Do not have an account?
Already have an account?

 

निर्धारण वर्ष 2026-27 साठी व्यवसाय / पेशातून उत्पन्न असलेल्या व्यक्तीस लागू असलेले विवरणपत्र

अस्वीकरण: या पानावरील मजकूर केवळ आढावा आणि सामान्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे आणि तो सर्वसमावेशक नाही. संपूर्ण तपशील आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी कृपया आयकर अधिनियम, 1961 चे नियम आणि अधिसूचना पहा

 

1. ITR-3- व्यक्ती आणि HUFसाठी लागू

हे विवरणपत्र व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (HUF) लागू आहे:

वेतन /निवृत्तीवेतन, घर मालमत्ता, व्यवसाय किंवा पेशातील नफा किंवा लाभ, भांडवली नफा किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या शीर्षकांखाली उत्पन्न असणे. अशी व्यक्ती जी ITR-1, ITR-2 किंवा ITR-4 दाखल करण्यासाठी पात्र नाही

 

 

2. ITR-4 (SUGAM) – व्यक्ती, HUF आणि व्यावसायिक संस्थांसाठी (LLP व्यतिरिक्त) लागू

हे विवरणपत्र अशा व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) जे सामान्य निवासी आहेत किंवा निवासी भागीदारी संस्थांसाठी (LLP व्यतिरिक्त) लागू आहे; ज्यांचे एकूण उत्पन्न ₹ 50 लाखांपर्यंत आहे, ज्यांच्या व्यवसाय किंवा पेशातील उत्पन्नाची गणना (आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AD / 44ADA / 44AE नुसार) अनुमानित आधारावर केली जाते, आणि ज्यांना खालील स्रोतांपैकी कोणत्याही एका स्रोतातून उत्पन्न मिळते:

वेतन/निवृत्तीवेतन इतर स्रोत (व्याज, कौटुंबिक निवृत्तीवेतन, लाभांश इ.) ₹ 5,000 पर्यंतचे शेती उत्पन्न आयकर कायदा, 1961 च्या कलम 112A अंतर्गत ₹ 125000 पर्यंतचे भांडवली नफा उत्पन्न

टीप:1 

 

ITR-4 एखादी व्यक्ती वापरू शकत नाही जी:

  1. कंपनीमध्ये संचालक आहे, किंवा
  2. जिच्याकडे अल्पकालीन भांडवली नफा आहे
  3. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 112A अंतर्गत ₹1.25 लाखांपेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफा आहे.
  4. जिच्याकडे मागील वर्षात कधीही सूचीबद्ध नसलेले इक्विटी शेअर्स धारण केले आहेत
  5. भारताबाहेर कोणतीही मालमत्ता (कोणत्याही संस्थेतील आर्थिक हितसंबंधांसह) आहे, किंवा
  6. भारताबाहेरील कोणत्याही खात्यामध्ये स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे, किंवा
  7. भारताबाहेरील कोणत्याही स्रोतातून उत्पन्न आहे,
  8. अशी व्यक्ती जिच्या बाबतीत ESOP वर कर भरणा किंवा कपात स्थगित/ विलंबित करण्यात आले आहे
  9. जिने उत्पन्नाच्या कोणत्याही शीर्षकाखाली कोणताही तोटा किंवा पुढे नेण्याजोगा तोटा सादर केला आहे; किंवा
  10. ज्यांचे एकूण उत्पन्न रु. 50 लाखांपेक्षा जास्त आहे.
  11. कलम 89A अंतर्गत अधिसूचित देशामध्ये ठेवलेल्या सेवानिवृत्ती लाभ खात्यातून उत्पन्न असणे.
  12. कलम 89A अंतर्गत अधिसूचित देशाव्यतिरिक्त इतर देशात ठेवलेल्या सेवानिवृत्ती लाभ खात्यातून उत्पन्न असणे.
  13. विशेष दराने आकारण्यायोग्य असलेले कोणतेही उत्पन्न असणे.
 

टीप:2  

फॉर्म ITR-4 (SUGAM) अनिवार्य नाही. हा एक सुलभ विवरणपत्र फॉर्म आहे जो निर्धारितीने आपल्या पर्यायानुसार वापरायचा असतो, जर तो/ती आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AD, 44ADA किंवा 44AE अंतर्गत अनुमानित आधारावर व्यवसाय किंवा व्यावसायिक नफा आणि उत्पन्न जाहीर करण्यास पात्र असेल.

 

आयकर कायदा, 1961 नुसार लागू फॉर्म

1. फॉर्म 16A – वेतनाव्यतिरिक्त उत्पन्नावरील TDS साठी आयकर कायदा, 1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र 

प्रदाता फॉर्ममध्ये दिलेले तपशील
वजावट करणारा ते वजावट मिळवणारी फॉर्म 16A हे तिमाहीला जारी केले जाणारे स्त्रोतावर कर कपातीचे (TDS) प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये जमा झालेली रक्कम, TDS ची रक्कम, पेमेंटचे स्वरूप आणि आयकर विभागाकडे जमा केलेल्या TDS पेमेंटची नोंद असते.

 

2. फॉर्म 26 AS

                                                                                                                    AIS (वार्षिक माहिती विवरणपत्र)                                                                                                                   

प्रदाता:

 

आयकर विभाग (ते ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे:

लॉग इन; ई-फाइल; आयकर विवरणपत्र; फॉर्म 26AS पहा)

प्रदाता:

 

आयकर विभाग (आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर अ‍ॅक्सेस केला जाऊ शकतो)

ई-फाइलिंग पोर्टलवर जा; लॉग इन करा; AIS

फॉर्ममध्ये दिलेले तपशील:

 

स्रोतावर कपात / संकलित केलेला कर.

 

 

फॉर्ममध्ये दिलेले तपशील:

 

  • स्रोतावर कपात / संकलित केलेला कर
  • SFT माहिती
  • कर भरणा
  • मागणी / परतावा

इतर माहिती (जसे की प्रलंबित / पूर्ण झालेली कार्यवाही, GST माहिती, परदेशी सरकारकडून प्राप्त माहिती इत्यादी.)

 

 

 

3. फॉर्म 3CB-CD

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

कलम 44AB अंतर्गत असा करदाता ज्याच्या/जिच्या खात्यांचे लेखापरीक्षण लेखापरीक्षकाने करणे आवश्यक आहे.

आयकर कायदा, 1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या किमान एक महिना आधी सादर करणे आवश्यक आहे.

आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AB अन्वये सादर करणे आवश्यक असलेला लेखापरीक्षण अहवाल (फॉर्म 3CB) आणि तपशिलाचे विवरण (फॉर्म 3CD).

4. फॉर्म 15G - कर कपातीशिवाय काही प्राप्तींवर दावा करणारे रहिवासी करदात्याचे (कंपनी किंवा फर्म नसणे) घोषणापत्र

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

60 वर्षांहून कमी वयाच्या निवासी व्यक्तीने किंवा HUF किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने (कंपनी/फर्म व्यतिरिक्त) ज्याचे उत्पन्न मूळ सवलतीच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यास, व्याज उत्पन्नावर TDS कपात न करण्यासाठी बँकेत सादर केले.

वित्तीय वर्षासाठी अंदाजे उत्पन्न

 

5. फॉर्म 15H - कर कपात न करता विशिष्ट प्राप्तीवर दावा करणाऱ्या रहिवासी व्यक्तीने (वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक) करावयाचे घोषणापत्र.

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

निवासी व्यक्ती, वय वर्षे 60 किंवा त्यापेक्षा अधिक, व्याज उत्पन्नावर TDS कपात न केल्याबद्दल बँकेला घोषणापत्र.

वित्तीय वर्षासाठी अंदाजे उत्पन्न

 

6. फॉर्म 3CEB

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा निर्दिष्ट देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या करदात्याने आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 92E अंतर्गत सनदी लेखापालाकडून अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे.

आयकर कायदा, 1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या किमान एक महिना आधी सादर करणे आवश्यक आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा आणि निर्दिष्ट देशांतर्गत व्यवहारांचा तपशील असलेला सनदी लेखापालाचा अहवाल

 

निर्धारण वर्ष 2026-27 साठी टॅक्स स्लॅब्ज***

नवीन कर व्यवस्था विरुद्ध जुनी कर व्यवस्था

 

  • वित्त कायदा 2023 ने कलम 115BAC च्या तरतुदींमध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे निर्धारण वर्ष 2024-25 पासून नवीन कर व्यवस्था ही वैयक्तिक, HUF, AOP (सहकारी संस्था वगळता), BOI किंवा कृत्रिम न्यायिक व्यक्ती असलेल्या निर्धारितीसाठी डिफॉल्ट कर व्यवस्था बनते. तथापि, पात्र करदात्यांना डिफॉल्ट कर व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा आणि जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत कर आकारणी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे जुनी कर व्यवस्था ही आयकर गणना प्रणाली आणि नवीन कर व्यवस्था लागू करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्लॅबचा संदर्भ देते. जुन्या कर व्यवस्थेमध्ये, करदात्यांना विविध कर कपाती आणि सवलतींचा दावा करण्याचा पर्याय आहे.

व्यापारेतर प्रकरणे:

  • "व्यापारेतर प्रकरणे", डिफॉल्ट कर व्यवस्था बदलण्याचा पर्याय दरवर्षी थेट ITRमध्ये वापरता येतो आणि असा ITR आयकर कायदा , 1961 च्या कलम (1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेच्या आधी किंवा त्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.

व्यापारिक प्रकरणे

  • व्यवसाय आणि पेशातून उत्पन्न असलेल्या पात्र करदात्यांना डीफॉल्ट कर व्यवस्थेतून बाहेर पडायचे असल्यास, ते आयकर कायदा, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी देय तारखेला किंवा त्यापूर्वी फॉर्म-10-IEA सादर करू शकतात. तसेच, असा पर्याय मागे घेण्यासाठी म्हणजेच नवीन कर व्यवस्थेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी, कलम 139(1) अंतर्गत आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत किंवा त्यापूर्वी फॉर्म नं. 10-IEA सादर करावा लागेल. तथापि, जुन्या कर प्रणालीतून बाहेर पडण्याचा आणि पुन्हा डिफॉल्ट कर प्रणालीत प्रवेश करण्याचा पर्याय केवळ पुढील मूल्यांकन वर्षात उपलब्ध आहे आणि व्यवसाय व व्यावसायिक उत्पन्न असलेल्या पात्र करदात्यांसाठी तो आयुष्यात फक्त एकदाच वापरता येतो.
मागील वर्षात कोणत्याही वेळी 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वैयक्तिक (रहिवासी किंवा अनिवासी) व्यक्तीसाठी कराचे दर खालीलप्रमाणे आहेत:

जुनी कर व्यवस्था

आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत मूलभूत कर व्यवस्था

आयकर स्लॅब

आयकर दर

 

आयकर स्लॅब

आयकर दर

 

₹ 2,50,000 पर्यंत

शून्य

 

₹4,00,000 पर्यंत

शून्य

 

₹ 2,50,001 - ₹ 5,00,000**

₹ 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

 

₹ 4,00,001 - ₹ 8,00,000

₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

 

₹ 5,00,001 - ₹ 10,00,000

₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 12,500

 

₹ 8,00,001 - ₹ 12,00,000

₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 10% + ₹ 20,000

 

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 1,12,500

 

 

₹ 12,00,001 - ₹ 16,00,000

₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 15% + ₹ 60,000

 

 

 

 

 

₹ 16,00,001 - ₹ 20,00,000

₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 1,20,000

 

 

 

 

₹ 20,00,001 - ₹ 24,00,000

₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 25% + ₹ 2,00,000

 

 

 

 

   

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 3,00,000

 

 

 

मागील वर्षादरम्यान कोणत्याही वेळी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक पण 80 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वैयक्तिक करदात्यांसाठी (रहिवासी किंवा अनिवासी) कर दर खालीलप्रमाणे आहेत:

जुनी कर व्यवस्था

आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन कर व्यवस्था

आयकर स्लॅब

आयकर दर

 

आयकर स्लॅब

आयकर दर

 

₹ 3,00,000 पर्यंत

शून्य

 

₹ 4,00,000 पर्यंत

शून्य

 

₹ 3,00,001 - ₹ 5,00,000**

₹ 3,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

₹ 4,00,001 - ₹ 8,00,000

₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

₹ 5,00,001 –₹ 10,00,000

 

₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 10,000

 

₹ 8,00,001 - ₹ 12,00,000

₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 10% + ₹ 20,000

 

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 1,10,000

 

₹ 12,00,001 - ₹ 16,00,000

₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 15% + ₹ 60,000

 

 

 

 

₹ 16,00,001 - ₹ 20,00,000

₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 1,20,000

 

 

 

 

₹ 20,00,001 –₹ 24,00,000

 

₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 25% + ₹ 2,00,000

 

 

 

 

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 3,00,000

 

 

 

मागील वर्षादरम्यान कोणत्याही वेळी 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वैयक्तिक करदात्यांसाठी (रहिवासी किंवा अनिवासी) कर दर खालीलप्रमाणे आहेत:

जुनी कर व्यवस्था

आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन कर व्यवस्था

आयकर स्लॅब

आयकर दर

 

आयकर स्लॅब

आयकर दर

 

₹ 5,00,000 पर्यंत

शून्य

 

₹ 4,00,000 पर्यंत

शून्य

 

₹ 5,00,001 - ₹ 10,00,000

₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20%

 

₹ 4,00,001 - ₹ 8,00,000**

₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

 

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 1,00,000

 

 

₹ 8,00,001 - ₹ 12,00,000

₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 10% + ₹ 20,000

 

 

 

 

₹ 12,00,001 - ₹ 16,00,000

₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 15% + ₹ 60,000

 

 

 

 

 

₹ 16,00,001 - ₹ 20,00,000

₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 1,20,000

 

 

 

 

 

₹ 20,00,001 - ₹ 24,00,000

₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 25% + ₹ 2,00,000

 

 

 

 

लागू अधिभार दर:

      

 

          उत्पन्न मर्यादा

  आयकर रक्कमेवरील अधिभार दर

 

        (नवीन कर व्यवस्था)

आयकर रक्कमेवरील अधिभार दर  

 

       (जुनी कर व्यवस्था)

 

₹ 50 लाखांपर्यंत

शून्य

शून्य

₹ 50 लाख ते 1 कोटी

10%

10%

₹ 1 कोटी ते 2 कोटी

15%

15%

₹ 2 कोटी ते 5 कोटी

25%

25%

₹ 5 कोटींपेक्षा जास्त

25%

37%

टीप: कलम 111A, 112, 112A अंतर्गत कर आकारण्यात येणाऱ्या उत्पन्नावर तसेच लाभांश उत्पन्नावर, आवश्यकतेनुसार 25% व 37% चा वाढीव अधिभार लागू केला जात नाही. त्यामुळे अशा उत्पन्नावर देय करावरील अधिभाराचा कमाल दर 15% असेल. तथापि, कलम , 115AB, 115AC, 115ACA आणि 115E अंतर्गत कर आकारणी होत असल्यास हा नियम लागू होणार नाही.

 

लागू आयकर कायदा , 1961 च्या कलम 87A अंतर्गत सवलत: निवासी व्यक्ती कर व्यवस्थेनुसार खालीलप्रमाणे कमाल मर्यादेच्या अधीन राहून 100% पर्यंत आयकर सवलत मिळण्याससुद्धा पात्र आहे:

कर व्यवस्था

सवलत मर्यादा

सवलत अट

नवीन कर व्यवस्था

₹ 60,000

करपात्र उत्पन्न ₹ 12,00,000 पेक्षा जास्त नसावे

जुनी कर व्यवस्था

₹ 12,500

करपात्र उत्पन्न 5,00000 पेक्षा जास्त नसावे

 

 

***टीप: दोन्ही कर प्रणालींमध्ये आयकराच्या रकमेवर तसेच अधिभारावर (असल्यास) 4% दराने आरोग्य व शिक्षण उपकर भरावा लागेल.

जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत कमावलेले उत्पन्न अनुक्रमे ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी, ₹ 2 कोटी किंवा ₹ 5 कोटींपेक्षा जास्त असल्यास आणि नवीन कर व्यवस्था अंतर्गत कमावलेले उत्पन्न अनुक्रमे ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी, ₹ 2 कोटींपेक्षा जास्त असल्यास अधिभारातूनदेखील सीमांत सवलतीचा दावा खालीलप्रमाणे केला जाऊ शकतो:

 

 

जुनी कर व्यवस्था

नवीन कर व्यवस्था

                   कलम 87A अंतर्गत सूट लागू

₹5 लाखांपर्यंत

एकूण उत्पन्न ₹ 5,00,000 पेक्षा जास्त नसल्यास निवासी व्यक्तींना ₹ 12,500 पर्यंत कर सूट लागू आहे (NRI साठी लागू नाही)

एकूण उत्पन्न ₹ 7,00,000 पेक्षा जास्त नसल्यास निवासी व्यक्तींना ₹ 20,000 पर्यंत कर सूट लागू आहे (NRI साठी लागू नाही)

5 लाख ते 7 लाखांपर्यंत

शून्य

***टीप: दोन्ही कर प्रणालींमध्ये आयकराच्या रकमेवर तसेच अधिभारावर (असल्यास) 4% दराने आरोग्य व शिक्षण उपकर भरावा लागेल.

जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी, ₹ 2 कोटी किंवा ₹ 5 कोटी, तसेच नवीन कर व्यवस्थेअंतर्गत ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी किंवा ₹ 2 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न झाल्यास, अधिभारावर अनुक्रमे सीमांत सवलतीचा दावा पुढीलप्रमाणे करता येतो:

निव्वळ उत्पन्न किरकोळ सवलत श्रेणी

(₹) पेक्षा जास्त

(₹) पेक्षा जास्त नाही

 

 

50 लाख

1 कोटी

दोन्ही कर व्यवस्थांअंतर्गत देय आयकर आणि अधिभार यांची एकूण रक्कम, एकूण उत्पन्नावर ₹50 लाख इतक्या उत्पन्नावर देय असलेल्या आयकराच्या रकमेपेक्षा, ₹50 लाखांपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक असू नये.

1 कोटी

2 कोटी

दोन्ही कर व्यवस्थांअंतर्गत देय आयकर आणि अधिभार यांची एकूण रक्कम, एकूण उत्पन्नावर ₹1 कोटी इतक्या उत्पन्नावर देय असलेल्या आयकराच्या रकमेपेक्षा, ₹1 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक असू नये.

2 कोटी

5 कोटी

दोन्ही कर व्यवस्थांअंतर्गत देय आयकर आणि अधिभार यांची एकूण रक्कम, एकूण उत्पन्नावर ₹2 कोटी इतक्या उत्पन्नावर देय असलेल्या आयकराच्या रकमेपेक्षा, ₹2 कोटींपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक असू नये.

5 कोटी

–

जुन्या कर व्यवस्थांअंतर्गत, देय आयकर आणि अधिभार यांची एकूण रक्कम, एकूण उत्पन्नावर ₹5 कोटी इतक्या उत्पन्नावर देय असलेल्या आयकराच्या रकमेपेक्षा, ₹5 कोटींपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक असू नये.

 

 

Investments / Payments / Incomes on which  tax benefit is available 
 
आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन कर व्यवस्थेचा पर्याय निवडणाऱ्या करदात्याला खालील कपाती उपलब्ध असतील:
  1. कलम 24(b) – गृहकर्जावरील भरलेल्या व्याजावर घराच्या मालमत्तेमधूनच्या उत्पन्नातून कपात:

मालमत्तेचे स्वरूप

कर्जाचा हेतू

स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा)

ITR भरण्यासाठी आवश्यक तपशील

भाडेतत्वावर देणे

घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

कोणत्याही मर्यादेशिवाय वास्तविक मूल्य (परंतु “घरमालमत्तेतील उत्पन्न” या शीर्षकाखालील कोणताही तोटा असल्यास तो CYLA अनुसूचीमध्ये इतर कोणत्याही शीर्षकाविरुद्ध समायोजित करता येणार नाही आणि पुढील वर्षांसाठी पुढे नेला जाऊ शकत नाही).

  • बँकेकडून / बँकेव्यतिरिक्त इतरांकडून घेतलेले कर्ज
  • ज्या बँकेकडून / संस्थेकडून / व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्याचे नाव
  • बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
  • कर्ज मंजूर करण्याची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला थकीत कर्ज
  • कलम 24(b) अंतर्गत कर्ज घेतलेल्या भांडवलावर व्याज
 

2.आयकर कायदा, 1961 च्या Chapter VIA अंतर्गत निर्दिष्ट कर कपात

कलम 80CCD(2)
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानातील कपात
 

"केंद्र सरकार" किंवा "राज्य सरकार" किंवा "PSU" किंवा "इतर" यासाठी

 

वेतनाच्या 14% इतकी कपात मर्यादा

 

कलम 80CCH

अग्निपथ योजनेतील योगदानाच्या संदर्भात कपात

करदाता हा अग्निपथ योजनेत नावनोंदणी केलेली एक व्यक्ती आहे आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर अग्निवीर कॉर्पस फंडाचे सदस्यत्व घेत आहे, त्याने मागील वर्षी या निधीमध्ये निर्धारिती खात्यात कोणतीही रक्कम भरली किंवा जमा केली असेल
 
भरलेल्या किंवा जमा केलेल्या संपूर्ण रकमेमधून एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीला परवानगी दिली
जेथे केंद्र सरकार अग्निवीर कॉर्पस फंडातील कर निर्धारितीच्या खात्यात कोणतेही योगदान देते
 
एकूण योगदान दिलेल्या रकमेच्या एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीची संपूर्ण परवानगी दिली
आयकर कायदा, 1961 नुसार जुन्या कर व्यवस्थेतील सवलती
  1. कलम 24(b) – गृहकर्जावरील भरलेल्या व्याजासाठी घरमालमत्ता उत्पन्नातून वजावट & घर सुधारणा कर्ज. स्वतःच्या वापरातील मालमत्तेच्या बाबतीत, गृहकर्जावरील भरलेल्या व्याजाच्या वजावटीची कमाल मर्यादा ₹ 2 लाख आहे.कलम 24(b) अंतर्गत कर्जावरील स्वीकारार्ह व्याज खाली दिले आहे:

मालमत्तेचे स्वरूप

कर्ज कधी घेतले होते

कर्जाचा हेतू

स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा)

आवश्यक तपशील < /strong>

स्व-व्याप्त

1/04/1999 रोजी किंवा नंतर

घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

₹ 2,00,000

  • बँकेकडून / बँकेव्यतिरिक्त इतरांकडून घेतलेले कर्ज
  • ज्या बँक / संस्था / व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्यांचे नाव
  • बँक / संस्थेचा कर्ज खाते क्रमांक .
  • कर्ज मंजूर करण्याची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला थकीत कर्ज
  • कलम 24(b) अंतर्गत घेतलेल्या भांडवलावरील व्याज

1/04/1999 रोजी किंवा नंतर

घरमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी

₹ 30,000

1/04/1999 पूर्वी

घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

₹ 30,000

1/04/1999 पूर्वी

घरमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी

₹ 30,000

भाडेतत्त्वावर देणे

कोणत्याही वेळी

घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

कोणतीही मर्यादा नसलेले प्रत्यक्ष मूल्य
निर्धारण वर्षादरम्यान इतर उत्पन्नाच्या प्रमुखांपुढे समायोजित करण्यासाठी कमाल परवानगीयोग्य तोटा ₹. 2,00,000 आहे आणि उर्वरित रक्कम पुढील 8 निर्धारण वर्षांपर्यंत पुढे नेली जाऊ शकते.

2. आयकर कायदा , 1961 च्या Chapter VIA अंतर्गत निर्दिष्ट वजावटी

कलम 80C, 80CCC, 80CCD (1)

यांना दिलेल्या पेमेंट्ससाठी कपात

80C
  • जीवन विमा हप्ता
  • भविष्य निर्वाह निधी
  • काही विशिष्ट इक्विटी शेअर्सची सदस्यता
  • शिकवणीचे शुल्क
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
  • गृहकर्ज मुद्दल
  • इतर विविध बाबी
  • कंटेंट2
  • कंटेंट3
80CCC

पेन्शन योजनेसाठी एलआयसी किंवा इतर विमा कंपनीची वार्षिकी योजना

80CCD(1)

केंद्र सरकारची निवृत्तीवेतन योजना

 

₹ 1,50,000 ची एकत्रित कपात मर्यादा

प्रत्येक पात्र पेमेंटसाठी ITR मध्ये भरायचे तपशील:

  • पॉलिसी नंबर किंवा कागदपत्र ओळख क्रमांक
  • कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र रक्कम
कलम 80CCD(1B)

(1)80CCD (1) अंतर्गत दावा केलेली कपात वगळून, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी केलेल्या पेमेंटवर कपात

 

2)या उपकलमांतर्गत नमूद केलेल्या पेन्शन योजनेअंतर्गत अल्पवयीनाच्या खात्यात कोणतीही रक्कम भरली किंवा जमा केली असल्यास, आणि निर्धारिती त्या अल्पवयीनाचे पालक किंवा संरक्षक असल्यास, या उपकलमांतर्गत वजावट देखील मंजूर केली जाईल,

₹ 50,000 पर्यंतची कपात मर्यादा

टीप:  

a. कलम 80 C अंतर्गत वजावटीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालीलप्रमाणे तपशील देणे आवश्यक आहे:

  • कपातीसाठी पात्र रक्कम
  • पॉलिसी क्रमांक किंवा कागदपत्र ओळख क्रमांक.

b. कलम 80CCC, 80 CCD (1), 80 CCD (1B) अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालीलप्रमाणे तपशील देणे आवश्यक आहे:

  • ओळखकर्त्याचा प्रकार
  • ओळखकर्त्याचे नाव
  • रक्कम

 

 

कलम 80CCD(2)
जर नियोक्ता PSU किंवा इतर असेल पगाराच्या 10% पर्यंत कपात मर्यादा
जर नियोक्ता केंद्र किंवा राज्य सरकार असेल पगाराच्या 14% पर्यंत कपात मर्यादा  

 

कलम 80CCH

अग्निपथ योजनेतील योगदानाच्या संदर्भात कपात

करदाता हा अग्निपथ योजनेत नावनोंदणी केलेली एक व्यक्ती आहे आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर अग्निवीर कॉर्पस फंडाचे सदस्यत्व घेत आहे, त्याने मागील वर्षी या निधीमध्ये निर्धारिती खात्यात कोणतीही रक्कम भरली किंवा जमा केली असेल
 
भरलेल्या किंवा जमा केलेल्या संपूर्ण रकमेमधून एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीला परवानगी दिली जाईल
जेथे केंद्र सरकार अग्निवीर कॉर्पस फंडातील कर निर्धारितीच्या खात्यात कोणतेही योगदान देते
 
एकूण योगदान दिलेल्या रकमेच्या एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीची संपूर्ण परवानगी दिली जाईल

 

 

कलम 80D

आरोग्य विमा हप्ता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी भरलेल्या रकमेतून कपात

 

स्वत:साठी / जोडीदार किंवा अवलंबित मुलांसाठी
 
₹ 25,000 (एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर ₹ 50,000)
प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेमध्ये समाविष्ट
पालकांसाठी
 
₹ 25,000 (एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर ₹50,000)
प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेमध्ये समाविष्ट

आरोग्य विमा कव्हरवर प्रीमियम भरला नसल्यास, ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या वैद्यकीय खर्चावर कपात

स्वतः/पती/पत्नी किंवा अवलंबित असलेल्या मुलांसाठी
  ₹ 50,000 पर्यंतची कपात मर्यादा
पालकांसाठी
  ₹ 50,000 पर्यंतची कपात मर्यादा

टीप: 

कलम 80D अंतर्गत वजावट दावा करणाऱ्या करदात्यांनी खालीलप्रमाणे तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
• विमा कंपनीचे नाव (विमा कंपनी)
• पॉलिसी क्रमांक
• आरोग्य विमा रक्कम

 

कलम 80DD
अपंग आश्रित व्यक्तीच्या देखभाल किंवा वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या पेमेंटवरील कपात किंवा संबंधित मंजूर योजनेच्या अंतर्गत कोणतीही भरलेली/जमा केलेली रक्कम आहे
 
अपंग व्यक्तीसाठी, खर्चाची पर्वा न करता
₹ 75,000
ची सरसकट कपात उपलब्ध आहे.
जर व्यक्तीस गंभीर अपंगत्व (80% किंवा त्याहून अधिक) असेल, तर
₹ 1,25,000
इतकी कपात उपलब्ध आहे.

टीप :

कलम 80DD अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी खालील तपशील ITR मध्ये नमूद करणे आवश्यक आहे:

  1. अपंगत्वाचे स्वरूप
  2. अपंगत्वाचा प्रकार
  3. कपातीची रक्कम
  4. अवलंबित्वाचा प्रकार
  5. अवलंबित व्यक्तीचा PAN
  6. अवलंबित व्यक्तीचा आधार
  7. ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी किंवा बहुविध अपंगत्वाच्या बाबतीत दाखल केलेल्या फॉर्म 10 IA चा पोचपावती क्र.
  8. UDID क्रमांक (उपलब्ध असल्यास)

 

 

कलम 80DDB
विशिष्ट रोगासाठी स्वतःच्या किंवा अवलंबितांच्या वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या पेमेंटची कपात

₹ 40,000
पर्यंत कपात (ज्येष्ठ नागरिक असल्यास, ₹ 1,00,000)
 

कृपया नोंद घ्या: कलम 80DDB अंतर्गत वजावटीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  1. वापरकर्त्याचा प्रकार
  2. निर्दिष्ट आजाराचे नाव
  3. रक्कम
 
कलम 80E

स्वत:च्या किंवा नातेवाईकाच्या उच्च शिक्षणासाठी कर्जावरील व्याजाच्या पेमेंटवर कपात.

 

घेतलेल्या कर्जावर भरलेलल्या व्याजाची एकूण रक्कम

 

टीप:

कलम 80E अंतर्गत वजावटीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  1. बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  2. ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्याचे नाव
  3. बँकेचा कर्ज खाते क्रमांक.
  4. कर्ज मंजूर करण्याची तारीख
  5. कर्जाची एकूण रक्कम
  6. आर्थिक वर्षाच्या अंतिम तारखेला थकीत असलेले कर्ज
  7. कलम 80E अंतर्गत व्याज

 

 

 

 

 

कलम 80EE

 

 
1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान कर्ज मंजूर असलेल्या निवासी घराच्या मालमत्तेच्या संपादनासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज पेमेंटवर कपात
घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजावर
₹ 50,000
पर्यंत कपात मर्यादा
   

टीप:

कलम 80EE अंतर्गत वजावटीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  1. बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  2. ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्याचे नाव
  3. बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
  4. कर्ज मंजूर करण्याची तारीख
  5. कर्जांची एकूण रक्कम
  6. आर्थिक वर्षाच्या अंतिम तारखेला थकीत असलेले कर्ज
  7. कलम 80EE अंतर्गत व्याज

 

 

                                                                                                                                कलम 80EEA

 

पहिल्यांदाच निवासी घराची खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या देयकावर ही वजावट केवळ वैयक्तिक करदात्यांनाच उपलब्ध आहे; जिथे कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 दरम्यान मंजूर झालेले असावे आणि कलम 80EE अंतर्गत या वजावटीचा दावा केलेला नसावा.

 

   
  घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजावरील कपातीची मर्यादा
₹ 1,50,000

टीप :

कलम 80EEA अंतर्गत वजावटीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  1. बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  2. ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्याचे नाव
  3. बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
  4. कर्ज मंजूर करण्याची तारीख
  5. कर्जाची एकूण रक्कम
  6. आर्थिक वर्षाच्या अंतिम तारखेला थकीत असलेले कर्ज
  7. कलम 80EE अंतर्गत व्याज

नोंद घ्या की, कलम 24(b) मधील मर्यादा संपल्यानंतरच कलम 80EEA अंतर्गत कपातीचा दावा केला जाऊ शकतो. तसेच, कर्ज मंजुरीची तारीख आणि इतर पात्र अटींच्या आधारावर 80EE किंवा 80EEA यापैकी एकाचा करदाते दावा करू शकतात.

 

 

 

 

Deduction towards interest payments made on loan for purchase of Electric Vehicle where the loan is sanctioned between 1st April 2019 to 31st March 2023

 
 

घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजावर
₹ 1,50,000
पर्यंत कपात मर्यादा

 
 
मूल्याची कपात

 

 

टीप:

कलम 80EEB अंतर्गत कपात मिळवण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे

  1. ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्याचे नाव
  2. बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
  3. कर्ज मंजूर करण्याची तारीख
  4. कर्जाची एकूण रक्कम
  5. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला थकीत कर्ज
  6. वाहन नोंदणी क्रमांक
  7. कलम 80EEB अंतर्गत व्याज

 

 

कलम 80G

विहित निधी, धर्मादाय संस्था इत्यादींना दिलेल्या देणग्यांसाठी वजावट.

खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीला पात्र आहेत

कोणत्याही मर्यादेशिवाय 100% कपात 100% कपात  

पात्रता मर्यादेच्या अधीन 100% कपात 50% कपात

 

टीप : ₹ 2000/- पेक्षा जास्त रकमेच्या रोख देणग्यांवर या कलमांतर्गत कोणतीही कपात अनुज्ञेय असणार नाही.

 

 

कलम 80GG

घराच्या भाड्यासाठी दिलेल्या भाड्यावरील वजावट आणि केवळ स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी किंवा ज्यांच्या पगारात HRA समाविष्ट नाही त्यांच्यासाठी लागू

खालीलपैकी किमान कपात म्हणून परवानगी दिली जाईल

या कपातीपूर्वी दिलेले भाडे एकूण उत्पन्नाच्या 10% ने कमी झाले

दरमहा ₹ 5,000 एकूण उत्पन्नाच्या 25% (दीर्घ कालावधीचा भांडवली नफा वगळून, कलम 111A अंतर्गत अल्प कालावधीचा भांडवली नफा किंवा कलम 115A किंवा 115D अंतर्गत उत्पन्न)  

टीप: कलम 80GG अंतर्गत वजावट मिळवण्यासाठी, उत्पन्नाचे विवरणपत्र भरताना फॉर्म 10 BA दाखल करणे आणि त्याचा (पोचपावती क्रमांक) अनुसूची 80G मध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.

 

 

कलम 80GGA

वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी केलेल्या देणग्यांसाठी वजावट

देणग्या खालील श्रेणींअंतर्गत कपातीसाठी पात्र आहेत:

संशोधन संघटना किंवा विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्था यासाठी

  • वैज्ञानिक संशोधन
  • सामाजिक विज्ञान किंवा सांख्यिकीय संशोधन

संघटना किंवा संस्थासाठी

  • ग्रामीण विकास
  • नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन किंवा वनीकरणासाठी
कोणताही पात्र प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय समितीने मंजूर केलेली PSU किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा संघटना किंवा संस्था

केंद्र सरकारकडून अधिसूचित केलेले निधी

  • वनीकरण
  • ग्रामीण विकास
केंद्र सरकारद्वारे व्यवस्था आणि अधिसूचित म्हणून राष्ट्रीय शहरी दारिद्र्य निर्मूलन निधी

टीप : ₹  2000/- रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोख स्वरूपात दिली असल्यास, किंवा एकूण ढोबळ उत्पन्नामध्ये व्यवसाय अथवा धंद्यातील नफा किंवा फायद्यांचा समावेश असल्यास, किंवा भागीदाराला भागीदारी संस्थेकडून मोबदला अथवा भांडवलावर व्याज मिळत असल्यास, या कलमांतर्गत कोणतीही वजावट दिली जाणार नाही.

 

 

 

कलम 80GGC

 

कलम 80-IA(4)(iv) मध्ये उल्लेख केलेल्या उपक्रमाच्या नफ्यावरील कपात

ज्या निर्धारण वर्षात निर्धारितीने पायाभूत सुविधा विकसित केली / चालवण्यास आणि देखरेख करण्यास सुरुवात केली, त्या निर्धारण वर्षापासून सुरू होणाऱ्या 15 निर्धारण वर्षांच्या कालावधीत येणाऱ्या सलग 10 निर्धारण वर्षांमधील नफ्याचा 100%.

1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास किंवा कामकाज सुरू करणाऱ्या कोणत्याही उपक्रमामध्ये कोणतीही कपात करण्यास परवानगी दिली जाणार नाही. (विशिष्ट व्यवसायासाठी विकास, संचालन इत्यादी निर्दिष्ट तारखेनंतर सुरू झाले असल्यास कोणतीही कपात अनुज्ञेय असणार नाही)

 

कलम 80IA
कलम 80-IA(4)(iv) मध्ये उल्लेख केलेल्या उपक्रमाच्या नफ्यावरील कपात
  ज्या निर्धारण वर्षात निर्धारितीने पायाभूत सुविधा विकसित केली / चालवण्यास आणि देखरेख करण्यास सुरुवात केली, त्या निर्धारण वर्षापासून सुरू होणाऱ्या 15 निर्धारण वर्षांच्या कालावधीत येणाऱ्या सलग 10 निर्धारण वर्षांमधील नफ्याचा 100%.
  1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास किंवा कामकाज सुरू करणाऱ्या कोणत्याही उपक्रमामध्ये कोणतीही कपात करण्यास परवानगी दिली जाणार नाही. (विशिष्ट व्यवसायासाठी विकास, संचालन इत्यादी निर्दिष्ट तारखेनंतर सुरू झाले असल्यास कोणतीही कपात अनुज्ञेय असणार नाही)

 

 

 

80IB

पायाभूत सुविधा विकास उपक्रमांव्यतिरिक्त विशिष्ट औद्योगिक उपक्रमांमधून लाभ आणि नफ्यासाठी कपात:

या कलमांतर्गत कपात अशा निर्धारितीला उपलब्ध आहे, ज्याच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये खालील व्यवसायातून मिळवलेल्या कोणत्याही नफ्याचा आणि लाभाचा समावेश आहे:

  • खनिज तेलाचे व्यावसायिक उत्पादन किंवा शुद्धीकरण सुरू करणारा उपक्रम [Section 80-IB(9)]
   
  • गृहनिर्माण प्रकल्प विकसित करणे आणि बांधणारा उपक्रम [कलम 80-IB(10)]
 

 

  • फळे, भाज्या, मांस, मांस उत्पादने, कुक्कुटपालन, सागरी किंवा दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया, जतन आणि पॅकेजिंगमध्ये सक्रिय असलेले उपक्रम [कलम 80-IB(11A)]
 
  • अन्नधान्याच्या हाताळणी, साठवण आणि वाहतुकीचा एकत्रीकृत व्यापार [कलम 80-IB(11A)]
 
(विशिष्ट अटींच्या अधीन)  

 

 

 

80IE

 

ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थापन केलेल्या काही उपक्रमांना कपात

(विशिष्ट अटींच्या अधीन)

  • निर्धारण वर्ष 10 यासाठी नफ्यांपैकी 100% निर्दिष्ट केलेल्या विविध अटींच्या अधीन
   
 

 

                                                                                                                              

                                                                          80JJA

जैवविघटनक्षम कचरा गोळा करणे आणि प्रक्रिया करण्याच्या व्यवसायातून मिळणारा नफा आणि लाभ संदर्भात कपात
(विशिष्ट अटींच्या अधीन)

जैवविघटनशील कचऱ्याचे संकलन, प्रक्रिया आणि व्यवस्थापन या उपक्रमांतून मिळणाऱ्या नफ्याच्या 100% इतकी कपात सलग 5 निर्धारण वर्षांसाठी उपलब्ध
 

                                                                                                                                

                                                                                80JJAA

करदात्याला कलम 44AB लागू असलेल्या नवीन कामगार/कर्मचार्‍यांच्या रोजगाराच्या संदर्भात कपात

(विशिष्ट अटींच्या अधीन)

विशिष्ट अटींच्या अधीन राहून 3 निर्धारण वर्षांसाठी अतिरिक्त कर्मचारी खर्चाच्या 30% इतकी कपात

 

 

 

80QQB

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर विशिष्ट पुस्तकांच्या रहिवासी लेखकांच्या संदर्भात कपात
 
इतर अटींच्या अधीन राहून कमाल ₹3 लाखांपर्यंत लेखक / संयुक्त लेखकाद्वारे रॉयल्टीद्वारे मिळवलेले उत्पन्न
 

टीप : येथे दावा केलेल्या वजावाटीवर आयकर अधिनियमाच्या इतर कोणत्याही ठिकाणी पुन्हा दावा करता येणार नाही.

 

 

 

                                                                                                                                            80RRB

पेटंटवरील रॉयल्टीच्या संदर्भात रहिवासी व्यक्तींसाठी कपात
  पेटंट कायदा, 1970 अंतर्गत पहिला शोधकर्ता / सह-मालक रॉयल्टीच्या प्रमाणात रॉयल्टीद्वारे किंवा ₹ 3 लाख ( जे कमी असेल ) पर्यंत रक्कम मिळवून देईल.

टीप: येथे दावा केलेल्या वजावाटीवर आयकर कायद्याच्या इतर कोणत्याही ठिकाणी पुन्हा दावा करता येणार नाही

 

 

 

 

कलम 80TTA
ज्येष्ठ नागरिक नसलेल्या व्यक्तीला बचत बँक खात्यांवर मिळणाऱ्या व्याजावरील कपात

₹ 10,000/-
पर्यंत कपात मर्यादा

 

कलम 80TTB

 

निवासी ज्येष्ठ नागरिकांद्वारे ठेवींवर प्राप्त झालेल्या व्याजावरील कपात
 

₹ 50,000/-
पर्यंत कपात मर्यादा
   

 

कलम 80U

 

अपंगत्व असलेल्या निवासी वैयक्तिक करदात्यासाठी कपाती
 
अपंग व्यक्तीसाठी, खर्च कितीही झाला असला तरीही सरसकट ₹ 75,000 कपात
 
 
गंभीर अपंगत्व (80% किंवा त्याहून अधिक) असलेल्या व्यक्तीसाठी खर्चाची पर्वा न करता ₹ 1,25,000 ची सरसकट कपात

 

टीप:

कलम 80DD किंवा 80U अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी ITR मध्ये खालील तपशील सादर करणे अनिवार्य आहे:

  1. अपंगत्वाचे स्वरूप
  2. अपंगत्वाचा प्रकार
  3. कपातीची रक्कम
  4. अवलंबित व्यक्तीचा PAN
  5. अवलंबित व्यक्तीचा आधार क्रमांक
  6. फाइल केलेल्या फॉर्म 10 IA चा पोचपावती क्रमांक

 

पेज शेवटचे पुनरावलोकन केले किंवा अपडेट केले: