Do not have an account?
Already have an account?

निर्धारण वर्ष 2025-26 यासाठी परदेशी कंपनीसाठी लागू असलेले विवरणपत्रे आणि फॉर्म

 

अस्वीकरण: या पेजवरील सामग्री केवळ विहंगावलोकन / सामान्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे आणि परिपूर्ण नाही. संपूर्ण तपशील आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी, कृपया आयकर अधिनियम, नियम आणि सूचना पहा.

 

परदेशी कंपनी:

कलम 2(23A) अनुसार परदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी जी देशी कंपनी नाही.

1. ITR-6

कलम 11 अंतर्गत सूट मागणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांना लागू.

कंपनीमध्ये पुढील समाविष्ट आहे:

भारतीय कंपनी

भारताबाहेरील देशाच्या कायद्यांद्वारे किंवा त्याच्या अंतर्गत समाविष्ट केलेली कॉर्पोरेट संस्था.

कोणतीही संस्था, संघटना किंवा मंडळ, मग ती निगमित असो वा नसो आणि भारतीय असो वा भारतीय नसो, जी मंडळाच्या सामान्य किंवा विशेष आदेशाने कंपनी म्हणून घोषित केली जाते, इ.

 

लागू होणारे फॉर्म

 

1.

फॉर्म 26 AS

AIS (वार्षिक माहिती विवरणपत्र)

याद्वारे प्रदान केले जाईल:

आयकर विभाग (हे ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे:

लॉग इन करा > ई-फाइल > आयकर विवरणपत्र > फॉर्म 26AS पहा)

फॉर्म मध्ये देण्यात आलेला तपशीलः

स्रोतावर कर कपात/जमा केलेला कर.

याद्वारे प्रदान केले जाईल:

आयकर विभाग (आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ते ॲक्सेस करता येते)

ई-फाइलिंग पोर्टल > लॉग इन करा > AIS वर जा

फॉर्म मध्ये देण्यात आलेला तपशीलः

  • स्रोतावर कर कपात/जमा केलेला कर.
  • SFT माहिती
  • कर भरणे
  • मागणी / परतावा

इतर माहिती (जसे की प्रलंबित/पूर्ण झालेली कार्यवाही, GST माहिती, परदेशी सरकारकडून मिळालेली माहिती इ.)

टीप: 26AS मध्ये उपलब्ध असलेली माहिती (अग्रिम कर/SAT, परताव्याचे तपशील, SFT व्यवहार, कलम 194IA,194IB,194M अंतर्गत TDS, न भरलेला TDS) आता खाली नमूद केल्याप्रमाणे AIS मध्ये उपलब्ध असेल

 

2. फॉर्म 16A – पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर TDS साठी आयकर कायदा,1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र

याद्वारे प्रदान केले जाईल

फॉर्ममध्ये देण्यात आलेले तपशील

वजावट करणारा ते वजावट मिळवणारी

फॉर्म 16A हे स्त्रोतावर कपात केलेला कर (TDS) याचे त्रैमासिक जारी केले जाणारे प्रमाणपत्र आहे जे जमा केलेली रक्कम, TDS ची रक्कम, पेमेंटचा प्रकार आणि आयकर विभागाकडे जमा केलेले TDS पेमेंट दर्शवते.

 

3. फॉर्म 3CA-3CD

याद्वारा सादर केले जाईल

फॉर्ममध्ये देण्यात आलेले तपशील

ज्या करदात्याला इतर कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत अनिवार्य लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे आणि ज्याला कलम 44AB अंतर्गत लेखापालाकडून त्याच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या एक महिना आधी सादर करणे आवश्यक आहे.

आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AB अंतर्गत सादर करणे आवश्यक असलेले खात्यांचे लेखापरीक्षण अहवाल आणि तपशीलांचे विवरणपत्र

 

4. फॉर्म 3CE

याद्वारा सादर केले जाईल

फॉर्ममध्ये देण्यात आलेले तपशील

अनिवासी करदाता किंवा भारतात व्यवसाय करणारी परदेशी कंपनी, ज्यांना विशिष्ट व्यक्तींकडून विशिष्ट उत्पन्न मिळाल्याबद्दल कलम 44DA अंतर्गत लेखापालाकडून अहवाल घेणे आवश्यक आहे. कलम 139(1) च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या निहित तारखेच्या एक महिना आधी सादर करावे.

