फॉर्म 3CA-3CD वापरकर्ता मार्गदर्शक
1. अवलोकन
1984च्या वित्त कायद्यानुसार 1985-86 च्या निर्धारण वर्षापासून नवीन कलम 44AB समाविष्ट करून कर टाळणी आणि कर चुकवेगिरीला परावृत्त करण्यासाठी कर लेखापरीक्षणाची आवश्यकता लागू करण्यात आली.
कर लेखापरीक्षणामध्ये निर्धारितीने उत्पन्न कर प्राधिकरणांकडे सादर केलेल्या विशिष्ट वस्तुस्थितीविषयक तपशिलांच्या सत्यतेवर आणि अचूकतेवर कर लेखापरीक्षकाचे मत व्यक्त करणे समाविष्ट असते; जेणेकरून सर्व भत्ते, वजावट, तोटा, समायोजन, सवलती इत्यादींचा विचार करून एकूण उत्पन्नाचे अचूक मूल्यांकन करणे आणि त्यावरील कर निश्चित करणे शक्य होईल. हे खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आयोजित केले जाते:
- करदात्याकडून हिशोबाच्या पुस्तकांची योग्य निगा व अचूकता राखली जाणे आणि सीएकडून त्यांचे प्रमाणीकरण केले जाणे सुनिश्चित करणे.
- लेखापरीक्षणादरम्यान सीएने नोंदवलेली अहवालातील निरीक्षणे/विसंगती
- फॉर्म 3CD मध्य संदर्भित केल्यानुसार आयकरअधिनियमाच्या तरतुदींचे अनुपालन करण्यासाठी विहित माहिती नोंदवा.
हा फॉर्म सीए कडून त्यांची DSC वापरून अपलोड केला जाणे आवश्यक आहे.
नियम 6G मध्ये कलम 44AB अंतर्गत सादर करावयाच्या लेखापरीक्षण अहवालाचे सादरीकरण आणि अहवाल देण्याची पद्धत विहित केली आहे. यासाठी दोन प्रकारचे फॉर्म आहेत: 3CA-3CD आणि 3CB-3CD. त्यामुळे प्रत्येक करदात्यासाठी यापैकी फक्त एकच फॉर्म लागू होईल.
- फॉर्म 3CA-3CD अशा व्यक्तीस लागू आहे जिला कोणत्याही कायद्यानुसार तिच्या खात्यांचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
- फॉर्म 3CB-3CD अशा व्यक्तीस लागू आहे जी वर उल्लेख केलेल्या व्यक्तींमध्ये येत नाही, म्हणजेच ज्यात कोणत्याही इतर कायद्यांतर्गत खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक नसते.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठीच्या पूर्वअटी
- करदाता आणि सीए ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आहेत व त्यांच्याकडे वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड आहे
- करदात्याच्या आणि सीएच्या पॅनची स्थिती सक्रिय आहे
- करदात्याने फॉर्म 3CA-CD साठी सीए नियुक्त केला आहे
- सीए आणि करदात्यांकडे वैध व सक्रिय डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आहे
- वैयक्तिक करदात्याच्या बाबतीत, करदात्याचा पॅन आधारशी लिंक केलेला असावा (शिफारस केलेले)
3. फॉर्मबद्दल माहिती
3.1. हेतू
कर चुकवेगिरी आणि कर टाळण्याला परावृत्त करण्यासाठी, 1984च्या वित्त कायद्याद्वारे निर्धारण वर्ष 1985-86 पासून नवीन कलम 44AB समाविष्ट करून कर लेखापरीक्षणाची आवश्यकता लागू करण्यात आली.
फॉर्म 3CA-3CD त्या व्यक्तीला लागू आहे जिला कोणत्याही कायद्यानुसार किंवा कायद्याअंतर्गत तिच्या लेखा पुस्तकांचे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
3.2. हे कोण वापरू शंकतो?
ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला सीए आणि ज्याला करदात्याने फॉर्म 3CA-3CD च्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त केले आहे, अशा सीएला हा फॉर्म ॲक्सेस करण्याचा अधिकार आहे.
