ई-फाईलिंग पोर्टलवर नोंदणी करा: कर वजावटकार आणि कर संकलक गोळा करणारे यांकरिता
क्रमानुसार मार्गदर्शक
स्टेप 1: ई-फाईलिंग पोर्टलवरील होमपेजवर जा, नोंदणी करा वर क्लिक करा.
स्टेप 2: इतर वर क्लिक करा आणि श्रेणी म्हणून कर वजावटकार व कर संकलक हे निवडा.
स्टेप 3: संस्थेचा TAN प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण करा वर क्लिक करा.
स्टेप 4a: TAN डेटाबेसमध्ये उपलब्ध असल्यास, TRACES मध्ये नोंदणीकृत असल्यास आणि नोंदणी विनंती आधीच केली गेली नसून मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास:
- मूळ तपशील पेज पाहण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
- मुलभूत तपशील आधीच भरलेले असल्यास, सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4b: TAN डेटाबेसमध्ये उपलब्ध असेल, परंतु TRACES मध्ये नोंदणीकृत नसेल आणि नोंदणीची विनंती आधीच तयार केली गेली नसेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित असेल तर:
- TRACES पेज पाहण्यासाठी पुढे सुरु ठेवा वर क्लिक करा.
- मूळ तपशील पेज पाहण्यासाठी TRACES वर ई-फाईलिंग करिता नोंदणी करा वर क्लिक करा.
- आवश्यकतेनुसार मूलभूत तपशील प्रविष्ट करा आणि चालू करा वर क्लिक करा.
टीप: आपल्याला प्रथम TRACES वर नोंदणी करावी लागेल. ई-फाइलिंग सहित नोंदणी करा वर क्लिक केल्यानंतर तिथून आपल्याला ई-फाइलिंग नोंदणीकरण पेज वर नेण्यात येईल.
स्टेप 4c: जर डेटाबेसमध्ये TAN उपलब्ध असेल, नोंदणी विनंती आधीच तयार केली गेली असेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित असेल तर:
- त्रुटीचा संदेश प्रदर्शित होईल आणि आपण नोंदणी प्रक्रिया मागे घेण्याचा निर्णय घेऊ शकता.
स्टेप 5: पेमेंट देणाऱ्या किंवा कर संकलकाचा तपशील प्रविष्ट करा आणि पुढे सुरु ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: प्राथमिक मोबाईल क्रमांक, ई-मेल ID आणि पोस्टाचा पत्ता असलेला संपर्क तपशील प्रदान करा. सुरू ठेवा वर क्लिक करा
स्टेप 7: स्टेप 6 मध्ये प्रविष्ट केल्याप्रमाणे तुमचा प्राथमिक मोबाईल क्रमांक आणि ई-मेल ID वर दोन स्वतंत्र OTP पाठवले जातात. स्वतंत्र 6 - अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 प्रयत्न आहेत
- स्क्रीनवरील OTP कालबाह्यता काउंटडाउन टाइमर तुम्हाला OTP केव्हा कालबाह्य होईल ते सांगेल
- OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल आणि पाठविला जाईल
स्टेप 8: तपशील सत्यापित करा या पेजवर, आवश्यक असल्यास दिलेल्या तपशीलांचे पुनरावलोकन करा, तपशील एडिट करा, नंतर पुष्टी करा वर क्लिक करा.
स्टेप 9:सेट पासवर्ड पेज वर, सेट पासवर्ड आणि पासवर्डची पुष्टी करा या दोन्हीही टेक्स्टबॉक्समध्ये, तुमचा इच्छित पासवर्ड प्रविष्ट करा, तुमचा वैयक्तिक संदेश सेट करा आणि नोंदणी करा वर क्लिक करा.
टीप:
रिफ्रेश किंवा मागे जा वर क्लिक करू नका.
आपण नवीन पासवर्ड प्रविष्ठ करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
- हा किमान 8 वर्ण आणि कमाल 14 वर्णांचा असला पाहिजे
- यामध्ये मोठ्या लिपीतील आणि लहान लिपीतील अक्षरे समाविष्ट असली पाहिजेत
- त्यामध्ये एक संख्या असली पाहिजे
- त्यामध्ये एक विशिष्ट वर्ण असला पाहिजे (उदा. @#$%)
व्यवहार ID सह यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाल्यांनतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.