1. अवलोकन
PAN कार्डच्या नवीन अर्जदारांसाठी, अर्जाच्या टप्प्यात आधार- PAN स्वयंचलितपणे लिंक केले जाते. विद्यमान PAN धारकांसाठी, ज्यांना 01-07-2017 रोजी किंवा त्यापूर्वी PAN देण्यात आले होते त्यांना आधारसह PAN लिंक करणे अनिवार्य आहे. लिंक आधार सेवा ही वैयक्तिक करदात्यांसाठी (ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या आणि नोंदणीकृत नसलेल्या दोन्हींसाठी) उपलब्ध आहे. आपण 30जून 2023 पर्यंत आधारसोबत PAN लिंक केले नाही तर आपले PAN निष्क्रिय होईल. तथापि, सूट असलेल्या श्रेणीत येणारे लोक PAN निष्क्रिय होण्याच्या परिणामांच्या अधीन राहणार नाहीत.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व शर्ती:
- वैध PAN
- आधार क्रमांक
- वैध मोबाईल नंबर
3. ई-फाइलिंग पोर्टलवर आधार PAN लिंक करण्याचे शुल्क कसे भरावे
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल होम पेजला भेट द्या आणि क्विक लिंक्सविभाग यामधील आधार लिंक करा वर क्लिक करा. वैकल्पिकरित्या, ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि प्रोफाइल विभागातील आधार लिंक करा वर क्लिक करा.
स्टेप 2: आपला PAN आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
स्टेप 3: कराचे ई पेमेंट याच्या माध्यमातून पैसे देणे पुढे चालू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4: आपला PAN प्रविष्ट करा, PAN ची पुष्टी करा आणि OTP प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
स्टेप 5: OTP पडताळणीनंतर, आपल्याला कराचे ई पेमेंट पेजवर पुननिर्देशित केले जाईल.
स्टेप 6: आयकर टाइल यावरील पुढे जा वर क्लिक करा.
स्टेप 7: संबंधित निर्धारण वर्ष आणि पेमेंटचा प्रकार इतर प्राप्त्या (500) म्हणून निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 8: लागू असलेली रक्कम इतरांच्या नावे आधी-भरली जाईल. सुरू ठेवा वर क्लिक करा.
आता, चलान तयार होईल. पुढील स्क्रीनवर, आपल्याला पेमेंटची पद्धत निवडावी लागेल. पेमेंटची पद्धत निवडल्यानंतर, आपण पेमेंट करू शकता अशा बँक वेबसाइटवर आपल्याला पुन्हा निर्देशित केले जाईल.
शुल्क भरल्यानंतर, आपण ई-फाइलिंग पोर्टलवरील PAN सह आपले आधार लिंक करू शकता.
4. शुल्क भरल्यानंतर आधार PAN लिंकची विनंती कशी सबमिट करावी
आधार PAN लिंक विनंती लॉग इनच्या नंतर तसेच लॉग इनच्या पूर्वी या दोन्हींमध्ये केली जाऊ शकते.
प्रत्येक पद्धतीसाठीची तपशीलवार स्टेप्स खाली दिली आहेत:
आधार PAN लिंक विनंती सबमिट करा (लॉग इन नंतर):
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल यावर जा > लॉग इन करा > डॅशबोर्डवरील, प्रोफाइल विभागामध्ये आधार PAN सह लिंक करा पर्यायाच्या अंतर्गत, आधार लिंक करा वर क्लिक करा.
किंवा वैकल्पिकरित्या, वैयक्तिक तपशील विभागात आधार लिंक करा वर क्लिक करा.
स्टेप 2:आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण करा वर क्लिक करा.
आधार PAN लिंक करण्याची विनंती सबमिट करा (लॉग इनपूर्वी):
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होम पेजवर जा आणि क्विक लिंक्स अंतर्गत आधार लिंक करा वर क्लिक करा.
स्टेप 2: PAN आणि आधार प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण करा वर क्लिक करा.
स्टेप 3: आवश्यकतेनुसार अनिवार्य तपशील प्रविष्ट करा आणि आधार लिंक करा वर क्लिक करा.
स्टेप 4: मागील स्टेपमध्ये नमूद केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि प्रमाणित करा वर क्लिक करा.
स्टेप 5: आधार लिंक करण्यासाठीची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे, आता आपण आधार-PAN लिंकची स्थिती तपासू शकता.
परिस्थिती 1: पेमेंट तपशीलाची ई-फाइलिंग पोर्टलवर पडताळणी केली नसेल तर.
स्टेप 1 : PAN आणि आधारचे प्रमाणीकरण केल्यानंतर आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की
” पेमेंटचे तपशील सापडले नाहीत". आधार PAN लिंक करण्याची विनंती सादर करण्यासाठी शुल्क भरण्याची पूर्व-आवश्यकता असल्याने शुल्क भरण्यासाठी कराचे ई पेमेंट याद्वारे पैसे भरणे पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: आपण आधीच शुल्क भरले असल्यास, 4-5 कामकाजाच्या दिवसांची प्रतीक्षा करा. त्यानंतर, आपण विनंती सबमिट करू शकता.
टीप : कृपया आपण आपल्या PAN सह आपले योग्य आधार लिंक केले आहे याची खात्री करा.
आधार आणि PAN आधीपासून लिंक केलेले असेल किंवा इतर कोणत्या आधारशी लिंक केलेले असेल किंवा त्याउलट असेल तर आपल्याला खालील त्रुटी मिळतील:
परिस्थिती 2: PAN आधीच आधारशी किंवा इतर दुसऱ्या आधारसह लिंक केलेले आहे:
आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याची आणि चुकीच्या PAN सह आपला आधार डिलिंक करण्याची विनंती सबमिट करण्याची आवश्यकता असू शकते.
आपल्या AO चे संपर्क तपशील जाणून घेण्यासाठी, https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO (लॉग इन पूर्व) ला भेट द्या
किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/dashboard/myProfile/jurisdictionDetail (लॉग इन नंतर)
परिस्थिती 3: आपण चलानचे पेमेंट केले असेल आणि ई-फाइलिंग पोर्टलवर पेमेंट व तपशीलाची पडताळणी केली असेल.
स्टेप 1:PAN आणि आधारचे प्रमाणीकरण केल्यानंतर आपल्याला पॉप-अप संदेश दिसेल की "आपल्या पेमेंट तपशीलाची पडताळणी झाली आहे". कृपया आधार PAN लिंक करण्याची विनंती सबमिट करण्यासाठी पॉप-अप संदेशावरील पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 2: आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि आधार लिंक करा बटणावर क्लिक करा.
स्टेप 3: आधार PAN च्या लिंकसाठी विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे, आता आपण आधार PAN लिंकची स्थिती तपासू शकता.
5. आधार लिंक करण्याची स्थिती पहा (लॉग इन पूर्व)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर, क्विक लिंक्स अंतर्गत, आधार लिंक करण्याची स्थिती वर क्लिक करा.
स्टेप 2: आपला PAN आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि आधार लिंक करण्याची स्थिती पहा वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, आपल्या आधार लिंक स्थितीच्या संदर्भात संदेश प्रदर्शित केला जाईल.
आधार-PAN लिंक करणे प्रगतीपथावर असल्यास:
आधार-PAN लिंक करणे यशस्वी झाल्यास:
6. आधार लिंक करण्याची स्थिती पहा (लॉग इन नंतर)
स्टेप 1: आपल्या डॅशबोर्डवर,आधार लिंक करण्याची स्थिती वर क्लिक करा.
स्टेप 2: वैकल्पिकरित्या, आपण माझी प्रोफाइल > आधार लिंक करण्याची स्थिती वर जाऊ शकता.
(जर आपला आधार आधीच लिंक असेल तर आधार क्रमांक प्रदर्शित केला जाईल. आधार लिंक केले नसेल तर, आधार लिंक करा अशी स्थिती दर्शविली जाईल.
टीप:
- प्रमाणीकरण करणे अयशस्वी झाल्यास, स्थिती पेजवर आधार लिंक करा वर क्लिक करा, आणि आपल्याला आपला PAN आणि आधार जोडण्यासाठी स्टेप्सची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.
- जर आपला PAN आणि आधार क्रमांक जोडन्यासाठी विनंती सत्यापन करण्यासाठी UIDAI कडे प्रलंबित असेल तर, आपल्याला नंतर स्थिती तपासणे आवश्यक आहे.
- आधार आणि PAN डिलिंक करण्यासाठी तुम्हाला अधिकारक्षेत्र AO शी संपर्क साधावा लागेल, जर:
- आपले आधार इतर PANशी जोडले गेले आहे
- आपले PAN इतर आधारसोबत जोडले गेले आहे
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, आपल्या आधार लिंक स्थितीच्या संदर्भात संदेश प्रदर्शित केला जाईल.
अस्वीकरण:
ही उपयोगकर्ता पुस्तिका केवळ माहिती आणि सामान्य मार्गदर्शनाच्या उद्देशाने जारी केली जाते. करदात्यांना त्यांच्या प्रकरणांना लागू होणारी अचूक माहिती, व्याख्या, स्पष्टीकरण यासाठी संबंधित परिपत्रके, अधिसूचना, नियम आणि आयकर कायद्यातील तरतूद पाहण्याचा सल्ला दिला जातो. या उपयोगकर्ता पुस्तिकेच्या आधारे केलेल्या कृती आणि / किंवा निर्णयांसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.