4. फॉर्मचा संक्षिप्त आढावा
फॉर्म 3CA-3CD मध्ये 2 विभाग आहेत जे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी भरणे आवश्यक आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत:
- फॉर्म क्रमांक 3CA
- फॉर्म क्र. 3CD
येथे फॉर्म 3CA-3CD मधील विविध विभागांची थोडक्यात माहिती दिली आहे.
- पहिले पेज तुम्हाला फॉर्म 3CA आणि फॉर्म 3CD वर जाऊ देते.
- फॉर्म क्रमांक 3CA ते पेज आहे जेथे सीए निर्धारितीच्या व्यापार किंवा व्यवसायाच्या खात्याच्या लेखापरीक्षणाचे तपशील दाखल करतो. वापरकर्त्याला फॉर्म क्रमांक 3CD वर पुढे जाण्यासाठी आधी फॉर्म क्रमांक 3CA मध्ये तपशील भरायला हवा.
- फॉर्म 3CD मध्ये आणखी 5 विभाग आहेत, ज्यामध्ये सीए आयकर अधिनियमाच्या कलम 44AB अंतर्गत सादर करावयाच्या आवश्यक तपशीलांची नोंद करतो. फॉर्म 3CD दोन भागांमध्ये विभागलेला आहे: भाग A आणि भाग B.
- फॉर्म 3CD च्या भाग A (कलम 1 ते 8) मध्ये सीएने करनिर्धारितीचे मूलभूत तपशील सादर करणे आवश्यक असते. फॉर्मचा भाग A भरून सेव्ह केल्यानंतरच वापरकर्ता पुढे जाऊ शकतो.
- फॉर्म 3CD च्या भाग B मध्ये कलम 9 ते 44 पर्यंत पुढील विभाग आहेत. येथे सर्व कलमांशी संबंधित तपशील भरणे आवश्यक आहे.
5. अॅक्सेस आणि सबमिट कसे करावे
तुम्ही सीएला फॉर्म असाइन करू शकता आणि सबमिट केलेल्या फॉर्मची पडताळणी ऑनलाईन मोडद्वारे करू शकता. सीएने ऑफलाईन उपयुक्ततेद्वारेच फॉर्म भरणे आवश्यक आहे.
टीप: अधिक माहितीसाठी वैधानिक फॉर्म्ससाठी ऑफलाईन उपयुक्तता वापरकर्ता पुस्तिका पहा.
5.1 सीएला फॉर्म असाइन करणे
स्टेप 1: तुमच्या वापरकर्ता ID आणि पासवर्डचा वापर करून ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसेल, तर तुम्हाला एक पॉप-अप संदेश दिसेल की, तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे पॅन निष्क्रिय करण्यात आला आहे.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आताच लिंक करा बटणावर क्लिक करा, किंवा सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर, ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर क्लिक करा.
स्टेप 3: आयकर फॉर्म्स फाइल करा पेजवर, आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स या टॅब अंतर्गत फॉर्म 3CA-3CD वर क्लिक करा. वैकल्पिकरीत्या, फॉर्म भरण्यासाठी शोध बॉक्समध्ये फॉर्म 3CA-3CD लिहा.
स्टेप 4: फॉर्म 3CA-3CD पेजवर, फाइलिंगचा प्रकार आणि निर्धारण वर्ष (A.Y.) निवडा, सनदी लेखापाल असाइन करा आणि कोणतीही सहाय्यक कागदपत्रे जोडा. पुढे जाण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप:
- तुम्ही आधीच सीए असाइन केला असेल तर, फाइल करण्यासाठी किंवा मंजुरीसाठी सीएकडे प्रलंबित असलेल्या फॉर्म 3CA-3CD चे तपशील प्रदर्शित केले जातील.
- जर सीए असाइन केला नसेल तर तुम्ही विद्यमान सीए या लिंकमधून पूर्वी असाइन केलेल्या सीएच्या विद्यमान यादीतून निवडून सीए असाइन करू शकता.
- जर कोणतेही सीए जोडलेले नसतील, तर तुम्ही डॅशबोर्ड > अधिकृत भागीदार > माझा सीए > नवीन सीए जोडा वर क्लिक करून सीए जोडू शकता.
