1. अवलोकन
माझी प्रोफाईल/ प्रोफाईल अपडेट सेवा ई-फाईलिंग पोर्टलच्या सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना पोर्टल वर लॉग इन केल्या नंतर त्यांची प्रोफाईल माहिती पाहण्यासाठी आणि एडिट/ अपडेट करण्यासाठी उपलब्ध आहे. ही सेवा तुम्हाला वेगवेगळ्या वापरकर्त्याच्या प्रकारानुसार प्रोफाईल माहिती एडिट / अपडेट करण्याची अनुमती देते:
- PAN तपशील, TAN तपशील, आधार क्रमांक यासारखे आपले वैयक्तिक तपशील पहा / अपडेट करा
- मोबाईल क्रमांक, ई-मेल ID आणि पत्ता यासारखे तुमचे संपर्क तपशील पहा / अपडेट करा
- तुमचे इतर तपशील पहा / अपडेट करा जसे की:
- बँक खाते आणि डिमॅट खाते तपशील
- DSC ची नोंदणी करा
- ई-फाइलिंग वॉल्ट उच्च सुरक्षा
- PAN – AO कार्यक्षेत्र तपशील
- आयकर विवरणपत्र / फॉर्मसाठी प्रतिनिधी निर्धारिती आणि अधिकृत स्वाक्षर्यांचे तपशील
- उत्पन्नाच्या स्रोताचे तपशील
- नोंदणी आणि प्रमाणपत्रे
- प्रशंसा आणि बक्षिसे
- पोर्तुगीज नागरी संहिता प्रयोज्यता
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वावश्यकता
- वैध वापरकर्ता ID आणि पासवर्डसहित ई-फाईलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्ता
3. क्रमानुसार मार्गदर्शक
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 2: डॅशबोर्ड पेजवर, आपल्या डॅशबोर्डच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, आपल्या नावावर क्लिक करा आणि माझी प्रोफाइल वर क्लिक करा.
स्टेप 3: माझी प्रोफाइल या पेजवर, आपण पुढील माहिती पाहू शकता आणि/किंवा अपडेट करू शकता:
| नागरिकत्व, निवासी तपशील, पासपोर्ट क्रमांक यासारखा वैयक्तिक तपशील | विभाग 3.1चा संदर्भ घ्या |
| मोबाईल क्रमांक, ई-मेल ID आणि पत्ता यासारखा संपर्क तपशील | विभाग 3.2चा संदर्भ घ्या |
| उत्पन्नाच्या स्रोताचे तपशील | विभाग 3.3चा संदर्भ घ्या |
| पोर्तुगीज नागरी संहिता प्रयोज्यता | विभाग 3.4चा संदर्भ घ्या |
| आयकर विवरणपत्रे / फॉर्मसाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता |
आयकर विवरणपत्रे / फॉर्मसाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता वर क्लिक करा. तपशील अपडेट करण्यासाठी एडिट वर क्लिक करा आणिजतन करा वर क्लिक करा. टीप: अधिकृत प्रतिनिधी / स्वाक्षरीकर्ता कसा नोंदणी करावा हे शिकण्यासाठी प्रतिनिधी पुस्तिका म्हणून अधिकृत आणि नोंदणीचा संदर्भ घ्या. |
| प्रतिनिधी निर्धारिती |
प्रतिनिधी निर्धारिती वर क्लिक करा. तपशील अपडेट करण्यासाठी एडिट वर क्लिक करा आणिजतन करा वर क्लिक करा. टीप: प्रतिनिधी निर्धारितीची नोंदणी कशी करावी हे शिकण्यासाठी प्रतिनिधी वापरकर्ता पुस्तिका म्हणून अधिकृत आणि नोंदणीचा संदर्भ घ्या. |
| सुरक्षित प्रवेश संदेश सेट करा ( तुम्ही ई-फाईलिंग पोर्टलमध्ये लॉग इन करता तेव्हा प्रत्येक वेळी एक वैयक्तिक संदेश प्रदर्शित केला जाईल. तुम्ही तुमचा वापरकर्ता ID आणि पासवर्ड प्रविष्ट करत असलेली वेबसाईट खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी वैयक्तिक संदेश हा एक उपयुक्त मार्ग आहे. |
सुरक्षित प्रवेश संदेशावर क्लिक करा. सुरक्षित प्रवेश संदेश पेजवर, मजकूरबॉक्समध्ये वैयक्तिक संदेश प्रविष्ट करा आणि जतन करा वर क्लिक करा . |
| आधार OTP लॉग इन | एकल घटक प्रमाणीकरणासाठी आधार OTP द्वारे तुमचा लॉगइन सक्षम करण्यासाठी आधार OTP लॉग इन वर क्लिक करा. आधार लॉग इन पेज वर, होय निवडा आणि जतन करा वर क्लिक करा आणि आधार OTP द्वारे लॉग इन सक्षम करण्यात येईल. |
| कार्यक्षेत्र तपशील | कार्यक्षेत्र तपशील पाहण्यासाठी कार्यक्षेत्र तपशील वर क्लिक करा |
