेडिटचा दावा करणाऱ्या निवासी करदात्याने, अशा कर सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी कलम 139 च्या पोटकलम (1) अंतर्गत आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठी निर्धारित केलेल्या मुदतीपर्यंत किंवा त्यापूर्वी फॉर्म 67 मध्ये निवेदन सादर करणे आवश्यक आहे.
चालू वर्षातील तोटा मागील वर्षांकडे समायोजित केल्यामुळे, पूर्वीच्या कोणत्याही मागील वर्षात ज्यासाठी परदेशी कर क्रेडिटचा दावा करण्यात आला होता त्या परदेशी कराचा परतावा मिळत असल्यास, अशा परिस्थितीतही फॉर्म 67 सादर करणे आवश्यक आहे.

3.2 याचा वापर कोण करू शकतो / शकते?

भारताबाहेरील देशात कर कपातीद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे भरलेल्या परदेशी करासाठी कर सवलतीचा दावा करणारा निवासी करदाता.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 67 मध्ये पुढील 4 भाग आहेत:
1. भाग A
2. भाग B
3. पडताळणी
4. जोडपत्रे

Data responsive

4. क्रमवार मार्गदर्शन

स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.

Data responsive

स्टेप 2: वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: ई-फाईल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाईल करा यावर जा.

Data responsive

स्टेप 4: आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स टॅबमध्ये फॉर्म 67 शोधा/निवडा.

Data responsive

स्टेप 5: निर्धारण वर्ष निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 6: चला सुरू करूया वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.1.a: चला, सुरू करूया वर क्लिक केल्यावर फॉर्म 67 दिसेल. त्यानंतर “भाग A” टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 8.1.b: या भागामध्ये निर्धारितीची मूलभूत माहिती, भारताबाहेरील देश किंवा निर्दिष्ट प्रदेशातून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील आणि परदेशी कर क्रेडिट यांचा तपशील समाविष्ट असतो.

टीप: संपर्क तपशील अपडेट करण्यासाठी “माझे प्रोफाइल” वर क्लिक करा.

टीप: तुम्ही “तपशील जोडा” हे बटण वापरून स्वतः उत्पन्नाचा तपशील भरू शकता किंवा तुमच्याकडे 50 पेक्षा जास्त नोंदी असल्यास, त्याच पेजवरून CSV टेम्पलेट डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरा आणि “CSV फाईल जोडा” या पर्यायाचा वापर करून अपलोड करा. CSV टेम्पलेट भरण्याबाबत अधिक माहितीसाठी सूचना असलेली फाईल डाउनलोड करा आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.2.a: भाग A ची पुष्टी झाली आहे. आता भाग B टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.2.b: या भागात परदेशी करासंदर्भातील 2 प्रश्नांचा समावेश आहे. तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.3.a: भाग B ची पुष्टी झाली आहे. आता पडताळणी टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.3.b: तपशील प्रविष्ट करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.4.a: पडताळणी टॅबची पुष्टी झाली आहे. आता जोडपत्रे टॅबवर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7.4.b: या भागात परदेशात भरलेल्या कराचा तपशील समाविष्ट असतो.

टीप: येथे निर्धारितीने परदेशी कर भरल्याचा/कर कपात झाल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त फाईल्स असल्यास त्यांची ZIP फाईल तयार करून जोडावी. आवश्यक फाईल्स जोडल्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 8: सर्व टॅबची पुष्टी झाली आहे. आता पूर्वावलोकन वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9: हे फॉर्मचे पूर्वावलोकन आहे. पूर्वावलोकनातील तपशील योग्य असल्यास ई-पडताळणीसाठी जा वर क्लिक करा. तपशीलांमध्ये बदल करायचा असल्यास ते संपादित करू शकता.

Data responsive

स्टेप 10: उपलब्ध असलेल्या कोणत्याही पडताळणी पद्धतीचा वापर करून तुम्ही फॉर्मची ई-पडताळणी करू शकता.

ई-पडताळणी पूर्ण झाल्यानंतर फॉर्म 67 सबमिट केला जाईल. त्यानंतर पोचपावती क्रमांक तयार होईल आणि तो नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.

Data responsive

5. फाईल केलेला फॉर्म कसा पाहता येईल?

ई-फाईल > आयकर फॉर्म्स > फाईल केलेले फॉर्म्स पहा > आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स यावर जा.