ई-फाइलिंग (कर कपातकर्ता आणि संकलककर्ता) यासाठी नोंदणी करण्याबाबत उपयोगकर्ता पुस्तिका

 

1. अवलोकन

ही प्री-लॉगिन सेवा ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी करून त्याचा ॲक्सेस प्राप्त करू इच्छिणाऱ्या सर्व कर कपातदार/संकलकांसाठी उपलब्ध आहे. नोंदणी सेवा वापरकर्त्याला कराशी संबंधित सर्व उपक्रम ॲक्सेस करण्यास आणि त्यांचा मागोवा घेण्यास सक्षम करते.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठीच्या पूर्वअटी
 

  • वैध आणि सक्रिय TAN
  • ई-फायलिंग पोर्टलवर मुख्य संपर्क व्यक्तीचा पॅन नोंदणीकृत असावा

3. क्रमवार मार्गदर्शक
 

स्टेप 1:ई-फायलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा, नोंदणी करा वर क्लिक करा.
 

Data responsive


स्टेप 2: इतर वर क्लिक करा आणि कर कपातकर्ता आणि संकलक म्हणून श्रेणी निवडा.
 

Data responsive


स्टेप 3: संस्थेचा TAN प्रविष्ट करा आणि प्रमाणित करा वर क्लिक करा.
 

Data responsive


स्टेप 4a: TAN डेटाबेसमध्ये उपलब्ध असेल, TRACES मध्ये नोंदणीकृत असेल आणि नोंदणी विनंती यापूर्वी करण्यात आलेली नसेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित नसेल, तर:

  • मूलभूत तपशील पेज पाहण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  • मूलभूत तपशील आधीपासून भरलेले आहेत. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
     

Data responsive


स्टेप 4b:TAN डेटाबेसमध्ये उपलब्ध असेल, परंतु TRACES मध्ये नोंदणीकृत नसेल आणि नोंदणी विनंती यापूर्वी करण्यात आलेली नसेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित नसेल, तर:

  • TRACES पेज पाहण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  • मूलभूत तपशील पेज पाहण्यासाठी, TRACES वरील ई-फायलिंगसह नोंदणी करा वर क्लिक करा.
  • आवश्यकतेनुसार मूलभूत तपशील प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.


टीप: तुम्हाला प्रथम TRACES वर नोंदणी करावी लागेल. तेथून, ई-फायलिंगसह नोंदणी करा वर क्लिक केल्यावर तुम्हाला ई-फायलिंग नोंदणी पेजवर नेले जाईल.

स्टेप 4c: जर TAN डेटाबेसमध्ये उपलब्ध असेल, नोंदणी विनंती यापूर्वीच केली गेली असेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित असेल, तर:

  • एक त्रुटी संदेश दर्शविला जाईल आणि तुम्ही नोंदणी प्रक्रिया मागे घेण्याचा पर्याय निवडू शकता.


स्टेप 5: पेमेंट भरणाऱ्या किंवा कर संकलित करणाऱ्या व्यक्तीचे तपशील प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
 

Data responsive


स्टेप 6: प्राथमिक मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पोस्टल पत्ता यांसह संपर्क तपशील प्रदान करा. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
 

Data responsive


स्टेप 7: स्टेप 6 मध्ये प्रविष्ट केल्यानुसार, तुमच्या प्राथमिक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर दोन स्वतंत्र ओटीपी पाठवले जातील. तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेले स्वतंत्र 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
 

Data responsive


टीप:

  • ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुम्हाला 3 प्रयत्न करता येतील.
  • स्क्रीनवरीलओटीपी कालबाह्य होण्याचा काउंटडाउन टाइमर तुम्हाला ओटीपी कधी कालबाह्य होईल हे दर्शवतो.
  • ओटीपी पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यावर, एक नवीन ओटीपी जनरेट करून पाठवला जाईल.

स्टेप 8: तपशीलांची पडताळणी करा पेजवर, प्रदान केलेल्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करा. पुष्टी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 9: पासवर्ड सेट करा पेजवर, पासवर्ड सेट करा आणि पासवर्डची पुष्टी करा या दोन्ही टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्या पसंतीचा पासवर्ड प्रविष्ट करा, आपला वैयक्तिकृत संदेश सेट करा आणि नोंदणी करा वर क्लिक करा.
 

Data responsive


टीप:

  • रिफ्रेश किंवा बॅक वर क्लिक करू नका.
  • आपला नवीन पासवर्ड प्रविष्ट करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
    • हा कमीत कमी 8 वर्ण आणि जास्तीत जास्त 14 वर्णांचा असावा.
    • यामध्ये मोठ्या लिपीमध्ये आणि लहान लिपीमध्ये अशी दोन्ही प्रकारची अक्षरे समाविष्ट असली पाहिजेत.
    • यात एक संख्या असावी.
    • यात एक विशेष वर्ण असावे (उदा. @#$%).

व्यवहार आयडीसह एक यशस्वी झाल्याचा संदेश दर्शविला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी या व्यवहार आयडीची नोंद करून ठेवा. सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.

 

Data responsive


4. संबंधित विषय