भारत सरकार किंवा भारतीय संस्थेकडून तांत्रिक सेवांसाठी रॉयल्टी किंवा शुल्काच्या स्वरूपात मिळालेल्या उत्पन्नाबाबत लेखापरीक्षकाचा अहवाल.

 

 

5. फॉर्म 29B

याद्वारा सादर केले जाईल

फॉर्ममध्ये देण्यात आलेले तपशील

असा करदाता ज्याला आयकर कायदा, ,1961 च्या कलम 115JB अंतर्गत लेखापरीक्षकाकडून अहवाल घेणे आवश्यक आहे. कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी देय तारखेच्या एक महिना आधी सादर करणे आवश्यक राहील.

कलम 115JB लागू होणाऱ्या परदेशी कंपनीच्या बाबतीत, कलम 115JB च्या तरतुदींनुसार पुस्तकी नफा गणला गेला आहे हे प्रमाणित करणारा अहवाल.

 

निर्धारण वर्ष 2025-26 यासाठी परदेशी कंपनीसाठी कर स्लॅब

 

अट

आयकर दर

31 मार्च 1961 नंतर परंतु 1 एप्रिल 1976 पूर्वी भारतीय संस्थेशी केलेल्या कराराच्या अनुषंगाने सरकारकडून किंवा भारतीय संस्थेकडून मिळणारी रॉयल्टी किंवा 29 फेब्रुवारी 1964 नंतर परंतु 1 एप्रिल 1976 पूर्वी केलेल्या कराराच्या अनुषंगाने तांत्रिक सेवा देण्याचे शुल्क आणि जिथे असा करार, दोन्ही बाबतीत, केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे.

50%

इतर कोणतेही उत्पन्न

40%

 

अधिभार, किरकोळ दिलासा आणि आरोग्य व शिक्षण उपकर

 

अधिभार म्हणजे काय?

अधिभार हे विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्याकरिता आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क आहे, लागू असलेल्या दरानुसार गणना केलेल्या आयकराच्या रकमेवर ते आकारले जातेः

  • 2% - करपात्र उत्पन्न ₹ 1 कोटी - ₹ 10 कोटींपर्यंत
  • 5% - करपात्र उत्पन्न ₹10 कोटींपेक्षा जास्त

किरकोळ दिलासा म्हणजे काय?

देण्यायोग्य अधिभार अतिरिक्त उत्पन्नापेक्षा जास्त असेल ज्यामुळे व्यक्ती अधिभारासाठी उत्तरदायी असेल अशा प्रकरणांमध्ये किरकोळ दिलासा ही अधिभारातून मिळणारी सवलत आहे. अधिभार म्हणून देय रक्कम अनुक्रमे ₹ 1 कोटी पेक्षा जास्त आणि ₹ 10 कोटी पेक्षा जास्त उत्पन्नाच्या रकमेपेक्षा जास्त नसेल.

आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणजे काय?

आयकर आणि अधिभार (जर असेल तर) च्या रकमेवर 4% दराने आरोग्य आणि शिक्षण उपकर देखील भरणे आवश्यक आहे.

 

टीप: कलम 115JB च्या स्पष्टीकरण 4 अंतर्गत न येणारी परदेशी कंपनी, जर कंपनीची सामान्य कर दायित्व पुस्तकी नफ्याच्या 15% पेक्षा कमी असेल तर, पुस्तकी नफ्याच्या 15% दराने (अधिक अधिभार आणि लागू असलेले आरोग्य आणि शिक्षण उपकर) किमान पर्यायी कर (MAT) भरण्यास जबाबदार असेल.