| नोंदणी आणि प्रमाणपत्रे | ई-PAN तपशील, स्टार्टअप ओळख तपशील आणि ई-फाईल केलेल्या फॉर्मचे तपशील पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी नोंदणी आणि प्रमाणपत्रे यावर क्लिक करा. |
| कौतुक आणि बक्षिसे | कौतुकाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी कौतुक आणि बक्षिसे वर क्लिक करा |
| बँक खात्याचा तपशील |
बँक खात्याचा तपशील, यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला बँक खाते सेवा पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही बँक खात्यातून EVC जोडू / काढू शकता किंवा सक्षम/ बंद करू शकता. |
| डिमॅट खात्याचा तपशील |
डिमॅट खात्याचा तपशील, यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला डिमॅट खात्याच्या सेवा पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही डिमॅट खात्यातून EVC जोडू / काढू शकता किंवा सक्षम/ बंद करू शकता. |
| DSC ची नोंदणी करा किंवा DSC पहा आणि अपडेट करा | DSC ची नोंदणी करा वर क्लिक केल्यावर, तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही हे करू शकता:
नोट: अधिक जाणून घेण्यासाठी DSC नोंदणी करा वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या. |
| ई-फाईलिंग वॉल्ट-उच्च सुरक्षा |
ई-फाईलिंग वॉल्ट-उच्च सुरक्षा वर क्लिक केल्यावर, तुम्हाला ई-फाईलिंग वॉल्ट-उच्च सुरक्षा पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही तुमच्या ई-फाईलिंग खात्यासाठी प्रमाणीकरणाची अतिरिक्त पातळी जोडू शकता. |
| स्टॅटिक पासवर्ड |
स्टॅटिक पासवर्ड जनरेट करण्यासाठी स्टॅटिक पासवर्ड वर क्लिक करा. |
टीप:
- बाह्य एजन्सी वैयक्तिक तपशील जसे की बाह्य एजन्सीचा प्रकार, सेवेचा प्रकार,संस्थेचा PAN, संस्थेचा TAN, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल ID संपादित/अपडेट करू शकते.
- ERI आणि TIN 2.0 नोंदणीधारक केवळ त्यांचे वैयक्तिक तपशील पाहू शकतात आणि कोणतेही वैयक्तिक तपशील एडिट / अपडेट करू शकणार नाहीत.
- ERI, बाह्य एजन्सी आणि TIN 2.0नोंदणीधारक त्यांचे संपर्क तपशील अपडेट करू शकतात.
- ERI, बाह्य एजन्सी त्यांच्या संबंधित प्रोफाईलद्वारे सेवा जोडू किंवा काढू शकतात.
- अधिक जाणून घेण्यासाठी संबंधित वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
3.1 वैयक्तिक तपशील अपडेट करण्यासाठी
स्टॅप 1: माझी प्रोफाइल पेजवर, वैयक्तिक तपशील अपडेट करण्यासाठी संपादित करा वर क्लिक करा.
टीप: फक्त नागरिकत्व आणि निवासी स्थिती बदलता येतात.
स्टेप 2: इच्छित तपशील एडिट केेल्या नंतर, जतन करा वर क्लिक करा ेे
टीप: कृपया लक्षात घ्या की वापरकर्त्याच्या प्रकारानुसार काही तपशील एडिट करता येणार नाहीत.
3.2 प्राथमिक आणि द्वितीय संपर्क तपशील अपडेट करण्यासाठी ( मोबाईल क्रमांक आणि ई-मेल ID)
(तुम्ही आधार, PAN किंवा बँक तपशीलानुसार तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट देखील करू शकता)
स्टेप 1: माझी प्रोफाईल या पेजवर, संपर्क तपशील अपडेट करण्यासाठी एडिट क्लिक करा.
स्टेप 2: बँक / आधार / PAN तपशीलांनुसार मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि ई-पडताळणी करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करा.
स्टेप 3a: आपल्या संपर्क तपशीलांची पडताळणी करा पेजवर, प्राथमिक आणि द्वितीय मोबाइल नंबरवर प्राप्त झालेले दोन वेगवेगळे 6-अंकी OTP आणि दुसरा प्राथमिक आणि द्वितीय ईमेल ID वर पाठवलेला OTP प्रविष्ट करा. OTP प्रविष्ट केल्यानंतर आणि “सबमिट करा आणि पडताळणीसाठी पुढे जा” वर क्लिक करा.
स्टेप 3b: ई-पडताळणी पेजवर, आपल्याला ज्या पर्यायाद्वारे विवरणपत्राची ई-पडताळणी करायची आहे तो पर्याय निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: आपण असे अनिवासी असाल ज्यांच्याकडे PAN नाही आणि ते असणे आवश्यक नाही असे असल्यास, प्रक्रियेतील स्टेप 3B आपल्यासाठी लागू होणार नाही.
3.3. उत्पन्नाचा स्रोत अपडेट करण्यासाठी (केवळ करदात्यांसाठी)
स्टेप 1: माझी प्रोफाईल या पेजवरील, उत्पन्नाच्या स्त्रोत यावर क्लिक करा.
स्टेप 2: जर कोणतेच तपशील जोडले नसेल, तर तपशील जोडा वर क्लिक करा.
टीप: उत्पन्नाचा स्त्रोत भरलेला आहे आणि तुम्हाला तो तपशील अपडेट करायचा असेल, तर एडिट करा वर क्लिक करा. जर तुम्हाला आधीच समाविष्ट केलेल्या उत्पन्नाचा स्रोत हटवायचा असेल, तर हटवा वर क्लिक करा आणि तुमच्या प्रोफाईल मधून तपशील हटविले जातील.
स्टेप 3: ड्रॉपडाऊन मधून उत्पन्नाचा स्रोत (पगारदार / निवृत्तीवेतनधारक, घर मालमत्ता, व्यापार / व्यवसाय, शेती, इतर) निवडा.
स्टेप 4: ड्रॉपडाउनमधून पर्याय निवडल्यानंतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि समाविष्ट करा वर क्लिक करा.
- तुम्ही पगारदार /निवृत्तीवेतनधारक निवडले, तर तपशील प्रविष्ट करा जसे की नियोक्त्याचे TAN / निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरण, रोजगाराचे स्वरूप, नियोक्ता / निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरणाचे नाव आणि रोजगाराचा कालावधी
- तुम्ही व्यापार / व्यवसायनिवडला, तर तुम्ही व्यापार / व्यवसायाशी संबंधित प्रकारची संघटनानिवडू शकता, व्यावसायिक तपशील आणि व्यवसायाचा पत्ताप्रविष्ट करू शकता.
- तुम्ही घर मालमत्ता निवडले, तर तुम्ही मालमत्तेची मालकी (जसे की स्वतःची), पत्ता, घराच्या मालमत्तेचा प्रकार (स्वतः व्यापित / भाडेतत्वावर देणे/ भाड्याने दिले म्हणून मानले जाईल), मालकाची टक्केवारी, इतर सह-मालकांची मालकी आणि सह-मालकांचा तपशील जसे की निवासी स्थिती, PAN तपशील, आधार तपशील, नाव आणि मालकाची टक्केवारीयासारखा तपशील प्रविष्ट करू शकता.
टीप: तुम्ही उत्पन्नाचे अनेक स्रोत समाविष्ट करू शकता. उत्पन्नाचे सर्व स्रोत समाविष्ट करण्यासाठी तपशील समाविष्ट करा वर क्लिक करा.
3.4 पोर्तुगीज नागरी कोड उपयोगिता अपडेट करण्यासाठी
स्टेप 1: माझे प्रोफाईलया पेजवरील, पोर्तुगीज नागरी कोड उपयोगिता वर क्लिक करा.
टीप: पोर्तुगीज नागरी कोड म्हणजे काय? यावर क्लिक करा. हे तुम्हाला लागू आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी.
स्टेप 2: होय निवडा, जर कलम 5A नुसार पोर्तुगीज नागरी कोडद्वारे संचालित केले असेल तर.
स्टेप 3: तपशील प्रविष्ट करा जसे की PAN, आधार आणि तुमच्या जोडीदाराचे नाव आणि समाविष्ट करा वर क्लिक करा.
टीप : वैयक्तिक व्यक्ती सोडून करदाते त्यांच्या प्रोफाईलमध्ये खालील तपशील देखील प्रविष्ट / अपडेट करू शकतात:
| करदात्याची श्रेणी | तपशील |
| HUF | मुख्य व्यक्तीचा तपशील |
| फर्म | व्यवस्थापन भागीदार / नियुक्त भागीदराचा तपशील |
| कंपनी | मुख्य व्यक्तीचे तपशील, पद, मुख्य संपर्क, भागधारक तपशील |
| AOP | सदस्य तपशील, मुख्य अधिकारी तपशील |
| न्यास | विश्वस्तांचा तपशील |
| AJP, स्थानिक प्राधिकरण, कर कपात करणारे आणि कर वसुली करणारे, सरकार | प्रधान अधिकाऱ्याचा तपशील |
| CA | सदस्यता क्रमांक, नोंदणीची तारीख यासह व्यापार / व्यावसायिक तपशील |