सीएला फॉर्म असाइन केल्यानंतर, व्यवहार IDसह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार IDची नोंद ठेवा.
5.2 सीएद्वारे फॉर्म फाइल करणे
स्टेप 1: तुमची वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर , प्रलंबित कृती > कार्यसूची वर क्लिक करा, जिथे प्रलंबित बाबींची यादी दर्शविली जाते.
स्टेप 3: तुमच्या कार्यवाहीसाठी टॅब अंतर्गत, तुम्हाला असाइन केलेल्या फॉर्म 3CA-CD समोरील स्वीकार करा वर क्लिक करा.
करदात्याचा पॅन आधारशी लिंक नसेल, तर सीएला फॉर्म स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी स्क्रीनवर एक पॉप-अप संदेश दिसेल. या संदेशात असे दर्शविले जाईल की करदात्याचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय झाला आहे.
फॉर्म स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
टिप: तुम्ही विनंती नाकारण्याचे निवडल्यास, तुम्हाला सेवा विनंती नाकारण्याचे कारण द्यावे लागेल.
स्टेप 4: विनंती यशस्वीरित्या स्वीकारल्यानंतर, व्यवहार आयडी सह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. भविष्यातील संदर्भासाठी कृपया व्यवहार ID ची नोंद ठेवा. फॉर्म भरण्यासाठी कार्यसूचीकडे परत जा वर क्लिक करा.
स्टेप 5: तुमच्या कार्यसूचीमध्ये, फाइलिंगसाठी प्रलंबित टॅब अंतर्गत, तुम्ही स्वीकारलेल्या फॉर्म 3CA-3CD समोरील फॉर्म फाइल करा वर क्लिक करा.
करदात्याचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल, तर सीएला फॉर्म फाइल करताना/अपलोड करताना स्क्रीनवर एक पॉप-अप संदेश दिसेल की करदात्याचा पॅन निष्क्रिय आहे कारण तो आधारशी लिंक केलेला नाही. फॉर्म फाइल/अपलोड करण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: फॉर्म 3CA-3CD पेजवर, पुढे जाण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 7: ऑफलाईन उपयुक्तता डाउनलोड करा (हे तुमच्या होमपेजवरील डाऊनलोड्स विभागातही उपलब्ध आहे) आणि त्या उपयुक्ततेचा वापर करून फॉर्म भरा. ऑफलाईन उपयुक्तता द्वारे तयार केलेली JSON फाइल फॉर्म 3CA-3CD पेजवर अपलोड करा. आवश्यक सहाय्यक कागदपत्रे जोडा आणि सबमिट वर क्लिक करा.
स्टेप 8: विशिष्ट ओळख क्रमांक पेजवर, पुढे जा वर क्लिक करा.
स्टेप 9: तुम्ही पुढे जा निवडल्यास, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल, जिथे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी ही वापरकर्ता मार्गदर्शिका पहा.
यशस्वी ई-पडताळणी नंतर, व्यवहार ID यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. भविष्यातील संदर्भासाठी कृपया व्यवहार IDची नोंद ठेवा. करदात्याला ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत ईमेल ID आणि मोबाईल क्रमांकावर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.
5.3. करदात्याद्वारे पडताळणी
स्टेप 1: तुमचा वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेले नसल्यास, तर पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय झाला असल्याचा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आताच लिंक करा बटणावर क्लिक करा, नाहीतर सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवर, प्रलंबित कारवाई > कार्यसूची वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या कार्यसूचीमध्ये, स्वीकृतीसाठी प्रलंबित अंतर्गत, तुमच्या सीएने सादर केलेल्या फॉर्म 3CA-3CD समोरील स्वीकार करा वर क्लिक करा.
टीप: तुम्ही जर विनंती नाकारण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला सेवा विनंती नाकारण्याचे कारण नमूद करावे लागेल.
स्टेप 4:विनंती स्वीकारल्यानंतर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.
टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी ही वापरकर्ता पुस्तिका पहा.
यशस्वी ई-पडताळणी नंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित केला जातो. भविष्यातील संदर्भासाठी कृपया व्यवहार ID आणि पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवरील तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.