 

 

 

गुंतवणूक / पेमेंट्स / उत्पन्न ज्यावर मला कर लाभ मिळू शकतो

 

आयकर अधिनियमाच्या अध्याय VI-A अंंतर्गत निर्दिष्ट कर कपात

कलम 80G

विहित निधी, धर्मादाय संस्था इत्यादींना दिलेल्या देणग्यांसाठी कपात.

खालील वर्गवारींच्या अंतर्गत कपातींसाठी पात्र देणगी

पात्रता मर्यादेच्या अधीन

100% देणगी दिली

50% देणगी दिली

कोणत्याही मर्यादेशिवाय

100% देणगी दिली

50% देणगी दिली

 

 

 

 



टीप: या कलमाच्या अंतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख रकमेच्या देणगीच्या बाबतीत कोणतीही कपातीला परवानगी नाही.

 

कलम 80GGA

वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी केलेल्या देणग्यांसाठी कपात.

खालील वर्गवारींच्या अंतर्गत कपातींसाठी पात्र देणगी

संशोधन संघटना किंवा विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्था यासाठी:

  • वैज्ञानिक संशोधन
  • सामाजिक विज्ञान किंवा सांख्यिकीय संशोधन

यासाठी संघटना किंवा संस्था:

  • ग्रामीण विकास
  • नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन किंवा वनीकरणासाठी

कोणताही पात्र प्रकल्प राबवण्यासाठी राष्ट्रीय समितीने मान्यता दिलेली सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा संघटना किंवा संस्था

केंद्र सरकारकडून अधिसूचित केलेले निधी

  • वनीकरण
  • ग्रामीण विकास

केंद्र सरकारने स्थापन व अधिसूचित केल्यानुसार राष्ट्रीय शहरी दारिद्र्य निर्मूलन निधी

 

टीप: या कलमाच्या अंतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख स्वरूपात दिलेल्या देणगीच्या बाबतीत किंवा एकूण उत्पन्नात व्यापार/व्यवसायातील नफा/लाभ यातून मिळणारे उत्पन्न समाविष्ट असल्यास, कोणत्याही कपातीला परवानगी नाही.

 

कलम 80GGC

राजकीय पक्ष किंवा निवडणूक न्यासाला दिलेल्या रकमेला कपात म्हणून परवानगी आहे (विशिष्ट अटींच्‍या अधीन राहून)

रोख रकमे व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने भरलेल्या एकूण रकमेची कपात

 

कलम 80IAB

 

विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासामध्ये गुंतलेले उपक्रम किंवा उद्योगाद्वारे नफा आणि लाभाच्या संदर्भात कपात

(विशिष्ट अटींच्या अधीन)

 

केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र अधिसूचित केल्यापासून सुरू होणाऱ्या पंधरा कर निर्धारण वर्षांपैकी सलग दहा कर निर्धारण वर्षांसाठी नफ्यावर 100% कर सूट.

1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास सुरू झाल्यास, करदात्याला कोणतीही कपात मिळणार नाही.

 
 

 

 

कलम 80IE

ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थापन केलेल्या काही उपक्रमांची कपात (विशिष्ट अटींच्या अधीन राहून)

विविध अटींच्या अधीन राहून 10 निर्धारण वर्षासाठी नफ्यावर 100% कर सूट.

 

कलम 80JJAA

कलम 44AB लागू असलेल्या निर्धारितीला लागू असलेल्या नवीन कामगार / कर्मचाऱ्यांच्या रोजगारासंदर्भातील कपात (काही अटींच्या अधीन)

 

काही अटींच्या अधीन राहून, तीन निर्धारण वर्षांसाठी अतिरिक्त कर्मचारी खर्चाच्या 30%

 

कलम 80LA

ऑफशोर बँकिंग युनिट्स आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या उत्पन्नातील कपात (विशिष्ट अटींच्या अधीन राहून)

निर्दिष्ट अटींनुसार, सलग 5 निर्धारण वर्षांसाठी निर्दिष्ट उत्पन्नाच्या 100% कर सूट

पेज शेवटचे पुनरावलोकन केले किंवा अपडेट केले: