चलान सुधारणा विनंती याबाबत उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

आयकर ई-फायलिंग पोर्टलवर आता पॅनधारकांना कर भरण्याच्या वेळी चुकीने नमूद झालेल्या महत्त्वाच्या चलान तपशीलांमध्ये थेट दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेद्वारे करदाता पुढील महत्त्वाच्या बाबींमध्ये बदल करू शकतात:

  • कर वर्ष,
  • निर्धारण वर्ष (A.Y.)
  • लागू कर (मुख्य शीर्ष)
  • पेमेंटचा प्रकार (लघु शीर्ष)

या दुरुस्ती पर्यायांमुळे चलानाची माहिती करदात्याच्या खात्याशी योग्य प्रकारे जोडली जाते. त्यामुळे जमा झालेला कर वेळेवर दिसून येतो आणि प्रक्रिया विनाकारण विलंब न होता पूर्ण होते. टीप: ITNS 281N संबंधीची दुरुस्ती (TAN द्वारे दुरुस्ती) ही सुविधा ट्रेसेस पोर्टलवर (www.tdscpc.gov.in) उपलब्ध आहे.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी

चलान दुरुस्तीची विनंती फक्त लॉगिननंतर (ई-फायलिंग पोर्टलमध्ये लॉगिन केल्यानंतर) उपलब्ध असलेल्या सुविधेद्वारेच सबमिट करता येते.

पूर्वअटी

  • ई-फायलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत पॅन वापरकर्ता होम | आयकर विभाग
  • सुधारणा करावयाचे चलान प्रक्रियेदरम्यान वापरले जाऊ नये
  • चलान सुधारणेची विनंती इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे प्रलंबित नसावी

टीप:

  1. सध्या ई-फायलिंग पोर्टलवर निर्धारण वर्ष 2020-21 आणि त्यानंतरच्या वर्षांशी संबंधित चलानांमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यापूर्वीच्या निर्धारण वर्षांशी संबंधित चलानांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी कृपया संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
  2. ई-फायलिंग पोर्टलवर एखाद्या चलानासाठी चलान दुरुस्तीची विनंती केवळ एकदाच करता येते. चलानामध्ये पुढील कोणतीही दुरुस्ती करावयाची असल्यास, वापरकर्त्याने संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
  3. ई-फायलिंग पोर्टलवर मुख्य शीर्ष (लागू कर) आणि लघु शीर्ष (पेमेंटचा प्रकार) यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठीची चलान दुरुस्ती विनंती, चलान जमा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सादर करता येईल.
  4. ई-फायलिंग पोर्टलवर निर्धारण वर्ष किंवा कर वर्ष बदलण्यासाठीची चलान दुरुस्ती विनंती, चलान जमा केल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत सादर करता येईल.

3. क्रमवार मार्गदर्शन

चलान दुरुस्ती विनंती तयार करा

विभाग 3.1 पहा.

चलान दुरुस्ती विनंतीची स्थिती तपासा.

विभाग 3.2 पहा

3.1. चलान दुरुस्ती विनंती तयार करा(लॉगिन केल्‍यानंतर)

स्टेप 1: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेले नसल्यास, तर पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय झाला असल्याचा पॉप-अप संदेश दिसेल.

पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आता लिंक करा बटणावर क्लिक करा. अन्यथा पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

स्टेप 2: डॅशबोर्डवर सेवा > चलान दुरुस्ती यावर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: चलान दुरुस्ती पेजवर, नवीन चलान दुरुस्ती विनंती तयार करण्यासाठी“ + चलान दुरुस्ती विनंती तयार करा” या पर्यायावर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 4: चलानामध्ये कोणती दुरुस्ती करायची आहे, त्यासंबंधित योग्य बाब निवडणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार (एकापेक्षा अधिक) पर्याय निवडता येतील. त्यानंतर 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करा.

टीप: खाली दिलेल्या तक्त्याच्या आधारे वापरकर्ता योग्य पर्याय निवडू शकतो.

चलान दुरुस्तीसाठी बाबी

पर्याय

सूचना

दुरुस्तीसाठी उपलब्ध कालमर्यादा

कर वर्षात बदल

कर वर्ष (TY) किंवा

निर्धारण वर्ष (AY)

मूळ चलान कर वर्षाच्या आधारे जनरेट केलेले असल्यास आणि त्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यास, कृपया ‘कर वर्षात बदल करा’ हा पर्याय निवडा.

त्याचप्रमाणे, मूळ चलान निर्धारण वर्षाच्या आधारे जनरेट केलेले असल्यास आणि त्यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास, ‘निर्धारण वर्षात बदल करा’ हा पर्याय निवडा.

चलान जमा केल्याच्या तारखेपासून, म्हणजेच CIN जनरेट झाल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत.

लागू करामध्ये बदल
(लघु शीर्ष)

100 
300
400

चलान दुरुस्तीची विनंती केवळ लघु शीर्षांमध्ये बदल करण्यासाठीच सबमिट करता येते.

100 (अग्रिम कर),

300 (स्वयं निर्धारण कर) 400 (नियमित निर्धारणानुसार मागणी केलेल्या कराचा भरणा)

100, 300 आणि 400 व्यतिरिक्त इतर लघु शीर्षांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास, चलान दुरुस्तीची विनंती संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याकडे सबमिट करावी.

चलान जमा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत.

 

लागू करामध्ये बदल (मुख्य शीर्ष)

निवडलेल्या लघु शीर्षाशी संबंधित योग्य मुख्य शीर्ष निवडा. (उदा. 0020, 0021, 0034, 0023, 0028, 0026, 0023 इ.)

 

 

कृपया चलानातील तपशीलांनुसार लागू असलेले मुख्य शीर्ष निवडा.

चलान जमा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत.

 

Data responsive

स्टेप 5: चलान दुरुस्तीची विनंती तयार करण्यासाठी निर्धारण वर्ष, कर वर्ष किंवा चलान ओळख क्रमांक (CIN) यांपैकी योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. निवडलेल्या पर्यायानुसार दुरुस्तीसाठी उपलब्ध असलेली, अद्याप वापरात न आलेली चलाने प्रदर्शित केली जातील. पुढे जाण्यासाठी 'पुढे सुरू ठेवा' बटणावर क्लिक करा.

Data responsive

टीप: मागील स्क्रीनवर वापरकर्त्याने चलान मूळतः कर वर्षाच्या आधारे तयार केले असल्याचे निवडले असल्यास, या स्क्रीनवर कर वर्ष आणि CIN हे पर्याय उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे, चलान मूळतः निर्धारण वर्षाच्या (AY) आधारे तयार केले असल्यास, निर्धारण वर्ष आणि CIN हे पर्याय निवडीसाठी उपलब्ध असतील. वापरकर्ता थेट CIN (चलान ओळख क्रमांक) प्रविष्ट करू शकतो किंवा ज्या निर्धारण वर्ष/कर वर्षासाठी दुरुस्ती करावयाची आहे त्यानुसार संबंधित चलान निवडू शकतो. कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रणालीला अद्याप वापरात न आलेल्या चलानाची माहिती आढळली नाही, तर खालील त्रुटी संदेश प्रदर्शित होईल.
“कृपया खात्री करा की आपण केवळ अद्याप वापरात न आलेल्या चलानांसाठीच दुरुस्तीची विनंती करत आहात, कारण वापरात आलेली चलाने ऑनलाइन दुरुस्तीसाठी पात्र नाहीत.”

Data responsive

स्टेप 6: संबंधित चलान निवडल्यानंतर 'चलानामध्ये दुरुस्ती' हे पेज उघडेल. या पेजवर वापरकर्ता आवश्यक चलान तपशीलांमध्ये दुरुस्ती करू शकतो. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर "पुढे सुरू ठेवा" बटणावर क्लिक करा.

या पेजवर वापरकर्ता पुढील प्रकारच्या दुरुस्ती करू शकतो:

1. मूळ चलान हे निर्धारण वर्षासाठी तयार केले असल्यास → वापरकर्ता निर्धारण वर्षाच्या जागी कर वर्ष (TY) किंवा निर्धारण वर्ष (AY) निवडू शकतो, (आवश्यक असल्यास) ज्या वर्षासाठी चलान भरले होते ते वर्ष सुधारू शकतो तसेच लागू असल्यास मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष अपडेट करू शकतो.

2. मूळ चलान हे कर वर्षासाठी तयार केले असल्यास → वापरकर्ता कर वर्षाच्या जागी कर वर्ष (TY) किंवा निर्धारण वर्ष (AY) निवडू शकतो, (आवश्यक असल्यास) ज्या वर्षासाठी चलान भरले होते ते वर्ष सुधारू शकतो तसेच लागू असल्यास मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष अपडेट करू शकतो.

Data responsive

कृपया नोंद घ्या : स्टेप 4 मध्ये निवडलेल्या पर्यायानुसार दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध होईल.

स्टेप 7: केलेल्या बदलांचा सारांश पडताळून पहा आणि बदल योग्यरीत्या अपडेट झाले असल्यास "पुढे सुरू ठेवा" वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप8: आता आपल्याला आधार ओटीपी , DSC, EVC किंवा इतर उपलब्ध पर्यायांद्वारे चलान दुरुस्ती विनंतीची ई-पडताळणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया ई-पडताळणी कशी करावी – वापरकर्ता पुस्तिका | आयकर विभाग पहा.

Data responsive


स्टेप 9: ई-पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश प्रदर्शित होईल. चलान दुरुस्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण "चलान दुरुस्ती स्थिती पहा" यावर क्लिक करू शकता.

Data responsive

स्टेप 10: चलान दुरुस्ती विनंतीची स्थिती तपासण्यासाठी, कृपया स्टेप 1 ते स्टेप 3 पुन्हा करा. "चलान दुरुस्ती" पेजवर, आपण केलेल्या चलान दुरुस्ती विनंत्यांचे तपशील आणि स्थिती पाहू शकता. कृपया संदर्भासाठी खालील स्क्रीन पहा.

टीप: चलान दुरुस्तीची स्थिती पोर्टलवर अपडेट होण्यासाठी 7–20 दिवस लागू शकतात.

Data responsive