लॉगिन यूजर उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
लॉगिन सेवा ई-फाइलिंग पोर्टलच्या नोंदणीकृत वापरकर्त्याला ई-फाइलिंग पोर्टलमध्ये आणि पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा वापरण्यास सक्षम करते. ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करण्याच्या विविध पद्धती उपलब्ध आहेत. लॉगिनच्या सर्व पद्धती आणि त्याकरिता प्रविष्ट करावयाची क्रेडेंशियल्स खालील सूचीमध्ये दिली आहेत:
| लॉगिन पद्धत | प्रविष्ट करावयाची क्रेडेंशियल्स |
|---|---|
| नेट बँकिंग (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केली गेली) | वापरकर्ता आयडी व पासवर्ड + दुसऱ्या घटकाच्या प्रमाणीकरणासाठी नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड |
| नेट बँकिंग (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केलेली नाही) | नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड |
| बँक खाते/डीमॅट अकाउंट EVC (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा सक्षम केली गेली) | वापरकर्ता आयडी (पॅन) व पासवर्ड + दुसऱ्या घटकाच्या प्रमाणीकरणासाठी बँक EVC |
| DSC | वापरकर्ता आयडी (पॅन) व पासवर्ड + दुसऱ्या घटकाच्या प्रमाणीकरणासाठी DSC |
| सीए, TAN वापरकर्ता, ERI, बाह्य एजन्सी, ITDREIN वापरकर्ता यांच्यासाठी - वापरकर्ता आयडी वापरून लॉगिन | वापरकर्ता आयडी व पासवर्ड |
टीप: ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय लॉगिन आणि पासवर्ड रीसेटसाठी बहु-घटक प्रमाणीकरण प्रदान करतात. उच्च सुरक्षा पर्याय निवडल्यावर लॉगिन करण्याची प्रक्रिया देखील या उपाययोगकर्ता पुस्तिकेत दिली आहे.
नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये द्वि-घटक प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, वापरकर्ता नाव आणि पासवर्ड व्यतिरिक्त, ई-फाइलिंगमध्ये नोंदणीकृत प्राथमिक मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी किंवा आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे आणखी एक प्रमाणीकरण प्रविष्ट करणे आवश्यक आहे. ज्या करदात्यांना अशा मोबाईल नंबर/ईमेल आयडीचा ॲक्सेस उपलब्ध नसेल, त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सुरुवातीच्या कालावधीत द्वि-घटक प्रमाणीकरण निष्क्रिय ठेवण्यात येईल. या कालावधीत, द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम झाल्यानंतर लॉगिन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी, करदात्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्राथमिक मोबाईल/ईमेल म्हणून अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी
- सामान्य पूर्व अटी
- ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्ता.
- ई-फाइलिंग पोर्टलचा वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड.
- नेट बँकिंग वापरणे
- नेट बँकिंगद्वारे लॉगिन करण्यासाठी (केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी) तुमचा पॅन तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला असावा आणि तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- DSC वापरणे
- वैध आणि सक्रिय DSC असावा तसेच DSC ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा.
- आपण एम-साइनर इंस्टॉल केलेले असावे आणि ते सिस्टीमवर रन होत असावे.
- DSC USB टोकन मशीनमध्ये प्लग इन केलेले असावे.
- DSC भारताच्या प्रमाणित असलेल्या प्राधिकरणाकडून खरेदी केलेले असावे.
- DSC USB टोकन हे क्लास 2 किंवा क्लास 3 प्रमाणपत्राचे असावे.
3. क्रमवार मार्गदर्शक
आवश्यक लॉगिन पद्धतीसाठी खालील सारणीचा संदर्भ घ्या:
| ई-फाइलिंग पासवर्ड वापरून लॉगिन करा | विभाग 3.1 चा संदर्भ घ्या |
| आधार OTP वापरून लॉगिन करणे (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम असलेल्या प्रकरणांसह) | विभाग 3.2 चा संदर्भ घ्या |
| नेट बँकिंग वापरून लॉगिन करणे (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम असलेल्या प्रकरणांसह) | विभाग 3.3 चा संदर्भ घ्या |
| बँक खाते / डीमॅट अकाउंट EVC वापरून लॉगिन करणे (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केलेला असताना) | विभाग 3.4 चा संदर्भ घ्या |
| DSC वापरून लॉगिन करणे (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केलेला असताना) | विभाग 3.5 चा संदर्भ घ्या |
| करदात्यांव्यतिरिक्त इतर वापरकर्त्यांसाठी (सीए, ERI, बाह्य एजन्सी, TAN वापरकर्ते, ITDREIN वापरकर्ते) लॉगिन | विभाग 3.6 चा संदर्भ घ्या |
3.1 ई-फाइलिंग पासवर्ड वापरून लॉगिन करा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा या टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा पॅन प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या सुरक्षित ॲक्सेस संदेश चे पुष्टीकरण करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, ई-फाइलिंग डॅशबोर्ड प्रदर्शित होतो.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आत्ता लिंक करा बटणावर क्लिक करा, अन्यथा 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
3.2 आधार ओटीपी वापरून लॉगिन करा (ई-फाइलिंग व्हॉल्ट पर्याय सक्षम असलेल्या प्रकरणांसह)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा या टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा पॅन प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या सुरक्षित ॲक्सेस संदेश चे पुष्टीकरण करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4: तुमच्याकडे आधीपासून ओटीपी असल्यास, आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर माझ्याकडे आधीपासून ओटीपी आहे हा पर्याय निवडा आणि स्टेप 5 कडे जा. वैध ओटीपी उपलब्ध नसल्यास, ओटीपी जनरेट करा वर क्लिक करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: तुम्हीच असल्याची पडताळणी करा या पेजवर, माझ्या आधार तपशीलांची पडताळणी करण्यासाठी मी सहमत आहे > आधार ओटीपी जनरेट करा वर क्लिक करा.
स्टेप 6: आधारशी नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, तुम्हाला ई-फाइलिंग डॅशबोर्ड वर नेले जाईल.
तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आत्ता लिंक करा बटणावर क्लिक करा, अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.3 नेट बँकिंग वापरून लॉगिन करा (ई-फाइलिंग व्हॉल्ट पर्याय सक्षम असलेल्या प्रकरणांसह)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा. उच्च सुरक्षा पर्याय म्हणून नेट बँकिंग वापरत असल्यास, तुमचा वापरकर्ता आयडी, पासवर्ड प्रविष्ट करा, उच्च सुरक्षा पर्याय पेजवरील नेट बँकिंगद्वारे वर क्लिक करा आणि स्टेप 3 कडे जा.
स्टेप 2: तुम्ही ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय निवडला नसेल, तर पेजच्या तळाशी तुमचे खाते ॲक्सेस करण्याचे इतर मार्ग अंतर्गत असलेल्या नेट बँकिंग पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: पसंतीची बँक निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4: अस्वीकरण वाचा आणि समजून घ्या. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: तुमचा नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करा.
स्टेप 6: लॉगिन केल्यानंतर, बँकेच्या वेबसाइटवरील ई-फाइलिंग पोर्टलची लिंक निवडा. तुम्हाला ई-फाइलिंग डॅशबोर्ड वर नेले जाईल.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आत्ता लिंक करा बटणावर क्लिक करा, अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.4 बँक खाते / डीमॅट अकाउंट EVC वापरून लॉगिन करा (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केलेला असताना)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा या टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा पॅन प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या सुरक्षित ॲक्सेस संदेश चे पुष्टीकरण करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4: बँक खाते EVC / डीमॅट अकाउंट EVC निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: तुमच्याकडे EVC नसल्यास, EVC जनरेट करा वर क्लिक करा. . तुमच्या बँक / डिमॅट खात्याशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला EVC प्राप्त होईल.
टीप: तुमच्याकडे आधीपासून EVC असल्यास, माझ्याकडे आधीपासून EVC आहे हा पर्याय निवडा.
स्टेप 6: EVC प्रविष्ट करा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, तुम्हाला ई-फाइलिंग डॅशबोर्ड वर नेले जाईल.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आत्ता लिंक करा बटणावर क्लिक करा. अन्यथा, पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.5 DSC वापरून लॉगिन (ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केलेला असताना)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा या टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा पॅन प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या सुरक्षित ॲक्सेस संदेश चे पुष्टीकरण करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 4: DSC पर्याय निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: आवश्यकतेनुसार नवीन DSC किंवा नोंदणीकृत DSC निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी DSC नोंदणी करा या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.
स्टेप 6: मी एमसाईनर युटिलिटी डाउनलोड आणि इंस्टॉल केली आहे हा पर्याय निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: पेजच्या तळाशी असलेल्या हायपरलिंकचा वापर करून तुम्ही ही युटिलिटी डाउनलोड आणि इंस्टॉल करू शकता.
स्टेप 7: डेटा साइन पेजवर प्रदाता आणि प्रमाणपत्र निवडा. प्रदाता पासवर्ड प्रविष्ट करा आणि स्वाक्षरी करा वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर, तुम्हाला ई-फाइलिंग डॅशबोर्ड वर नेले जाईल.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, पॅन आधारशी लिंक केलेला नसल्यास, तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे तो निष्क्रिय करण्यात आला आहे, असा पॉप-अप संदेश दिसेल.
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी आत्ता लिंक करा बटणावर क्लिक करा, अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
3.6 करदात्यांव्यतिरिक्त इतर वापरकर्त्यांसाठी लॉग इन (सीए, TAN वापरकर्ता, ERI, बाह्य संस्था, ITDREIN वापरकर्ता)
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा आणि लॉगिन करा वर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा या टेक्स्टबॉक्समध्ये तुमचा वापरकर्ता आयडी प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप: विविध वापरकर्त्यांसाठीचे वापरकर्ता आयडी खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहेत:
|
अनुक्रमांक |
वापरकर्ता |
वापरकर्ता आयडी |
|
1 |
CA |
ARCA नंतर 6-अंकी सदस्यत्व क्रमांक |
|
2 |
कर कपातकर्ता आणि संकलक |
TAN |
|
3 |
ERI |
ERIP नंतर 6-अंकी क्रमांक, |
|
4 |
बाह्य एजन्सी |
EXTA नंतर 6-अंकी क्रमांक. |
|
5 |
ITDREIN वापरकर्ता |
अहवाल देणाऱ्या संस्थेचा पॅन/TAN, त्यानंतर 2 अक्षरे आणि 3 अंक; |
स्टेप 3: तुमच्या सुरक्षित ॲक्सेस संदेश चे पुष्टीकरण करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
पुढील प्रक्रियेसाठी खालील तक्त्याचा संदर्भ घ्या:
| ई-फाइलिंग पासवर्ड वापरून लॉगिन करणे | विभाग 3.1 चा संदर्भ घ्या |
| आधार ओटीपी वापरून लॉगिन करणे | विभाग 3.2 चा संदर्भ घ्या |
| नेट बँकिंग वापरून लॉगिन करणे | विभाग 3.3 चा संदर्भ घ्या |
| बँक खाते / डीमॅट अकाउंट EVC वापरून लॉगिन करणे | विभाग 3.4 चा संदर्भ घ्या |
| DSC वापरून लॉगिन करणे | विभाग 3.5 चा संदर्भ घ्या |
4. संबंधित विषय
- स्वतःची नोंदणी करा
- DSC ची नोंदणी करा
- ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा
- आधार लिंक करा
- माझे प्रोफाइल
- पासवर्ड रीसेट करा