1. अवलोकन
इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (EVC) जनरेट करा सेवा केवळ ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी EVC जनरेट करण्यासाठी उपलब्ध आहे. ही सेवा आपल्याला याची परवानगी देते:
- यादीतील माहीतीची ई-पडताळणी करा (वैधानिक फॉर्म, आयकर विवरणपत्र फॉर्म, परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती आणि कोणत्याही सूचनासाठी प्रतिसाद)
- ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा
- पासवर्ड रिसेट करा
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वावश्यकता
- ई-फाइलिंग पोर्टलवर वैयक्तिक करदाता म्हणून नोंदणीकृत वापरकर्ता ज्याच्याकडे वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड आहे
- ई-फाइलिंग पोर्टलमध्ये (बँक खाते पर्यायासाठी) प्रमाणित आणि EVC सक्षम बँक खाते
- ई-फाइलिंग पोर्टलमध्ये (डिमॅट खाते पर्यायासाठी) प्रमाणित आणि EVC सक्षम डीमॅट खाते
- बँक खात्यासह जोडला गेलेला PAN (नेट बँकिंग पर्यायासाठी)
- वैध डेबिट कार्ड (बँक ATM पर्यायासाठी)
- संबंधित बँक खाते PAN सह लिंक असेल पाहिजे आणि हाच PAN ई-फाइलिंग वर नोंदणीकृत असला पाहिजे (बँक ATM पर्यायासाठी)
3. क्रमानुसार- मार्गदर्शक
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर, क्लिक करा सेवा > EVC जनरेट करा.
स्टेप 3: EVC जनरेट करा पेजवर, PAN / TAN निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.
स्टेप4: EVC जनरेट करा पेजवर. आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड(EVC) कसा जनरेट करावा ते निवडा?
आपण खालील पद्धती वापरुन EVC तयार करू शकता:
| नेट बँकिंग | विभाग 4.1 चा संदर्भ घ्या |
| बँक खाते | विभाग 4.2 चा संदर्भ घ्या |
| डीमॅट खाते | विभाग 4.3 चा संदर्भ घ्या |
| बँक ATM | विभाग 4.4 चा संदर्भ घ्या |
4.1 नेट बँकिंगद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1: EVC जनरेट करा पेजवर, नेट बँकिंगद्वारे निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.
स्टेप2: ई-फाइलिंग लॉग इन द्वारे नेट बँकिंग पेजवर, बँकेचे नाव निवडा.
टीप: जेव्हा आपल्या बँकेचे नेट बँकिंग लॉग इन पेज दिसेल तेव्हा आपण ई-फाइलिंग पोर्टलमधून लॉग आऊट व्हाल.
स्टेप 3: आपल्या बँकेच्या नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा पेजवर, आपल्या बँकेने प्रदान केलेले आपले वापरकर्ता नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करा
स्टेप 4: आपल्या नेट बँकिंग वेबसाइटवर, ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
टीप: आपण नेट बँकिंगच्या वेबसाइटवरून लॉग आउट व्हाल आणि आपल्या ई-फाइलिंग खात्यात लॉग इन व्हाल.
स्टेप 5: आपल्या डॅशबोर्ड वर, क्लिक करा सेवा > EVC जनरेट करा.
आपल्या ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर आपल्याला जनरेट झालेला EVC प्राप्त होईल आणि यशस्वी झाल्याचा संदेश देखील दिसेल.
4.2. बँक खात्याद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1: EVC जनरेट करा पेजवर, बँक खात्याद्वारे हे निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.
यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवला जाईल आणि आपल्या बँकेद्वारे पडताळणी केलेल्या मोबाइल नंबरवर आणि ईमेल ID वर आपल्याला EVC प्राप्त होईल.
टीप:
- बँक खात्याद्वारे EVC केवळ तेव्हाच जनरेट करता येतो जेव्हा जोडलेले बँक खाते प्रमाणित केलेले आणि EVC सक्षम असेल.
- जर बँकेने पडताळणी केली असेल तरच आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर किंवा ईमेल ID वर EVC प्राप्त होईल.
4.3. डिमॅट खात्याद्वारे EVC जनरेट करणे
स्टेप 1: EVC जनरेट करा पेजवर, डिमॅट खात्याद्वारे हे निवडा आणि चालू ठेवा यावर क्लिक करा.
यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवला जाईल आणि आपल्याला NSDL / CSDL द्वारे पडताळणी केलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर EVC प्राप्त होईल.
टीप:
- डिमॅट खात्याद्वारे EVC केवळ तेव्हाच जनरेट करता येते जेव्हा जोडलेले डिमॅट खाते प्रमाणित केलेले आणि EVC सक्षम असेल.
- जर NSDL/CSDL द्वारे पडताळणी केली असेल तरच आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर किंवा ईमेल ID वर EVC प्राप्त होईल.
4.4. बँक ATM पर्यायाद्वारे EVC जनरेट करणे (ऑफलाइन पद्धतीने)
स्टेप 1: आपल्या बँकेच्या ATM मध्ये जा आणि आपले डेबिट कार्ड स्वाईप करा.
स्टेप 2: पिन प्रविष्ट करा.
स्टेप 3: आयकर फाइल करण्यासाठी EVC जनरेट करा हे निवडा.
ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाइल नंबरवर आणि ईमेल ID वर EVC पाठवण्यात येईल.
टीप:
- आपला PAN संबंधित बँक खात्याशी लिंक असला पाहिजे आणि हाच PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असला पाहिजे.
- बँकेच्या ATM द्वारे EVC जनरेट करता येईल अशा बँकांची यादी - अॅक्सिस बँक लि., कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिन्द्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया.