इन्स्टंट ई-PAN उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
इन्स्टंट ई-PAN सेवा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यांना कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) देण्यात आलेला नाही, पण त्यांच्याकडे आधार आहे.ही पूर्व-लॉग इन सेवा आहे, जिथे आपण खालील पर्याय करू शकता:
- आधार आणि आधारसोबत लिंक केलेल्या आपल्या मोबाइल नंबरच्या मदतीने, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिटल पद्धतीने साइन इन केलेले PAN विनामूल्य प्राप्त करा,
- आधार ई-KYC अनुसार PAN तपशील अपडेट करा,
- वितरित PAN नंतर/अपडेट केल्यानंतर, ई-KYC तपशीलांच्या आधारे ई-फाईलिंग खाते तयार करा.
- प्रलंबित ई-PAN विनंतीची स्थिती तपासा / ई-फाईलिंग पोर्टलवर लॉग इन करण्याआधी किंवा नंतर ई-PAN डाऊनलोड करा.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता
- ज्या व्यक्तींना PAN वितरित केलेले नाही
- वैध आधार आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- विनंतीच्या तारखेपासून वापरकर्ता अल्पवयीन नाही; आणि
- आयकर कायद्याच्या कलम 160 अंतर्गत प्रतिनिधी निर्धारितीच्या व्याख्येनुसार वापरकर्त्याचा समावेश नाही.
3. क्रमानुसार मार्गदर्शक
3.1 नवीन ई-PAN जनरेट करा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा, इन्स्टंट ई-PAN वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-PAN पेजवर, नवीन ई-PAN मिळवा वर क्लिक करा.

स्टेप 3: नवीन ई-PAN मिळवा पेजवर, आपला 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा, मी पुष्टी करत आहे हा चेकबॉक्स निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- आधार आधीपासून वैध PAN सह लिंक केलेला असल्यास, खालील संदेश प्रदर्शित केला जातो - प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आधीच PAN सह लिंक आहे.
- आधार कोणत्याही मोबाइल नंबरशी लिंक केलेला नसल्यास, खालील संदेश प्रदर्शित केला जातो - प्रविष्ट केलेला आधार क्रमांक कोणत्याही सक्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेला नाही.
स्टेप 4: OTP प्रमाणीकरण पेजवर, मी संमती अटी वाचल्या आहेत आणि पुढे जाण्यास सहमती आहे, वर क्लिक करा. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 5: OTP प्रमाणीकरण पेजवर, आधारसोबत लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6 -अंकी OTP प्रविष्ट करा, UIDAI सोबत आधार तपशीलाचे प्रमाणीकरण करण्यासाठी चेकबॉक्स निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
- स्क्रीनवरील OTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
- OTP पुन्हा पाठवा यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.
स्टेप 6: आधार तपशील प्रमाणित करा पेजवर, मी स्वीकारत आहे चेकबॉक्स निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- (आपल्या आधारसह नोंदणीकृत) ईमेल ID लिंक /प्रमाणित करणे पर्यायी आहे.
- आपण आधारमध्ये आपला ईमेल ID अपडेट केला असेल परंतु त्याचे प्रमाणीकरण केले गेला नसेल, तर ईमेल प्रमाणित करा वर क्लिक करा. ईमेल ID प्रमाणित करा पेजवर, आधारसोबत लिंक केलेल्या आपल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
- आपण आधारमध्ये आपला ईमेल ID अपडेट केला नसल्यास, ईमेल ID लिंक करा वर क्लिक करा. ईमेल ID प्रमाणित करा पेजवर, आधारशी लिंक केलेल्या आपल्या मोबाइल नंबरवर मिळालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.
यशस्वीपणे दाखल केल्यानंतर, पोचपावती नंबर सह यशस्वी झाल्याचा संदेश प्राप्त होतो. भविष्यातील संदर्भांसाठी कृपया पोचपावती ID नोंद करून ठेवा. तसेच आपल्याला आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर देखील पुष्टीकरणाचा संदेश येईल.

3.2 आधार ई-KYC अनुसार PAN तपशील अपडेट करा
स्टेप 1 : ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि इन्स्टंट ई-PAN वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-PAN पेजवर, PAN अपडेट करा वर क्लिक करा.

