Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन


ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या वापरकर्त्यांसाठी ई-पडताळणी सेवा उपलब्ध आहे.

आपण उपलब्ध असलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून आपले आयकर विवरणपत्रई-पडताळणी करू शकता. याव्यतिरिक्त, आपण संबंधित प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ई - फाइलिंग पोर्टलवर इतर कोणत्याही आयकर संबंधित सबमिशन/सेवा/प्रतिसाद/विनंत्या यांची ई-पडताळणी करू शकता. ई-पडताळणीसाठी उपलब्ध असलेली खालीलपैकी कोणतीही एक पद्धत आपण निवडू शकता:

  • डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
  • आधार OTP
  • इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (बँक खाते / डिमॅट खाते वापरून)
  • इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (बँक ATM - ऑफलाइन पद्धत वापरून)
  • नेट बँकिंग

2. ही सेवा मिळवण्यासाठी शर्ती

  • ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
  • पोचपावती क्रमांक (ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग इन न करता ITR ई-पडताळणी करण्यासाठी)
  • आपण विवरणपत्र फाइल केले आहे किंवा ERI ने आपल्या वतीने विवरणपत्र फाइल केले आहे (ITR ची पडताळणी करण्यासाठी)
ई-पडताळणी पद्धत पूर्व अटी
डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
  • DSC वैध आणि सक्रिय आहे
  • आपल्या PC वर एमसाइनर युटिलिटी इन्स्टॉल केली आहे आणि रन होत आहे
  • आपल्या PC मध्ये DSC UCB टोकन प्लग इन केले आहे
  • प्रमाणित प्राधिकरण प्रदात्याकडून DSC USB टोकन घेतले आहे
  • DSC USB टोकन हे क्लास 2 किंवा क्लास 3 चे प्रमाणपत्र असलेले आहे.
आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP
  • PAN आधारसोबत लिंक केलेले आहे
बँक खाते EVC/ डिमॅट खाते EVC
  • आधीपासून प्रमाणित केलेले आणि EVC सक्षम केलेले बँक / डिमॅट खाते
नेट बँकिंग
  • आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला PAN
  • पसंतीच्या बँक खात्यासाठी नेट बँकिंग सक्षम असले पाहिजे

 

3. क्रमानुसार मार्गदर्शक

अनुक्रमांक परिस्थिती विभाग
1

खालील पर्याय वापरून आपले ITR (फाइल केल्यानंतर लगेच) किंवा आयकर संबंधित इतर कोणतेही सबमिशन / सेवा/ प्रतिसाद/ विनंतीची ई-पडताळणी करा.

a DSC* विभाग 3.1 चा संदर्भ घ्या
b आधार OTP जनरेट करा विभाग 3.2 चा संदर्भ घ्या
c सध्याचा आधार OTP विभाग 3.3 चा संदर्भ घ्या
d सध्याचा EVC विभाग 3.4 चा संदर्भ घ्या
e बँक खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.5 चा संदर्भ घ्या
f बँक खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.6 चा संदर्भ घ्या
g नेट बँकिंग** विभाग 3.7 चा संदर्भ घ्या
h बँक ATM पर्याय (ऑफलाइन पद्धत) याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.8 चा संदर्भ घ्या
2

लॉग इन पूर्व / लॉग इन नंतर आपल्या ITR ची ई-पडताळणी करा. खालील बाबतीत लागू:

  • आयकर विवरणपत्र सबमिट करताना आपण नंतर ई-पडताळणी करा पर्याय निवडला आहे
  • ERI द्वारे सबमिट केलेले विवरणपत्र
  • पडताळणी 120/30 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले परतावे (विलंबाचे योग्य कारण दिल्यानंतर)

महत्त्वाची टीप:

कृपया नोंद घ्या की, दिनांक 29.07.2022 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 5/2022 द्वारे, 01/08/2022 पासून ई-पडताळणी किंवा ITR-V सबमिट करण्याची वेळ-मर्यादा उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्याच्या तारखेपासून 30 दिवसांची असेल.

तथापि, जर परतावा 31.07.2022 रोजी किंवा त्यापूर्वी फाइल केला गेला असेल तर आधीची 120 दिवसांची मर्यादा लागू राहील.

विभाग 3.9 (लॉग इन पूर्व) किंवा विभाग 3.10 (लॉग इन नंतर) याचा संदर्भ घ्या

*आपण आपले आयकर विवरणपत्र फाइल केल्यानंतर ('मी विवरणपत्राची पडताळणी नंतर करेन' या पर्यायाऐवजी), लगेच आपल्या ITR ची ई-पडताळणी करण्याचा पर्याय निवडला, तर आपण ई-पडताळणीसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हा पर्याय पसंतीचा पर्याय म्हणून वापरू शकता.

**आपण ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतरच ई-पडताळणीचा पसंतीचा पर्याय म्हणून नेट बँकिंगचा वापर करू शकता.


3.1 डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) वापरून ई-पडताळणी

टीप: जर आपण आयकर विवरणपत्र फाइल करताना नंतर ई-पडताळणी करा पर्याय निवडला तर आपण आपले डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून ITR ची ई-पडताळणी करू शकणार नाही. आपण ई-पडताळणी करणे निवडल्यास आणि आपल्या ITR ची पडताळणी लगेच केल्यास, आपण ई-पडताळणी पर्याय म्हणून DSC चा वापर करू शकता.


स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, मला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) वापरून ई-पडताळणी करायची आहे ते निवडा.

Data responsive


स्टेप 2: आपल्या ओळखीची पडताळणी करा पेजवर, एमसाईनर सुविधा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा निवडा.

Data responsive


स्टेप 3: एमसाईनर सुविधा डाऊनलोड आणि इन्स्टॉल करून झाल्यांनतर, आपल्या ओळखीची पडताळणी करा पेजवर मी एमसाईनर सुविधा डाउनलोड आणि इन्स्टॉल केली आहे निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: डेटा स्वाक्षरी करा पेजवर, आपला प्रदाता, प्रमाणपत्र निवडा आणि प्रदाता पासवर्ड प्रविष्ट करा. स्वाक्षरी करा वर क्लिक करा.

Data responsive


व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश पेज प्रदर्शित केले जाते. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.2 आधार OTP जनरेट झाल्यानंतर ई-पडताळणी करा

स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, मला आधार क्रमांकासह नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP वापरून पडताळणी करायची आहे याची निवड करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: आधार OTP पेजवर, मी माझ्या आधार तपशीलांच्या पडताळणीसाठी सहमत आहे हा चेकबॉक्स निवडा आणि आधार OTP जनरेट करा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: आधारसह नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबरवर प्राप्त 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि पडताळणी करा यावर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीनवरील OTP कालबाह्यता OTP कालबाह्यच्या काउंटडन कालबाह्य कधी होईल हे सांगते.
  • OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल व पाठवला जाईल.


व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश पेज प्रदर्शित केले जाते. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.3 विद्यमान आधार OTP वापरून ई-पडताळणी करा

स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, माझ्याकडे आधारसह नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर आधीपासून OTP प्राप्त झाला आहे हे निवडा.

Data responsive


स्टेप 2: आपल्याकडे असलेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीनवरील OTP कालबाह्यता काउंटडन टाइमर OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
  • OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल व पाठवला जाईल.


व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश पेज प्रदर्शित केले जाते. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.4 विद्यमान इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) वापरून ई-पडताळणी करा

स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, माझ्याकडे आधीपासून इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) आहे हे निवडा.

Data responsive


स्टेप 2: EVC प्रविष्ट करा टेक्स्टबॉक्समध्ये EVC प्रविष्ट करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


व्यवहार ID आणि EVC सह यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवणारे पेज दिसेल. कृपया भविष्यातील संदर्भांसाठी व्यवहार ID आणि EVC यांची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.5 बँक खात्याद्वारे इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) जनरेट झाल्यांनतर ई-पडताळणी करा

स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, बँक खात्याद्वारे निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • EVC जनरेट केला जाईल आणि आपल्या पूर्व-प्रमाणित व EVC सक्षम केलेल्या बँक खात्यामध्ये नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर आणि ईमेल ID वर पाठवला जाईल.
  • आपण आपले बँक खाते अजून पूर्व-प्रमाणित केले नसेल तर, माझे बँक खाते या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या आणि आपले बँक खाते पूर्व-प्रमाणित आणि EVC सक्षम कसे करायचे ते जाणून घ्या.

स्टेप 2: EVC प्रविष्ट करा टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्या बँक खात्यात नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर प्राप्त EVC प्रविष्ट करा आणि ई-पडताळणी करा यावर क्लिक करा.

Data responsive


व्यवहार ID आणि EVC सह यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवणारे पेज दिसेल. कृपया भविष्यातील संदर्भांसाठी व्यवहार ID आणि EVC यांची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.6 डिमॅट खात्याद्वारे इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) जनरेट केल्यानंतर ई-पडताळणी करा.

स्टेप 1: ई-पडताळणी पेजवर, डिमॅट खात्याद्वारे निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • EVC जनरेट केला जाईल आणि आपल्या पूर्व-प्रमाणित आणि EVC सक्षम केलेल्या डिमॅट खात्यावर नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबर आणि इमेल ID वर पाठवला जाईल.
  • आपण आपले डिमॅट खाते अजून पूर्व-प्रमाणित केले नसेल तर, माझे डिमॅट खाते या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या आणि आपले डिमॅट खाते पूर्व-प्रमाणित आणि EVC सक्षम कसे करायचे ते जाणून घ्या.

स्टेप 2: EVC प्रविष्ट करा टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्या डिमॅट खात्यात नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर प्राप्त EVC प्रविष्ट करा आणि ई-पडताळणी करा यावर क्लिक करा.

Data responsive


व्यवहार ID आणि EVC सह यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवणारे पेज दिसेल. कृपया भविष्यातील संदर्भांसाठी व्यवहार ID आणि EVC यांची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.7 नेट बँकिंगद्वारे ई-पडताळणी करणे

स्टेप 1: ई-पडताळणी या पेजवर, नेट बँकिंगद्वारे निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: आपल्याला ज्या बँकेद्वारे ई-पडताळणी करायची आहे ती बँक निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: अस्वीकरण वाचा आणि समजून घ्या पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा

Data responsive


टीप: या नंतर, आपल्या समोर आपल्या बँक खात्याचे नेट बँकिंग लॉग इन पेज येईल.


स्टेप 4: आपला नेट बँकिंग वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.


स्टेप 5: आपल्या बँकेच्या वेबसाइटवरून ई-फाइलिंग फॉर्मवर लॉग इन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.


टीप: आपण इंटरनेट बँकिंगच्या पेज वरून लॉग आउट व्हाल आणि ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन व्हाल.


स्टेप 6: यशस्वी लॉग इन केल्यानंतर, आपल्या समोर ई-फाइलिंगचा डॅशबोर्ड दिसेल. संबंधित ITR / फॉर्म / सेवा यावर जा आणि ई-पडताळणी करा यावर क्लिक करा. आपला ITR / फॉर्म / सेवा यशस्वीपणे ई-पडताळणी करण्यात येईल.

Data responsive


व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश पेज प्रदर्शित केले जाते. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

 

3.8 बँकेच्या ATM द्वारे इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) जनरेट करा (ऑफलाइन पद्धत).

स्टेप 1: आपल्या बँकेच्या ATM ला भेट द्या आणि आपले ATM कार्ड स्वाइप करा.

टीप: बँकेच्या ATM द्वारे EVC जनरेट करण्याची सेवा केवळ काही बँक देतात.

स्टेप 2: पिन प्रविष्ट करा.

स्टेप 3: आयकर फाइल करण्यासाठी EVC जनरेट करा हे निवडा.

ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबरवर आणि ईमेल ID वर EVC पाठवण्यात येईल.

टीप:

  • आपला PAN संबंधित बँक खात्याशी लिंक असला पाहिजे आणि हाच PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असला पाहिजे.
  • बँकेच्या ATM द्वारे EVC जनरेट करता येईल अशा बँकांची यादी - अ‍ॅक्सिस बँक लि., कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिन्द्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया.


स्टेप 4: पुढील पर्यायवापरून जनरेट केलेला EVC विवरणपत्रच्या ई-पडताळणीसाठी वापरू शकतो माझ्याकडे आधीच इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) आहे. ई-पडताळणीची पसंतीची निवड म्हणून. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या उपयोगकर्ता पुस्तिकेमधील विभाग 3.4 विद्यमान EVC चा संदर्भ घ्या.

 

3.9 ई-पडताळणी विवरणपत्र (लॉग इन पूर्व)

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेज वर जा आणि ई-पडताळणी विवरणपत्र यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: ई-पडताळणी विवरणपत्र पेजवर, आपला PAN प्रविष्ट करा, निर्धारण वर्ष निवडा, फाइल केलेल्या ITR चा पोचपावती नंबर आणि आपल्याकडे असलेला मोबाइल नंबर निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: स्टेप 2 मध्ये दिलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी मोबाइल OTP प्रविष्ट करा.

Data responsive


टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीनवरील OTP कालबाह्यता काउंटडन टाइमर OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
  • OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल व पाठवला जाईल.


स्टेप 4: सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive

 

जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांनंतर पडताळणी करत असाल स्टेप 5 वर जा (विलंब विनंती सादर करण्यासाठी)
जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांमध्ये पडताळणी करत असाल थेट स्टेप 7 वर जा


स्टेप 5: जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांनंतर पडताळणी करत असाल, तर ठीक आहे वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 6: विलंबासाठी माफी विनंती दाखल करण्यासाठी, ड्रॉपडाऊन मधून विलंब होण्याचे कारण निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


टिप: आपण ड्रॉपडाऊनमध्ये इतर निवडले असल्यास, शेरा टेक्स्ट बॉक्समध्ये विलंब होण्याचे कारण लिहा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.


स्टेप 7: पुढे जाण्यासाठी खालील सारणीचा संदर्भ घ्या:

ई-पडताळणीची पद्धत (कोणतेही एक निवडा) विभाग
आधार OTP जनरेट करा विभाग 3.2 चा संदर्भ घ्या
विद्यमान आधार OTP विभाग 3.3 चा संदर्भ घ्या
विद्यमान EVC विभाग 3.4 चा संदर्भ घ्या
बँक खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.5 चा संदर्भ घ्या
डिमॅट खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.6 चा संदर्भ घ्या
बँक ATM पर्याय (ऑफलाइन पद्धत) याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.8 चा संदर्भ घ्या

 

3.10 विवरणपत्राची ई-पडताळणी (लॉग-इन नंतर)

स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive

स्टेप 2: क्लिक करा ई-फाइल > आयकर विवरणपत्र > परताव्याची ई-पडताळणी.

Data responsive


स्टेप 3: परताव्याची ई-पडताळणी पेजवर, पडताळणी न केलेल्या परताव्यासमोरील ई-पडताळणी यावर क्लिक करा.

Data responsive

 

जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांनंतर पडताळणी करत असाल स्टेप 4 वर जा (विलंब विनंतीला सूट देण्यासाठी)
जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांमध्ये पडताळणी करत असाल थेट स्टेप 6 वर जा


स्टेप 4: जर आपण परतावा फाइल केल्याच्या 120/30 दिवसांनंतर पडताळणी करत असाल, तर ठीक आहे वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 5: दुर्लक्षित करण्याची विनंती फाइल करण्यासाठी ड्रॉपडाउनमध्ये विलंब होण्याचे कारण निवडा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


टीप: आपण ड्रॉपडाउनमध्ये इतर निवडले असल्यास, शेरा टेक्स्ट बॉक्समध्ये विलंब होण्याचे कारण लिहा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करा.

स्टेप 6: पुढे जाण्यासाठी खालील सारणीचा संदर्भ घ्या:

ई-पडताळणीची पद्धत (कोणतेही एक निवडा) विभाग
आधार OTP जनरेट करा विभाग 3.2 चा संदर्भ घ्या
सध्याचा आधार OTP विभाग 3.3 चा संदर्भ घ्या
विद्यमान EVC विभाग 3.4 चा संदर्भ घ्या
बँक खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.5 चा संदर्भ घ्या
डिमॅट खात्याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.6 चा संदर्भ घ्या
नेट बँकिंग विभाग 3.7 चा संदर्भ घ्या
बँक ATM पर्याय (ऑफलाइन पद्धत) याद्वारे EVC जनरेट करा विभाग 3.8 चा संदर्भ घ्या

 

4. विषयाशी संबंधित