स्टेप 3: PAN तपशील अपडेट करा पेजवर, आपला 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा, मी पुष्टी करत आहे हा चेकबॉक्स निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- आधार आधीपासून वैध PAN सह लिंक केलेला असल्यास, खालील संदेश प्रदर्शित केला जातो - प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आधीच PAN सह लिंक आहे.
- आधार कोणत्याही मोबाइल नंबरशी लिंक केलेला नसल्यास, खालील संदेश प्रदर्शित केला जातो - प्रविष्ट केलेला आधार क्रमांक कोणत्याही सक्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेला नाही.
स्टेप 4: OTP प्रमाणीकरण पेजवर, आधारसह नोंदणीकृत आपल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
- स्क्रीन वरीलOTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
- OTP पुन्हा पाठवा यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.
स्टेप 5: OTP प्रमाणीकरणानंतर, PAN सह नोंदणीकृत तपशीलांसह आधार ई-KYC तपशील प्रदर्शित केले जातात. आधार ई-KYC अनुसार अपडेट करण्यासाठी तपशील निवडा आणि आधार तपशीलानुसार अपडेट करण्यासाठी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

कृपया लक्षात घ्या की आधारच्या तपशीलानुसार खालील तपशील अपडेट केले जाऊ शकतात:
- फोटो
- नाव
- जन्म तारीख (जर आपल्या पॅनमध्ये फक्त जन्माचे वर्ष असेल तर, पॅनमध्ये अपडेट करण्यापूर्वी आपल्याला आधारमध्ये ते अपडेट करावे लागेल).
- मोबाईल नंबर (तो डिफॉल्टनुसार अपडेट केला आहे )
- ईमेल आय.डी (आपल्याला पॅन तपशीलामध्ये अपडेट करण्यासाठी ईमेल आय.डी सत्यापित करणे आवश्यक आहे )
- पत्ता
स्टेप 6: आधार तपशीलानुसार आपल्याला अपडेट करायचे असलेले सर्व तपशील निवडल्यानंतर, पुष्टी करा वर क्लिक करा.

पुष्टीकरण झाल्यांनतर, पोचपावती नंबरसह यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवला जाईल. भविष्यातील संदर्भांसाठी पोचपावती ID नोंद करून ठेवा.आपल्याला आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर देखील पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

3.3 प्रलंबित ई-PAN विनंतीची स्थिती तपासा / ई-फाइलिंग पोर्टलवर खाते तयार करा / ई-PAN डाउनलोड करा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि इन्स्टंट ई-PAN वर क्लिक करा.

स्टेप 2: ई-PAN पेजवर, PAN ची स्थिती तपासा/डाउनलोड करा पर्यायावर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 3: PAN ची स्थिती तपासा/डाउनलोड करा पेज वर, आपला 12-अंकी आधार प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 4: OTP प्रमाणीकरण पेजवर, आधारसह नोंदणीकृत आपल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला 6 - अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
- स्क्रीन वरीलOTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
- OTP पुन्हा पाठवा यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.
स्टेप 5: आपल्या ई-PAN विनंती पेजच्या सध्याच्या स्थितीवर, आपण आपल्या ई-PAN विनंतीची स्थिती पाहू शकाल. नवीन ई-PAN जनरेट केले गेले असल्यास आणि आपल्याला जारी केले असल्यास, ते पाहण्यासाठी ई-PAN पाहणे वर किंवा डाउनलोड करण्यासाठी ई-PAN डाउनलोड करा वर क्लिक करा. ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ई-फाइलिंग खाते तयार करा वर क्लिक करा.

टीप: आपला ई-PAN तयार करताना किंवा PAN तपशील अपडेट करताना आपला ईमेल ID (आपल्या आधार KYC अनुसार) प्रमाणित केला नसेल तर नोंदणी करताना तसे करणे अनिवार्य आहे.
3.4 ई-PAN डाउनलोड करा - लॉग इन नंतर
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

टीप: ई-PAN प्राप्त केल्यानंतर आपल्याला ई- फाइलिंग पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. केवळ यशस्वी नोंदणी नंतरच, आपण पोर्टलमध्ये लॉग इन करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी ई-फाइलिंग (करदाता) यासाठी नोंदणीवरील उपयोगकर्ता पुस्तिकेवर जा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्डवर, सेवा > ई-PAN पहा/ डाउनलोड करा वर क्लिक करा.

स्टेप 3: आधार क्रमांक प्रविष्ट करा पेजवर, आपला 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 4: OTP प्रमाणीकरण पेजवर, आधारसह नोंदणीकृत आपल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला 6 - अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
- स्क्रीन वरीलOTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
- OTP पुन्हा पाठवा यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.
स्टेर 5: ई-PAN पेज पहा/डाउनलोड करा पेजवर, आपण आपल्या ई-PAN विनंतीची स्थिती पाहू शकाल. नवीन ई-PAN जनरेट केले गेले असल्यास आणि आपल्याला जारी केले असल्यास, ते पाहण्यासाठी ई-PAN पाहणे वर किंवा डाउनलोड करण्यासाठी ई-PAN डाउनलोड करा वर क्लिक करा.

4. संबंधित विषय
- (करदाता) ई-फाईलिंगसाठी नोंदणी करा
- डॅशबोर्ड आणि कार्यसूची
- लॉग इन करा
- आपला पॅन PAN सत्यापित करा
- आधार लिंक करा
- आपले पॅन जाणून घ्या